Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2701

पब्जीच्या नादात तलवारीने केला खराखुरा हल्ला; 22 वर्षांच्या साहिलचा जागीच मृत्यू

thane crime

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पब्जी खेळात वारंवार जिकंण्यावरून झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये मृत तरुणावर दोन अल्पवयीन तरुणांनी चाकू, सुरे, तलवारीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
साहिल बबन जाधव असे या मृत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री मुख्य आरोपीसह अन्य तिघांनी साहिलवर हल्ला केला होता. मृत साहिल जाधव हा पब्जी खेळात हुशार होता. तिन्ही आरोपी हे संगनमत करीत पब्जी खेळात मृत साहिल जाधव याला नेहमी किल करीत होते. यावरून 2019 मध्ये साहिल आणि अटक झालेल्या तिन्ही आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादातून किरकोळ हाणामारीसुद्धा झाली होती. यानंतर साहिलने वर्तकनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती.

याच गोष्टीचा राग आरोपींना आला. यानंतर आरोपी प्रणव प्रभाकर माळी, राहुल महादेव गायकवाड आणि गौरव रवींद्र मिसाळ यांनी एकत्र येऊन साहिल जाधव याला किल करायचे असे ठरवले मात्र पब्जी खेळात नाहीतर प्रत्यक्षात किल करण्याचे ठरविले. यानंतर त्यांनी चाकू, सुरा आणि तलवारीच्या सहाय्याने साहिल याला जानकीदेवी चाळ, जुनी पाईपलाईन जवळ गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये साहिलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी एका मुख्य आरोपी प्रणव यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. यानंतर या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वर्तकनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

उधारीचे पैसे परत न दिल्याच्या रागातून नवी मुंबईत कामगाराकडून ठेकेदाराची निर्घृणपणे हत्या

navi mumbai

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पैशांच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. उधारीचे पैसे परत न दिल्यामुळे आरोपीने ठेकेदाराचा खून केला आहे. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये हि घटना घडली आहे. पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करून हि हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीने आरोपीकडून 30 हजार रुपये उसने घेतले होते, मात्र ते परत न केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?
नवी मुंबईत तुर्भे एमआयडीसी मधील शिशा साई प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. आरोपी जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकिशोर सहाणी याची पैशांच्या वादातून हत्या केली आहे. मृत ठेकेदार नंदकिशोर सहाणी याच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हरने वार करुन त्याचा जीव घेण्यात आला. मागच्या वर्षांपासून जयशंकर प्रसाद आणि नंदकिशोर सहाणी हे दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते.यावेळी ठेकेदार नंदकुमारने कामाला असलेल्या जयशंकर प्रसाद याच्याकडून तीस हजार रुपये उधार घेतले होते, मात्र त्याने पैसे परत न केल्याच्या रागातून हि हत्या करण्यात आली.

स्क्रू ड्रायव्हर पाठीत खुपसला
यामध्ये मृत नंदकिशोर सहाणी याने परत केल्यामुळे आरोपी जयशंकर प्रसाद आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात जयशंकर प्रसाद याने ठेकेदार नंदकुमार सहाणीच्या पाठीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला. हा वार एवढा भयंकर होता कि या हल्ल्यात नंदकुमारचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

उद्योग नगरीतील पेंट शॉपला भीषण आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

औरंगाबाद – वाळूज उद्योगनगरीतील एलएपीएल ऑटोमोटिव्ह या कंपनीच्या पेंट शॉपला आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कंपनीचे पेंट शॉप जळून खाक झाले आहे. या आगीत शॉपचे जवळपास 1 कोटी रुपयांचे नुकसान नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

एलएपीएल ऑटोमोटिव्ह या वाळूज उद्योगनगरीतील कंपनीत दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचे इंडिकेटर तयार केले जाते. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास कंपनीच्या पेंट शॉपला अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य, मशीन्स जळून खाक झाले.

जवळपास एक ते दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कंपनीचे सुनील धारपूरकर यांनी व्यक्त केला. कंपनी चे मालक नीरज गोयल हे दिल्ली येथे गेले असून आगीचे कारण समजू शकले नाही

वडिलांनी केली आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली अन्….

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी त्याच्या मुलीच्या बॅगमध्ये एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमुळे आपल्या पतीने त्याला होणाऱ्या मानसिक त्रासातून आत्महत्या केल्याचे पत्नीला समजले. यानंतर या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हि धक्कादायक घटना नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोपळनगरमध्ये घडली. काही दिवसांपूर्वी प्रदीप मारवाडे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली होती. गळफास घेऊन त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला होता. मात्र त्यांनी हि आत्महत्या का केली हे अजून समजू शकले नव्हते.

काय आहे प्रकरण?
प्रदीप मारवाडे यांच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी म्हणजेच 24 फेब्रुवारीला प्रदीप यांच्या मुलीच्या बॅगमध्ये प्रदीप यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट त्यांच्या कुटुंबियांना सापडली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आरोपी पंजू तोतवानी याच्या नावाचा उल्लेख होता. पंजूकडून आर्थिक गोष्टीवरुन होणाऱ्या मानसिक त्रासावरून आत्महत्या करत असल्याचे प्रदीपने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.

सुसाईड नोटच्या आधारे कारवाई
पती प्रदीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे त्यांच्या पत्नीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. या तक्रारीवरून आरोपी पंजू तोतवानी याला मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

राजकीय नेत्यांशी स्नेहसंबंध
पंजू तोतवानी याच्यावर याअगोदरदेखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्याचे विविध राजकीय नेत्यांशी त्याचे स्नेहसंबंध असल्याचे समजत आहे. याचाच फायदा घेऊन तोतवानी लोकांना त्रास देत होता. यानंतर प्रतापनगर पोलिसांनी यासंदर्भात तोतवानीला अटक करुन मृत व्यक्तीचे आणि आरोपीचे काय संबंध आहे, तसेच मृत व्यक्तीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

गॅस पाइपलाइन उद्धाटन कार्यक्रमात भाजपचे शक्ती प्रदर्शन; इतर पक्षांचे नेते अनुपस्थित

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात झपाट्याने वाढलेले शहर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या औरंगाबादमध्ये आज सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास हर घर गॅस या अभियान या 2 हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत पार पडले. मात्र, या कार्यक्रमास एमआयएम खासदार इम्तियाज जलील आणि जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील आमदारांनी पाठ फिरवली.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी ऑनलाईन सहभागी झाले. केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी केवळ भाजपच्याच आमदारांची उपस्थिती दिसत होती.

भाजपने या भूमिपूजन कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात चांगलेच शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले. प्रत्येक वार्डातून भाजपचे कार्यकर्ते कार्यक्रमासाठी जात होते. विशेष म्हणजे, कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर शहरात प्रथमच एवढ्या मोठा कार्यक्रमाचे नियोजन भाजपतर्फे करण्यात आले होते.

हे होते अनुपस्थित –
कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर पालकमंत्री सुभाष देसाई, कॅबीनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, रमेश बोरनारे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, विक्रम काळे यांची नावे होती. मात्र, कार्यक्रमास हे सर्व अनुपस्थित राहिले.

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मंदिरात अत्याचार : बापलेकावर गुन्हा दाखल

ratnagiri rape

खंडाळा | दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका मंदिरातच 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी 9 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दुकानात जात होती. त्यावेळी त्याच गावातील एका तरुणाने तिला बोलावून घेतले. मुलीला धमकी देऊन जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला मारून टाकीन. तसेच तुझ्या घरच्यांना पण मारून टाकीन, अशी धमकी त्या तरुणाने दिली. त्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही.

काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती. त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला. त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने तातडीने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर अत्याचाराची  घटना घडली त्याच दिवशी संशयित आरोपी तरुणाच्या वडिलानेही मुलीला ‘तू माझ्या मुलासोबत लग्न कर, अन्यथा तुझ्या वडिलांना व तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन,’ अशी धमकी दिली. त्यामुळे  त्याच्या वडिलांवर धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. दोघेही बापलेक पोलिसांना सापडले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने हे अधिक तपास करीत आहेत.

भाजपच्या ‘विशेष निमंत्रण पत्रिकेवरुन’ रावसाहेब दानवेंचे नाव गायब; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

औरंगाबाद – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला गॅस पाईप लाईनच्या उद्घाटन कार्यक्रम आज पार पडले. या कार्यक्रमासाठी भाजपतर्फे निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक नेत्यांची नावे आहेत. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नावाला मात्र फाटा देण्यात आला आहे.

भाजपतर्फे तयार करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे सरचिटणीस आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे तेवढीच नावे देण्यात आली आहेत.

दरम्यान मराठवाड्यातील महत्त्वाचे नेते तथा भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आले असल्याची चर्चाही दानवे गटातर्फे करण्यात येत आहे. मात्र शासकीय निमंत्रण पत्रिकेत मात्र रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. हे नाव नसल्याने दानवी समर्थकांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

Credit Card बिलिंग सायकल कशी असते, त्याची ड्यू डेट कशाप्रकारे कॅल्क्युलेट केली जाते हे समजून घ्या

credit card

नवी दिल्ली । भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढत आहे आणि कोरोना महामारीच्या काळात ते जास्त महत्त्वाचे झाले आहे. देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा कल वाढला आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात सुमारे 6.4 कोटी क्रेडिट कार्ड चलनात आहेत.

जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती असायला हवी. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे ती म्हणजे बिलिंग सायकल. तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर बिलिंग सायकलकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल काय आहे ?
क्रेडिट कार्ड बिलिंग सायकल हे स्टेटमेंट सायकल म्हणूनही ओळखले जाते. क्रेडिट कार्ड ऍक्टिव्ह झाल्याच्या दिवसापासून बिलिंग सायकल सुरू होते. बिलिंग सायकलचा कालावधी 28 ते 32 दिवसांपर्यंत असू शकतो.

तर, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट किंवा बिलिंग स्टेटमेंट बिलिंग सायकल किंवा बिलिंग कालावधी दरम्यान क्रेडिट कार्ड कसे वापरले याची माहिती देते. या स्टेटमेंटमध्ये तुमच्या बिलिंग सायकल दरम्यान केलेले ट्रान्सझॅक्शन, मिनिमम अमाउंट ड्यू, अमाउंट ड्यू, ड्यू डेट इत्यादींची माहिती असते.

पेमेंट ड्यू डेट-
क्रेडिट कार्ड बिल भरण्याची ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर केलेल्या पेमेंटवर दोन प्रकारचे शुल्क आकारले जाते. पहिले, तुम्हाला थकित रकमेवर व्याज द्यावे लागेल आणि उशीरा पेमेंट फीस भरावी लागेल.

टोटल आउटस्टँडिंग –
ही थकबाकी रकमेची टक्केवारी आहे (अंदाजे 5 टक्के) किंवा सर्वात कमी रक्कम (काही शंभर रुपये) जी लेट फिसवर बचत करण्यासाठी भरावी लागते.

अमाउंट ड्यू –
तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दरमहा एकूण थकबाकी भरली पाहिजे. एकूण रकमेत बिलिंग सायकल दरम्यान लागणाऱ्या शुल्कांसह सर्व EMI समाविष्ट आहेत.

क्रेडिट लिमिट –
तुम्हाला क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये तीन प्रकारचे लिमिट आढळतील, एकूण क्रेडिट लिमिट, उपलब्ध क्रेडिट लिमिट आणि कॅश लिमिट.

ट्रान्सझॅक्शन डिटेल्स –
या विभागात तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात किती पैसे आले आणि किती खर्च झाले याची संपूर्ण माहिती असते.

रिवॉर्ड पॉइंट्स –
क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये, तुम्हाला आतापर्यंत जमा झालेल्या रिवॉर्ड पॉइंटचे स्टेट्स दिसेल. येथे तुम्हाला मागील सायकलमधून कमावलेल्या रिवॉर्ड पॉइंट्सची संख्या, सध्याच्या बिलिंग सायकलमध्ये मिळवलेले पॉइंट्स आणि एक्सपायरी झालेले पॉइंट्स दाखवणारे टेबल्स दिसतील.

वृद्ध शेतकऱ्याने रचले स्वत:चे सरण, दिवा लावून पूजा केली अन् स्वतःला जाळून घेतले

nagpur crime

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यामधील कुही तालुक्यातील किन्ही या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये स्वत:चे सरण रचले. त्यांनंतर त्याने पूजा करून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. आत्माराम मोतीराम ठवकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते 80 वर्षांचे होते. तसेच ते वारकरी असून, धार्मिक प्रवृतीचे होते. विशेष बाब म्हणजे मृत आत्माराम मोतीराम ठवकर यांनी आत्महत्येपूर्वी रचलेल्या सरणाशेजारी विधीवत पूजासुद्धा केली होती. या ठिकाणच्या भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे ते वडील होते. शेतात असलेल्या गॅस गोडाऊनच्या शेजारी त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अजून समजू शकलेले नाही. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय घडले नेमके ?
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री किन्ही येथे मंडईचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी आत्माराम ठवकर हे येथे झाडीपट्टी नाटक बघायला गेले होते. नाटक पाहून झाल्यावर ते पहाटे त्यांच्या शेतात आले. येथे त्यांनी शेतातील लाकडे गोळा केली. स्वतःसाठी लाकडांचे सरण रचले. त्यावर तणस टाकली. सरणाची पूजा केली. त्यानंतर ते सरणावर चढले आणि नंतर त्यांनी स्वतःला पेटवून घेतले.

मृत आत्माराम धार्मिक वृत्तीचे होते
सकाळी आत्माराम यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर करत आहेत. आत्माराम हे धार्मिक वृत्तीचे होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. घरातील परिस्थिती चांगली असताना त्यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला ? याचा तपास पोलीस करत आहेत.