हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे येथील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची याप्रकरणी ईडीकडून गेली साडेसहा तास झाले चौकशी केली सुरु आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. स्वतः खडसेंनी माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचे सांगत भाजपचे अप्रत्यक्ष नाव घेतले होते. यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, मी काय आदींचा प्रवक्ता नाही. ईडीला बोलायचं ते बोलेल.”
खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजपलाच राष्ट्रवादीकडून टार्गेट केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहार. खडसेंच्या ईडी चौकशीवरून त्यांनी म्हंटले आहे कि, “भाजपमधून बाहेर पडल्यास काय त्रास होतो हे त्यांना दाखवायचे आहे. हा भाजपचा एक प्रकारचा टॅक्टिक्सचा भाग आहे.” असेही म्हंटले.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल आहे. त्यांनी म्हंटल आहे कि, एकनाथ खडसे यांच्यावर जी काही ईडीने कारवाई केली आहे. तोएक प्रकारचा कायदेशीर भाग आहे. ईडी आपलं काम जायदेशीर पद्धतीने करीत आहे. कायदा आपलं काम करतोय. भाजपमध्ये अशा प्रकारचे सुडाचे राजकारण केले जात नाही.