Saturday, December 13, 2025
Home Blog Page 1687

आ. शहाजीबापु म्हणाले, अजित दादांचा ‘स्वराज्यरक्षक’ शब्द बरोबर आहे, पण…

Shahajibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
स्वराज्यरक्षक हा अजित दादांचा शब्द बरोबर आहे. परंतु त्याचबरोबर छ. संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारकही होते, आणि ते कडवे हिदु धर्मवीर होते. अजित दादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असे म्हटले. तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ते आवडेल. तेवढा अजित दादांनी वैचारीक मोठेपणा दाखवावा, असा टोला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापु पाटील यांनी लगावला आहे.

कराड येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहाजीबापु पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी संवाद साधला. छ. संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्यरक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्यरक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक या शब्दावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यावरून शहाजीबापु यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वीज कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही
शिंदे- फडणवीस सरकारची धोरणे ही लोकहिताची आहेत. या धोरणात वीज कर्मचाऱ्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. अशा पध्दतीचं धोरण आखलेलं आहे. जे धोरण सरकारने स्विकालेलं आहे, ते महाराष्ट्र राज्याच्या फायद्याच आहे.

Garlic Side Effects : ‘या’ लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये, अन्यथा…

Garlic side effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या दैनंदिन जीवनात लसूण (Garlic)हा नेहमीचा लागणारा आणि रोजच्या वापरातील पदार्थ आहे. लसणाशिवाय कोणतीही भाजी किंवा आमटी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे लसणाचे महत्त्व आनन्यसाधारण आहे. काहीजण तर आवडीने कच्चाच लसूण खातात. खरं तर लसूण खाल्ल्याने आपल्याला मोठे आरोयदायी फायदे होतात. परंतु, काही लोकांसाठी मात्र लसूण खाण हानिकारक (Garlic Side Effects) ठरू शकत.

ज्या लोकांना अॅसिडिटीचा (Acidity) त्रास आहे अशा लोकांनी लसूण खाणं टाळावं. लसूण खाल्ल्याने त्यांच्या छातीत जळजळ होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीचा त्रास असलेल्यां व्यक्तींनी रिकाम्या पोटी तर अजिबात लसूण खाऊ नये.

ज्या लोकांना नेहमी पोटाची समस्या असते अशा लोकांनीही लसणाचे सेवन करू नये, यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.

जर तुम्हाला खूप डोकेदुखी होत असेल तर लसणाचे सेवन करू नका. कच्चा लसूण तुमची डोकेदुखी वाढवू शकतो.

जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधी आणि शरीराला घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही लसणाचे सेवन अजिबात करू नये. यामुळे तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

अनेक वेळा हृदयरोगी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात, अशा स्थितीत अशा व्यक्तींनी लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.

संजय राऊत महाराष्ट्रातील अदखल पात्र : आ. शहाजीबापू पाटील

Shahjibapu Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
संजय राऊत हे सकाळी उठल्यानंतर एकाद तरी भडक विधान केल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. त्यामुळे त्या पात्राची महाराष्ट्राने फार दखल घ्याव, असं काही ठेवलं नाही, अदखल पात्र अशी गणना संजय राऊतांची झालेली आहे, असा हल्लाबोल बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आ. शहाजीबापू पाटील यांनी केला.

कराड येथे एका कार्यक्रमानिमित्त आ. शहाजीबापू पाटील होते. तेव्हा त्यांनी हॅलो महाराष्ट्रशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. पुढे आ. पाटील म्हणाले, संजय राऊतांनी घडवलेलं जे काही होते. आय काॅंग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेना हे बाैध्दिक किंगमेकर झालेले होते. त्यांना हा टोला बसलेला आहे अन् त्याच्या तो जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे ते रोज सकाळी उठल्यानंतर काहीतरी बोलत राहतायत. त्यात कुठलेही तथ्य नाही, तो एक राजकीय डावपेचातील एक भाग आहे.

बाळासाहेबांची शिवसेना गटाला फायदा
जोगेंद्र कवाडे हे एक आंबेडकरवादी चळवळीतील प्रभावी नेते आहेत. त्याचे विचार, वक्तृत्व प्रभावी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना गटाला या युतीचा मोठा फायदा होईल.

 

Vivo X80 : फक्त 5,772 रुपयांमध्ये घरी आणा Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन, असे असतील फिचर्स

Vivo X80

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vivo X80 : फ्लिपकार्टवर सध्या Vivo Days Sale सुरु झाला आहे. 2 जानेवारीपासून सुरू झालेला हा सेल 6 जानेवारीपर्यंत चालेल. हे लक्षात घ्या कि, या सेलमध्ये ग्राहकांना अनेक चांगले स्मार्टफोन अतिशय कमी किंमतींमध्ये खरेदी करण्याची संधी मिळते आहे. या सेल अंतर्गत, ग्राहकांना 51,499 रुपयांच्या किंमतीमध्ये Vivo X80 घरी आणता येईल. त्याच प्रमाणे काही ऑफर्स अंतर्गत त्यावर मोठ्या प्रमाणात सूटही देण्यात येते आहे. चला तर मग फ्लिपकार्टच्या सेल विषयीची माहिती जाणून घेउयात…

Vivo X80 Pro 5G Review: In a class of its own

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये, ग्राहकांना हा फोन दरमहा फक्त 5,722 रुपयांच्या EMI मध्ये घरी आणता येईल. म्हणजेच 5,772 रुपये भरून घरी आणा आणि उर्वरित पैसे दर महिन्याला द्या. याशिवाय, यावर एक्सचेंज ऑफरवर देखील मिळेल.ज्या अंतर्गत यावर 21,400 रुपयांची सूट दिली जाते आहे.

या Vivo X80 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा फुल HD + 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले असेल, त्याचे रिझोल्यूशन 2400×1080 पिक्सेल आहे. तसेच या डिस्प्लेचा रीफ्रेश दर 120Hz तर टच सॅम्पलिंग रेट 240Hz असेल. कंपनी यामध्ये 1000 nits चा पीक ब्राइटनेस लेव्हल देखील देत आहे.

Vivo X80 Pro review: Flagship performance, but could be smoothe

या Vivo X80 स्मार्टफोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. तसेच या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसहीत येईल. तसेच यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.3, USB Type-C आणि GPS सारखे पर्याय देखील देण्यात आले आहेत.

हा Vivo X80 स्मार्टफोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. तसेच प्रोसेसर म्हणून कंपनीने MediaTek Dimensity 9000 चिपसेट दिला आहे. तसेच हा फोन कॉस्मिक ब्लॅक आणि अर्बन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

Vivo X80 Pro review: Can't shake budget tag despite good cameras, features  | Business Standard News

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास या Vivo X80 स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे उपलब्ध असतील. ज्यामध्ये, 50-मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासहीत एक किंवा दोन 12-मेगापिक्सेल कॅमेरे देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/mobiles/vivo~brand/pr?sid=tyy,4io

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ

ऊसतोड मजुराच्या 17 वर्षीय मुलीवर बंद खोलीत 2 वर्ष बलात्कार; तुला नोकरी लावतो, लग्न करतो म्हणत..

pune rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीचं आमिष दाखवून ऊसतोड मजूराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पीडित मुलगी ही मूळ बीडची असून कामानिमित्त पुण्यात आली होती. तुला नोकरीला लावतो, तुझ्याशी लग्न करतो अशा खोट्या भूलथापा देत तिच्यावर तब्बल २ वर्ष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संदीप किसन बडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत फिर्यादी मुलीने केलेल्या आरोपानुसार, तिची आई 2017 पासून कामानिमित्त उत्तरप्रदेश येथे राहते त्यामुळे ती तिची मावशी शिला मुंजाजी तरकशे रा.चाकण, जि. पुणे यांच्या ओळखीने घरकाम शोधण्यासाठी चाकणला आली. चाकणमध्ये मावशी राहत असलेल्या परिसरात तिला घरकाम मिळाले. जवळपास वर्षभर तिने तिथे काम केले मात्र त्यांनतर तेवढ्या पैशात परवडत नसल्याने सदर पीडित तरुणीने तिची मोठी बहीण राजश्री शिंदे (रा. आढळगाव, ता. श्रीगोदा, जि. अहमदनगर) हिस काम शोधण्यास सांगितलं. तेव्हा तिने तिचा दूरवा नातेवाईक संदीप बडेकर याला चाकण बस स्टँडला पाठवले व तिला बस स्टॅण्डवर जाउन त्याला भेटायला सांगितले. तेव्हा आरोपी आणि पीडित मुलीची सर्वप्रथम ऑक्टोबर 2018 मध्ये पहिल्यांदा भेट झाली.

त्यावेळी सदर मुलीने संदीप बडेकर याला घरकाम शोधून देण्यास सांगितले, तेव्हा त्याने तिला त्याच्या गाडीत बसायला सांगितले व दोघे तळेगाव दाभाडे येथे काम शोधण्याकरिता गेले. तेथे एका बिल्डींगमधील एका रूममध्ये संदीप बडेकर याने पीडित मुलीला राहण्यास सांगितले. दोन दिवस ती एकटी तेथेच राहिले, . तिस-या दिवधी संदीप बडेकर हा दारू पिउन ती राहात असलेल्या खोलीत आला आणि शिवीगाळ करत तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. मुलीने त्याला विरोध करूनही त्याने जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्याबाबत कोणाला सांगू नकोसे अशी दमदाटी केली. आसपास कोणीही ओळखीचे नसल्याने सदर मुलीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

परंतु संदीप बडेकर याने घरकाम शोधून तर दिलेच नाही, उलट तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून दुस-या दिवशीही तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला तळेगावमधील राहात असलेल्या रूममध्येच राहण्यास सांगितले. मुलीची आई कामानिमित्त उत्तरप्रदेशाला असल्याने आणि इतर नातेवाईक मूळ गावी राहात असल्याने ती तेथेच राहिली. यादरम्यान, ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2020 पर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांच्या कालावधीत संदीप बडेकर हा लग्न करतो असे सांगून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संभोग करीत होता. परंतु त्याने तिच्यासोबत लग्न केले नाही.

त्यांनतर सप्टेंबर 2020 मध्ये तिची विवाहित बहीण राजश्री शिंदे हिचे पती बाबासाहेब शिंदे हे मयत झाले. त्यानंतर पीडितेने काही दिवसांनी बहीण राजश्री शिंदे आणि आई मंगल कनकुटे या दोघींना तळेगावला राहात असलेल्या रूमवर फोन करून बोलावून घेतले आणि ती त्यांच्यासोबत श्रीगोंदा येथे राजश्री शिंदे हिच्या घरी गेली आणि त्यांनतर परळीला मावशीकडे राहायला गेली. त्यांनतर सदर पीडित मुलीने आरोपीवर कायदेशीर ऍक्शन घेतली. ऑक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2020 पर्यंतच्या कालावधीत अल्पवयीन असताना बलात्कार केल्याप्रकरणी संदीप बडेकर याच्याविरूध्द तिने कायदेपीर तक्रार आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर कलम ३७६(२) (n), कलम ५०४, ५०६ , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार, कलम ४, ८, १२ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

FD Rate : ‘ही’ हाउसिंग फायनान्स कंपनी एफडीवर देत आहे बँकांपेक्षा जास्त व्याज

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rate : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ICICI हाउसिंग फायनान्स कंपनीने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातवाढ केली आहे.

ICICI Home Finance launches home loan festival

3 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू

हे नवीन दर 3 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. हे लक्षात घ्या कि, CRISIL, ICRA आणि CARE कडून ICICI HFC ला AAA रेटिंग मिळाले आहे. म्हणजे कंपनीच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत. या कंपनी कडून क्युम्युलेटिव्ह आणि नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीची ऑफर दिली जाते. या बदलानंतर, कंपनी आता क्युम्युलेटिव्ह एफडीवर 7.50 टक्क्यांपर्यंत तर, ICICI HFC नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर दरमहा जास्तीत जास्त 7.25 टक्के दराने व्याज देईल. FD Rate

क्युम्युलेटिव्ह पर्यायांतर्गत, ICICI HFC 12 ते 24 महिन्यांच्या FD वर 7.00 टक्के, 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.30 टक्के आणि 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देईल. FD Rate

ICICI HFC expands presence in AP, TS

नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवरील व्याजदरातही वाढ

हे लक्षात घ्या कि, या कंपनीने नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे. त्यानंतर आता कंपनी 12 ते 24 महिन्यांच्या FD वर दरमहा 6.80 टक्के दराने व्याज देईल. त्याच प्रमाणे, आता ग्राहकांना 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.05 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.15 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.25 टक्के मासिक व्याज मिळेल. FD Rate

‘या’ एफडींवरही मिळेल जास्त व्याज

कंपनीने 12 ते 24 महिन्यांच्या FD वर तिमाही दराने 6.85 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता ग्राहकांना 24 ते 36 महिन्यांच्या FD वर 7.10 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर 7.20 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर 7.30 टक्के दराने व्याज मिळेल. या अंतर्गत, ICICI HFC कडून आता 12 ते 24 महिन्यांच्या नॉन-क्युम्युलेटिव्ह एफडीवर वार्षिक 7.00 टक्के, 24 ते 36 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.30 टक्के, 36 ते 48 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.40 टक्के आणि 48 ते 120 महिन्यांच्या FD वर वार्षिक 7.50 टक्के व्याज दिले जाईल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. FD Rate

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

RBI कडून रेपो दरात वाढ

अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. FD Rate

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicihfc.com/fixed-deposit/fd-interest-rate

हे पण वाचा :
Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळेल 1000GB डेटा
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Google Pixel 7 वर मिळवा 28,000 रुपयांपर्यंतची सूट, अशा प्रकारे घ्या ऑफरचा लाभ

Bucket Water Heater : कडाक्याच्या थंडीतही अवघ्या काही मिनिटांत मिळवा गरम पाणी; फक्त 1,599 रुपयांमध्ये घरी आणा ही बादली

Bucket Water Heater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bucket Water Heater : भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याच्या थंडीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पाण्यामागे हात घालणे अनेकदा नकोसे वाटते. मात्र पाण्याशी संबंधित कामासाठी जसे कि, कपडे, भांडी धुणे अशा अनेक कामासाठी पाण्यामध्ये हात घालण्यास गत्यंतर नसते. मात्र जर गरम पाणी असेल तर त्यातून थोडाफार दिलासा मिळतो. यासाठी गिझर कामी येईल. थंडीच्या ऋतूमध्ये लोकांकडून गिझरची खरेदी केली जाते. मात्र, किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच गिझर घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत आज आपण गिझरच्या एका स्वस्त पर्यायाबाबतची माहिती जाणून घेउयात…

Buy Abirami Instant Bucket Water Heater | Portable Water Heater | SHOCKPROOF Instant Heating power saving Low Electicity Bill | 20 Ltrs Capacity (Mustard Color) Online at Low Prices in India - Amazon.in

वास्तविक, ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर सध्या एक बादली विकली जाते आहे, जी गिझरसाठी चांगला पर्याय ठरू शकेल. त्याची किंमत देखील कमी आहे. याशिवाय यामुळे जास्त वीज बिल देखील येणार नसल्याचा दावा देखील कंपनीने केला आहे. Bucket Water Heater

Abirami Bucket Water Heater at Rs 1599/unit | Coimbatore | ID: 21498931633

खरं तर आपण ज्या बादली बाबत चर्चा करत आहोत ती एक Abirami 20 L इन्स्टंट वॉटर गीझर आहे. फ्लिपकार्टवरून सवलतीनंतर ती 2,499 रुपयांऐवजी 1,599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याबरोबरच कंपनीकडून यावर ग्राहकांना एक वर्षाची वॉरंटी देखील मिळत ​​आहे. यावर 10 दिवसांची रिप्लेसमेंट ऑफर देखील दिली जाते आहे. या मल्टीपर्पज वॉटर हीटरची क्षमता 20 लिटरची आहे. Bucket Water Heater

Bucket Water Heater: कड़कड़ाती ठंड में भी मिनटों में पानी होगा गर्म, बस  1,599 रुपये में घर ले आएं ये बाल्टी - bucket water heater buy instant water  heater for winter from

ही बादली गिझरसारखीच अवघ्या काही मिनिटांतच पाणी गरम करते. फ्लिपकार्टवरील माहितीनुसार, या प्रॉडक्टद्वारे गरम होणारे पाणी आंघोळ, पिणे, स्वयंपाकघर आणि इतर अनेक कामांसाठी देखील वापरता येईल. शॉकप्रूफ डिझाइन असलेले हे एक पोर्टेबल प्रॉडक्ट आहे. जे प्रवासासाठी देखील वापरता येऊ शकते. या बादलीमध्ये पाणी घेण्यासाठी नळही दिला गेला आहे. Bucket Water Heater

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/abirami-20-l-instant-water-geyser-instant-bucket-heater-shockproof-power-saving-low-electricity-bill-green/p/itma24ca4ae41175

हे पण वाचा :
Samsung Galaxy S21 SE फोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या किंमत अन फिचर्स
Bank locker कसे मिळवायचे ??? या संबंधित नियमांबाबतची माहिती जाणून घ्या
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिला शेवटचा इशारा, लवकरात लवकर करा ‘हे’ काम अन्यथा निष्क्रिय होईल Pan Card
Smart TV Offers : फक्त 4999 मध्ये घरी आणा 32 इंच ब्रँडेड स्मार्ट टीव्ही, डिस्काउंट अन् फीचर्स तपासा
Indian Overseas Bank च्या ​​FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा – काँग्रेस

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता पातळी अलीकडच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर ढासळली आहे. यामुळे शेतकरी वर्गातील अन् ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. यापार्श्वभुनीवर जि.प. शाळांची गुणवत्ता सुधारा अन् गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना नापास करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांना भेटून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील सुमार गुणवत्तेचा लेखा जोखा मांडला आहे. तसेच अधिकारी व शिक्षक यांच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. बालाजी गाडे यांनी प्रधान सचिवांना निवेदन देऊन शिक्षण व्यवस्थेतील अनेक प्रश्न मांडले.

गाव खेड्यातल्या गोर गरीब शेतकरी, कामगार, शेतमजूर या अडाणी जनतेचे पाल्य येथे शिकत असतात. या पालकांना त्यांची मुले काय शिकतात त्यांची किती प्रगती झालीय हे समजेल असे नाही त्यामुळे शिक्षकांनी प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांना शिकवणे गरजेचे आहे. पण असे होतांना दिसत नाही. माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्याला साधं मराठी सुद्धा नीट वाचता व लिहिता येत नाही .मग शिक्षक आणि शिक्षण विभाग करतोय तरी काय ? ज्यांना वाचता येत नाही त्यांना पुढच्या वर्गात पाठवलंच कसं जातंय? असा सवाल त्यांनी केला. धर्म आणि जातीच्या राजकारणात मश्गूल असलेले सत्ताधारी याकडे अजिबात लक्ष देणार नाहीत.

शिक्षका अभावी शाळा बंद पडत आहेत. अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत. ती रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी बालाजी गाडे यांनी केली तसेच शिक्षकांवर शिकवण्या व्यतिरिक्त अनेक प्रशासकीय कामांचा भार टाकला जातो त्यामुळे त्यांना मूळ शिक्षकी पेशाला न्याय देता येत नाही याकडे सुद्धा त्यांनी प्रधान सचिवांचे लक्ष वेधले.

गाव खेड्यातल्या शाळा ओस पडत आहेत आणि शिक्षकांच्या सुमार दर्जा मुळे विद्यार्थी सुद्धा सुमार तयार होत आहेत. हेच विद्यार्थी पुढे प्रौढ झाल्यावर गुणवत्ता नसल्यामुळे बेरोजगार होऊन समाजावर भार होऊन जगत आहेत. त्यातूनच गुन्हेगारीचे , नशाखोरीचे प्रमाण ही वाढत आहे . गुणवत्ता प्रधान शिक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही आणि नोकरी नसल्या मुळे लाखो मुलांचे आज लग्न होत नाहीयेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बालाजी गाडे पाटील यांनी शिक्षण विभागाला दिला आहे. समाजा तील सुजाण नागरिक व पालकांनी या समाजहिताच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

मांढरदेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

सातारा : मांढरदेव यात्रा अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी श्री काळुबाई मंदिर व मांढरदेव परिसराची पहाणी केली.

मांढरदेव यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशा सूचना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी संयुक्तपणे केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंदिर ट्रस्ट व प्रशासनाच्या विविध विभागानी केलेली तयारी याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून तयारी बाबत समाधान व्यक्त केले व कर्तव्यवर असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी यात्रा कालावधी दरम्यान दक्ष राहून काम करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स

Samsung Galaxy F04

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Samsung ने आज भारतीय बाजारात Samsung Galaxy F04 लॉन्च केला आहे. हा कंपनीच्या Galaxy F-सिरीज अंतर्गत एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. सॅमसंगच्या या मोबाईल ची किंमत अवघी 7,499 रुपये आहे. चला आज आपण जाणून घेऊया या मोबाईलची खास वैशिष्ट्ये..

6.5-इंचाचा डिस्प्ले-

या सॅमसंग (Samsung Galaxy F04) मोबाईलमध्ये (1600 × 720 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 60 Hz रिफ्रेश रेटसहसह 6.5-इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर आधारित One UI 4.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह येईल. सॅमसंगच्या या मोबाईल ला 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी USB टाइप-सी पोर्टद्वारे 15W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्हाला हा मोबाईल जेड पर्पल आणि ओपल ग्रीन या २ रंगामध्ये मिळू शकतो.

Samsung Galaxy F04

कॅमेरा – (Samsung Galaxy F04)

मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, (Samsung Galaxy F04) तर या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि सेल्फी साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G, Wi-Fi, Bluetooth v5, GPS, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट आहे.

Samsung Galaxy F04

किंमत किती –

मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy F04 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. हा मोबाईल 12 जानेवारीपासून Flipkart, Samsung.com आणि इतर रिटेलर्सवर सुरू होईल. या मोबाईल वरील सेल ऑफरमध्ये 1,000 रुपयांची त्वरित सूट समाविष्ट आहे. ही सवलत ICICI क्रेडिट कार्ड व्यवहाराद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे.

हे पण वाचा : 

Jio Family Recharge Plan : एका Recharge चा फायदा 4 जणांना; 200 GB Data अन् बरंच काही

Nokia C31 : अवघ्या 10 हजार रुपयांत मिळणार Nokia चा जबरदस्त मोबाईल; पहा फीचर्स

Moto X40 लॉन्च; 60 MP सेल्फी कॅमेरा अन् बरंच काही; किंमतही पहा

भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स