SBI शाखेत चोरट्यांचा गोळीबार; 2 लाख 50 हजार रुपये पळवले, एका कर्मचार्‍याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतल्या दहीसर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच बँकेच्या शाखेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. या घटनेत मास्क घातलेले दोनजण बँकेत आले. त्यांनी बँकेत असलेले कर्मचारी संदेश गोमरे यांच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकाण्यास सुरूवात केली. मात्र संदेश गोमरे यांनी चोरट्यांना प्रतीकार केला. यादरम्यान या चोरटयांनी संदेश गोमरे यांच्यावर गोळीबार केला आणि त्या ठिकाणाहून फरार झाले.

पैशांची बॅग लुटण्याआधी संदेश गोमरेवर चोरटयांनी गोळीबार केला होता. संदेश यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे दोघे चोरटे पायी आले होते. हे चोरटे संदेशकडे असलेली अडीच लाखांची रक्कम घेऊन पसार झाले. या झटापटीत संदेश यांचा मृत्यू झाला आहे तर एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चोरटयांनी हा गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. हि घटना दुपारी 4 च्या सुमारास घडली.

या दरोड्या संदर्भात प्रवीण दरेकर काय म्हणाले ?
‘अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. मंगळवारी मी कायदा सुव्यस्थेवर अंतिम आठवडा प्रस्ताव आणला होता. अशात दहीसरमध्ये हा दरोडा टाकला गेला. अशा प्रकारे बँक लुटण्यासाठी गोळीबार होत असेल तर कसे जगायचे? असा प्रश्न दरेकरांनी उपस्थित केला. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? याला राज्य सरकार जबाबदार आहे. गुन्हेगाराचा धीर चेपला तर अराजकता माजेल. मी त्याठिकाणच्या डिसीपी यांच्यासोबत बोललो असून त्यांना या दरोड्याची चौकशी करण्यास सांगितले आहे असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Leave a Comment