Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 2684

तापोळा-बामणोली एकात्मिक पर्यटन साखळीसाठी विकास आराखडा तयार करावा : आदित्य ठाकरे

सातारा | सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील तापोळा, बामणोली, मुनावळे, वाघोळी परिसर मुबलक पाणी आणि वन क्षेत्राने समृद्ध असल्याने पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. येथे पर्यावरणपूरक योजना आखून एकात्मिक पर्यटन साखळी निर्माण करण्यासाठी विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा पर्यटनक्षेत्राचा विकास करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालक मिलिंद बोरीकर, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. मंत्री ठाकरे म्हणाले, सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या पर्यटकांना कोयना धरण परिसरात पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यास मोठा वाव आहे. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात नाशिक, गणपतीपुळेच्या धर्तीवर बोट क्लब विकसित करता येईल. पर्यटकांना सुविधा आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. यासाठी एमटीडीसीने व्यवहार्यता तपासून विकास आराखडा तयार करावा. पुढील टप्प्यात कॅराव्हॅन, तंबू, स्कुबा डायव्हिंग आदींचाही विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर आणि कास पठार येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी तापोळा, बामणोली, मुनावळेच्या रूपाने पर्यटनाची एकात्मिक साखळी तयार करता येईल. यामुळे पर्यटनाच्या नवीन संधी उपलब्ध होऊन महाबळेश्वर आणि कास पठारावर येणारा पर्यटक या परिसराचाही आनंद घेऊ शकेल. यासाठी महाबळेश्वर ते तापोळा रस्ता रूंदीकरण करण्यात येणार असून पाण्यात केबल स्टेड पूल आणि दर्शक गॅलरी देखील तयार करता येईल. काही ठिकाणी रोप वे उभारून निसर्गाचे नयनरम्य दर्शन घेता येईल.

पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, निसर्गाने नटलेल्या या परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा. बोट क्लबच्या माध्यमातून स्थानिकांना प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल, यावर भर द्यावा. स्थानिक बोटींबरोबरच आधुनिक सुविधांचा मेळ साधावा. जल पर्यटन बरोबरच साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग यामध्ये नाविन्यता आणावी. एमटीडीसीच्या जल पर्यटन विभागाचे श्री.सारंग यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे या परिसरात विकसित करता येणाऱ्या संभाव्य पर्यटन सुविधांबाबत माहिती दिली.

चार भिंती अन् मंडपात बारावीचे परीक्षा केंद्र

exam

औरंगाबाद – विनाप्लास्टरच्या उभ्या केलेल्या चार भिंती… दरवाजे अन् खिडक्यांसाठी तयार केलेल्या चौकटी बिनबोभाट तशाच उघड्या… छप्पर तर नाहीच… अन् ऊन लागू नये म्हणून चक्क लग्नासाठी टाकतात तसा मंडप टाकलेला… हे चित्र दुसरीकडे दिसले असते तर त्याची फारशी चर्चा झाली नसती. पण बारावीच्या एका परीक्षा केंद्रावरील ही वस्तुस्थिती असल्याने विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर कसा दिला असेल, याची कल्पनाच करवत नाही !

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला शुक्रवारी सुरवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने प्रशासनाकडून जोरदार नियोजन केल्याचा दावा केला जातो. परंतु, पहिल्याच पेपरला ग्रामीण भागातील केंद्रांवर सुविधांचा अभाव दिसून आला. निलजगाव येथील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर चार भिंती अन् वर मंडप अशा ठिकाणी घामाघूम झालेले विद्यार्थी परीक्षा देताना आढळून आले. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभाग, एसएससी बोर्ड व पोलिस प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली असली तरी, ग्रामीण भागात काही केंद्रावर नियमावली धाब्यावर बसविण्यात आली होती. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सकाळी दहापासून पेपर घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर परीक्षार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या वरती लग्नमंडपाचे कापड टाकून शेड तयार करण्यात आले होते. या शेडमध्येच विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी बसविण्यात आले होते.

सध्या या शाळेचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे तेथे परीक्षा हॉलमध्ये वाळूचा चाळणा देखील ठेवण्यात आला होता. येथील परीक्षा कक्षात फॅन, लाईट अशी कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे विद्यार्थी घामाघूम होऊन अंधाऱ्या खोलीत पेपर सोडवित होते. या परीक्षा घेण्यात येत असलेल्या वर्गांना ना खिडक्या होत्या, ना दरवाजे. त्यामुळे केंद्राबाहेर जमलेले विद्यार्थ्यांचे मित्र, नातेवाईक शाळेच्या भिंतीवर खिडकीतून चढून कॉपी पुरवत होते. मात्र, त्यांना कोणीही अडवताना दिसले नाही. भरारी पथकाला देखील या ठिकाणीच काहीच आढळून आले नाही हे विशेष! याबाबत विचारणा केली असता शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने अशी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

युक्रेनमधून मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप परतले

औरंगाबाद – वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मध्ये गेलेले मराठवाड्यातील 82 विद्यार्थी सुखरूप पोहोचले आहेत. 33 विद्यार्थी अद्यापही तिकडेच अडकले असून, पालकांची चिंता वाढली आहे. अडकलेल्या विद्यार्थ्यांना हंगेरी, रोमानिया, पोलंडच्या सीमेपर्यंत प्रवास केल्यानंतर त्याचा भारतीय विमानाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रशासनाने काल 33 विद्यार्थी अडकल्याची माहिती दिली. चौघेजण बुधवारी औरंगाबाद मार्गे जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचले. गुरुवारी आणि शुक्रवारी सात जण आले. रशिया युक्रेनमध्ये युद्ध अडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंताग्रस्त आहेत. नऊ दिवसांपासून पालकांची झोप उडाली असून ते मुलांच्या संपर्कात आहेत. युक्रेनमधील व्हिनित्सिया, युझोई, ओबॅस्क, ओडेसा, कीव्ह, लिव्ह, जॉर्जिया ठिकाणी विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणासाठी मराठवाड्यातील 115 विद्यार्थी आहेत. त्यातील 82 विद्यार्थी परतले आहेत.

युक्रेनमधून परतलेले विद्यार्थी –
जालना – 6
औरंगाबाद – 11
परभणी – 3
हिंगोली – 7
नांदेड – 33
बीड – 1
लातूर – 14
उस्मानाबाद – 7

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर

औरंगाबाद – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर ऑफलाईन पद्धतीने दिला. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्याने शैक्षणिक प्रवाह पुन्हा सुरु झाल्याचा चित्र दिसून आले. शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील 470 कनिष्ठ महाविद्यालये, शाळांपैकी 153 मुख्य तर 287 उपकेंद्रे अशा 440 परीक्षा केंद्रांवर आज परीक्षा पार पडली.

जिल्ह्यातील 58 हजार 343 विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. केंद्रावर विद्यार्थ्यांना तासभर आधी उपस्थित राहायच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तर काही केंद्रांनी सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टाईम दिला होता. यामुळे सकाळी 9 वाजेपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली. ऑनलाईन शिक्षण घेऊन दोन वर्षांच्या खंडानंतर ऑफलाईन पेपरला सामोरे जाताना काही विद्यार्थी साशंक वाटले. तर काही विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण दिसून आली. पहिलाच पेपर कंपल्सरी इंग्रजी भाषेचा असल्याने केंद्रांवर अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात 7 जिल्हास्तरीय, 9 तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात आहेत. मुख्य केंद्रावर चार सदस्यीय आणि उपकेंद्रावर रनर यांनीच बैठ्या पथकाची भूमिका बजावली. परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या जात असताना काॅपीमुक्त परीक्षेबद्दल मात्र कोणीच बोलत नसल्याने काॅपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोरीवरून नडले, सिग्नलवर भिडले ! कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – कल्याणमध्ये एक विचित्र प्रकार घडला. यामध्ये एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण असल्याच्या संशयातून दोघा तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हा वाद इतक्या विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभे राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला गाडीसोबत फरफटत नेले. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात हि घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात रेड सिग्नल लागला होता. वाहन चालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत असताना एक बाईकस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारायला सुरूवात केली. यानंतर एका तरुणाने त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू शकतो, या संशयातून हि संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.

कारसोबत फरफटत नेलं
त्या ठिकाणचा सिग्नल ग्रीन होताच कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यानंतर वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार चालकाला शोधून काढून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण चौधरी असे या आरोपी कारचालकाचे नाव आहे.

प्रेमसंबंधांचा संशय
प्रवीणचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्रिवेशला आला. नवी मुंबई येथे राहणारा प्रवीण हा या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचा संशय त्रिवेशला आला. म्हणून त्याने आधारवाडी चौकात त्रिवेशला अडवून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी प्रवीण विरोधात कारवाई केली आहे. मात्र शहर पोलिस यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नचे ‘ते’ स्वप्न ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते भारताने पूर्ण केलं

shane warne

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचा 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जगातील संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हि एक धक्कादायक बातमी आहे.

दिग्गज शेन वॉर्न यांना ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून ओळखले जाते. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानले जाते. आतापर्यंत त्यांच्या नावावर क्रिकेट विश्वात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

कर्णधार बनण्याचे स्वप्न राहिले अधुरे
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शेन वॉर्नने जानेवारी 2007 मध्ये सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर शेन वॉर्नने 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उपकर्णधार पदापर्यंत मजल मारली मात्र त्यांना कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यानंतर शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर त्यांनी प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचे चॅम्पियन बनवले.

साफ सफाई करण्याच्या वादातून दोघा भावांची बिल्डरला मारहाण

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात डोंबिवली शहरात दोघां भावांनी एका बिल्डरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. बांधकाम व्यावसायिकला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. साफसफाई करताना सिमेंटचे पत्र हटवण्यावरुन बिल्डरचा दोघा भावांशी वाद झाला होता. आमच्या जागेवरील पत्रे तुम्ही कसे हटवता, याचा जाब विचारत दोघांनी बिल्डरला मारहाण मारहाण केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
डोंबिवली पूर्वेकडील गोळवली परिसरात दिनकर हाईट्स ही तीन मजली इमारत आहे. घटनेच्या वेळी इमारतीचे मालक आणि बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इमारत परिसरातील जागेवर साफसफाई करत होते.

पत्रे हटवण्यावरुन झाला वाद
या जागेवर असलेले काही सिमेंटचे पत्रे हटवताना याच परिसरात राहणाऱ्या निलेश गायकर नावाच्या व्यक्तीने हा पत्रा आमचा आहे, जागा आमची आहे, तू पत्रे का हटवतोस, असे सांगितले. यावरून आशिष आणि निलेश यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर निलेश गायकर आणि त्याचा भाऊ अमित गायकर यांनी बांधकाम व्यावसायिक आशिष गव्हाणेला मारहाण करण्यास सुरूवात केली. यानंतर आशिष गव्हाणे यांनी मानपाडा पोलिसांत दोघां भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

क्रिकेट विश्वाला धक्का ! ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

shane warne

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, दिग्गज शेन वॉर्न यांचा 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जगातील संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी हि एक धक्कादायक बातमी आहे.

दिग्गज शेन वॉर्न यांना ऑस्ट्रेलियाचा महाग लेगस्पिनर म्हणून ओळखले जाते. जगातील क्रिकेट इतिहासात शेन वॉर्न यांना महान बॉलरपैकी एक मानले जाते. आतापर्यंत त्यांच्या नावावर क्रिकेट विश्वात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत.

1992 मध्ये ते पहिली टेस्ट मॅच खेळले होते आणि श्रीलंकाच्या मुरलीधरननंतर 1000 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारे ते जगातील दुसरे क्रिकेटपटू आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने याबाबत ट्विट दुःख व्यक्त केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, “विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.” असे लिहिले आहे.

धक्कादायक ! बाईक अपघातात बालमित्रांचा दुर्दैवी अंत

Jaipur crime

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानातील जयपूरमधील अजमेर रोडवर झालेल्या अपघातात भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघा दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले तरुण हे एकमेकांचे लहानपानापासूनचे मित्र होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी अपघातानंतर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कोणालाही वाचवता आले नाही. यानंतर या दोघां मित्रांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. यामधील एका तरुणाचे दोन महिन्यांनी लग्न होणार होते. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. बापलेकांच्या मृत्यूनंतर या तरुणाच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?
कपिल खटाणा आणि मोहित शर्मा अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही जयपूरमधील पुरानी बस्ती या ठिकाणचे रहिवाशी आहेत. घटनेच्या दिवशी मोहित कपिलसोबत स्कूटीवरुन घरातून निघाला होता. कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत, असे सांगून हे दोघे घरातून निघाले होते. त्यानंतर अजमेर रोडवरील पुलावर अज्ञात वाहनाने या दोघांच्या स्कूटीला धडक दिली आणि कारचालक घटनास्थळावरून फरार झाला.

एकामागून एक दोघांचाही मृत्यू
या अपघातात दोघांच्याही डोक्याला मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. दोघेही बराच वेळ रस्त्यावर पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. या परिसरात गस्त घालणारे पोलीस अधिकारी पृथ्वीपाल सिंग घटनास्थळावर गर्दी पाहून पोहोचले. तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक दोन्ही तरुणांना मदत करत होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रुग्णवाहिकेतून सवाई मानसिंग रुग्णालयात पाठवले. मात्र त्यागोदरच दोघांचा मृत्यू झाला होता.

कपिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
या अपघातातील कपिलचे 24 एप्रिलला लग्न होणार होते. मात्र त्या अगोदरच काळाने त्याच्यवर घाला घातला. कपिलच्या घरातून लग्नाची वरात निघण्याऐवजी त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. तसेच मोहितच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोहितच्या खांद्यावर येऊन ठेपली होती. कपिल आणि मोहित या जिवलग मित्रांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वृद्ध दाम्पत्याबाबत एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध दाम्पत्याला चोरांनी लुटले आहे. एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेतून 5 लाख रुपयांची रोकड पिशवीत भरून नेताना पार्किंग रस्त्यावरच दोन बाईकस्वारांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून हिंगणा मार्गाकडे पळ काढला. हि घटना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. हि घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
मीना आणि शिवप्रसाद सुखदेव विश्वकर्मा हे दाम्पत्य नागपुरातील यशोदा नगर, हिंगणा रोड परिसरात राहतात. शिवप्रसाद हे राज्य राखीव पोलीस दलातील सेवानिवृत्त सहा. पोलीस उपनिरीक्षक आहेत. घटनेच्या दिवशी हे वृद्ध दांपत्य घराच्या बांधकामासाठी स्कुटरने एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून 5 लाख रुपये काढल्यानंतर शिवप्रसाद यांनी ती पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली. यानंतर शिवप्रसाद हे बँकेच्या बाहेर रस्त्यावर ठेवलेली स्कुटर सुरू करीत असताना मागून बाईकवर दोन आरोपी आले आणि त्यांनी मीना यांच्या हातातील ती पिशवी हिसकावून पळून गेले. त्या पिशवीमध्ये एकूण पाच लाख रुपये, बँकेचे पासबूक आणि मोबाइल फोन होता.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. आरोपी हे घटनास्थळावरून हिंगणा मार्गाकडे गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी, सहा पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे यांनी सुद्धा घटनास्थळा ची पाहणी केली. आरोपी हे बँकेमधूनच या वृद्ध दांपत्यावर पाळत ठेवून होते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्या वृद्ध दांपत्याने केलेल्या वर्णनानुसार तसेच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.