मोठी बातमी ! कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात रेल्वे पूर्ण ताकदीनं उतरत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली.

पियुष गोयल म्हणाले. महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये रेल्वेच्या डब्यांचं रुपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेकडून आयसोलेशन कोचमध्ये एसीची देखील सोय करण्यात आली आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा फटका देशात सर्वाधिक बसला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री गोयल यांनी रेल्वेची आयसोलेशन सेवा नंदुरबार जिल्ह्यात सुरु केल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

शनिवारी महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रेल्वेचे आयसोलेशन कोच फायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्रात शनिवारी 67 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. त्यापार्श्वभूमीवर रेल्वे देखील कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरली आहे.
राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने हीऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) टँकर रेल्वेने हलवू शकतात का याचा शोध घेण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे संपर्क साधला होता. रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रोरो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल, असं रेल्वेने सुचवलं.

17 एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी,  राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक पार पडली. टँकर हे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडून दिले जातील, असा निर्णय झाला. रिकामे टँकर कळंबोली / बोईसर रेल्वे स्थानकांमधून ऑक्सिजन लोड करण्यासाठी वायझॅक आणि जमशेदपूर / रौरकेला / बोकारो येथे पाठविले जातील.

रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हर हेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादेमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी, रोड टँकर टी 1618 चे मॉडेल लावले जाणे शक्य असल्याचे आढळले. हे टँकरर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर ठेवले जाणार आहेत. वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेकडून घेण्यात आल्या आहेत.