हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील न्यू साउथ वेल्सच्या किनाऱ्यावर रविवारी एका १०० फूट लांबीच्या शार्कने एका ६० वर्षीय सर्फरवर हल्ला केला ज्यामध्ये सर्फरचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, तेथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी या सर्फरला मदत करण्यासाठी आणि शार्कशी लढण्याचा प्रयत्न केला. या जखमी व्यक्तीला साऊथ किंग्जक्लिफमधील सॉल्ट बीच किनाऱ्यावर आणण्यात आले. मात्र, काही तासांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
समुद्रकिनारे २४ तासांसाठी बंद
या घटनेनंतर लोकांना शार्कच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी जवळच्या समुद्रकिनार्यावरुन जलतरणपटू आणि सर्फर यांना काढले गेले. तसेच आजूबाजूचे सर्व समुद्रकिनारे हे २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत.
शार्कने यापूर्वीही एका २३ वर्षीय व्यक्तीची शिकार केली होती
गेल्या जानेवारीत पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीच्या एस्प्रेन्सजवळ एका डायवरचा याचप्रकारे मृत्यू झाला होता. एप्रिलमध्येही एका शार्कने ग्रेट बॅरियर रीफवर एका २३ वर्षीय वन्यजीव कर्मचाऱ्याची शिकार केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.