Saturday, December 13, 2025
Home Blog Page 1584

याला म्हणतात धाडस !! IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अधिकारी झाल्यानंतरही काहीजणांना पुढे जाऊन अजून मोठं अधिकारी व्हावंसं वाटत असत. अशीच मनात इच्छा असलेल्या गुजरातमधील कार्तिक जीवाणी यांनी धाडस करत IPS ची ट्रेनिंग अर्धवट सोडून कार्तिक असा झाला IAS पदाची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. पाहूया कार्तिक यांच्या धाडसाची यशोगाथा…

आयएएस अधिकारी कार्तिक जीवणी यांची यशोगाथा खूप इतरांपेक्षा वेगळी आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी अनेक प्रयत्न केले आणि प्रत्येकवेळी ते यशस्वी झाले. आयएएस अधिकारी होण्याच्या आपल्या ध्येयाबद्दल ते अगदी स्पष्ट होते आणि त्यासाठी तयारी करत राहिले आणि शेवटी त्यांनी यशाला गवसणी घातली. आज जाणून घेऊयात आयएएस कार्तिक जीवणी यांचा यशस्वी प्रवास.

Karthik Jiwani

अभ्यासात सुरुवातीपासूनच हुशार

गुजरातमध्ये राहणारे कार्तिक जीवाणी शालेय जीवनापासून अभ्यासात खूप हुशार होते. आयपीएस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणही सुरू केले. मात्र, यानंतरही तरीही त्यांच्यात IAS होण्याची जिद्द होती आणि त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.आयएएस कार्तिक जिवाणी यांनी गुजराती भाषेत आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ते जेईई परीक्षेला बसले. त्यात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.

Karthik Jiwani

महाविद्यालयीन काळात UPSC परीक्षेची तयारी

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना कार्तिक यांनी UPSC परीक्षेत बसून नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. 2016 पासून कार्तिक यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी ठरले होते. यानंतर त्यांनी 2 वर्षे जोरदार तयारी केली. 2019 मध्ये कार्तिकने दुसऱ्यांदा UPSC परीक्षा दिली आणि त्यात यशही मिळवले.

Karthik Jiwani

एकीकडे IPS चे प्रशिक्षण दुसरीकडे IAS ची तयारी

या परीक्षेत कार्तिक यांनी अखिल भारतीय स्तरावर 94 वा क्रमांक मिळविला. मात्र, त्यांची IAS साठी निवड होऊ शकली नाही. IAS होण्यासाठी त्यांना दोन रँकने कमी मिळाली. या प्रयत्नात त्यांची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचे प्रशिक्षणही त्यांनी सुरू केले होते. पण त्याचवेळी IAS होण्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली होती.

Karthik Jiwani

चौथ्या प्रयत्नात मिळाले यश

कार्तिक जीवाणी यांची IPS अधिकारी म्हणून निवड झाली. त्यांचे प्रशिक्षणही त्यांनी सुरू केले होते. यावेळी अचानक त्यांनी तिसऱ्यांदा परीक्षा देण्याचे ठरवले. यामध्ये त्यांनी अखिल भारतीय 84 वा क्रमांक मिळवला. त्यानंतर 2020 मध्ये चौथ्या प्रयत्नात, त्यांनी 8 वी रँक गाठली. यावेळी त्यांनी आयएएस पदाला गवसणी घातली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत बसण्यासाठी आयपीएस प्रशिक्षणातून 15 दिवसांची रजा घेतली होती.

Karthik Jiwani

UPSC परीक्षेत अशा प्रकारे मिळवले यश

कार्तिक जीवाणी रोज 10 तास अभ्यास करायचे. ते कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट वर्कला प्राधान्य देतात. कार्तिक बहुतेक रात्री अभ्यास करायचा. त्याच्या तयारीसाठी तो केवळ पुस्तकांवर अवलंबून नव्हता. त्यांनी इंटरनेटचाही वापर केला. यासोबतच ते त्यांच्या नोट्सही बनवत असत. आणि त्यातून ते अभ्यास करायचे

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; MSRTC मध्ये भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यतील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. MSRTC मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती सुरु होणार आहे. धुळे एस टी आगारात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा दाखल करायचा आहे. त्यासाठी खाली पत्ता दिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – एस. टी. महामंडळ, धुळे

पद संख्या – 110 पदे

भरले जाणारे पद –

शिकाऊ उमेदवार

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Job Alert)

उमेदवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गासाठी – 500/- रुपये

मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/- रुपये

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Job Alert)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/index.php

Aadhaar Card मधील चुकीची माहिती अशा प्रकारे घरबसल्या करा अपडेट

Aadhaar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Aadhaar Card हे खूपच महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता याशिवाय अनेक सरकारी कामांचा लाभही मिळू शकणार नाही. UIDAI कडून देशभरातील नागरिकांसाठी आधार कार्ड जारी केले जातात. आपल्या आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, बायोमेट्रिक डेटा, फोटो, पत्ता इत्यादी सर्व माहिती असते. मात्र जर आपल्या आधार कार्डमध्ये काही चुका असतील तर त्यामुळे अनेक कामांमध्ये अडथळे येऊ शकतील. मात्र UIDAI ने आता अपडेट करण्याची सुविधा देखील दिली आहे. चला तर मग ते घरबसल्या कसे दुरुस्त करता येईल याविषयीची माहिती जाणून घेउयात…

What Is Blue Aadhaar Card? How Can One Avail These Identity Cards | All You  Need To Know

अनेक लोकांच्या Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर किंवा पत्त्यासहीत अनेक चुका असतात. याशिवाय कधी कधी नावामध्ये किंवा आडनावातही बदल होतो. आधार कार्डमध्ये 12 अंकी ओळख क्रमांक असतो ज्याला आधार क्रमांक असे म्हंटले जाते. प्रत्येक व्यक्तीसाठी ते वेगळेवेगळे असतात.

Aadhaar Card Update: Change address in Aadhaar in few simple steps, here's  how | Personal Finance News | Zee News

अशा प्रकारे ऑनलाइन बदला

जर आपल्या मोबाईल नंबरमध्ये काही चुका असतील तर ते घरबसल्या ऑनलाईन बदलता येईल. त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर देखील अपडेट करता येईल. कारण UIDAI ने घरबसल्या आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच आपल्या आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारख तपशील अपडेट करण्यासाठी, Aadhaar Card वर मोबाइल नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. जेणेकरून अपडेट दरम्यान त्याच नंबरवर OTP पाठवता येईल.

How to Apply for a New Aadhaar Card Online and Offline

अशा प्रकारे Aadhaar Card अपडेट करा

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in ला भेट द्या.
यानंतर मोबाईल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा.
यानंतर कॅप्चा भरा. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
आता फोन नंबरवर पाठवलेला OTP टाका. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
यानंतर, खाली स्क्रोल करा आणि जिथे ऑनलाइन आधार सर्व्हिस असे दिसेल.
येथे दिलेल्या लिस्टमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी दिसतील.
आता जी माहिती अपडेट करायची आहे ती निवडा.
काय अपडेट करायचे आहे हा पर्याय निवडा.
नंतर एक नवीन पेज उघडेल आणि जिथे कॅप्चा एंटर करा.
मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
त्यानंतर Save आणि Proceed वर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/en/my-aadhaar/update-aadhaar.html

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा

Axis Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, ​​FD वरील व्याजदरात झाली वाढ

Axis Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Axis Bank : महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या 9 महिन्यांत RBI ने रेपो दरात वारंवार वाढ केली आहे. ज्यानंतर अनेक सरकारी आणि खाजगी बँकांकडून एफडीवरील व्याजदरात वाढ केली गेली ​​आहे. यामध्ये आता Axis Bank चे नाव देखील सामील झाली आहे.

Axis Bank in competition for best bank - Rediff.com Business

11 फेब्रुवारी 2023 पासून नवीन दर लागू

Axis Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. 11 फेब्रुवारी 2023 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. या बदलानंतर, बँकेकडून आता 7 दिवस ते 10 वर्षाच्या एफडीवर सर्वसामान्यांना 3.50% ते 7.00% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.00% ते 7.75% व्याजदर देत आहे. आता 2 वर्षे ते 30 महिन्यांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 8.01 टक्के तर सर्वसामान्यांना 7.26 टक्के व्याजदर मिळेल.

Axis Bank Branches in Pune, Axis Bank Regional Office & IFSC Code Pune

Axis Bank च्या एफडीचे नवीन दर

7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.50 टक्के, 46 दिवस ते 60 दिवसांच्या एफडीवर 4%, 61 दिवस ते 3 महिन्यांच्या एफडीवर 4.50 टक्के, 3 महिने ते 6 महिन्यांच्या मुदतीच्या एफडीवर 5.75 टक्के, 6 महिने ते 9 महिन्यांच्या एफडीवर 6 टक्के, 9 महिने ते 1 वर्षाच्या एफडीवर 6% व्याजदर मिळेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ

8 फेब्रुवारी रोजी RBI ने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केली. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण बैठकीनंतर बोलताना सांगितले की,” जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो दरात केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.”

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.axisbank.com/interest-rate-on-deposits

हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अ‍ॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा

Valentine’s Day का साजरा केला जातो? काय आहे यामागील इतिहास?

Valentine's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) म्हणजे प्रेमाचा दिवस…. संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अतिशय उत्साहात साजरा केला जातो. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला या दिवसाची विशेष प्रतीक्षा असते. अनेक कपल्स व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांच्या सोबत वेळ घालवून आणि प्रेमाच्या गोष्टी करून आपला आनंद व्यक्त करत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का ? व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो आणि यासाठी १४ फेब्रुवारी हीच तारीख का निवडण्यात आली? चला आज आपण यामागील इतिहास जाणून घेऊया…

ही कहाणी आहे रोमचा राजा आणि (Valentine’s Day) संत व्हॅलेंटाईन यांच्यातील सामन्याबाबत … रोमच्या तिसऱ्या शतकात क्लॉडियस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच असं मत होते कि लग्न झालेल्या सैनिकापेक्षा लग्न न झालेला सैनिक अधिक चांगल्या प्रकारे युद्ध करू शकतो कारण विवाहित सैनिकाला आपल्या मृत्यूनंतर कुटुंबाचे काय होईल याची काळजी असते आणि या चिंतेमुळे तो युद्धात आपले पूर्ण लक्ष देऊ शकत नाही. याचा विचार करून राजा क्लॉडियसने घोषणा केली की त्याच्या राज्याचा कोणीही सैनिक विवाह करणार नाही आणि जो कोणी त्याच्या आदेशाचे उल्लंघन करेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल.

अनेकांनी नाईलाजाने राजाचा निर्णय (Valentine’s Day) मान्य केला. परंतु संत व्हॅलेंटाईन यांनी या गोष्टीला विरोध केला आणि रोम मधील लोकांना प्रेमासाठी प्रेरित केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी लपून छपून अनेक तरुण सैनिकांची लग्ने लावून दिली. ज्या सैनिकांना आपल्या मैत्रिणीशी लग्न करायचे होते ते व्हॅलेंटाईनकडे मदत मागायला जायचे आणि व्हॅलेंटाईन सुद्धा त्यांना मदत करायचा. अशाप्रकारे व्हॅलेंटाइनने अनेक सैनिकांची गुपचूपपणे लग्ने लावून दिली होती.

14 फेब्रुवारीला फाशी- (Valentine’s Day)

परंतु म्हणतात ना, सत्य कधीही लपत नाही, ते बाहेर येतेच. व्हॅलेंटाइनच्या या कारनाम्याची बातमी राजा क्लॉडियसपर्यंत पोहोचली. व्हॅलेंटाइनने राजाच्या आदेशाचे पालन केले नाही, म्हणून राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली आणि तुरुंगात टाकले. तुरुंगात व्हॅलेंटाइनला भेटण्यासाठी अनेक लोक यायची, त्याला गुलाब आणि भेटवस्तू द्यायचे, आम्ही सर्वजण प्रेमावर विश्वास ठेवतो असं सांगायचे, परंतु ज्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा झाली तो दिवस होता 14 फेब्रुवारी 269… फाशीवर जाण्यापूर्वी व्हॅलेंटाईनने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले. व्हॅलेंटाईनने प्रेम करणाऱ्यांसाठी (Valentine’s Day) आनंदाने त्याग केला आणि हेच प्रेम जिवंत ठेवण्याची विनंती केली, म्हणून त्या दिवसापासून आजपर्यंत 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.

रणजितसिंह निंबाळकर मिक्सर दुरुस्तीचा डिप्लोमा केलेले भाजपमधील एकमेव खासदार; रामराजेंची टीका

RamrajeNaik Nimbalkar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

संसदेत असलेल्या 542 खासदारांपैकी रणजितसिंह निंबाळकर हे एकमेव खासदार आहे ज्यांनी हाऊस अप्लायंसेस मेंटेनंन्स डिप्लोमा केला आहे. हा डिप्लोमा मिक्सर टोस्टर मेंटेनंन्समधील आहे. अशा खासदाराला साधा हिदुत्व हा शब्द तरी लिहायला येईल का? असा सवाल करत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टिका केली.

फलटण तालुक्यातील गोखळी येथे कापूस उत्पादकांचा शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी रामराजेंनी भाजपा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.

येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फलटणमधील राजकारण चांगलच तापल्याचे पहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी रामराजेंनी खासदार रणजितसिह निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेची चांगलीच चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात रंगली आहे.

राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की, अशी व्यक्ती…..

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्र्रपतींनी मंजूर केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडी कडून या निर्णयाचे स्वागत केलं जात आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर महाराष्ट्राची सुटका झाली अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली, अतिशय चांगला निर्णय आहे हा… खरं तर यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल झाली नव्हती. मात्र आता केंद्र सरकारने आणि राष्ट्रपतींनी हा बदल केला ही समाधानाची बाब आहे असं पवारांनी म्हंटल. तसेच त्यांच्या कडून जे जे काही संविधानाच्या विरुद्ध झालं असेल त्याची चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उशीरा का होईना महाराष्ट्र द्वेष्ट्याकडून राज्याची सुटका! महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेले रमेश बैस यांचं अभिनंदन! ते संविधानाचा मान ठेवतील आणि राज्याची अस्मिता जपण्यासोबतच महान व्यक्तींचा अनादर न करता सन्मान राखतील, अशी अपेक्षा! त्यासाठी त्यांना शुभेच्छा! असं रोहित पवार यांनी म्हंटल.

7 वेळा खासदार, 2 वेळा राज्यपाल; कोण आहेत रमेश बैस ?

ramesh bais

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यांनतर आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (Governor)म्हणून नियुक्ती झाली आहे. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल असतील. केंद्रात मंत्रिपद भूषवलेले रमेश बैस तब्बल सात वेळा छत्तीसगड येथून खासदार झाले आहेत. आजपर्यंत एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता म्हणून ते ओळखले जातात.

रमेश बैस हे मूळचे छत्तीसगड येथील आहेत. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये छत्तीसगढच्या रायपूरमध्ये झाला. 1978 मध्ये ते सर्वप्रथम रायपूर महानगरपालिकेत निवडून आले होते. इथूनच त्यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. याशिवाय, सलग 7 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. रमेश बैस यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधे केंद्रात पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीपद सुद्धा भूषवलं आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारी विधाने केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी टीकेचे धनी बनले होते. राज्यपालांचा राजीनामा घ्या अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात येत होती. छत्रपतींचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी सुद्धा कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतला होती. त्यातच राज्यपालांनी स्वतःच मला पदमुक्त करावं अशी मागणी केल्यांनतर अखेर केंद्राने त्यांचा राजीनामा मंजूर केला.

कोश्यारींचा राजीनामा मंजूर; राज्यपालपदी ‘या’ नेत्याची निवड

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी केली होती. त्याला राष्ट्रपती कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांमुळे आता त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. रमेश बैस हे आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. कोश्यारी यांच्यासह देशभरातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल बदलण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यांनतर राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले होते. राज्यापालांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात होती. छत्रपतींचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी सुद्धा कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतला होती. त्यातच राज्यपालांनी स्वतःच मला पदमुक्त करावं अशी मागणी केल्यांनतर अखेर केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्राचे आत्तापर्यंतचे सर्वात चर्चेत असणारे राज्यपाल म्हणून कोश्यारी यांचा उल्लेख केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षातील काळात राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकारमध्ये वाद सुरूच होता. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात पहिली ठिणगी पडली होती. महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेक विनंत्या करूनही राज्यपालांनी तेव्हा १२ आमदारांची नियुक्ती केली नव्हती. तसेच कोरोना काळातही भगतसिंह कोश्यारी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील लेटर वॉर चर्चेत आलं होते.

ना पेट्रोलची चिंता, ना चार्जिंगचं टेन्शन; गडकरींची ‘ही’ अप्रतिम कार पहाच

Nitin Gadkari Hydrogen Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव देशात नेहमीच आदराने घेतलं जात. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. रस्ते- वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी देशभर रस्त्यांचे मोठं जाळ तयार केलं. गडकरींना गाड्यांमध्ये सुद्धा आवड आहे. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर चालणाऱ्या गाड्यांवरही त्यांचा भर असतो. परंतु गडकरी स्वतः कोणती गाडी चालवतात हे तुम्हाला माहित आहे का? चला आज आपण जाणून घेऊया …

नितीन गडकरी जी कार वापरतात तिचे नाव आहे (Toyota Mirai) टोयोटा मिराई.. ही एक सेडान कार असून ही कार हायड्रोजनवर (Hydrogen Car) चालते. गेल्या वर्षी टोयोटाने ही डेमो कार म्हणून सादर केली असून गडकरींकडे ही कार टेस्टिंग स्वरूपात आहे. नितीन गडकरी म्हणतात की आपण इंधनात स्वयंपूर्ण व्हायला हवे. त्यामुळे हायड्रोजन कारवर भर दिला जात आहे. गडकरींनी सांगितले की एकीकडे इलेक्ट्रिक कारचा खर्च प्रति किमी 1 रुपये आहे तर हायड्रोजन कारमधून प्रवास करताना तुम्हाला प्रति किलोमीटर 1.5 ते 2 रुपये खर्च येऊ शकतो. देशाला जर स्वावलंबी बनवायचे असेल तर आगामी काळात आपण हायड्रोजनवर आधारित इंधनाचे उत्पादन करणे आवश्यक आहे.

टोयोटा मिराई हायड्रोजन फ्युएल सेल टेक्निक वर काम करते. त्यात हायड्रोजन टाकी आहे, ज्याचा गॅस ऑक्सिजनसह रिअक्शन करून गाडीला चालना देतो. यामध्ये एक इलेक्ट्रिक मोटर देखील आहे, जी 182 PS पॉवर आणि 406 Nm टॉर्क जनरेट करते. यात 1.24 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे. या सेडान कारमध्ये 5.2 किलोग्रॅम क्षमतेची हायड्रोजन टाकी आहे. एकदा का टाकी फुल्ल भरली की ही कार तब्बल 646  किलोमीटरपर्यंत धावू शकते.