हॅलो महाराष्ट्र । BSNL च्या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन प्रमोशनल ऑफर अंतर्गत सर्व प्रीपेड योजनांमध्ये 25 टक्के अतिरिक्त डेटा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार या नव्या योजनेत सर्व विद्यमान व स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STV) यासह अतिरिक्त डेटा देण्यात येईल. या ऑफरचा लाभ ग्राहक 31 ऑक्टोबरपर्यंत घेऊ शकतात. टेलिकॉम प्रोव्हायडरने BSNL च्या 20 वर्षांच्या ‘‘Customer Delight Month’ सोहळ्याअंतर्गत 25 टक्के डेटा ऑफर सुरू केली आहे.
BSNL च्या तमिळनाडूच्या वेबसाईटवर या ऑफरविषयी माहिती देणारे सर्कुलर जारी करण्यात आले होते. या व्यतिरिक्त कंपनीच्या राजस्थान, पंजाब आणि तेलंगनाच्या ट्विटर अकाउंटवरही ही घोषणा करण्यात आली आहे.
बेसिक डेटा व्यतिरिक्त, 25 टक्के डेटा उपलब्ध असेल.
BSNL ने याची पुष्टी केली आहे की, हे 25% एक्स्ट्रा डेटा बेनिफिट सर्व सर्कल्समध्ये उपलब्ध असेल. या डेटा ऑफरअंतर्गत सर्व अस्तित्त्वात असलेल्या आणि नव्या योजनांना याचा फायदा होईल. यामध्ये स्पेशल टॅरिफ व्हाउचरचा समावेश आहे. याचा अर्थ असा आहे की, युझर्सच्या योजनेत उपलब्ध बेसिक डेटाव्यतिरिक्त 25 टक्के डेटा उपलब्ध असेल. ही प्रमोशनल ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत लाइव्ह आहे.
चेन्नई सर्कलसाठी 49 रुपये वाला प्रीपेड प्लॅन
BSNL ने चेन्नई सर्कलमध्ये 49 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सुरू केला होता. या योजनेत 100 मिनिटांचे फ्री कॉलिंग उपलब्ध आहे. FUP लिमिट संपल्यानंतर, युझर्सना प्रति मिनिट 45 पैसे कॉल करण्यासाठी द्यावे लागतील. या प्रीपेड रिचार्ज प्लॅन मध्ये 2 जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस देखील उपलब्ध आहेत. BSNL चा हा प्रीपेड प्लॅन 29 नोव्हेंबरपर्यंत ऍक्टिव्ह राहील, असे दूरसंचार कंपनीने म्हटले आहे.
499 रुपयांचा Work@Home ची व्हॅलिडिटीही वाढली
499 रुपयांच्या Work@Home प्रमोशनल ब्रॉडबँड योजनेबद्दल बोलायचे, तर अंदमान आणि निकोबार सर्कल वगळता सर्व सर्कलमध्ये त्याची व्हॅलिडिटी वाढविण्यात आली आहे. या योजनेत, युझर्सना 90 दिवसांसाठी फ्री इंटरनेट मिळते. Work@Home ब्रॉडबँड प्लॅन मध्ये दररोज 10 एमबीपीएस स्पीडसह 5 जीबी डेटा मिळतो. लिमिट संपल्यानंतर त्याचा स्पीड 1 एमबीपीएस पर्यंत कमी होतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.