ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Covishield च्या मानवी चाचण्यांची अंतिम फेरी सोमवारपासून पुण्यात सुरू होत आहे

0
62
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । भारतात दररोज कोरोनाव्हायरसच्या नवीन पॉझिटिव्ह संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशात आतापर्यंत कारोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी 42 लाखांहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. त्याचबरोबर 85 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. देश आतुरतेने कोरोना विषाणूच्या लसीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, एक चांगली बातमी आली आहे की, ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोविड -१९ व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायलच्या तिसर्‍या आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी पुण्यात ट्रायल सुरू होईल.

पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये सीरम इंडिया ह्यूमन ट्रायल घेईल
ऑक्सफोर्ड विद्यापीठाची व्हॅक्सीन मॅन्‍युफॅक्‍चरिंग पार्टनर, भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ह्यूमन ट्रायलसाठी सज्ज झाली आहे. कोविशील्ड (Covishield) च्या ह्यूमन ट्रायलचा तिसरा टप्पा पुण्यातील ससून जनरल रुग्णालयात सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. कोविशील्ड या लसीची ट्रायल घेण्यासाठी बरेच वॉलेंटियर्स पुढे आलेले आहेत. सुमारे दीडशे ते दोनशे जणांना या लसीचा डोस दिला जाईल. ससून रुग्णालयाने ट्रायलच्या शेवटच्या फेरीसाठी वॉलेंटियर्सची नावनोंदणी करण्यास सुरवात केली आहे.

DCGI ने काही अटींसह दिली आहे ट्रायलसाठी परवानगी
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व केईएम रुग्णालयात या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली ही लस तयार करण्यासाठी सीरम इंडियाने फार्मा कंपनी अॅस्ट्रॅजेनेकाशी करार केला आहे. 15 सप्टेंबर रोजी, कोविशील्डची ट्रायल पुन्हा सुरू करण्यासाठी सीआरम इंडियाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) डॉ. व्ही.जी. सोमानी यांनी मंजूरी दिली. यासाठीच्या तपासादरम्यान अतिरिक्त लक्ष देण्यासह DCGI ने अनेक अटी घातल्या आहेत.

DCGI ने 11 सप्टेंबर रोजी ट्रायलसाठी बंदी घातली
DCGI नेही सीरम इंडियाला प्रतिकूल परिस्थितीत नियमांनुसार करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती देण्यास सांगितले आहे. 11 सप्टेंबर रोजी DCGI ने कोविड -१९ च्या संभाव्य लसीची चाचणी थांबविण्याचे निर्देश सीरम इंडियाला दिले होते. या अभ्यासामधील एका व्यक्तीची तब्येत अचानक बिघडल्यानंतर अॅस्ट्रॅजेनेकाने इतर देशातील चाचणीही थांबविली होती. या व्यतिरिक्त या लसीची चाचणी ब्रिटन, अमेरिका, ब्राझील आणि इतर देशांमध्ये सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here