Monday, December 15, 2025
Home Blog Page 1582

Satara News : पाचगणी-वाई रस्त्यावर चालत्या कारने घेतला पेट

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साताऱ्यातील वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. आगोमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील वाई-पाचगणी येथे मुंबईतील चार पर्यटक कारने फिरण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांची कार वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक आली असता कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी कारमधील प्रवासी कारमधून खाली उतरले. अचानक कारणे पेट घेतल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांसह कारमधील प्रवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारने जास्तच पेट घेतल्याने या घटनेची माहिती नागरिकांनी पाचगणी पोलीसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम केले जात आहे.

अचानक चालत्या कारला लागलेली आग शॉर्टसर्किटमुले लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कारने पेट घेतल्यानंतर महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये कार संपूर्ण जळून खाक झाली आहे.

WPL 2023 Auction : स्मृती मानधना RCB च्या संघात; तब्बल ‘इतक्या’ कोटींची लागली बोली

Smriti Mandhana RCB

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच होत असणाऱ्या महिला आयपीएल (WPL 2023 Auction) साठी आज खेळाडूंची लिलावप्रक्रिया सुरु आहे. यावेळी रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला आपल्या संघात सामील करून घेतले. तब्बल 3.40 रुपयांसह RCB च्या संघाने स्मृतीला संघात घेतलं. आत्तापर्यंत पार पडलेल्या लिलावादरम्यान स्मृती मानधना सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.

स्मृती मानधनाला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि आणि आरसीबीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर शेवटी आरसीबीने ही बोली जिंकली आणि मानधनाला संघात घेतलं. स्मृती मानधना RCB ची कर्णधार पदाची सुद्धा मुख्य दावेदार असू शकते. स्मृती मानधनाचा अनुभव RCB च्या संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

स्मृती मानधना ही जगातील सर्वोत्तम T20 फलंदाजांपैकी एक आहे. तिने आत्तापर्यंत ११२ टी-२० आपल्या बॅटने 27.32 च्या सरासरीने 2651 धावा केल्या आहेत. यामध्ये तिने 20 अर्धशतकेही झळकावली आहेत. याशिवाय महिला बिग बॅश लीग आणि द हंड्रेडमध्येही खेळली आहे.

कराडच्या 19 वर्षांपूर्वीच्या मोठ्या उड्डाणपूलावर पडला हातोडा

Flyover Demolition Work Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील 19 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवारी रात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. तत्पूर्वी पूल परिसरातील महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. पूल पाडण्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे.

कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याच्या कामास ८ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली. कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथील 2003 साली संबंधित उड्डाणपूल बांधण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री म्हणजेच रविवारी दि. 5 रोजी 12 नंतर सदरील उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून वाहतूक सुरू असल्याने नक्की पूल कधी पाडणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, काल रात्री संबंधित पूल पाडण्याच्याच कामास अधिक गती घेण्यात आली.

मागील आठवड्यात रविवारपासून दोन्ही उड्डाण पूल पाडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल पाडण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे. हा उड्डाण पूल पाडण्यासाठी जवळपास महिन्याचा अवधी लागणार आहे.

Karad flyover

त्यामुळेच कोयना पुलावरून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर कराड शहरात प्रवेश करण्यासाठी कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या वाहनांना वारूंजी फाट्यावरून कराडमध्ये यावे लागत आहे. त्यामुळेच जुन्या कोयना पुलावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे.

Karad flyover

60 कर्मचारी आणि 13 सीसीटीव्हीद्वारे कामावर ‘वॉच’

कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे काम सुरु असताना होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वारूंजी फाट्यापासून मलकापूरमधील डी मार्टपर्यंत वाहतूक पोलिसांसोबत संबंधित ठेकेदार कंपनीकडून 60 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 13 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कंट्रोल रूममधून वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असणारे पोलिस व अन्य कर्मचारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत.

Derivatives Contracts ला SEBI ची परवानगी

Derivatives contracts SEBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Derivatives Products जून 2000 मध्ये इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सपासून टप्प्याटप्प्याने सादर केली गेली आहेत. इंडेक्स ऑप्शन्स आणि स्टॉक ऑप्शन्स जून 2001 आणि जुलै 2001 मध्ये सादर केले गेले आणि त्यानंतर नोव्हेंबर 2001 मध्ये स्टॉक फ्युचर्स आले. डिसेंबर 2002 मध्ये डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगसाठी क्षेत्रीय निर्देशांकांना परवानगी देण्यात आली होती. डिसेंबर 2007 मध्ये SEBI ने Index (सेन्सेक्स आणि निफ्टी) वर मिनी डेरिव्हेटिव्ह (F&O) कराराला परवानगी दिली.

त्यांनतर पुढे जानेवारी 2008 मध्ये, दीर्घ कालावधीचे निर्देशांक पर्याय करार आणि अस्थिरता निर्देशांक आणि एप्रिल 2008 मध्ये, बाँड निर्देशांक सादर करण्यात आला. याव्यतिरिक्त, ऑगस्ट 2008 मध्ये, SEBI ने एक्सचेंज ट्रेडेड करन्सी डेरिव्हेटिव्हला परवानगी दिली.

1. इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स (Index Futures Contracts)

इंडेक्सवर आधारित फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजेच अंतर्निहित मालमत्ता ही इंडेक्स आहे ज्याला इंडेक्स फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ, निफ्टी इंडेक्स आणि बीएसई-३० इंडेक्सवर फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट. हे कॉन्ट्रॅक्ट अंतर्निहित निर्देशांकाच्या मूल्यापासून त्यांचे मूल्य प्राप्त करतात.

2. इंडेक्स ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स (Index Options Contracts) –

काही इंडेक्सवर आधारित असलेल्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सला इंडेक्स ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स म्हंटल जाते. इंडेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सच्या खरेदीदारास केवळ अधिकार आहेत परंतु expiry नंतर underlying index खरेदी/विक्री करण्याचे बंधन नाही. इंडेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट हे साधारणपणे युरोपियन स्टाईल ऑप्शन असतात म्हणजेच ते केवळ expiry डेटवरच वापरता येतात किंवा नियुक्त केले जाऊ शकतात.

3. स्टॉक ऑप्शन्स (Stock Options) –

स्टॉक ऑप्शन तुम्हाला भविष्यात ठराविक तारखेला ठराविक किंमतीला स्टॉकचे ठराविक शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देतो, परंतु जबाबदारी नाही.

4. स्टॉक फ्यूचर्स (Stock Futures) –

हे फ्यूचर्स एक प्रकारचे Derivatives contract आहेत जे एखाद्या विशिष्ट वस्तू मालमत्तेच्या किंवा सुरक्षिततेच्या खरेदी किंवा विक्रीसाठी भविष्यातील तारीख आणि किंमत specifies करते. फ्युचर्स एक्सचेंजेसवर, फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सचे व्यवहार केले जातात. ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट प्रमाणेच, फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये खरेदीदार आणि विक्रेता दोघांचा समावेश असतो.

5. क्षेत्रीय निर्देशांक (Sectoral Indices)-

जे निर्देशांक विशिष्ट क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात ते क्षेत्रीय निर्देशांक असतात

6. इंडेक्स ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स (Index options contracts) –

काही इंडेक्सवर आधारित असलेले ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स इंडेक्स ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट्स म्हणून ओळखले जातात. इंडेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्सच्या खरेदीदारास केवळ अधिकार आहे परंतु ते Expiry झाल्यानंतर अंतर्निहित निर्देशांकाची खरेदी/विक्री करण्याचे बंधन नाही. इंडेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट हे साधारणपणे युरोपियन स्टाईल पर्याय असतात म्हणजेच ते केवळ एक्सपायरी डेटवरच वापरता येतात किंवा नियुक्त केले जाऊ शकतात.

7. अस्थिरता निर्देशांक (Volatility Index) –

अस्थिरता निर्देशांक हे स्टॉक/इंडेक्स पर्यायांच्या किमतींद्वारे व्यक्त केलेल्या विशिष्ट कालावधीत अपेक्षित स्टॉक मार्केट अस्थिरतेचे मोजमाप आहे. हे निहित भविष्यातील अस्थिरतेवर बाजाराची सामूहिक भावना दर्शवते.

8. बाँड इंडेक्स (Bond Index) –

बाँड मार्केटची कामगिरी मोजण्यासाठी बाँड इंडेक्स वापरला जातो. निर्देशांकाचा वापर बेंचमार्क म्हणून केला जातो ज्याच्या विरुद्ध गुंतवणूक व्यवस्थापक त्यांच्या कामगिरीचे मोजमाप करतात. हे विविध मालमत्ता वर्गांच्या कामगिरीची तुलना करण्यासाठी एक उपाय म्हणून देखील वापरले जाते.

9. एक्सचेंज-ट्रेडेड करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज (Exchange-traded Currency Derivatives ) –

एक्सचेंज-ट्रेडेड डेरिव्हेटिव्ह बाजार अनेक सामान्य चलन जोड्यांमध्ये trading करतात. गुंतवणूकदार फ्युचर्स contracts किंवा options वापरून लॉन्ग किंवा शॉर्ट pairings करू शकतात.

5paisa सह पर्याय ट्रेडिंग सुरू करा.

LTTE प्रमुख प्रभाकरन जिवंत, लवकरच तो सर्वांसमोर येईल; कोणी केला दावा?

ltte prabhakaran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा प्रमुख (LTTE) वेलुपिल्लई प्रभाकरन अजूनही जिवंत आहे असा धक्कादायक दावा वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ तामिळचे अध्यक्ष पी नेदुमारन यांनी केला आहे. योग्य वेळ येताच प्रभाकरन जगासमोर येईल असेही नेदुमारन यांनी म्हटले आहे.

प्रभाकरन जिवंत आहे, ठीक आहे. असं नेदुमारन यांनी म्हंटल. तसेच प्रभाकरन यांचे कुटुंबही आपल्या सतत संपर्कात असून ते सुद्धा सुरक्षित असल्याचा दावाही नेदुमारन यांनी केला. प्रभारकनने संमती दिल्यांनतर मी ही माहिती सांगत आहे. लवकरच तो सर्वांसमोर येईल. त्यावेळी तामिळनाडूमधील सरकार, राजकीय पक्ष आणि जनतेने प्रभाकरनच्या पाठीशी उभे राहावं असं आवाहन नेदुमारन यांनी केले.

वेलुपिल्लई प्रभाकरन हा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. LTTE ने श्रीलंकेच्या उत्तरेला आणि पूर्वेला एक स्वतंत्र तमिळ राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. श्रीलंकेत तामिळ लोकांसाठी स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी LTTE ने 25 वर्षांहून अधिक काळ श्रीलंकेत युद्ध पुकारले. जवळपास तीन दशके लोकांना त्यांच्या दहशतीने घाबरवले. त्यानंतर 2009 मध्ये श्रीलंका सरकार आणि लष्कराने एलटीटीई प्रमुख प्रभाकरनची हत्या केली. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रभाकरनवर आहे

शरद पवार हे ओसाड गावचे पाटील; सदाभाऊंची टीका

sadabhau sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्गच्या अहवालानंतर अडचणीत आलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे. देशभरातील विरोधक सुद्धा या प्रकरणावर आक्रमक झाले असून केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पवारांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात शेतकऱ्याचे कौतुक नाही पण अदानीचे कौतुक केलं आहे असं म्हणत पवार हे ओसाड गावचे पाटील अशी टीका त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ म्हणाले, आज अदानीच्या नावाने गळा काढत असताना शरद पवारांनी आपले लोक माझे सांगाती हे पुस्तक वाचावे. पवार साहेबानी त्यांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचं कौतुक केलं नाही पण गौतम अदानीचे कौतुक केलं आहे. अदानी हा कष्टाळू पोरगा असं त्यात म्हंटल आहे. पवारसाहेब हे ओसाड गावचे पाटील असून, त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही. त्यामुळे ते बोलू शकतात. कारण बोलणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं अशी बोचरी टीका खोत यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत हे टाइम पास चॅनल असल्याचं सदाभाऊंनी म्हंटल. तसेच राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागे अजित पवार हेच कारण आहे कारण त्यांचाच मुहूर्त अजून ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा? असा टोलाही त्यांनी लगावला.

दादा मला माफ करा, गौतमीने हात जोडत मागितली अजितदादांची माफी; नेमकं प्रकरण काय?

Gautami Patil NCP Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून लावणी म्हंटल कि एकच नाव लोकांच्या तोंडी निघत आहे ते म्हणजे गौतमी पाटील होय. महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चांगलीच चर्चा आहे. गौतमीच्या डान्सने तरुणांना अक्षरश: वेड लावले आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना विरोध होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, असे कार्यकर्त्यांना ताकीद दिल्यानंतर गौतमी पाटीलने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीने दादांची हात जोडून माफी मागितली असून “दादा माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा,” असे गौतमीने म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/Cnhh4XrtJ7Q/?utm_source=ig_web_copy_link

नुकतीच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता. मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली होती. यानंतर अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

दरम्यान, अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली. ‘याआधी माझ्याकडून काही चुका झाल्या. मात्र, लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासून माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी अश्चील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा’, असे गौतमीने म्हटले आहे.

अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही? असे गौतमी हिने म्हंटले आहे.

Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड

Banking Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Banking Rules : बँकेमध्ये बचत खाते असणे हि काळाची गरज आहे. देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे बँकेचे बचत खाते आहे. याशिवाय बँकादेखील नागरिकांना बचत खाते उघडण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहेत. मात्र कोरोना काळानंतर बँकेच्या खात्यात किमान शिल्लक ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जर आपण किमान शिल्लक ठेवली नाही तर आपल्याला दंड देखील भरावा लागेल. हे जाणून घ्या कि, बँकांकडून आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र या सुविधांसोबतच ग्राहकांना काही नियमांचेही पालनही करावे लागते. यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमान शिल्लक राखणे. मात्र प्रत्येक बँकेची किमान शिल्लक राखण्याची मर्यादा वेगवेगळी असते. जर ग्राहकाने आपल्या खात्यानुसार किमान शिल्लक राखली गेली नाही तर संबंधित बँक त्याच्याकडून दंड वसूल करेल.

SBI says no minimum balance penalty, SMS charges on all savings accounts |  Mint

स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रदेशानुसार आपल्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम केला आहे. ज्यानुसार आता ग्रामीण भागासाठी 1,000 रुपये तर निमशहरी भागातील ग्राहकांना खात्यामध्ये 2,000 रुपये ठेवावे लागतील. तसेच मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3,000 रुपये आहे. Banking Rules

HDFC Bank reorganises business verticals, digital to form backbone - The  Economic Times

HDFC बँक खातेधारकांसाठी किमान शिल्लक राखण्याचा नियम

एचडीएफसी बँकेतील सरासरी किमान शिल्लक राखण्याची मर्यादा देखील ग्राहकाच्या लोकेशनवर अवलंबून आहे. ज्यानुसार शहरांमध्ये ही मर्यादा 10,000 रुपये, निमशहरी भागामध्ये 5,000 रुपये तर ग्रामीण भागामध्ये 2,500 रुपये आहे. Banking Rules

ICICI Bank stock hits all-time high as market rebounds after two sessions -  BusinessToday

ICICI बँक खातेधारकांसाठी किमान शिल्लक राखण्याचा नियम

ICICI बँकेने प्रदेशानुसार आपल्या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम निश्चित केला आहे. ज्यानुसार शहरी भागासाठी 10,000 रुपये, निमशहरी भागासाठी 5,000 रुपये तर ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये इतकी मर्यादा आहे. Banking Rules

किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना दंड

सध्या बँकेच्या खात्यामध्ये किमान शिल्लक न राखल्यास दंड भरावा लागतो. मात्र येत्या काळात सर्व काही ठीक झाले तर बँकेच्या खात्यामध्ये किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वास्तविक, अर्थ राज्यमंत्री भागवत किशनराव कराड यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले होते की,” किमान शिल्लक न ठेवणाऱ्या खात्यांवरील दंड रद्द करण्याचा निर्णय बँकांचे संचालक मंडळ घेऊ शकतात.” एका प्रश्नाच्या उत्तरात कराड श्रीनगरमध्ये त्यांनी म्हंटले कि, “बँका या स्वतंत्र संस्था आहेत. त्यांचे संचालक मंडळ दंड माफ करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.” Banking Rules

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/accounts/saving-account/basic-savings-bank-deposit-account

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

रामकृष्ण वेताळ संघाने कोरले छत्रपती शिवाजी महाराज चषकावर नाव

Ramakrishna Vetal Karad team cricket

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सुरू असलेल्या त्रिनय स्पोर्ट्स प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘रामकृष्ण वेताळ 11 कराड उत्तर’ या संघाने बाजी मारली. या संघाचा अंतिम सामना ‘श्री 11’ या संघाबरोबर पार पडला. यावेळी अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रामकृष्ण वेताळ ११ कराड उत्तर या संघाने नेत्रदीपक असा विजय मिळवला आणि प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले.

त्रिनय स्पोर्ट्स कराड आणि नाना फौजी यांच्यावतीने संबंधित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 28 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यानंतर विजयी संघाला करंडक आणि रोख बक्षीस देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक अतुल शिंदे, कराड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पोपटराव साळुंखे, नगरसेवक राजू मुल्ला, भाजप किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, नयन निकम, कराड तालुका अध्यक्ष सूर्यकांत पडवळ, स्वप्निल हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होती. विजेत्या संघातील खेळाडूंसह रामकृष्ण वेताळ यांनी हा करंडक स्वीकारला. यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रथमच सहभागी झालेल्या या संघाला पहिल्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चषकवर आपले नाव कोरून वेगळा इतिहास निर्माण केला आहे.