Oppo A57e : Oppo ने लॉन्च केला बजट स्मार्टफोन; पहा फीचर्स आणि किंमत

Oppo A57e
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोबाईल (Oppo A57e) फोनच वेड सर्वश्रुत आहे. नवनवीन मोबाइल घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी ओप्पो ने आपला नवा स्मार्टफोन OPPO A57e भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन नुकत्याच लाँच झालेल्या OPPO A57 सारखाच आहे. अत्यंत बजट मध्ये असलेला ओप्पोचा हा स्मार्टफोन अनेक वैशिष्टयांनी सुसज्ज आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स, किंमत इत्यादींबद्दल..

वैशिष्ट्ये-

या स्मार्टफोनला 6.56-इंचाचा एचडी प्लस IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर A57e मध्ये MediaTek Helio G35 चिप देण्यात आली आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.

Oppo A57e

कॅमेरा- (Oppo A57e) 

मोबाईलच्या कॅमेरा बद्दल सांगायचे तर, या OPPO स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा असलेला डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनला 5,000mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo A57e

या स्मार्टफोन मध्ये  ब्लूटूथ व्हर्जन 5.2, 3.5mm हेडफोन जॅक, 4G, वाय-फाय आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये अल्ट्रा लिनियर स्टीरिओ स्पीकर देण्यात आला आहे.

Oppo A57e

OPPO A57e किंमत आणि उपलब्धता

ओप्पो च्या या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, OPPO A57e च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. सध्या हा मोबाईल हिरव्या आणि काळ्या रंगात उपलब्ध असून विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

हे पण वाचा : 

Facebook वरील पोस्ट एडिट, डिलीट किंवा रिस्टोअर कशी करावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

Redmi Note 11 SE चा पहिला सेल आजपासून सुरु, जाणून घ्या या स्वस्त स्मार्टफोनचे 10 फीचर्स !!!

Samsung मोबाईल पेक्षाही कमी किंमतीत मिळते ही Electric कार; कुठे होतेय विक्री??

Samsung Galaxy A04 : 50 MP कॅमेरा, 5,000mAh च्या बॅटरीसह Sumsung ने लॉन्च केला दमदार मोबाईल

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत