Monday, December 15, 2025
Home Blog Page 1583

Instagram वर ब्लु टिक पाहिजे? अशाप्रकारे करा Apply

instagram blue tick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंस्टाग्राम हे एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरातील अनेक तरुण- तरुणी इंस्टाग्रामचा वापर करत आहेत. याशिवाय, अनेक बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटू यांसारखे दिग्गज आणि प्रसिद्ध लोक सुद्धा इंस्टाग्रामवर आपल्या पोस्ट्स शेअर करत असतात. आपले अकाउंट अजून चांगलं ठेवण्यासाठी कंपनी इंस्टाग्राम ब्लू टिक घेण्याची परवानगी देखील देते. मात्र यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. येथे आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामवर ब्लू टिक कसे मिळवायचे त्याबाबत माहिती सांगणार आहोत.

इंस्टाग्रामवर प्रसिद्ध लोक किंवा काही ठराविक यूजर्सना ब्लु टिक दिली जाते. यूजर्सच्या नावापुढे ब्लु टिक लागल्याने सदर अकाउंट हे ओरिजिनल आहे आणि इंस्टाग्रामने सुद्धा ते कन्फर्म केलं आहे हे स्पष्ट होते. आपल्या अकॉउंटचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी, तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला सरकारने जारी केलेले फोटो ओळखपत्र देखील सब्मिट करावे लागेल. जर तुमच्याकडे बिझनेस प्रोफाईल असेल तर तुम्हाला बिझनेसशी संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील.

इंस्टाग्रामवर ब्ल्यू टिकसाठी केलेला अर्जही अनेकदा फेटाळला सुद्धा जाऊ जातो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी तुमचे खाते पूर्ण केल्याची खात्री करा. त्यानंतर ब्लू टिकसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अकाउंट सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनच्या ऑप्शन वर क्लीक करा. येथे सर्व डिटेल्स दिल्यानंतर, तुम्हाला जी काही कागदपत्रे आवश्यक आहेत ती जमा करावी लागतील. वेरिफिकेशन रिक्वेस्ट केल्यांनतर काहीवेळ तुम्हाला वाट पाहावी लागेल. कंपनीकडून तुम्हाला नोटिफिकेशन आणि मेल येईल. अकाउंट वेरिफाइड झाल्यांनतर तुमच्या नावापुढे ब्लु टिक दिसेल.

मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग; दोघांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई येथील मालाड परिसरात मोठी दुर्घटना घडली असून एका झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील मालाड पुर्व परिसरात जामरुशी नगर मध्ये आज सकाळी झोपडपट्टीला आग लागली. झोपडपट्टी असलेल्या विभागात एका घरात आग लागली आणि तेथुन ती हळूहळू परिसरात पसरली. आगीसार धुराचे लोट परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी घरेलू गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन व नागरिकांकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पहा आपल्या शहरातील आजचे नवीन दर

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, देशांतर्गत वायदे बाजारात सोन्यामध्ये किंचित मजबूती दिसून येत आहे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सचे दर 29 रुपयांच्या मजबूतीसह 56, 770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेड करत आहेत. त्याच वेळी, MCX वर मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सचे दर 396 रुपयांच्या घसरणीसह 66,268 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

इथे हे जाणून घ्या कि, गेल्या ट्रेडिंग सत्रात एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सचे दर 56,741 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​स्थिरावले होते. त्याचवेळी मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सचे दर किलोमागे 66,664 रुपयांवर बंद झाले होते.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 6.00 डॉलर्सने घसरून 1,859.59 डॉलर प्रति औंस वर तर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.17 टक्क्यांनी घसरून $ 21.84 प्रति औंस वर ट्रेड करत आहे.  Gold Price Today

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,500 रुपये
पुणे – 52,500 रुपये
नागपूर – 52,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 57,230 रुपये
पुणे – 57,230 रुपये
नागपूर – 57,230 रुपये

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात ग्राहकांना किंचित दिलासा; सोन्याचे दर आजही स्थिर

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

हे पण वाचा :

CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता

पुण्यातील Google चे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Google Office

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात असलेले गुगलचे ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क येथबॉम्ब असल्याचा फोन मुंबईतील गुगलच्या कार्यालयात आला होता. यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही प्रकाराची बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली नाही. पोलिसांनी या प्रकरणी एकाला हैद्राबाद येथून अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील मुंढवा परिसरातील पुनावाला इमारतीमध्ये शेवटच्या मजल्यावर गुगलचे ऑफिस आहे. दोन महिन्यांपूर्वीच गुगलचे हे ऑफिस सुरु करण्यात आले होते. मात्र, मुंबईत असलेल्या गुगलच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन केला. आणि पुण्यातील गुगलच्या ऑफिसखाली बॉम्ब ठेवला असल्याचे सांगितले. माहिती मिळताच तात्काळ मुंबईच्या गुगल ऑफिसने पुणे पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर मुंढवा पोलिसांनी तात्काळ गुगलच्या इमारतीमध्ये जाऊन तपास सुरु केला. मात्र, तपासामध्ये कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही.

दरम्यान, धमकीचा फोन आल्यांतर मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत हैद्राबाद येथून एकाला अटक केली आहे. बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीअंती पोलिसांनी शिवानंदविरोधात 505 (1) (ब) व 506 (2) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिवानंदने मुंबईच्या गुगल ऑफिसमध्ये फोन करत पुणे गुगलच्या ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती.

जोडीदारासोबत व्हेलेंटाईन डे साजरा करायचाय? गोव्यातील या TOP 6 ठिकाणी नक्कीच भेट द्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या व्हेलेंटाईन वीक सुरु आहे. त्यामुळे या वीकमध्ये तुम्हीही जर आपल्या जोडीदारासोबत गोव्याला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशी खूप सुंदर व रोमॅंटिक ठिकाणं पहायला मिळती. आम्ही तुमच्यासाठी अशीच गोव्यातील खास TOP 6 अशी ठिकाणे घेऊन आलेलो आहोत. पाहूया काय आहेत ठिकाणाची वैशिष्टये…

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांप्रमाणे गोवा हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य ठिकाण वर्षातील बाराही महिने या ठिकाणी पर्यटकांची व कपल्सची कायम गर्दी असते. सध्या रोमॅंटिक असा फेब्रुवारी महिना सुरु असून या महिन्यातील व्हेलेंटाईन वीकमध्ये अनेकी कपल, मित्र-मैत्रिणी गोव्याला फिरायला येतात. त्यांना या ठिकाणी काही खास अशी ठिकाणे आहेत कि तेथे ते भरपूर एन्जॉय करू शकतात.

बागा बिच

बागा बिच (Baga Beach)

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा हे छोटे राज्य आहे. गोव्याला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती तसेच महोत्सवांची परंपरा लाभली आहे, जी सर्व जगासमोर आल्याने दूरदूरवरून गोव्याला भेट देण्यासाठी लाखो पर्यटक येतात. गोव्यात आल्यावर सर्वात प्रसिद्ध ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे बागा बिच होय. येथील शांतता आणि असेलेले निसर्गसौंदर्य हे सगळं मोहवून टाकणारं आहे. येथे फिरण्याबरोबरच मिळणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांचीही तुम्ही चव घेऊ शकता, आणि पुढची सफर करू शकता. गोवा बागा बीच हा उत्तर गोव्यातील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे जो पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. समुद्रकिनार्‍याजवळ अनेक झोपड्या आणि मासेमारी नौका आहेत. मुख्यतः हा समुद्रकिनारा वॉटर र्स्पोट्स पॅरासेलिंग आणि बनान राइडसाठी ओळखला जातो. आपल्याला येथे डॉल्फिन्स पाहण्याची संधी देखील मिळेल.

फॉन्टेनहास

फॉन्टेनहाऊस (Fontainehouse)

गोव्यातील सर्वात छान, रंगीबेरंगी इमारतींनी नटलेल्या अरुंद गल्ल्यांचा हा एक गजबजलेला परिसर आहे, जो राज्याच्या स्थापत्य कलेवर पोर्तुगीज स्थापत्यशास्त्राच्या प्रभावाचे वास्तविक जिवंत प्रतिनिधित्व आहे. तुम्हाला भारतात युरोपला भेट देण्याचा फील घेयचा असेल तर तुम्ही फॉन्टेनहासला नक्की जा. येथील घरे युरोपियन शैलीत बांधण्यात आली आहेत. घराच्या भिंतींचा रंग अगदी युरोपातील देशांसारखा आहे. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते फॉन्टेनहास हे अंतर २५ किलोमीटरवर आहे.

dudhsagar water falls

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall)

दुधासारखं पाणी असलेला हा धबधबा गोव्याच्या मांडोवी नदीवर आहे, 320 मीटर उंचीसह हा भारताचा चौथा सर्वोच्च धबधबा आहे. कर्नाटक-गोव्याच्या सीमेवर घनदाट जंगलात प्रसिद्ध दूधसागर धबधबाही सर्वांचे लक्ष वेधून घेतो. हा धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि मोलम राष्ट्रीय उद्यानात आहेत. म्हणून येथे आल्यामुळे आपल्याला हिरवेगार झाकलेल्या जंगलासह पाणी वेगाने खाली पडताना दिसेल. जसे नावाने स्पष्ट आहे की येथील पाणी दुधासारखे पूर्णपणे पांढरे आहे. आपण येथे हायकिंग आणि ट्रेकिंग देखील करू शकता.

आरंबोल बीच

आरंबोल बीच (Arambol Beach)

निसर्गरम्य सौंदर्य आणि शांतता यांचा आदर्श संयोजन दर्शवणारा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा त्याच्या विशिष्ट बोहेमियन वातावरणासाठी ओळखला जातो. हा खडकाळ आणि वालुकामय समुद्रकिनारा गोव्यातील कमी गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपैकी गणला जातो, जो तुम्हाला काही रोमँटिक क्षण घालवण्यासाठी तसेच काही उत्कृष्ट जल-आधारित खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य बनवतो. तुम्ही समुद्रकिनारी असलेल्या छोट्या दुकानात ट्रिंकेट्स आणि पोशाख दागिन्यांची खरेदी करण्यासाठी देखील जाऊ शकता किंवा समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एका शॅकमध्ये तुम्ही एक किंवा दोन पेय घेऊ शकता.

सिंक्वेरिम बीच

सिंक्वेरिम बीच Sinquerim Beach

आश्चर्यकारक Sinquerim बीच तुम्हाला त्याच्या नयनरम्य वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही जलतरणासह विविध प्रकारच्या जल-आधारित खेळांमध्ये आणि रोमांचक क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकता, परंतु तुम्ही फक्त पोहण्यासाठी जाऊ शकता. या समुद्रकिनाऱ्यावरील नाईटलाइफमध्ये बहुतेक वेळा संगीत महोत्सवांचे वर्चस्व असते. हॉटेल्स आणि इतर प्रकारचे रिसॉर्ट्स मोठ्या संख्येने आहेत. याव्यतिरिक्त, आजूबाजूच्या परिसरात अनेक उत्कृष्ट रेस्टॉरंट्स आहेत जे त्यांच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी ओळखले जातात. भरपूर टॅक्सी, मोटारसायकल आणि बस उपलब्ध असल्यामुळे सिंक्वेरिमला जाणे सोपे आहे.

मोरजिम बीच

मोरजिम बीच Morjim Beach

गोव्यातील सुप्रसिद्ध अशा ठिकाणांपैकी एक मोरजीम बीच होय. ज्यांना स्वतःला जपून ठेवायला आवडते ते लोक मोरजिम बीचची पूजा करतात. चापोरा नदीच्या उत्तरेस आढळणारा हा समुद्रकिनारा, वालुकामय समुद्रकिनाऱ्याचे एक आश्चर्यकारक उदाहरण आहे आणि हा गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे जो फार कमी जणांना माहिती आहे. ऑलिव्ह रिडले कासव हे या बीचवरील शोचे तारे आहेत कारण ते त्यांच्यासाठी घरटे बनवण्याचे ठिकाण आहे. मोरजिम बीच एक प्रकारचे पर्यावरणशास्त्र आहे जे या प्रकारच्या कासवांच्या विकासास आणि उबवणुकीला प्रोत्साहन देते, ज्यामुळे ते त्यांच्यासाठी एक आदर्श स्थान बनते. याचा परिणाम म्हणून मोरजिम बीचला टर्टल बीच असे नवीन टोपणनाव देण्यात आले आहे. या ठिकाणी सूर्यस्ताचे खूप सुन्दर असे दृश्य पहायला मिळते.

शंभुराज देसाई लक्षात ठेवा इलाका तुम्हारा, लेकिन धमाका हमारा होगा ! ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळातत्यांना गुलाल मिळू द्यायचा नाही. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही, शंभूराजेंनी आतापर्यंत दारूबंदीचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी अंधारेंनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्यावर निशाणा साधला. यावेळी अंधारे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले तरी शंभुराज देसाई यांना गुलाल मिळू न देण्याचा कार्यर्त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पाटण मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत.

देसाईंनी नात्याला काळिमा फासण्याचे काम केले आहे. शंभुराज यांचे मला कौतुक आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? तुम्ही आजोबांच्या नावाला काळीमा फासला. मी जे काही बोलत आहे, ते रेकॉर्ड करून खबऱ्यानी देसाई यांना पाठवावे. शंभुराज तुम्हाला निवडणुकीतील लीड किती आणि तुम्ही बोलताय किती? चाळीसजण रोज बडबडत आहेत. याचाच अर्थ महाप्रबोधन यात्रा यशस्वी झाली असल्याचे अंधारे यांनी म्हंटले.

मोदी-शाह यांनी मुंबईत 2 BHK फ्लॅट घ्यावा

यावेळी अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या दौऱ्यावरून त्याच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मोदी आणि शहा यांचे मुंबई आणि पुण्यातील दौरे वाढले आहेत. या दोघांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घेऊन राहावे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

तानाजी सावंत आरशात बघून स्वतःशीच बोलत असतील : अंधारे

यावेळी अंधारे यांनी तानाजी सावंत यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, तानाजी सावंत हे आरशात बघून स्वतःशीच बोलत असतात. अशा आरशात बघून बोलणाऱ्या लोकांबद्दल काही बोलायचं नसतं. त्यांचं जेवढं डोकं आहे, तेवढं ते बोलले आहेत. आम्ही त्या स्तरावर उतरणार नाही, असेही अंधारे यांनी म्हंटले.

म्हणून दिला कोश्यारींनी पदाचा राजीनामा : अंधारेंनी सांगितलं नेमकं कारण

कोश्यारींनी महाराष्ट्राची जी अस्मिता व महापुरुषांचा अवमान करण्याची कृती केली. आता जी कृती आहे ती पक्षाला डॅमेज होत आहे तो भरून काढण्यासाठी कोश्यारींनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. मात्र, त्यांनी लक्षात घ्यावे कि हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र महापुरुषांचा अवमान कधीही विसरणार नाही, असे अंधारे यांनी म्हंटले.

10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार नो एन्ट्री

SSC Exam HSC Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी-बारावीची परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाकडून यंदा परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून बोर्डाने प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विध्यार्थ्यांना आता पेपर सुरु होण्याच्या अर्ध्या तासापूर्वी केंद्रावर हजर राहावे लागणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेत नियोजन करण्यात आले. राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे प्रकार चालत होते. तर दुसरीकडे पेपर सुरु झाल्यानंतर काही शिक्षक विद्यार्थ्यांना पासिंगपुरते वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगत असल्याचे अनुचित प्रकार घडत असल्याने याला आळा घालण्यासाठी बोर्डाने परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांमध्ये वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

पेपर पोहचविण्याचीया ‘या’ संस्थेकडे जबाबदारी

दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर दिली जाणार आहे. पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या ‘रनर’वरील जबाबदारी वाढविली आहे. कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर पोचल्यावर वेळोवेळी ‘रनर’ला त्यांच्याकडील मोबाइल किंवा कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.

बोर्डाने केली नवीन नियमावली तयार

दहावी-बारावीची परीक्षा यंदा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकांची देखील भरारी पथके नेमली जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत.

दहावी-बारावी परीक्षेची स्थिती

एकूण विद्यार्थी : 32 लाख

एकूण परीक्षा केंद्रे : 8000

बारावीचा पहिला पेपर : 21 फेब्रुवारी

दहावीचा पहिला पेपर : 2 मार्च

Jammu and Kashmir Bank ने एफडीवरील व्याजदरात केली वाढ, ग्राहकांना 7.25% पर्यंत मिळणार व्याज

Jammu and Kashmir Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jammu and Kashmir Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. आता देशातील सर्वात जुन्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या Jammu and Kashmir Bank ने आपल्या एफडी वरील व्याजदरात वाढ केली आहे.

J&K Bank slips into red with ₹294-crore Q4 net loss - The Hindu BusinessLine

11 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 11 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन दर लागू होणार आहेत. बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. Jammu and Kashmir Bank ची स्थापना 1938 च्या सुमारास झाली आणि तेव्हापासून ही बँक खाजगी क्षेत्रातील अनुसूचित व्यावसायिक बँकांपैकी एक बनली आहे.
J&K Bank Comes Under Scanner Amid Allegations of Recruitment Scam

Jammu and Kashmir Bank च्या एफडीचे नवीन दर

आता बँकेकडून 7 दिवस ते 30 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के, 31 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.70 टक्के, 46 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के, 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 5.50%, 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर आता 6.00%, 1 वर्ष ते 2 वर्षांच्या FD वर आता 7.25 टक्के, 2 ते 3 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के, 3 ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.50 टक्के दराने व्याज मिळेल.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.” Jammu and Kashmir Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.jkbank.com/deposits/personal/fixedDepositsScheme.php

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

गळ्यात पट्टा घालून कुणाची गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही; ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमच्याकडे दोन व्यक्ती भेटल्यानंतर राम-राम घालतात. तर तुमच्याकडे जय श्रीराम म्हणातात. शेवटी राम आहेच. मी अयोध्येला जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथून माती घेतली आणि मग रामलल्लाच्या दर्शनाला गेलो. माघारी आल्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. मुस्लिमांचा द्वेष करा, असं बाळासाहेबांनी कधीही सांगितलं नाही. गळ्यात पट्टा घालून कुणाचीतरी गुलामगिरी करणं, हे मला शिकवलेलं नाही, असा टोला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला.

आज मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले की, तोडा-फोडा ही इंग्रजांची निती भाजप अवलंबतय, भाजपचं हे असंच सुरू राहिलं तर हिंदू म्हणायलाही लाज वाटेल. राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम, हाताला काम हीच आमची भूमिका राहिलीय.आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदुत्वाची साथ कायम आहे.

राम मंदिराच्या मुद्द्यात आम्हीच लक्ष घातलं. राम मंदिराचा मुद्दा खितपत पडला होता, परंतु आम्ही भूमिका घेतली. हवं तर स्वतंत्र कायदा करा परंतु राम मंदिराचा प्रश्न सोडवा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मी अयोध्येत जाण्यापूर्वी शिवनेरीवर गेलो होतो. तिथली माती प्रभू रामाकडे नेली होती. नंतर मी मुख्यमंत्री झालो आणि राम मंदिरही उभं राहात आहे. आम्ही महाराष्ट्रात राम-राम म्हणतो आणि तुमच्याकडे जय श्रीराम म्हणतात. शेवटी राम आहेच. ‘राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व आहे’ असं बाळासाहेब म्हणायचे. हेच आमचे संस्कार आहेत, असे ठाकरे यांनी म्हंटले.

त्यावेळी मोदींना बाळासाहेबांनी वाचवलं

यावेळी उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एक आठवण सांगितली. ऐकमेकांचा द्वेष करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा बचाव केला होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. राजधर्माचं पालन झालं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश बँकांकडून चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देत आहेत. यासोबतच क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रिया सोपी देखील करण्यात आली आहे. तसेच यावर अनेक आकर्षक ऑफर्स मिळत असल्यामुळे लोकांकडूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होऊ लागला आहे. आता तर डिजिटल पेमेंटसाठी UPI व्यतिरिक्त, Mobikwik, Amazon Pay Paytm आणि PhonePe सारख्या ई-वॉलेटचा वापरही होऊ लागला आहे.

अनेक लोकं Credit Card ने ई-वॉलेटमध्ये पैसे जोडतात आणि नंतर ते छोट्या पेमेंटसाठी वापरतात. आता तर ई-वॉलेटद्वारे पेमेंट करण्यासाठी ओटीपी किंवा पिन पुन्हा पुन्हा एंटर करण्याची आवश्यकता नाही. एका अर्थाने ते सोयीचे मानले जाते आहे.

How to Add a Credit/Debit Card to Paytm? | Paytm Blog

याचे फायदे काय आहेत ???

हे जाणून घ्या कि, Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट्स देखील मिळतात. याशिवाय, रीपेमेंटसाठी सुमारे 45 दिवस मिळतात, ज्यासाठी कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. तसेच, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डांवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च केल्यानंतर वार्षिक मेन्टनन्स फी देखील परत केली जाते. याशिवाय अनेकदा क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी कॅशबॅक देखील मिळतो.

याचे नुकसान काय ???

मात्र Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागेल. उदाहरणार्थ जर आपण ई-वॉलेटमध्ये 100 रुपये जोडले तर 2-5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकेल.

Paytm begins charging 2% fee on loading wallet via credit card

Paytm मध्ये किती शुल्क द्यावे लागेल ???

Paytm च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, Credit Card द्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी 2.5 टक्के शुल्क आकारले जाईल. तसेच, अमेरिकन एक्सप्रेस, कॉर्पोरेट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यावर 3% शुल्क आकारले जाईल. तसेच जे ग्राहक क्रेडिट, कॉर्पोरेट किंवा प्रीपेड कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे जोडतात आणि प्रति महिना 5,000 रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात त्यांना 2 टक्क्यांपर्यंतचा सरचार्ज लागू होईल.

PhonePe मध्ये किती शुल्क द्यावे लागेल ???

क्रेडिट कार्डद्वारे PhonePe वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी 2.65 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

Mobikwik वर किती शुल्क द्यावे लागेल ???

क्रेडिट कार्डद्वारे दर महिन्याला Mobikwik वॉलेटमध्ये 2500 रुपये जोडल्यास यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

Pros and Cons of Credit Cards - Experian

Amazon Pay वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे करता येत नाही

Amazon Pay वॉलेट या ई-कॉमर्स कंपनीच्या पेमेंट युनिटमध्ये Credit Card द्वारे पैसे लोड करण्याची सुविधा आता थांबवण्यात आली आहे. मात्र यामध्ये आपल्याला डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि UPI द्वारे पैसे लोड करता येतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://paytm.com/blog/payments/mobile-wallet/how-to-add-money-to-paytm-wallet-through-credit-card/

हे पण वाचा :
BSNL : फक्त 100 रुपयांच्या खर्चात वर्षभर बोला मोफत, सोबत डेटाही…
Credit Card ग्राहकांनी चुकूनही करू नयेत ‘या’ 3 चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
LIC ने लाँच केला जबरदस्त इन्शुरन्स प्लॅन, 15 दिवसांत विकल्या 50,000 पॉलिसी
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ
FD Rates : 102 वर्षे जुन्या बँकेने FD वरील व्याजदर वाढवले, ग्राहकांना मिळणार 8.50% पर्यंत रिटर्न