Friday, December 12, 2025
Home Blog Page 1685

रात्रपाळीस कामावर गेलेली आई मुलासह बेपत्ता

Police Borgaon

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेलेली महिला व तिचा 3 वर्षाचा मुलगा घरी परत न आल्याने ते दोघे बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मनीषा भरत जाधव (वय- 22 वर्षे, रा. नागठाणे) व तिचा मुलगा आदर्श भरत जाधव असे दोघा माय- लेकांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद भरत पोपट जाधव (मूळ रा. निनाम, सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ही नागठाणे येथे तिच्या पतीसह वास्तव्यास आहे. तिचे पती हे शेतीच्या कामासाठी त्यांच्या मूळगावी निनाम येथे गेले होते. सोमवारी सायंकाळी 7 वाजता ही महिला तिच्या लहान मुलासह हॉस्पिटल मध्ये रात्र पाळीस कामावर जाते म्हणून घरातून गेली. दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांची पत्नी व मुलगा घरी दिसून आला नाही.

भरत जाधव यांनी पत्नी व मुलाचा सर्वत्र शोध घेतला तरी त्यांना ते मिळून आले नाहीत. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बोरगाव पोलिस आई व मुलाचा शोध घेत आहेत.

पुणे ते लोणावळा केवळ 20 मिनिटांत पोहोचणार; उडणार्‍या बाईकची Booking सुरु

Flying Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आतापर्यंत आपण रस्त्यावर चालणाऱ्या बाईक बघितल्या असतील. मात्र आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे कि आता तुम्हाला हवेत उडणारी बाइकदेखील (Worlds First Flying Bike) पाहायला मिळणार आहे. आश्चर्य वाटलं ना… पण हे खरं आहे. आकाशात उडणाऱ्या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकची (Worlds First Flying Bike) बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकमध्ये 8 पॉवरफुल जेट इंजिन बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकांची ट्रॅफिकची चिंता मिटली. या बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किमीचा प्रवास करण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. चला तर या बाइक विषयी अधिक जाणून घेऊया….

या बाईकचे डिझाईन कशा प्रकारचे आहे?
या बाइकमध्ये आठ जेट इंजिन वापरण्यात आले आहेत. हे जेट इंजिन बाईकच्या चारही कोपऱ्यांवर वापरले जातील. जे रायडरला संरक्षण देण्यास मदत करेल. ही बाईक 136 किलोपर्यंतच्या बाईक रायडरसह 250 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम असेल.

वेग किती असणार?
हवेतून उडणारी ही बाईक (Worlds First Flying Bike) 250mph वेगाने हवेत उडण्यास सक्षम असणार आहे. या बाईकला व्हिडीओ गेमसारखा कंट्रोल सिस्टीम असणार आहे. ही बाईक हवेत उडण्यासाठी लढाऊ विमानांमध्ये फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे. तर दुसरे बटण उंचीवर नेऊन स्पीड वाढवण्याचे आहे.

किंमत किती असणार?
या बाईकचे (Worlds First Flying Bike) निर्माते जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकची किंमत 3.15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. हि बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

Wai Police

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
वाई तालुक्यातील धोम कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याप्रकरणी वाई पोलिसांनी तिघांना अटक केली. संशयितांकडून 21 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पंकज आनंदराव राजपुरे (वय- 28, रा. साक्षी विहार, यशवंत नगर वाई), विलास बबन कोळी (वय- 19 रा. रेल्वे स्टेशनजवळ कोरेगाव) व रवी रमेश काळे (वय- 38, रा, बावधन नाका, वाई) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.

संशयितांनी शुक्रवारी (ता. 30) रात्री धोम कॉलनी येथील बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने 21 हजार रुपये किमतीचे पाण्याचे नळ व एसी चोरून नेला असल्याची तक्रार डॉ. कासुर्डे यांनी दाखल केली होती. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटी विभागाने करून चोरट्यांना बावधन नाका येथून ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. भरणे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस हवालदार विजय शिर्के, सोनाली माने, पोलिस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, अमित गोळे, श्रावण राठोड, प्रसाद ददुस्कर यांनी केली.

स्कुटीचालक महिलेचा भीषण अपघात! 3 किमी ट्रकने फरफटत नेलं अन्….

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी दिल्लीत एका 20 वर्षीय तरुणीला कारने तब्बल 12 किलोमीटरपर्यंत फरफटत (accident) नेल्याची घटना ताजी असताना अशाच प्रकारची एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये एका स्कूटी चालक महिलेला ट्रकने धडक देऊन तिचा मृतदेह तीन किलोमीटरपर्यंत फरफटत (accident) नेला आहे. यानंतर हि महिला स्कुटीसह ट्रकमध्ये अडकली. यादरम्यान ट्रकने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आणि ती त्यामध्ये जळून खाक झाली.

या अपघाताची (accident) माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर त्यांनी पीडितेचा मृतदेह ट्रकमधून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या अपघातातील पीडित महिला हि एका विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरत होती. मृत महिलेचं नाव पुष्पा असे आहे.

पुष्पा या घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. यावेळी त्या स्कूटरवरून जात असताना ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर ट्रकने त्यांना 3 किमी पर्यंत ओढत नेले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न (accident) केला पण ट्रकचालक काही थांबला नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मृत पुष्पा या मूळच्या लखनऊ येथील रहिवासी होत्या. या घटनेनंतर आरोपी ट्रकचालक फरार झाला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी

शंभूराज देसाईंचे आजोबा थोर पण हे चोर : आ. भास्कर जाधव

Shamburaj Desai Patan

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्यभर पुढे पुढे करणारे मंत्री शंभूराज देसाई देशात दीर्घकाळ चाललेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर, महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा अपमान होतो. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बाबतीत तोंड उघडत नाहीत. त्याठिकाणी हिम्मत दाखवत नाहीत. मात्र, ज्या शिवसेना प्रमुखांनी लाल दिवा देऊन सन्मान केला, त्यांचा पक्ष संपवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे पाप करतात. शंभूराज देसाई यांचे आजोबा थोर होते; पण हे चोर निघाले, अशी जहरी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केले

येथील श्रीमंत रणजीतसिंह पाटणकर स्मारक मंदिरात आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हा प्रमुख रवी पाटील, तालुका प्रमुख सुरेश पाटील, चिपळूण तालुका प्रमुख संदीप सावंत, सचिन आचरे, गौरव परदेशी, दादा पानस्कर, भरत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

भास्कर जाधव म्हणाले, “शंभूराज देसाई यांची ओळख चोरवाटा दाखवणारा, अशी महाराष्ट्रात झाली आहे. थोर महापुरुषांची बदनामी करून राजकारण केले जात आहे. महाराष्ट्राचे प्रश्न संपले का, तर नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने संस्कृती लोकशाही व समाज व्यवस्था बिघडण्याची सुपारी घेतली आहे. सत्तेची मस्ती दहशत या जोरावर खाजगीकरण आणि राजकीय पक्ष संपवण्यासाठी कुटील डाव केले जात आहेत.

पाटणच्या जनतेचा शंभूराज देसाईंनी विश्वासघात केला
पाटणचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई यांचे अलीकडचे बोलणे जमिनीवरून दिसत नाही. हेच शंभूराज देसाई त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे ऋणातून मी कसा उतराई होऊ असे म्हणाले होते. आज मात्र त्यांनी विश्वासघात केला आहे. त्यामुळे पाटणची जनता वेळ आल्यावर त्यांचा हिशोब चुकता करील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते, माजी मंत्री भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला.

Business Idea : घरबसल्या ‘हे’ व्यवसाय करून मिळवा हजारो रुपये

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला घरबसल्या एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आजची ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची ठरू शकेल. हे लक्षात घ्या कि, सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. आज आपण अशा काही व्यवसायांबाबत जाणून घेणार आहोत. याद्वारे घरबसल्या अगदी आरामात भरपूर कमाई मिळवता येऊ शकेल. मात्र यासाठी आपल्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असावे लागेल. चला तर मग घरबसल्या करता येऊ शकणाऱ्या काही व्यवसायांबाबतची माहिती जाणून घेऊयात…

Introduction to digital marketing | Indian Digital Marketer

डिजिटल मार्केटिंग

आजकाल असे अनेक व्यवसाय आहेत, जे डिजिटल पद्धतीने केले जातात. ज्यासाठी डिजिटल मार्केटिंग खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करता येऊ शकेल. तसेच त्यासाठी गुंतवणूकीची गरज देखील नाही. याद्वारे गुंतवणूक न करताही चांगले उत्पन्न मिळवता येते. Business Idea

Excellence Publishing Services

इंटरनेट रिसर्च आणि सर्व्हे

सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून चांगली कमाई करता येते. जेव्हा आपण फावल्या वेळेत इंटरनेट वापरतो. त्यावेळी ऑनलाइन सर्व्हे भरू शकता. याद्वारे देखील भरपूर कमाई करता येऊ शकते. Business Idea

4K video playback could be exclusive to YouTube Premium users: Report

youtube द्वारे

गेल्या काही वर्षांत व्हिडिओ कंटेन्टमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यासाठी YouTube सारखे काही फ्री प्लॅटफॉर्म देखील आहे. ज्यावर अपलोड केलेल्या व्हिडिओंद्वारे भरपूर कमाई करता येऊ शकेल. यासाठी फक्त आपल्याला स्वतःचे यूट्यूब चॅनल तयार करून आपल्या आवडीच्या विषयांवरील व्हिडिओ बनवा. यानंतर तो यूट्यूबवर अपलोड करा. यावर दररोज, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा व्हिडिओ अपलोड करता येईल. यानंतर, या व्हिडिओद्वारे चांगली कमाई मिळवता येऊ शकेल. सध्या अनेक लोकं यूट्यूबच्या माध्यमातून मोठी कमाई करत आहेत. Business Idea

Online classes: Bane or boon? - The Himalayan Times - Nepal's No.1 English Daily Newspaper | Nepal News, Latest Politics, Business, World, Sports, Entertainment, Travel, Life Style News

ऑनलाइन क्लासेस

जर आपल्याला अभ्यासात स्वारस्य असेल आणि एखाद्या विषयावर चांगले प्रभुत्व असेल तर आपण ऑनलाइन क्लासेस सुरू करू शकता. यानंतर जसजसा क्लास सुरू लोकप्रिय होऊन सदस्य वाढतील, त्यानंतर कमाई देखील वाढेल.

Ultimate Guide to Blogging for Small Businesses in 2023 - Keap

ब्लॉगिंग

जर आपल्याला लिखाणाची आवड असेल, तर आपण ब्लॉग लिहू शकता. हे लक्षात घ्या कि, अशा प्रकारच्या ब्लॉगिंगद्वारे देखील भरपूर कमाई करता येते. जर आपल्याला हे मोठ्या प्रमाणावर करायचे असेल तर यासाठी स्वतःची वेबसाइट देखील बनवता येऊ शकेल. Business Idea

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : 

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ

आ. शहाजीबापु म्हणाले, अजित दादांचा ‘स्वराज्यरक्षक’ शब्द बरोबर आहे, पण…

Shahajibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
स्वराज्यरक्षक हा अजित दादांचा शब्द बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर छ. संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारकही होते, आणि ते कडवे हिदु धर्मवीर होते. अजित दादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले. तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. तेवढा अजित दादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापु पाटील यांनी लगावला आहे.

कराड येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहाजीबापु पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी संवाद साधला. छ. संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या शब्दावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यावरून शहाजीबापु यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
शिंदे- फडणवीस सरकारची धोरणे ही लोकहिताची आहेत. या धोरणात वीज कर्मचाऱ्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीचं धोरण आखलेलं आहे. जे धोरण सरकारने स्विकालेलं आहे, ते महाराष्ट्र राज्याच्या फायद्याच आहे.

Garlic Side Effects : ‘या’ लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये, अन्यथा…

Garlic side effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या दैनंदिन जीवनात लसूण (Garlic)हा नेहमीचा लागणारा आणि रोजच्या वापरातील पदार्थ आहे. लसणाशिवाय कोणतीही भाजी किंवा आमटी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे लसणाचे महत्त्व आनन्यसाधारण आहे. काहीजण तर आवडीने कच्चाच लसूण खातात. खरं तर लसूण खाल्ल्याने आपल्याला मोठे आरोयदायी फायदे होतात. परंतु, काही लोकांसाठी मात्र लसूण खाण हानिकारक (Garlic Side Effects) ठरू शकत.

ज्या लोकांना अॅसिडिटीचा (Acidity) त्रास आहे अशा लोकांनी लसूण खाणं टाळावं. लसूण खाल्ल्याने त्यांच्या छातीत जळजळ होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीचा त्रास असलेल्यां व्यक्तींनी रिकाम्या पोटी तर अजिबात लसूण खाऊ नये.

ज्या लोकांना नेहमी पोटाची समस्या असते अशा लोकांनीही लसणाचे सेवन करू नये, यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.

जर तुम्हाला खूप डोकेदुखी होत असेल तर लसणाचे सेवन करू नका. कच्चा लसूण तुमची डोकेदुखी वाढवू शकतो.

जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधी आणि शरीराला घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही लसणाचे सेवन अजिबात करू नये. यामुळे तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

अनेक वेळा हृदयरोगी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात, अशा स्थितीत अशा व्यक्तींनी लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.

संजय राऊत महाराष्ट्रातील अदखल पात्र : आ. शहाजीबापू पाटील

Shahjibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
संजय राऊत हे सकाळी उठल्यानंतर एकाद तरी भडक विधान केल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे त्या पात्राची महाराष्ट्राने फार दखल घ्याव, असं काही ठेवलं नाही, अदखल पात्र अशी गणना संजय राऊतांची झालेली आहे, असा हल्लाबोल बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापू पाटील यांनी केला.

कराड येथे एका कार्यक्रमानिमित्त आ. शहाजीबापू पाटील होते. तेव्हा त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. पुढे आ. पाटील म्हणाले, संजय राऊतांनी घडवलेलं जे काही होते. आय काॅंग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेना हे बाैध्दिक किंगमेकर झालेले होते. त्यांना हा टोला बसलेला आहे अन् त्याच्या तो जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे ते रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी बोलत राहतायत. त्यात कुठलेही तथ्य नाही, तो एक राजकीय डावपेचातील एक भाग आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाला फायदा
जोगेंद्र कवाडे हे एक आंबेडकरवादी चळवळीतील प्रभावी नेते आहेत. त्याचे विचार, वक्तृत्व प्रभावी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना गटाला या युतीचा मोठा फायदा होईल.

 

Vivo X80 : फक्त 5,772 रुपयांमध्ये घरी आणा Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन, असे असतील फिचर्स

Vivo X80

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo X80 : फ्लिपकार्टवर सध्या Vivo Days Sale सुरु झाला आहे. 2 जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल 6 जानेवारीपर्यंत चालेल. हे लक्षात घ्या कि, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक चांगले स्मार्टफोन अतिशय कमी किंमतींमध्ये खरेदी करण्याची संधी मिळते आहे. या सेल अंतर्गत, ग्राहकांना 51,499 रुपयांच्या किंमतीमध्ये Vivo X80 घरी आणता येईल. त्याच प्रमाणे काही ऑफर्स अंतर्गत त्यावर मोठ्या प्रमाणात सूटही देण्यात येते आहे. चला तर मग फ्लिपकार्टच्या सेल विषयीची माहिती जाणून घेउयात…

Vivo X80 Pro 5G Review: In a class of its own

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये, ग्राहकांना हा फोन दरमहा फक्त 5,722 रुपयांच्या EMI मध्ये घरी आणता येईल. म्हणजेच 5,772 रुपये भरून घरी आणा आणि उर्वरित पैसे दर महिन्याला द्या. याशिवाय, यावर एक्सचेंज ऑफरवर देखील मिळेल.ज्या अंतर्गत यावर 21,400 रुपयांची सूट दिली जाते आहे.

या Vivo X80 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा फुल HD + 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले असेल, त्याचे रिझोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. तसेच या डिस्प्लेचा रीफ्रेश दर 120Hz तर टच सॅम्पलिंग रेट 240Hz असेल. कंपनी यामध्ये 1000 nits चा पीक ब्राइटनेस लेव्हल देखील देत आहे.

Vivo X80 Pro review: Flagship performance, but could be smoothe

या Vivo X80 स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. तसेच या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसहीत येईल. तसेच यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.3, USB Type-C आणि GPS सारखे पर्याय देखील देण्यात आले आहेत.

हा Vivo X80 स्मार्टफोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनीने MediaTek Dimensity 9000 चिपसेट दिला आहे. तसेच हा फोन कॉस्मिक ब्लॅक आणि अर्बन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Vivo X80 Pro review: Can't shake budget tag despite good cameras, features  | Business Standard News

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास या Vivo X80 स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे उपलब्ध असतील. ज्यामध्ये, 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासहीत एक किंवा दोन 12-मेगापिक्सेल कॅमेरे देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobiles/vivo~brand/pr?sid=tyy,4io

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ