ओमिक्रॉनचा धोका वाढला !! कर्नाटक नंतर आता ‘या’ राज्यात सापडला अजून एक रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा नवा व्हेरीएन्ट ओमिक्रोनचा भारतात शिरकाव झाला असून कर्नाटक नंतर आता गुजरात मधील जामनगर येथील एका 74 वर्षीय व्यक्तीला ओमीक्रोन ची लागण झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा देशात खळबळ उडाली असून चिंतेत भर पडली आहे.

सदर व्यक्ती ही 74 वर्षीय असून 28 नोव्हेंबर ला ते अहमदाबाद विमानतळावर उतरून जामनगर ला गेला होता. झिम्बॉम्बे ते दुबई ते अहमदाबाद ते जामनगर असा प्रवास त्यांनी केला होता. त्याचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला असून त्यात त्याला ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान यापूर्वी कर्नाटक येथे ओमीक्रोन चे 2 रुग्ण सापडलं होते. 66 आणि 46 वय वर्षे असलेली दोन्ही रुग्ण दक्षिण आफ्रिका येथून आले होते. या दोन्ही रुग्णात कोरोनाची सौम्य लक्षणं होती. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉननं संक्रमित रुग्ण आढळले आहेत.

You might also like