बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा मागील काही महिन्यापासून होत्या. त्या चर्चा आता सत्यात उतरताना दिसत आहेत. कारण आपण पक्षांतराच्या विचारात आहे असे स्वतः दिलीप सोपल यांनी सांगितले आहे. कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन करून दिलीप सोपल यांनी पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार असल्याचे देखील म्हणले आहे.
भाजप नेत्याचा आरोप ; प्रियांका गांधी राहुल गांधींना राखी बांधत नाहीत
चार वेळा चार चिन्हावर निवडणूक जिंकण्याचा विक्रम ज्यांच्या नावे आहे असे बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी ठेवलेल्या आव्हान पुढे हातबल झाले आहेत. त्यांनी राजेंद्र राऊत यांच्याबद्दल वाढलेली लोकप्रियता आणि जनप्रतिसाद बघून जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे जनतेच्या मनात असणारा राष्ट्रवादीचा रोष आणि मोदींची लोकप्रियता याचा तोटा होऊ नये म्हणून पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.
चौथीच्या मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्यध्यपकाला बेड्या
बार्शीची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे शिवसेनेत जाऊन भाजपच्या राजेंद्र राऊत यांची गोची करण्याचा दिलीप सोपल यांचा डाव असावा. मात्र दिलीप सोपल कोणत्याही पक्षात जाऊन उभा राहिले तरी त्यांच्या विरोधात उभा राहणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाऊन तिथून तिकीट मिळवलं तर मी अपक्ष निवडणूक लढवणार असे राजेंद्र राऊत यांनी या आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे दिलीप सोपल यांचे पक्षांतर होणार का? बार्शीत कोणाची सरशी होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आगामी काळातच मिळू शकतात. तूर्तास दिलीप सोपल यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष ठेवणेच उचित ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group Link – http://bit.ly/2MX7ZOF
WhatsApp Nambar – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra http://bit.ly/2YCtGur
परिवहन मंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा करणाऱ्या ५०० रिक्षांवर कारवाही ; प्रकरण तापण्याची चिन्ह
खासदार सुनील तटकरेच्या कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
९ वेळा काँग्रेसचे लोकसभा खासदार राहिलेल्या नेत्याची मुलगी जाणार शिवसेनेत
पूरामुळे निवडणुका पुढे ढकण्याच्या मुद्दयांवर शरद पवारांनी केले हे विधान