Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 1667

हसन मुश्रीफांच्या घरावर ED ची छापेमारी

hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांच्या घरावर आज ईडी (ED) आणि इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली आहे. कोल्हापूर आणि पुणे या दोन ठिकाणी ही छापेमारी सुरु असून मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणी ईडी कडून छापेमारी करण्यात आल्याच्या चर्चा सुरु आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून ही छापेमारी सुरु असून जवळपास 20 अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोचले आहेत. या एकूण सर्व प्रकरणामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या घरी ईडीची छापा टाकला होता.त्यातच आता दिग्गज नेते हसन मुश्रीफ ईडी आणि इन्कम टॅक्सच्या रडारावर असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, याप्रकरणी आपण लवकरच सर्व माहिती घेऊन बोलणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

पुणे- बंगलोर महामार्गावर भीषण आगीत 5 दुकाने जळाली

Shops burned Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पुणे- बंगलोर महामार्गावर असलेल्या वाढे फाटा येथे लागलेल्या भीषण आगीत 5 दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. जवळपास 3 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात सातारा नगरपरिषदेच्या अग्निशामक यश आले आहे. आगीने राैद्ररुप धारण केल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

सातारा शहराच्या बाहेरून महामार्गावर ही आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच सातारा पोलिस व सातारा नगरपरिषदेच्या 3 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अद्याप सुरू आहे. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.

या आगीमध्ये दोन टायरची दुकान, इलेक्ट्रॉनिकचे दुकान, हॉटेल, चप्पल- बूट दुकान या सर्व दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सदरची आग नेमकी कशाने लागले हे मात्र, अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आगवणे पती- पत्नीसह 7 जणांवर मोक्का : जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे व त्याच्या पत्नीसह त्यांच्या टोळीतील सातजणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पावणे तीन कोटींच्या फसवणुकीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या मोक्का कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात व फलटण तालुक्यात जिल्ह्यात खळबळ उडाली.

टोळीप्रमुख दिगंबर रोहिदास आगवणे व त्याची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे (रा. गिरवी, ता. फलटण), स्नेहल रविंद्र बनसोडे (रा. गिरवी), आदिनाथ काशीनाथ मोटे (रा. सरडे, ता. फलटण), नितीन कालीदास करे (रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड (रा. आसू ता. फलटण), अनिल रामचंद्र सरक (रा. नांदल, ता. फलटण) अशा सातजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करत विशेष पोलस महानिरीक्षकांनी त्यांच्यावर मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे. दिगंबर आगवणे याने रणजित संदीप धुमाळ (रा. खुंटे, ता. फलटण) यांची दिशाभूल करत तसेच त्यांना आगवणेच्या मालकीच्या जे. डी. केमिकल्स अँड फर्टिलायझर कंपनीचे संचालक केले. त्यानंतर खोटी कागदपत्रे तयार करून धुमाळ यांच्या नावावर कंपनीच्या नावे 2 कोटी 75 लाख रुपयांचे बनावट कर्ज काढले. धुमाळ यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर आगवणे याने त्यांच्याकडेच खंडणी मागितली. खंडणीस नकार दिल्यावर धुमाळ यांचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील एक लाख रुपये जबरदस्तीने काढून घेत धुमाळ यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

या गुन्ह्याच्या तपासात दिगंबर आगवणे याने त्याच्या टोळीची दहशत पसरवण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र आणून त्याच्या टोळीची दहशत पसरवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यामुळे फलटणचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी आगवणे व त्याच्या टोळीविरुध्द विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पाठविला होता. त्याला फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.

बच्चू कडू यांचा अपघात; रस्ता क्रॉस करताना धडक

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bachchu Kadu) यांचा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना बच्चू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत बच्चू कडू जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आज बुधवारी सकाळी ६ च्या आसपास हा अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जोरात मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत. बच्चू कडू यांच्या डोक्याला ४ टाके पडले आहेत.

दरम्यान, मागील एका महिन्यात अनेक राजकीय नेत्यांचा अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे यांची गाडी नदीत कोसळली होती. त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यातच २ दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचाही अपघात झाला होता, गेल्या काही दिवसांतील अपघाताच्या या घटना पाहता आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

IND vs SL 1st ODI: टीम इंडियाने रचला नवा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

Team India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका (IND vs SL 1st ODI) सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी या ठिकाणी खेळवला जात आहे. या सामन्यात (IND vs SL 1st ODI) भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 373 धावा केल्या. या बरोबरच भारताने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा विश्वविक्रम रचला आहे.

काय आहे तो विक्रम?
भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (IND vs SL 1st ODI) नवा विश्वविक्रम केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम केला आहे. टीम इंडियाने विक्रमी 9 व्यांदा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 हून अधिक धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाला टाकले मागे
भारताने या विक्रमाच्या बाबतीत (IND vs SL 1st ODI) ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाने असा कारनामा भारताविरुद्ध केला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 वेळा 350 हून अधिक धावा केल्या होत्या. आता हा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 व्यांदा 350 हून अधिक धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात कोहलीने 113, रोहित शर्माने 83, शुबमन गिलने 70 आणि केएल राहुलने 39 धावा करून आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

हे पण वाचा :
‘कांतारा’ फेम अभिनेता चेतन अहिंसावर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
अचानक कारच्या चाकाखाली आली बाईक, 10 फूट अंतरापर्यंत फरफटत गेला तरुण
KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली
IRCTC च्या वेबसाईटद्वारे अशा प्रकारे बुक करा तिकिटे
Indian Army मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रश्नावरुन शिंदे गटाचे खासदार संतापले; म्हणाले…

MP Prataprav Jadhav

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आता पक्षतील नेते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर विरोधकही यावर तोंडसुख घेत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांना प्रश्न विचारला असता ते संतापले. ते म्हणाले कि, “मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? हे सांगायला मी मी काही संजय राऊत सारखा ज्योतिषी नाही, असं उत्तर खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी दिले.

मंत्रीमंडळावरुन आमदार नाराज
मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत आमदार बच्चू कडू यांनी उघड नाराजी व्यक्ती केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी धाडस नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. अशातच मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार या प्रश्नावर शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांना विचारले असता त्यांनी संतापून “मी संजय राऊत सारख ज्योतिषी नाही की तुम्हाला तारीख सांगेन, त्यांनी जसे सांगितले की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकार कोसळेल, त्यांनी ज्योतिषी पाहिला असेल, पंचांग पाहिला असेल, तसं मला काही पंचांग समजत नाही, मी काही ज्योतिषी नाही.”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार बच्चू कडूंचा इशारा
माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू दिवसेंदिवस शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज होताना दिसत आहेत. जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. यंदाच्यावर्षी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं वक्तव्य कडू यांनी केले आहे.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी

कॅप्टन अमोल यादव यांना राज्य सरकारच मोठं गिफ्ट : विमान निर्मितीच्या संशोधनासाठी 12.91 कोटींचा निधी मंजूर

Captain Amol Yadav Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याची निर्मिती करणारे अमोल यादव यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी अमोल यादव यांना 12.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाकडून विशेषबाब म्हणून हा निधी देत राज्य सरकारकडून यादव यांना गिफ्ट देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सामाजिक न्याय विभागाकडून विशेष बाब म्हणून पाटण तालुक्यातील सळवे गावचे कॅप्टन अमोल यादव यांना विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी निधी देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

पाटण तालुक्यातील सळवे हे कॅप्टन यादव यांचे मूळ गाव आहे. भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवून ते ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रदर्शित केल्यानंतर देशभर चर्चेत आले. 1997 पासून यादव हे विमान तयार करण्याचा प्रयत्न करत होते. तिसऱ्या प्रयत्नानंतर 2009 मध्ये त्यांना यश मिळाले. 2019 मध्ये त्यांना परमीट टू फ्लाय मिळाले.

मागील महिन्यातील बैठकीत निर्णय आता प्रत्यक्ष मंजुरी

विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी कॅप्टन अमोल यादव यांना 12.91 कोटी रुपये देण्याचा निर्णय मागील महिन्यात पार पडलेल्या राज्य सरकारच्या बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यान एक महिन्यानंतर आता कॅबिनेटच्या बैठकीत सामाजिक न्याय विभागाने विशेषबाब म्हणून कॅप्टन यादव यांना निधी देण्यात निर्णय घेतला.

पंतप्रधान मोदींकडूनही झालेय कौतुक

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील साळवे गावात जन्मलेल्या कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रदर्शित केले होते. त्याच्या विमाननिर्मितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दखल घेतली आणि यादव यांचे त्यावेळी त्यांनी विशेष कौतुक केले होते.

Auto Expo 2023 : Hyundai IONIQ 5 Photos

Hyundai IONIQ 5 Photos
4

Auto Expo 2023 : Hyundai Grand i10 Nios Photos

Hyundai Grand i10 Nios Photos
6

Auto Expo 2023 : Hyundai Aura Photos

Hyundai Aura Photos
1