Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2064

Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते

Audi Q3 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑडी इंडियाने (Audi Q3 2022) आपली नवीन SUV 2022 ऑडी Q3 भारतात लॉन्च केली आहे. ही गाडी दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. एक म्हणजे प्रीमियम प्लस आणि दुसरा म्हणजे टॉप- स्पेक टेक्नोलॉजी .. . या गाडीच्या प्रीमियम प्लस वर्जनची किंमत 44.89 लाख रुपये आणि टॉप- स्पेक टेक्नोलॉजी प्रकाराची किंमत 50.39 लाख रुपये आहे. जुन्या ऑडी क्यू ३ च्या तुलनेत नवीन ऑडी क्यू ३ चा लूक हा जबरदस्त आहे.

Audi Q3 2022

लूक आणि डिझाइन-

नवीन ऑडी Q3 त्याच्या आउटगोइंग मॉडेलपेक्षा (Audi Q3 2022) अधिक स्पोर्टी दिसत आहे. नवीन ऑडी Q3 फोक्सवॅगन ग्रुपच्या MQB प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याला अष्टकोनी डिझाइनमध्ये सिंगल-फ्रेम ग्रिल मिळते. यामध्ये उभ्या पट्ट्या तसेच मोठ्या एअर इनलेट आहेत. गाडीचे स्लिम हेडलाइट्स आतील बाजूस येतात. या SUV च्या इंटिरिअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये हाय ग्लोस स्टाइलिंग पॅकेज, फोर-वे लंबर सपोर्टसह पॉवर अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, लेदर कॉम्बिनेशनमध्ये सीट अपहोल्स्ट्री, ओस्टर अॅडजस्टमेंटसह मागील सीट प्लस फोर/, लेदर रॅप्ड थ्री-स्पोक मल्टीफंक्शन प्लस उपलब्ध आहे.

Audi Q3 2022

7.3 सेकंदात 0 ते 100 किमी वेग –

गाडीच्या इंजिन बाबत बोलायचं झाल्यास, ही (Audi Q3 2022) SUV क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टिमसह सुसज्ज आहे. नवीन ऑडी Q3 ला 2.0-लिटर TFSI पेट्रोल इंजिन मिळते. जे 190 hp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. ही SUV केवळ 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते.

Audi Q3 2022

कलर पर्याय- (Audi Q3 2022)

सुरक्षेच्या दृष्टीने, नवीन Audi Q3 मध्ये इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टीयरिंग, 6 एअरबॅग्ज, (Audi Q3 2022) टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, बाहेरील मागील सीटसाठी टॉप टिथर, अँटी थेफ्ट व्हील बोल्ट आणि स्पेस सेव्हिंग स्पेअर व्हील मिळतात. नवीन ऑडी Q3 पाच बाह्य रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये पल्स ऑरेंज, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मायथोस ब्लॅक आणि नवेरा ब्लू. या रंगांचा समावेश आहे.

हे पण वाचा : 

Maruti Suzuki Alto K10 CNG : मारुती सुझुकीची Alto K10 येणार CNG मध्ये; देईल इतके मायलेज

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड

Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

कराडला गणेशोत्सव काळात 165 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव : बी. आर. पाटील

Karad Police B R Patil

कराड | गणेशोत्सवाच्या काळात तापदायक ठरणाऱ्या 165 संशयितांवर तात्पुरत्या हद्दपारीचे 146 प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यातील काही लोकांना उत्सव कालावधीत स्थानबध्द अथवा त्यांना शहर सोडून जाण्याचे बंधन घालण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवात 100 स्वंयसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना स्वतत्र गणवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

पोलिस निरिक्षक पाटील म्हणाले, शहरात उत्सव काळात वेगवेगळ्या प्रकारची तयारी पोलिसांनी केली आहे. आगमन, उत्सव कालवधी व विसर्जनाचा टप्पा अशा तीन भागात त्याची विभागणी केली आहे. 146 प्रस्तावाव्दारे उपद्रवी ठरणाऱ्या 165 जणांना शहरातून तात्पुरते हद्दपार करावे अथवा त्यांना घरी स्थानबध्द करून त्यांच्या हालचाली नोंदवाव्यात असे त्यांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. यापूर्वी गुन्हा केला आहे. मात्र शिक्षा भोगून येवूनही अशाच पध्दतीच्या गुन्ह्याच्या हालचाली असलेल्या 13 जणांवर आम्ही कारवाईचे प्रस्ताव दिले आहेत. त्यासह 50 अन्य संशयितांवरही वेगवेगळ्या कलमाव्दारे कारवाईचा प्रस्ताव आहे. दारू विक्रत्यांकडून उत्सव काळात चांगल्या वर्तवणुकीचे बॉण्ड घेण्यात आले आहेत. शहरातील पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांशी संपर्क साधून त्याची मदत घेण्यात येणार आहे.

घरगुती विसर्जनानंतर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तर विसर्जन मार्गावरही वेगळा बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी आम्ही आराखडा केला आहे. पोलिस 100 स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र पोशाख देण्यात आला आहे. त्यांच्याकडे प्रशासन व मंडळ समन्वयकाची भुमिका त्यांची असणार आहे. त्याशिवाय जलद कृती दलासहीत शिघ्र कृती दलाचे पोलिसही तैनात होणार आहेत. त्यासाठीही स्वतंत्र मागणी करण्यात आली आहे. विसर्जन मार्ग त्यादिवशी पूर्ण मोकळा ठेवला जाणार आहे.

उद्धव ठाकरेंकडून शिवसेना उपनेते पदाच्या नियुक्त्या जाहीर; पेडणेकरांसह ‘या’ निष्ठावंतांना संधी

uddhav thackeray pednekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासहित ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यांनतर सेनेत उभी फूट पडली आहे. अनेक सहकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून नव्याने सेनेची पुनर्बांधणी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे उपनेते जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ७ जणांचा समावेश आहे.

किशोरी पेडणेकर, दत्ता दळवी, कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हाचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी आणि आशा मामेडी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. निष्ठांवंत शिवसैनिकांची काळजी घेत त्यांना बळ देण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेतेपदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या होत्या. यामध्ये आक्रमक आणि निष्ठावंत आमदार भास्कर जाधव आणि ठाकरेंची शेवट्पर्यंत साथ देणारे खासदार अरविंद सावंत यांची निवड कऱण्यात आली आहे. तर सेनेचे दिग्गज नेते लीलाधर डाके यांचे सुपुत्र पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल : शंभूराज देसाई

Shamburaj Deasi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मुंबईत दहिहंडी, गोपाळकाला कार्यक्रमाला सर्व बंधने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काढली होती. आता त्याच पध्दतीने यंदाचा गणेशोत्सवही आनंदाच्या, उत्साहाच्या वातावरणात व धुमधडाक्यात ग्रामीण भागतही साजरा केला जाईल, असे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सातारा येथे जिल्हा प्रशानाने गणेश उत्सावाची केलेल्या तयारीचा आढावा बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अजित बोऱ्हाडे उपस्थित होते. मंत्री श्री. देसाई म्हणाले, कोर्टाच्या आदेशाचे प्रशासनाला पालन करावेच लागेल. परंतु शिंदे- फडणवीस सरकार यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार आहे. डॉल्बीला आवाजाची मर्यादा ठेऊन न्यायालयाचे आदेश पाळून उत्सव साजरा करावा. पोलिस प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना योग्य सूचना दिलेल्या आहेत.

मी 35 वर्षे राजकारणाच्या धंद्यात ः- सध्या मंत्रिमंडळाचा पहिला छोटा विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळाची संख्या रिक्त असून पुढील विस्तारात महिलांबाबत बदललेलं चित्र पाहायला मिळेल. मी 35 वर्ष राजकारणाच्या धंद्यात आहे. शिवसेनेचा दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री ठरवतील. मात्र, थोरली शिवसेना आमचीच आहे.

दिगंबर आगवणेंचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न : मुलाचा थेट आरोप खासदारांवर

फलटण | फलटण येथील आयुर उद्योग समूहाचे संस्थापक दिगंबर आगवणे यांनी लोणंद पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर आगवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथून त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दिगंबर आगवणे आणि माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गेले काही महिने जुन्या व्यवहारातून वाद सुरू होते. यामधून दोघांनी एकमेकांवर गुन्हे देखील नोंद केले आहेत. आता आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे पुन्हा रणजितसिंह नाईक यांच्यावर आरोप होवू लागले आहेत.

दरम्यान, आगवणे यांच्या आत्महत्या प्रयत्नानंतर त्यांना लोणंद येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. या घटनेनंतर आगवणे यांच्या मुलागा तुषार आगवणे याने खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर आणि पोलिस प्रशासन या घटनेला दोषी असल्याचे संदेश समाज माध्यमातून व्हायरल केले.

कथा चिंता हरणाऱ्या थेऊरच्या ‘चिंतामणी ‘ची..

#गणेशोउत्सव । मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

श्री क्षेत्र चिंतामणीची कथा

आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.

गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेसुद्धा म्हणतात.

श्री चिंतामणी मंदिर आणि परिसर

चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.

चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.

असा साजरा व्हायचा माझ्या गावात गणेशोत्सव..

ग्राफिक्स सौजन्य शटरस्टॉक

गणेशोउत्सव विशेष | माधवी काकडे

खेड्यापाड्यात विजेच्या तारांनी प्रवेश केल्यावर उजळलेल्या गावांनी क्रांतिची स्वप्नं पहायला सुरुवात केली होती. माणसांचे डांबरीकरण न झालेल्या गावातल्या लोकांची मने अगदी साफ होती, नेक होती ती माणसे. त्याच 1995- 96 च्या दशकात माझा जन्म झाला.माझ्या बालपणी गणेशेत्सव कसा असायचा हे मी आज तुम्हाला सांगणारे. आज डॉल्बी अन डीजे च्या गेणेशोत्सवातही मी लहानपणीच बाप्पा का मिस करतीय हे तुम्हाला यातून लक्षात येईल.

शेती, माती, नाती आणि शाळेतले छोटे सोबती यांना बघत बघत मी मोठी होत गेले. तेंव्हा गावात कदाचित एकाकडेच टू व्हीलर असायची. नाहीतर सगळा प्रवास हा बैलगाडीतूनच. त्या बैलगाडीच्या चालीवर वाजणाऱ्या कितीतरी घुंगरांनी आपली गाथा इथल्या ओढ्या-नाल्यांना ऐकवली असेल. तो काळ खूपच चांगला होता. कळायला लागलं तसं शाळेत जायला लागल्यावर वडिलांनी आणलेली राजा पाटी. त्यावर काढलेला श्री गणेशा तेव्हापासून त्या गणेशाचे नी माझे नाते दृढ होत गेले. गावी गणेशोत्सव म्हणजे खूप धमाल असायची. सगळे नागरिक गट तट विसरून मंडळाच्या गणपतीला आरतीला यायचे. उकडलेले मोदक किंवा साखर, बर्फी कुस्करून वाटली जायची. त्याची चव आजच्या आधुनिक पदार्थाना नक्कीच नाही.

भल्या पहाटे डोक्यावर चिखली गणपती एका बुट्टीत घेऊन कुंभार आमच्या घरी यायचा. ज्यांच्या घरात रंगीत गणपती आहेत. त्यांनी आदल्या दिवशीच गणपती घरी आणलेले असायचे. आम्ही सकाळी लवकर उठून, अंघोळ करून, गणपतीला रात्रभर रंगवून तयार केलेल्या कपाटात बसवायचो. मग दुर्वा आणि आघाडा आणायला मंदिराकडे जायचो. आमच्या छोट्या छोट्या हातांनी काढलेली दुर्वा आणि फुले आम्ही भरलेल्या तांब्यात टाकायचो. देवाला नमस्कार करून आमची स्वारी घरी यायची. मग गणपतीची पूजा आणि मग आरती.

आरतीला सगळ्या मैत्रिणी असायच्या सुखकर्ता दुखहर्ता म्हणताना खड्या आवाजाची उंची वाढत जायची. वातावरण अगदी भक्तिमय व्हायचे. वाजणाऱ्या घंटीचा आवाज घरभर घुमायचा. आवाजाने रडणारी मुले गप्प बसायची. आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद दिला जायचा. कधी चिरमुरे, कधी साखर तर कधी कुस्करलेल्या बर्फीचा तुकडा हातात पडायचा. याचं प्रसादासाठी आम्ही गावभरच्या गणपतीच्या आरतीला जायचो. प्रसाद मुबलक मिळायचा. मग फटाक्यांना उत यायचा. 5 रुपयाला  मिळणारी फटाक्यांची माळ पुरवून पुरवून वापरायचो. न वाजणाऱ्या फटक्यातली दारू काढून त्याचा जाळ करण्यात आम्ही माहीर होतो. सायंकाळी हातपाय धुवून आम्ही मंडळाच्या आरतीला जायचो. मग घराघरात आरती व्हायची. सगळा आनंदी आनंद असायचा. पण आताचे आधुनिक गणपती दहा-दहा फुटावर अनेक मंडळे स्थापन झाली. गणेशोत्सवाला एक पैशाचे रूप आले. आता गणेशोत्सव तर होतो मोठाच पण त्यात ते प्रेम, माणुसकी मात्र कुठेच दिसत नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त उद्या Stock Market राहणार बंद !!!

Recession

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, 31 ऑगस्ट रोजी इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट, इक्विटी सेगमेंट आणि सिक्युरिटीज लेंडिंग अँड बोरोइंग (SLB) सेगमेंट बंद राहतील. तर, मल्टीकमोडिटी एक्सचेंज हे फक्त सकाळच्या सत्रात (सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत) बंद राहतील. मात्र संध्याकाळच्या सत्रात (संध्याकाळी 5 ते 11.30 पर्यंत) ट्रेडिंग सुरु राहील.

त्याचबरोबर, नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) हे सकाळच्या सत्रात (सकाळी 9 ते संध्याकाळी 5) या वेळेत बंद राहील. मात्र सायंकाळी 5 ते 9 या वेळेत काम सुरु राहील.

sensex today: Traders' Diary: Stay with index majors - The Economic Times

शेअर बाजाराच्या 2022 मधील सुट्ट्या पहा

2022 मधील उर्वरित महिन्यांत साप्ताहिक सुट्ट्या वगळता शेअर बाजाराला (Stock Market) एकूण 4 दिवस सुट्ट्या असतील. या 4 दिवशी शेअर बाजारात कोणतेही ट्रेडिंग केले जाणार नाहीत. यानंतर, शेअर बाजाराची पुढील सुट्टी ऑक्टोबर महिन्यात असेल. हे लक्षात घ्या कि, सप्टेंबरमध्ये बाजाराला सुट्टी नसेल. त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एकूण चार प्रसंगी शेअर बाजार (Stock Market) बंद असतील. आता 5 ऑक्टोबर (बुधवार) रोजी दसरा, 24 ऑक्टोबर (सोमवार) रोजी दिवाळी आणि 26 ऑक्टोबर (बुधवार) दिवाळी बली प्रतिपदा असल्याने बंद राहणार आहेत. तसेच 8 नोव्हेंबरला (मंगळवार) गुरुनानक जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहेत. 2022 या वर्षामध्ये शेअर बाजाराला एकूण 13 सुट्ट्या घोषित करण्यात आल्या होत्या.

NSE, BSE to remain closed on Thursday on account of Muharram; MCX, NCDEX to open during evening session – CHECK DETAILS | Zee Business

सेन्सेक्स 1564 अंकांच्या वाढीने बंद

जवळपास 6 महिन्यांनंतर आज सेन्सेक्स 1500 हून जास्त अंकांच्या वाढीने बंद झाला. आज सेन्सेक्स 1564 अंकांनी (2.70%) वाढून 59,527 वर बंद तर निफ्टी 446 अंकांच्या (2.58%) वाढीने 17759.30 वर बंद झाला. आज शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.71 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

US equity consolidation to sway FBM KLCI's near-term outlook”

या वाढीमागील कारण जाणून घ्या

इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती खूपच चांगली असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमण्यम यांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर लक्ष केंद्रित केले आहे. टॅक्स कलेक्शन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत गुंतवणूक सुधारणे ही अतिशय सकारात्मक पावले असल्याचे ते म्हणाले. याशिवाय या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील GDP डेटाकडूनही लोकांना खूप अपेक्षा आहेत आणि हीच भावना आज बाजारात दिसून आली आहे. Stock Market

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/static/markets/marketinfo/listholi.aspx

हे पण वाचा :

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!

EPFO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO ने सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. आता ईपीएफओ सदस्यांना डिजीलॉकरद्वारेच अनेक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करता येतील. ईपीएफओकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत त्यासाठीची सुविधा सुरू करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

All you need to know about DigiLocker and how to use it | Mint

आता EPFO ​​च्या सदस्यांना डिजीलॉकरद्वारे UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करता येतील. हे लक्षात घ्या कि, सदस्यांसाठी EPFO ​​कडून बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ऑनलाइन सेवांमुळे, ग्राहकाला ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच यामुळे ईपीएफओवरील कामाचा ताणही कमी होईल.

ट्विट करत दिली माहिती

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत ईपीएफओकडून या सुविधेबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी ईपीएफओने म्हंटले कि, “आता सदस्य डिजीलॉकरद्वारे UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) आणि योजना प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.” याशिवाय, डिजीलॉकरवरूरील सर्व कागदपत्रे डाउनलोड करता येतील, असेही या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Provident Fund-PF Money Will Be Credited In Bank Account In Just 3 Days, Know How To Apply | सिर्फ 3 दिन में बैंक अकाउंट में आ जाएगा PF का पैसा, जानिए क्या

असा होईल फायदा

ईपीएफओ सदस्यांसाठी UAN क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि ईपीएस सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. डिजीलॉकरच्या मदतीने आता ते सहजपणे डाउनलोड करता येणार आहेत. पगारदार लोकांसाठी UAN हे एक अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. याद्वारे सदस्यांना त्यांचे EPFO ​​खाते ट्रॅक आणि मॅनेज करता येतील.

पेन्शन पेमेंट ऑर्डर हा एक युनिक 12-अंकी नंबर आहे, जो पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन मिळवण्यासाठी गरजेचं आहे. त्याचप्रमाणे, ईपीएस सर्टिफिकेट हे ईपीएफओकडून जारी केले जाणारे डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये भविष्य निर्वाह निधी सदस्याच्या सर्व्हिस डिटेल्स असतात. याशिवाय सदस्यांनी किती वर्षे काम केले, कुटुंबाची माहिती आणि नॉमिनी डिटेल्स आहेत.

Relief from unemployment: EPFO adds 17.08 lakh net subscribers in April |

1951 मध्ये झाली EPFO ची स्थापना

हे जाणून घ्या कि, EPFO ची स्थापना 15 नोव्हेंबर 1951 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अध्यादेशाद्वारे करण्यात आली. यानंतर 1952 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याने त्याची जागा घेतली. तर डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा (MeitY) एक प्रमुख उपक्रम आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/

हे पण वाचा :

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan योजनेअंतर्गत 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर शेतकऱ्यांना हा हप्ता हवा असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत केवायसी करावे लागेल. हे लक्षात घ्या कि, या योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. जर उद्यापर्यंत केवायसी केले गेले नाही तरया योजनेचे पैसेही मिळणार नाहीत.

PM Kisan Scheme: PM-Kisan 3rd Anniversary, transferred Rs 1.80 lakh to farmers accounts directly

केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तसेच येत्या काही दिवसात 2000 रुपयांचा पुढील हप्ताही दिला जाणार आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 11.20 कोटी लाभार्थ्यांची या योजनेमध्ये नोंदणी देखील झाली आहे.

PM-KISAN: Last chance to get Rs 4000 today, know what you need to do and documents you have to submit | Personal Finance News | Zee News

आता ‘या’ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

सुरुवातीला PM Kisan ही योजना फक्त 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी होती. मात्र यानंतर फक्त स्वतःची जमीन असणाऱ्या शेतकर्‍यांनासाठीच ती लागू करण्यात आली. मात्र या योजनेचा लाभ प्रत्येक जमीनधारक शेतकऱ्याला मिळेलच असे नाही. यासाठी सरकारकडून काही अटी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. चला तर मग या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही ते जाणून घेऊयात …

ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेतजमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरी देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर जमीनीचा मालक सरकारी नोकरीत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
तसेच रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.
जर एखाद्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
एखाद्या शेतकरी कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. इथे कुटुंबातील सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले असतील. PM Kisan

PM Kisan eKYC, KYC update, Last date, OTP Solution - Indian News Weekly

अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC

PM Kisan साठी इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन देखील केवायसी करता येईल. हे 2 प्रकारे केले जाऊ शकते. शेतकऱ्यांना घर बसल्या स्मार्टफोनवरून OTP आधारित KYC करता येईल किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊन बायोमेट्रिक केवायसी करता येईल. OTP द्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही तर कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे केवायसी करण्यासाठी काही शुल्क द्यावे लागेल.

स्मार्टफोनवरून e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असला पाहिजे. कारण OTP हा फक्त रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरच येईल, ज्याद्वारे e-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. PM Kisan

PM Kisan E KYC Update, (31 August) pmkisan.gov.in Aadhar OTP

अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC

पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा आणि e-KYC वर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल. येथे आधार क्रमांक टाका आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
शेतकऱ्याच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
यानंतर, e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.

हे पण वाचा :

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!