व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना; माजी मंत्र्यांची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस- राष्ट्रवादी सोबत संघर्ष करून शिवसेना मोठी केली आणि उद्धव ठाकरे सत्तेसाठी शरद पवार यांच्या मांडीवर आणि सोनिया गांधी यांच्या पायाशी बसले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना आहे अशी जळजळीत टीका शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शिवसेना भाजप युती म्हणून तुम्ही लढला. पण मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलं आणि शिवसेनेशी बेईमानी केली. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि हे आमदार गद्दार नाहीत तर तुम्हीच गद्दार आहात अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयात फक्त ३ वेळा आले, त्यांची गिनीच बुकात नोंद आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

उद्धव ठाकरे हे मराठा द्वेष्टे आहेत. त्यांना मराठा व्यक्ती मोठा झालेला आवडत नाही. हे आपण जबाबदारीने बोलत आहोत, कारण मी हे खूप जवळून बघितलं आहे असेही रामदास कदम यांनी म्हंटल इथून पुढे जिथे जिथे आदित्य आणि उद्धव ठाकरे सभा घेतील तिथे तिथे हा रामदास कदम सभा घेणार आणि घरे गद्दार कोण आहेत? खरे खोकेवाले कोण आहेत हे जनतेला सांगणार असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.