Thursday, December 18, 2025
Home Blog Page 2676

टीचरला अटक करा, थेट दुसरीतल्या विद्यार्थ्याने घेतली पोलीस ठाण्यात धाव अन्….

hydrabad

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद मध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका दुसरीच्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाच्या विरोधात तक्रार नोंदवण्याची विनंती पोलिसांना केली. त्याचे कारण ऐकून महिला पोलीस निरीक्षक सुद्धा सुन्न झाल्या. हि घटना तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील बयाराम मंडल या परिसरात घडली आहे. अनिल नाईक असे या तक्रार दाखल करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो एका खासगी शाळेत शिकतो.

एक दुसरीच्या वर्गात शिकणारा मुलगा अचानक पोलीस ठाण्यात आला. त्याला एकट्याला पाहून तो हरवला असेल असे पोलिसांना वाटले. यानंतर महिला पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी तू इथं का आलास? असे या मुलाला विचारले. यानंतर त्या लहान मुलाने दिलेले उत्तर ऐकून रमादेवी थक्क झाल्या. मला माझ्या शिक्षकाने मारहाण केली आहे. त्यामुळे मला माझ्या शिक्षकांच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे, असं त्या मुलानं सांगितलं.

यानंतर पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी त्याला कारण विचारलं असता, मी अभ्यास करत नव्हतो म्हणून मारलं, असं त्या मुलानं सांगितले. यावेळी रमादेवी यांनी या मुलाची तक्रार शांतपणे ऐकून घेतली आणि त्यानंतर ते मुलाला घेऊन शाळेत पोहोचल्या. त्या ठिकाणी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी तडजोड करण्यास तयार नव्हता. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले आणि हा वाद मिटवण्यात आला.

पत्नीसाठी जेवण बनवायला विसरला पती; यानंतर रागावलेल्या पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पती- पत्नीमध्ये अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद सुरू असतात. मात्र कधी कधी हे वाद एक वेगळेच वळण घेतात. अशीच एक विचित्र घटना थायलंडमध्ये घडली आहे. यामध्ये महिलेचा पती रात्रीचं जेवण बनवणार होता, मात्र नंतर त्याने आपल्या मित्रांसोबत दारू पिण्याचा प्लॅन केला. यामुळे पत्नी इतकी भडकली की तिने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट मासे पकडण्याच्या काट्यामध्येच अडकवला आणि यानंतर पतीला ओढत घरी घेऊन आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
हि विचित्र घटना थायलंडमधील आहे. या ठिकाणी राहणारी 43 वर्षीय चनीटा कुएडरूम आपला पती बुनछुए मूसीटोची रात्री वाट बघत होती. तिचा पती रात्रीचं जेवण बनवणार होता.मात्र बराच उशीर आपला पती घरी न आल्याने तिने पतीला शोधायला जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने आपल्या पतीची शोधाशोध केली असता तिचा पती बुनछुए मूसीटो हा आपल्या मित्रांसोबत दारू पित होता. हे पाहून आरोपी पत्नीला आपला राग अनावर झाला आणि तिने तिथेच असलेल्या मासे पकडण्याच्या काट्यात आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट अडकवला. यानंतर त्याला ओढत घरी नेलं.

ही घटना घडली तेव्हा व्यक्ती इतका नशेत होता की घरी जाऊन तो थेट झोपला. दुसऱ्या दिवशी नशा उतरताच त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. या सगळ्या प्रकारामुळे पती बुनछुए मूसीटो एवढा घाबरला आहे कि तो तोपर्यंत घरी जाणार नाही, जोपर्यंत त्याच्या पत्नीचा राग शांत होणार नाही. या घटनेनंतर चनीटाने सांगितलं की तिचा पती दारूपुढे सगळं काही विसरून जातो . त्याला फक्त दारूच लक्षात राहते. यावेळी तिने खूप राग आणण्याचा प्रयत्न केला मात्र तिला आपला नशेत असलेला पती समोर दिसला अन् तिचा रागावरचा ताबा सुटला. आणि तिने लगेचच मासे पकडण्याच्या काट्याने पतीचं गुप्तांग पकडून त्याला रस्त्यावरून ओढत घरी आणले.

पुन्हा जन्मलो आता परदेश नको… बाॅम्बनी कानटाळ्या बसल्या : प्रतिक्षा अरबुणे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

बंकरमध्ये गेल्यावर पाणी आणि चिपसवर दिवस काढावे लागले. जेवण मिळत नाही, दुसरीकडे बाॅम्बनी आमच्या कानटाळ्या बसत होत्या. आता परत युक्रेनमध्ये जायचचं नाही. आम्ही आपल्या देशात आलो तेव्हा आम्हाला पुन्हा जन्म मिळाला असल्याचे थरारक अनुभव कराड येथे युध्दग्रस्त युक्रेनमधून परतलेली प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309

सातारा जिल्ह्यातील कराड येथील एक विद्यार्थीनी सुखरूप घरी परतली. त्यानंतर तिने आपल्या पालकांसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेत आभार मानले. यावेळी तिने किव शहरातील भयानक युद्ध परिस्थितीतून भारतात परतण्याचा भयानक प्रवास सांगितला.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/530801901676309

मेस व बाजारपेठा बंद असल्याने खाण्यास काहीही मिळत नव्हेत, एक दिवस आम्ही केवळ पाण्यावर काढला. नंतर तिथे खाण्यासाठी चिपस मिळाले, परंतु ते आणण्यासाठी जाताना डोळ्यांनी आम्ही भयानक परिस्थिती पहात होतो. तिथे इतर कोणतीही प्रकारची व्यवस्था होती. अखेर आम्ही मुलांनी धाडस करून ग्रुपने तेथून बाहेर पडून बाॅर्डरवर जाण्याचा निर्णय घेतला. तिथे कडाक्याची थंडी मायनस (- 5) अंश सेल्सिअस होते. रशिया आणि युक्रेन देशातील सैन्यातील फायरिंगचा जोराचा आवाज येत होता. त्यामुळे आता परत आपला देश सोडून जायची इच्छा अजिबात नसल्याची प्रतिक्षाने सांगितले.

 

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला”; नाना पटोले यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावेळी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पंतप्रधानांनी केला. छत्रपतींच्या विरोधातली मानसिकता स्पष्ट दिसतेय,” अशी टीका नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केली.

काँग्रेसच्या वतीने आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी जी विधाने पावरली आहेत. त्यावरून राज्यपाल देखील अपमान करतात. आहे दिसत आहे. भाजपसाठी नरेंद्र मोदींच देव आहेत असे वर्तन भाजपचे आहे, राजमुद्रा आणि छत्रपतींचा अपमान करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भाजपने घेतले आहे काय?,” असा सवालही नाना पटोलेंनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या निषेधावर पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी गो बॅकचे नारे पुण्यात बघायला मिळत आहे. देशभरात मोदींचा विरोध होतोय. पुण्याच्या जनतेची मोदी गैरसोय करता आहेत. पुणेकर देखील भाजपवर नाराज दिसत आहेत, असे पटोलेंनी यावेळी सांगितले.

वाळू कारवाईचा गोलमाल : तहसिलदाराची बदली अन् पाच तलाठी निलंबित

Sand

सातारा | माण- खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत असल्याबाबत कारवाई करतानाचा व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आल्याने पाच तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले. या भागातील तहसिलदारांचीही तात्काळ बदली करुन त्या ठिकणी नव्याने तहसीलदार नेमण्यात आले आहे. यात आता प्रातांधिकारी आणि तहसीलदार या दोघांनाही कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यावरही कारवाई होणार का? याकडे लक्ष लागू आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वाकी या गावात बेकायदा वाळू उपसा होत असल्याबाबतचे सातारा जिल्हाधिकारी यांना समजल्यानंतर त्यांन येथील प्रांत तहसीलदार यांना अलर्ट केले होते. 22 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री याच भागात वाळू उपसा होत असल्याचे जिल्हाधिकारी यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबत तात्काळ जाण्याचे आदेश दिले होते. त्या ठिकाणी 10 ते 12 आज्ञात लोक आले आणि त्या ठिकाणी आम्हाला घोळका करुन उभारले असे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले होते. त्यानुसार पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्याबाबत वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते.

मात्र पोलिसांनी अज्ञातांबाबत गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानतंर तसा अहवालही सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. मात्र आता धाडीबाबत एक ऑडिओ क्लिप आणि एक व्हिडीओ क्लिप सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पाठवली. त्यात या भागाचे प्रातांधिकारी, तहसिलदार, तलाठी हे यात आरोपीला क्लिनचिट देण्यासाठी वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर आले.

हे स्पष्ट झाल्यानंतर माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची तात्काळ बदली केली आहे. शिवाय यामध्ये जांभुळणीचे तलाठी बी.एस.वाळके, वाकी गावातील तलाठी एस.एल.ढोले, मार्डी गावचे तलाठी वाय.बी.अभंग, खडकी गावचे तलाठी एस.व्ही.बडदे, वरकुटे-म्हसवडचे तलाठी जी.एस.म्हेत्रे, या पाच तलाठ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशीत आता तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांचाही हात आहे का? हे ही काही दिवसात समजेल.

त्या पाच तलाठ्यांवर नेमका काय ठपका ?

त्याचबरोबर तहसीलदार माण यांनी अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन रोखणेकामी नेमूण दिलेल्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा, मंडल अधिकारी म्हसवड के.पी. शेंडे पथक प्रमुख यांचे समवेत या कार्यालयास चुकीचा अहवाल सादर करुन प्रशासनाची दिशाभूल करणे, गौण खनिजाची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यासाठी कारणीभूत प्रशासनाची प्रतिमा मलीन करणे,गौण खनिजाची अवैध व वाहतूक करणाऱ्या इसमांशी तडजोड करत असलेचे व्हिडोओ रेकॉर्डिंग वरुन दिसून येत आहे. जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) (8) नुसार वाहन जप्तीचे अधिकार असतांना सदर नियमांस बाधा निर्माण करणे. गौण खनिज सारख्या महसूल मिळवून देणाऱ्या व पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या संवेदनशील प्रकरणात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांची एक वेतनवाढ कायम स्वरुपी रोखणे,पदास नेमून दिलेल्या कामामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणे असे दोषारोपपत्र उपविभागीय अधिकारी यांचेकडे दाखल केले आहे.

तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना नोटिसा

माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा नियम 3 चा भंग केला आहे. शासकीय कर्मचारी या नात्याने त्यांनी शासकीय सेवा करताना सचोटी कर्तव्यतत्परता व शासकीय कर्मचाऱ्यांला न शोभेल असे वर्तन करून त्यांना कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल ) नियम 1979 चा नियम 4 (1) (अ) अशी नोटिस बजावले आहे

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उदरनिर्वाहाचे साधन देत HRC संस्थेने विविध क्षेत्रातील महिलांचा केला सन्मान

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवार 6 मार्च रोजी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे 8 निराधार, दुर्धर आजारग्रस्त व विधवा महिलांना उदरनिर्वाहासाठी साधन वाटप करून विविध क्षेत्रातील 8 महिलांचा सन्मान करण्यात आला. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रा .जयंत देशपांडे, दामिनी पथकातील उपनिरीक्षक राधिका भावसार, प्राचार्य डॉ . बाबर, ह.भ.प. शिवव्याख्याते स्वामिराज भिसे, प्रा शिवा आयथळ, प्रा प्रशांत वक्ते, प्रा आनंद मनवर यांची उपस्थिती होती .

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीने महापुरुषांच्या जयंती, भारतीय सण तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील उपेक्षित महिलांना उदरनिर्वाहाचे साधन दिली जाते. आज जागतिक महिला दिनानिमित्त आठ निराधार दुर्धर आधारग्रस्त महिलांच्या मागणीनुसार त्यांना 1 महिलेला डाळ काढण्याची मशीन, 5 महिलेला शिलाई मशीन, 2 महिलेला उदरनिर्वाहासाठी शेळी व शेळीचे पिल्लू आदींची मदत लोकसहभागातून करण्यात आली.

सलाम तिच्या जिद्दीला: विविध 8 क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान ‘सलाम तिच्या जिद्दीला’ अंतर्गतवैष्णवी विष्णुपंत देशपांडे (कृषी),डॉ. आरती देऊळकर (वैद्यकीय), अश्विनी जाधव (क्रीडा), अर्चना पंडितराव दुधाटे (सामाजिक), प्रा पुजा राधाकिशन काकडे (शिक्षण), सुमन प्रकाश पाळोदे (स्वच्छता), संगीता वाघमारे (पोलीस), अमिता रौफ बकश (तृतीय पंथ सामाजिक) यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात ‘हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सारथी’ या विषयावर पुणे येथील शिवव्याख्याते ह भ प प्रा स्वामीराज भिसे यांचे व्याख्यान झाले. डॉ. पवन चांडक, डॉ. सौ आशा चांडक, राजेश्वर वासलवार, भाग्यश्री सावळे, ममता जाधव, पूजा काकडे, भक्ती तायडे, अंजली जोशी, विशाखा हेलसकर, शलाका हेलसकर, पद्मा भालेराव, बुद्धभूषण गाढे, ज्ञानेश्वर इक्कर, श्रीरंग पांडे, पांडुरंग पाटणकर, सत्यनारायण चांडक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्यांना मी येऊ दिले नाही; पवारांचा फडणवीसांवर निशाणा

Pawar Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला. निवडणुकीपूर्वीच काहीजण म्हणाले, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईन … मात्र मी त्यांना येऊ दिले नाही अस म्हणत पवारांनी फडणवीसांना चिमटा काढला.

शरद पवार उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, काही लोक निवणडणूक लागायाच्या अगोदर, निकाला आधीच मी येणार अस सांगत होते, पण आम्ही येऊ दिल नाही, असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच सतत 52 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. त्या समाजाचे आणि लोकांच्या भविष्य उज्वल करण्याची जबाबदारी माझी आहे असे पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. सत्तेसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेसाठी ही आघाडी काम करत आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रीत करून स्वराज्य उभं केलं, देशात अनेक राज्य झाली, कुठे मोगल झाले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं असही ते म्हणाले.

वडिलांना सोडून परत येत असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

dinesh

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – आमगाव-गोंदिया महामार्गवर एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये ट्रक आणि बाईक यांच्यात झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. दिनेश चंद्रप्रकाश पहिरे असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो गोंदियातील शास्त्री वॉर्डातील रहिवाशी होता.

आमगाव गोंदिया महामार्गावरून एमएच 25 एजे 2644 हा ट्रक आमगावकडून गोंदियाच्या दिशेने जात होता. यावेळी या ट्रकच्या पाठीमागून एमएच 35 यु 2552 हि बाईक येत होती. यादरम्यान मृत तरुण हा ट्रक चालकाला ओव्हरटेक करण्याचा नादात खाली पडला. आणि त्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर हा ट्रकचालक आपला ट्रक जाग्यावरच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृत दिनेश हा आपल्या वडिलांना आमगाव येथे सोडून परत येत असताना हा अपघात घडला. या अपघातात ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने दिनेशच्या शरीराच्या अक्षरशः चिंधळ्या उडाल्या. त्याच्या शरीराचे तुकडे झाले. पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

पृथ्वीराज चव्हाणांचा नरेंद्र मोदीवर हल्लाबोल : मनोवृत्तीमुळे सरकार कमी पडतयं

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

युक्रेन- रशिया युध्दाबाबत खरी परिस्थिती काय आहे. युध्द परिस्थीतीच्या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक पार्लमेंटमध्ये बोलविली पाहिजे होती. एक देश म्हणून सर्वांनी युध्द परिस्थितीस विश्वासाने सामोरे गेले पाहिजे होते. भाजप, काॅंग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणून नव्हे परंतु यामध्ये सरकार कमी पडत आहे. शेवटी आता तो मनोवृत्तीचा प्रश्न असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कराड येथे युक्रेन येथून सुखरूप परत आलेली विद्यार्थींनी प्रतिक्षा अरबुणे हिने आज माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. तसेच आभारही मानले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. युक्रेन येथे अजूनही विद्यार्थी अडकले असून तेथील परिस्थीती अंत्यत वाईट असल्याचे प्रतिक्षा अरबुणे हिने सांगितले.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रीय प्रश्न किंवा प्रकल्प असेल तर त्यामध्ये सर्वांच योगदान आहे. त्यामध्ये एकट्याचे काही नसते, परंतु क्रेडिट कोणी घ्यायचे. एकट्या व्यक्तीचे क्रेडिट असल्याचे जे काही रंगविले जाते, ते चुकीचे आहे. युध्दाबाबत खरी परिस्थिती काय आहे, ती खासगीपणे संसद सदस्यांना सांगायला पाहिजे होती. काही गोष्टी जाहीरपणे उघड करता येणार नाहीत, परंतु संसद सदस्य व जेष्ठ नेत्यांना सांगणे करणे गरजेचे होते.

कराड शहरासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 3 कोटींचा निधी

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहर व शहराच्या लगत वाढीव वस्तीतील रस्ते व इतर विकासकामांकरिता 3 कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे नगरपरिषदेच्या महसुलात घट झाल्याने विशेष बाब म्हणून आ. चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वस्तुस्तिथी मांडली यामुळे एकनाथ शिंदे यांनी आ. चव्हाण यांनी मागणी केलेल्या पूर्ण निधीला मंजुरी दिलेली आहे.

या 3 कोटी रुपयांच्या निधीमधून वाढीव भागातील शिक्षक कॉलनी ते माने वस्तीपर्यंत नवीन रस्तासाठी 40 लाख रुपये, स्टेडियम ते सुर्यवंशी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागुन सर्व्हे नं. 98 ते वाखाण रस्त्याकडे जाणारा सर्व्हे नं. 66 पर्यंतचा नगरपरिषद भुसंपादीत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी 40 लाख रु., स्टेडियम ते सुर्यवंशी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला लागुन बारा डबऱ्याकडे व तेथुन पुढे पोस्टल कॉलनी पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी रु. 40 लाख, वाढीव भागातील शिंदे चौक ते कदम वस्तीपर्यंत नवीन रस्ता करणेसाठी रु. 15 लाख, वाढीव भागातील कदम वस्ती ते बागवान वस्तीपर्यंत नवीन रस्ता करणेसाठी रु. 20 लाख, वाढीव भागातील जानाई देवी ते शामराव पवार वस्तीपर्यंत नवीन रस्ता करणेसाठी रु. 20 लाख रूपये दिला.

कराड नगरपरिषद हद्दीतील वारुंजी येथील जॅकवेल ॲप्रोज ब्रिजसाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे व गॅबियन वॉल बांधणेसाठी रु. 60 लाख, शनिवार पेठ कोयनेश्वर घाट या ठिकाणी सुशोभिकरण करणेसाठी रु. 10 लाख, शुक्रवार पेठ महादेव मंदिर परिसर या ठिकाणी सुशोभिकरण करणेसाठी रु. 10 लाख, शनिवार पेठ वाढीव भागामधील आशा किरण महिला वस्तीगृह ते कार्वेनाका पाण्याची टाकीपर्यंत पूर्व बाजूस गटर लाईन करणेसाठी रु. 20 लाख, नगरपरिषदेचे वाढीव भागातील बारा डबरे परिसरातील घनकचरा व्यवस्थापनेच्या जागेवर तांबडी माती टाकणे व सुशोभिकरणे करणेसाठी रु. 5 लाख, मुजावर कॉलनी निजामभाई कागदी घरापासून मशिदीसमोरील रस्ता गटर व काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख, एकविरा कॉलनी येथील राम कोळी घरापासून अली यमातनल यांचे घरापर्यंत गटर व काँक्रीटीकरण करणेसाठी रु. 10 लाख असा सर्व निधी शहराच्या विकासासाठी वापरला जाणार आहे.