Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2061

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; पहा आजचे दर

Gold Price Today
Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी, 1 नोव्हेंबर रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.71 टक्क्यांची घसरण झाली आहे. म्हणजेच सोने 358 रुपयांनी घसरले आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही 1.64 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

MCX वर, 24-कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 358 रुपयांनी घसरून (Gold Price Today) 50,056 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होते. सोन्याचा व्यवहार आज 50,202 रुपयांपासून सुरू झाला. किंमत उघडल्यानंतर, एकदा वाढ झाली आणि दर 50,245 रुपये झाला. पण नंतर लगेच या किमतीत घसरण झाली आणि सोन्याचा दर दर 50,056 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला.

Gold Price Today

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे-

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760 रुपये

मुंबई
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,730 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,530 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,760  रुपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

हे पण वाचा :

LPG Gas Cylinder Price : LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी घट; पहा नवे दर

BSNL कडून 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसहीत मिळेल इंटरनेट डेटा !!!

Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत या फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ही महत्त्वाची कागदपत्रे !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

धक्कादायक ! बुलढाण्यामध्ये एका शुल्लक कारणावरून युवकावर जीवघेणा हल्ला

young man attacked

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – अतिशय शुल्लक कारणांवरुन काही जण एकमेकांवर चालून (young man attacked) जातात, भांडण करतात आणि प्रसंगी एकमेकांसोबत हाणामारी (young man attacked) देखील करतात त्यामुळे महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.

यामध्ये शुल्लक कारणावरून एका युवकावर जीवघेणा हल्ला (young man attacked) करण्यात आला आहे. या युवकाच्या मानेवर धारदार वस्तऱ्याने वार करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये (young man attacked) या युवकाच्या मानेवर तब्बल 17 टाके पडलेत. तर कानालाही मोठी इजा झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप या युवकाकडून तसेच त्याच्या नातेवाईकाकडून करण्यात आला आहे.

या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटकसुद्धा केलेली नाही. त्यामुळे संबंधित युवक आणि त्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांवर रोष व्यक्त (young man attacked) करण्यात येत आहे.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर 
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

महाबळेश्वर अर्बन बॅंकेवर प्रशासक नेमण्याची संचालकांची मागणी

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बॅंकेत प्रशासकाही नियुक्ती करण्याची मागणी बँकेचे संचालक समीर सुतार यांनी सहा.दुय्यम निबंधक जे.पी शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीत तोडकर, दिलीप रिंगे, वृषाली डोईफोडे उपस्थित होत्या. महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या निवडी आधी सर्व संचालकांची बंद दाराआड चर्चा फिस्कटली व संचालकांमध्ये मतभेद झाल्याने निवडीवेळी संचालक समिर सुतार यांच्यासह जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, दिलीप रिंगे हे अनुपस्थित राहिले. या बहिष्कारामुळे 13 संचालकांपैकी 8 संचालकांच्या उपस्थितीत ही निवडीची प्रक्रिया पार पडली.

या निवडीवेळी अनुपस्थित राहिलेल्या पाच संचालकांच्या गटाने सहा. दुय्यम निबंधकांना भेटून निवेदन दिले असून या निवेदनात बँकेतील पदाधिकारी निवड रद्द करून प्रशासकाची नियुक्ती करण्याची प्रामुख्याने मागणी केली आहे. तसेच बँकेच माजी अध्यक्षांचा निष्क्रिय कारभारामुळेच आम्ही संचालकांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले तसेच सर्वांनी एकत्रित येऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून थकबाकीची प्रमाण कमी करण्यासाठीचे महत्वपूर्ण काम करणे गरजेचे होते. मात्र बँकेच्या सभासदांनी ज्या विश्वासाने संचालकांना विश्वस्त म्हणून पाठवले आहे त्यांनाच धोका देऊन नूतन अध्यक्षांसह काही संचालकांनी नातेवाईक मित्रमंडळींच्या नावावर घेतलेल्या भरमसाट कर्जाची परतफेड करायची नाही, हेच धोरण या संचालकांचे असून यांनीच बँकेस आर्थिक अडचणीत आणले आहे. बँकेतच गटतट निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयन्त सुरु केले असून असे गट निर्माण करून या गटांच्या माध्यमातून आपला स्वार्थ व उन्नती साधत आहेत. अश्या प्रकारचे वर्तन चालू असल्याने संस्थेच्या व भागधारक, ठेवीदारांच्या हिताचे नसल्याने अश्या संचालकांवर कारवाई करावी व बँकेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार यांनी महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या बँकेत कधीही, कोणत्याही प्रकारचे राजकारण झाले नाही, गटातटाचे राजकारण न करता संस्था प्रगतिप्रथावर जावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो मात्र आता या परंपरेला छेद देण्याचे काम नूतन अध्यक्षांसह काही संचालकांकडून होत असून या निवडीला आमचा विरोध असल्याचे नमूद केले. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, दिलीप रिंगे उपस्थित होते. या पाच संचालकांनी दिलेल्या तक्रारीला दुय्यम निबंधक काय निर्णय घेतात याकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दाऊदची माहिती देणाऱ्यास 25 लाखांचे बक्षीस; NIA ची घोषणा

dawood ibrahim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमविरोधातील कारवाई आणखी तीव्र झाली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रोख बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर NIA ने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. छोटा शकीलवर 20 लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दाऊद इब्राहिमने भारतात शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटांची (एफआयसीएन) तस्करी करण्यासाठी एक युनिट तयार केले आहे. आणि पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले घडवण्याची योजनाही आखली आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, एजन्सीने दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ ​​हाजी अनीस, जवळचे नातेवाईक जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना, शकील शेख उर्फ ​​छोटा शकील आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ ​​टायगर मेमन यांना बक्षीस जाहीर केले आहे. दाऊदवर 25 लाख रुपये, छोटा शकीलवर 20 लाख रुपये, अनीस, चिकना आणि मेमनवर 15 लाख रुपये जाहीर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासह भारतातील अनेक प्रकरणांमध्ये दाऊद वॉन्टेड आहे. विशेष म्हणजे दाऊदशिवाय लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिद्दीनचा सय्यद सलाहुद्दीन आणि निकटवर्तीय अब्दुल रऊफ असगर यांचाही भारतातील मोस्ट वाँटेड यादीत समावेश आहे.

लोकांनी भरगच्च भरलेली बोट नदीत उलटली, दुर्घटनेचा लाईव्ह Video आला समोर

boat accident

गाझिपूर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गाझिपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना (boat accident) घडली आहे. यामध्ये मुलं आणि बायकांनी खचून भरलेली बोट अचानक नदीमध्ये उलटली(boat accident). या दुर्घटनेमुळे (boat accident) परिसरात मोठी खळबळ उडाली. आपल्या जनावरांना चारा घेऊन जात असताना हि भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या बोटीत जवळपास 25 लोक होते. गंगा नदीत ही बोट उलटली आहे.

या भीषण अपघातात (boat accident) बोटीतील 7 जण वाहून गेले. रेवतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही दुर्घटना घडली आहे.गंगा नदीच्या पुरात बुडालेल्या 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पाण्यात बुडालेल्या 5 मुलांचा अद्याप शोध सुरू आहे. बोटीतील लोक जनावरांसाठी चारा घेऊन जात होते, त्याच दरम्यान बॅलन्स बिघडल्याने बोट बुडाल्याचे प्राथमिकदृष्या समोर आले आहे.

या दुर्घटनेत (boat accident) ग्रामस्थांनी बुडणाऱ्या 12 लोकांना वाचवलं आहे. तर बाकी बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे (boat accident) परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी यमुना नदीमध्ये बोट बुडून अशीच दुर्घटना घडली होती.

हे पण वाचा :
निवडणूकीचा बिगूल वाजला ः राज्यात 92 नगरपालिकांचा कार्यक्रम जाहीर
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू!!!
IND vs ENG 1st 20: Rohit Sharma ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच कर्णधार
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

भिलकटी येथे गावठी दारूविक्री प्रकरणी एकास अटक

Phaltan Police

फलटण | गावठी दारू तयार करून तिची विक्री करण्यात येत असलेल्या भिलकटी (ता. फलटण) येथे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून 1 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, यापैकी एकास अटक करण्यात आली आहे. सनी सोनवणे, पोपट गुंजाळ, किशोर आवारे (तिघेही रा. मंगळवार पेठ, फलटण), संदीप दिगंबर बनकर (रा. भिलकटी, ता. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, यापैकी संदीप बनकर यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, भिलकटी येथील बनकर यांच्या शेताजवळ नीरा उजवा कालव्या नजीकच्या झाडीत काल सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकला त्यावेळी तेथे त्यांना सनी सोनवणे, पोपट गुंजाळ, किशोर आवारे हे गावठी हातभट्टीच्या दारूचे मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून प्लॅस्टिकचे कॅन, इलेक्ट्रिक मोटार, केबल वायर, बॅरल, जर्मलची घमेली, ताट, बाभळीच्या साली, गुळाच्या ढेपा, नवसागर व एक मोटारसायकल, तयार गावठी हातभट्टीची 40 लिटर दारू असा एक लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याठिकाणी एक हजार 800 लिटर रसायन व 50 किलो वजनाचा गूळ पोलिसांनी पंचांसमक्ष जागेवर नष्ट केला.

सर्व संशयितांना संदीप बनकर याने जागा उपलब्ध करून दिली होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

मारुती- सुजूकीमध्ये मोठे बदल होणार? अध्यक्षांनी दिले थेट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियामध्ये पुढील काळात काही संघटनात्मक बदल होऊ शकतात. मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी मारुती सुझुकीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत माहिती दिली. सुझुकी मोटर कॉर्पोरेशन या मूळ कंपनीच्या संपूर्ण जागतिक व्यवसायात कंपनीचे योगदान वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर पार पडलेल्या एजीएम मिटिंग मध्ये बोलताना भार्गव म्हणाले की, भविष्यात सुझुकीच्या जागतिक उत्पादनात मारुती सुझुकी इंडियाचे योगदान गेल्या वर्षी गाठलेल्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. त्यामुळे मारुती सुझुकी इंडियाकडे आणखी काही पॉवर किंवा हिस्सेदारी असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

बायो मिथेन गॅस इंधनाच्या क्षेत्रात उतरण्यासाठी कंपनी आपली रणनीती तयार करेल, असेही भार्गव यांनी म्हंटल . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गांधीनगरमध्ये कंपनीला चार दशके पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही सूचना केली होती. भार्गव म्हणाले की, मारुती स्पष्टपणे सुझुकी जपानचा अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यांनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांच्या वक्तव्याचा दाखल देत म्हंटल की, गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, सुझुकी समूहाने जगभरात सुमारे 28 लाख वाहनांचे उत्पादन केले, त्यापैकी 1.6 दशलक्ष युनिट्स किंवा सुमारे 60 टक्के उत्पादन भारतात झाले.

भार्गव यांनी यावेळी सुझुकीची भारतात संपूर्ण मालकीची R&D कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच भविष्यात जेव्हा आम्ही काही बदल करू, तेव्हा आम्हाला तुमच्याकडून अधिक सहकार्य मिळेल अशी आशा आहे असं म्हणत त्यांनी संघटनात्मक बदलाचे संकेत दिले. मात्र, त्यात कोणते बदल होणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. कंपनीने रविवारी गुजरातमध्ये दोन बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळासोबत (एनडीडीबी) सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीवर गुन्हा दाखल

Police Borgaon

सातारा काशीळ (ता.सातारा) येथे विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी बसप्पा बिराजदार (रा.काशीळ) असे संबंधिताचे नाव आहे. वैष्णवी शिवाजी बिराजदार असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी व शिवाजी यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर काही महिन्यांनी शिवाजी हा दारू पिऊन माहेरहून पैसे घेऊन ये, या कारणावरून वारंवार वैष्णवीस मारहाण करत होता. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी तिच्या वेळोवेळी त्याची समजूत काढली होती. मात्र, त्याची मारहाण सुरूच होती. या छळाला कंटाळून वैष्णवीने घराच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या घटनेची फिर्याद वैष्णवीची आई माधुरी विठ्ठल बिदारी (वय- 50, रा. जालगिरी, ता. तिकोटा, विजापूर- कर्नाटक) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी शिवाजी याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले पुढील तपास करत आहेत.

मोदींनी केली गणपती बाप्पाची आरती; केंद्रीय मंत्र्यांच्या घरी जाऊन साजरा केला गणेशोत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीनंतर म्हणजेच तब्बल २ वर्षांनी देशभरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी जाऊन बाप्पाची आरती केली.मोदींनी यापूर्वीच एका संस्कृत श्लोक द्वारे देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.

बुधवारी नरेंद्र मोदी यांनी पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि गणेशाची आरतीही म्हंटली. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर माझे सहकारी पियुष गोयलजी यांच्या निवासस्थानी कार्यक्रमाला गेलो होतो. भगवान श्री गणेशाची कृपा सदैव आपल्यावर राहो असं ट्विट यानंतर मोदींनी केलं आहे. मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला आहे.

दरम्यान, कोरोना नंतर प्रथमच देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव गणेश चतुर्थीच्या दिवशी सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. बुद्धीची आणि सौभाग्याची देवता असलेल्या गणेशाचे भक्त भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात त्यांचा जन्म साजरा करतात. या विशेष प्रसंगी लोक घरोघरी गणपतीची मूर्ती आणतात, गणेशाची पूजा करतात आणि आपल्यावरील संकट दूर करा असं साकडं गणरायाला घालतात.

Asia Cup 2022: Virat Kohli च्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, रोहितच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Virat Kohli

दुबई : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आजपर्यंत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. हाँगकाँगविरुद्ध आशिया चषकातील सामन्यातही विक्रमांच्या विराट यादीत आणखी एका विक्रमाची भर पडली आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) या सामन्यात नाबाद 59 धावा केल्या. त्याच्या (Virat Kohli) या अर्धशतकी खेळीमुळे त्याने तसेच सूर्यकुमारसह साकारलेल्या 98 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने हाँगकाँगला 192 धावांचे लक्ष्य दिले.

रोहित शर्माची बरोबरी
हाँगकाँगविरुद्ध सामन्याआधी आंतरराष्ट्रीय टी20त सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा मान रोहित शर्माकडे होता. रोहितनं आजवर 31 अर्धशतकं झळकावली आहेत. पण आज विराटनं (Virat Kohli) रोहित शर्माची बरोबरी केली. हाँगकाँगविरुद्ध त्यानं केलेलं अर्धशतक हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधलं 31 वं अर्धशतक ठरलं. त्यामुळे आता सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत विराट (Virat Kohli) आणि रोहित संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत.

विराट पुन्हा फॉर्मात
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या काही सामान्यांपासून रनांसाठी झगडताना दिसत होता. मात्र नुकत्याच सुरु झालेल्या आशिया चषकात तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने (Virat Kohli) या चषकात पाकिस्तानविरुद्ध 35 तर हाँगकाँगविरुद्ध नाबाद 59 धावा केल्या आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?