औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीबाबत भाकीत केले आहे. राज्यातील जनता सरकारच्या धोरणावर नाखूष आहे. हा रोष मतदानांतून बाहेर येणार आहे. पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला झाला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर निश्चित आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणूक होण्याआधी देखील मोदींच्या विरोधात वातावरण होते. केंद्र सरकारच्या धोरणावर लोक नाराज होते. मात्र पुलवामा हल्ला झाला आणि देशात कमालीचे वातावरण बदलले. त्यामुळे मोदींचे सरकार पुन्हा सत्तेत आले. हा हल्ला नेमका कोणी घडवला या बद्दल काहीच सांगता येत नाही. लष्कराचे अधिकारी हा हल्ला केला की करवला याबद्दल संभ्रमात आहेत. त्यामुळे आसा हल्ला जर विधानसभा निवडणुकीपूर्वी झाला नाही तर राज्यातील सत्ता बदल अटळ आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.
नाशिकच्या सभेत मोदींनी केलेली टीका निरर्थक आहे. मी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल बोललो होतो.. तेथील लष्कर आणि तेथील राज्यकर्ते तेथील जनतेला नेहमी फसवत असतात. तेथील लोकांचे मत वेगळे आहे आणि तेथील सत्ताधारी आणि लष्कराचे मत वेगळे आहे असे मी म्हणालो होतो. त्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुकीचा अर्थ काढला आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.