TikTok ताब्यात घेण्यासाठीच्या स्पर्धेत Oracle ने मारली बाजी, Microsoft चा प्रस्ताव फेटाळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक मिळवण्याच्या शर्यतीत Oracle ने Microsoft ला हरवले. सत्या नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टची टिकटॉकला घेण्याची बोली नाकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या अमेरिकन ऑपरेशनच्या विक्रीसाठी 20 सप्टेंबरची अंतिम मुदत निश्चित केली. 20 सप्टेंबरपर्यंत जर एखाद्या अमेरिकन कंपनीला टिकटॉक विकले गेले नाही तर अॅपवर बंदी घातली जाईल असे ट्रम्प म्हणाले.

मायक्रोसॉफ्टची ऑफर नाकारली
सूत्रांनी रविवारी सांगितले की, टिकटॉकच्या मालकीच्या कंपनीने या करारासाठी मायक्रोसॉफ्टऐवजी ओरॅकलला निवडले आहे. या करारामुळे अमेरिकेतील हे लोकप्रिय अॅप ट्रेंडमध्ये राहू शकते. मायक्रोसॉफ्टने रविवारी सांगितले की, टिकटॉकची मालकी असलेली चीनची कंपनी बाईटडन्सने त्यांना सांगितले आहे की, या अधिग्रहणासाठीची बोली नाकारली गेली आहे. मायक्रोसॉफ्ट म्हणाले,”आम्हाला विश्वास आहे की, आमची ऑफर टिकटॉकच्या युझर्ससाठी चांगली आहे. त्याचबरोबर आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या हितांचेही संरक्षण करू.”

ओरॅकल घेणार टिकटॉक
दरम्यान, द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, टिकटॉकने तंत्रज्ञान भागीदार म्हणून ओरॅकलची निवड (Oracle) सोशल मीडिया अॅपमधील बहुसंख्य हिस्सा संपादन केल्यामुळे आहे की नाही हे अस्पष्ट आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असे म्हटले आहे की, टिकटॉकचा तंत्रज्ञान भागीदार म्हणून ओरॅकल जाहीर केले जाईल. या कराराला सरळ विक्री म्हणता येणार नाही.

यापूर्वी वॉलमार्टने या संपादनात मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी करण्याची तयारी दर्शविली होती. वॉलमार्टने रविवारी सांगितले की,”टिकटॉकमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये आपल्याला स्वारस्य आहे आणि ते बाईटडन्स आणि अन्य पक्षांशी बोलणी करत आहेत.

यापूर्वी, ट्रम्प प्रशासनाने बाईटडन्सला 20 सप्टेंबरपर्यंत टिकटॉक वर बंदी घालण्याचा इशारा देत अमेरिकेत आपला व्यवसाय विक्रीचा इशारा दिला होता. ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे की, ‘टिकटॉक अॅपवर चीनची मालकी असल्यामुळे हे अॅप अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.