हिंमत असेल तर उद्धव ठाकरे अजितदादांवर कारवाई करणार का? चंद्रकांत पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी सोलापुरात मात्र अजित पवारांच्या सभेत जोरदार गर्दी केली होती. यावरून भाजपा आक्रमक झाली असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांवर कारवाई करणार का असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

एका अर्थाने मोगलाई आली आहे….हम करे सो कायदा. आम्ही कसलेही कायदे पाळणार नाही असं…शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आम्ही सहकार्य करत आहोतच ना…आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर कारवाई करा मग…आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत,” असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रसारासाठी अजितदादा गेले असून अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपवर निशाणा साधला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like