हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Fraud : आजचा काळ हा डिजिटलायझेशनचा आहे. ज्यामुळे आता बँकाकडूनही डिजिटल बँकिंगच्या अनेक सर्व्हिस सुरु केल्या गेल्या आहेत. आता बँकेशी संबंधित अनेक कामे घरबसल्या अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण करता येतात. ज्यामुळे लोकांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवण्यात मदत झाली आहे.
मात्र ज्याप्रमाणे डिजिटल ट्रान्सझॅक्शन वाढले आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. डिजिटल बँकिंगचा आपल्याला खूप फायदा होत आहे. मात्र असे असले तरी डिजिटल बँकिंगमुळे आपली सुरक्षितता नेहमीच धोक्यात आली आहे. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची खाती रिकामी करत आहेत. Online Fraud
ऑनलाइन फसवणुकीबाबत सूचना
मात्र, पोलीस प्रशासनापासून बँका आणि अनेक वित्तीय संस्था लोकांना ऑनलाइन फसवणुकीबाबत वेळोवेळी सावध करत असतात. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने देखील लोकांना बनावट मेसेजेसबाबत सावध राहण्यास सांगितले आहे.
SBI ने आपल्या एका मेसेजमध्ये सांगितले की,”जर एखाद्या युझरला त्याचे बँक खाते ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल तर तो मेसेज पूर्णपणे बनावट आहे. अशा मेल किंवा मेसेजेसना कधीही रिप्लाय देऊ नका. असे बनावट मेसेज मिळाल्यावर [email protected] वर तक्रार नोंदवा. Online Fraud
अशा प्रकारे ऑनलाइन फसवणूक टाळता येईल
अनोळखी नावांवरील ईमेल, SMS मधील लिंक किंवा अटॅचमेंटवर कधीही क्लिक करू नका.
लॉटरी जिंकणे, इन्कम टॅक्स वाचवणे, अपेक्षेपेक्षा जास्त सवलत किंवा फ्री गिफ्ट्सच्या अशा प्रलोभनाला भुलू नका.
कोणत्याही व्यक्तीसोबत आपले बँक खाते, ATM किंवा डेबिट कार्ड क्रमांक, पासवर्ड आणि OTP शेअर करू नका.
आपला पासवर्ड वेळोवेळी बदला.
सार्वजनिक ठिकाणी देण्यात येणाऱ्या फ्री वाय-फाय वर पैशांचे व्यवहार करू नका. Online Fraud
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://cybercrime.gov.in/
हे पण वाचा :
IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर ‘हा’ संघ होणार होणार चॅम्पियन, जाणून घ्या काय आहे नवीन नियम
Tax Saving :’या’ योजनांमध्ये गुंतवणूक करून मजबूत रिटर्नसह मिळवा टॅक्स सूट !!!
SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!
Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!
मास्क्ड Aadhar Card म्हणजे काय ??? अशाप्रकारे करा डाउनलोड