Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2702

युक्रेनमध्ये दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | युक्रेनची राजधानी किव्ह एकीकडे रशियाच्या निशाण्यावर आहे तर दुसरीकडे किव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत सरकारने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. अशात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.

युक्रेनमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू असा असून चंदन जिंदाल असे या 22 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा पंजाबमधील बर्नाला या ठिकाणचा आहे. इस्केमिक स्ट्रोकच्या आजारामुळे चंदन जिंदालवर विनिस्टीयामधील इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

नवीन जिंदालच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून आपल्या मुलाचे शव भारतात आणले जावे अशी विनंती केली आहे. युक्रेनमधील खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात कर्नाटकमधील नवीन शेखराप्पा या विद्यार्थ्याचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या भारतीय विद्यार्थ्याचे निधन झाल्याने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

रशियन सैनिकांनी युक्रेनमधील खारकीव्ह शहरात गोळीबार केला होता. यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारला विनंती केली असून सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या पंजाबी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

T20 Rankings : श्रेयस अय्यरने मिळवले 27 वे स्थान, कोहली आणि रोहित दोघेही टॉप-10 मध्ये नाहीत

दुबई । श्रेयस अय्यरने ICC T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या विजयाचा खेळाडूंच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. अय्यरला मालिकेत तीन नाबाद अर्धशतकांचा मोठा फायदा झाला, ज्यामुळे तो फलंदाजांच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानावर पोहोचला. 27 वर्षीय अय्यरने या मालिकेत 3 सामन्यात 174 च्या स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या. संपूर्ण मालिकेत तो नाबाद राहिला होता.

श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तीन स्थानांची प्रगती करत गोलंदाजांच्या क्रमवारीत 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या पाथुम निसांकाने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 75 धावा केल्या, ज्यामुळे तो क्रमवारीत 9व्या स्थानावर पोहोचला आहे, तर भारताचा माजी कर्णधार कोहली 5 स्थानांनी घसरून 15व्या स्थानावर आला आहे. कोहलीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा 13 व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाज म्हणून फक्त केएल राहुल हा टॉप-10 मध्ये आहे. तो दहाव्या स्थानावर आहेत. T20 च्या टॉप-10 मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.

कुमारा पहिल्यांदाच टॉप-40 मध्ये
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा पहिल्यांदाच टॉप-40 गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. यजमान न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कसोटी क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली असून, तीन स्थानांची झेप घेत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाने 2 सामन्यांच्या मालिकेत 10 विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा काईल जेम्सन पाचव्या तर टीम साऊथी सहाव्या स्थानावर घसरला आहे.

Labushen पुन्हा टॉपवर
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. एकदिवसीय क्रमवारीत, अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. तो सहा स्थानांनी 9व्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज 7व्या स्थानावर घसरला आहे.

“एक महिलेने पंतप्रधान असूनही महिलांचे दुःख दूर केले नाही पण ते मोदींनी पाचच वर्षात केले”; रावसाहेब दानवेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे एका कार्यक्रमप्रसंगी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि पाचच वर्षात चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. मात्र, एक महिला 11 वर्षे देशात पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही,” असे वक्तव्य करत मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात गॅस पाइप लाइनच्या कामाचा शुभारंभ होत आहे. येत्या काही वर्षात घरोघरी पाइपद्वारे गॅस पोहोचणार आहे.

यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल टीका करताना मंत्री दानवे म्हणाले की, एक महिला देशात 11 वर्ष पंतप्रधान होती. पण महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं, असे दानवे यांनी म्हंटले.

LIC व्यतिरिक्त ‘या’ 6 कंपन्या मार्चमध्ये आणू शकतात IPO

नवी दिल्ली । आपण आर्थिक वर्ष 2022 च्या शेवटच्या महिन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे देशातील IPO मार्केटमधील खळबळ पुन्हा एकदा तीव्र होणार आहे. या महिन्यात किती कंपन्या आपला IPO घेऊन मार्केटमध्ये येणार आहेत याची अचूक माहिती सध्या आमच्याकडे नाही. मात्र तरीही, देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली LIC, FarmEasy, डेल्हीवरी सहित अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांचा IPO या महिन्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

LIC IPO : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या महिन्यात देशातील सर्वात मोठी इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) आणणार आहे. IPO ची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत सरकार या IPO मधून 70,000 – 75,000 कोटी रुपये उभारण्याची योजना करत आहे.

Delhivery IPO : डिलिव्हरी आणि लॉजिस्टिक फर्म डेल्हीवरी या महिन्यात मार्केटमधून सुमारे 7,460 कोटी रुपये उभारण्यासाठी आपला IPO लॉन्च करू शकते. या IPO अंतर्गत, 5,000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर गुंतवणूकदार आणि भागधारकांद्वारे 2,460 कोटी रुपयांची ऑफर-फॉर-सेल (OFS) आणली जाईल.

PharmEasy IPO : फार्मास्युटिकल डिलिव्हरी अ‍ॅप PharmEasy लवकरच आपला IPO लॉन्च करेल. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये IPO साठी अर्ज केला होता. PharmEasy ची नवीन शेअर्स जारी करून किमान 6,250 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे.

Byju’s IPO : Byju’s App द्वारे ऑनलाइन शिक्षण देणारी फर्म, लवकरच आपला IPO लॉन्च करण्याचा विचार करत आहे. कंपनी IPO मधून सुमारे $40कोटी ते $60 कोटी उभारण्याच्या तयारीत आहे.

OYO Hotels and Homes : देशातील आघाडीच्या हॉस्पिटॅलिटी फर्मपैकी एक असलेली OYO Hotels and Homes IPO द्वारे सुमारे 8,430 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. यामध्ये, 7,000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर कंपनीचे भागधारक आणि गुंतवणूकदार त्यांचे 1,430 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

SBI Mutual Fund : देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लवकरच आपल्या म्युच्युअल फंड बिझनेसची लिस्ट तयार करत आहे. SBI म्युच्युअल फंडातील IPO अंतर्गत, SBI आपला 6 टक्के हिस्सा आणि Amundi सुमारे 4 टक्के हिस्सा विकू शकते.

NSE IPO : देशातील सर्वात मोठे एक्सचेंज असलेले नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) सुमारे 10,000 कोटी रुपये उभारण्यासाठी आपला IPO लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनीच्या प्रमुख भागधारकांमध्ये SBI, LIC, IFCI, IDBI बँक, गोल्डमन सॅक्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, टायगर ग्लोबल आणि सिटीग्रुप यांचा समावेश आहे.

ट्रक आणि पिकअप व्हॅनचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

nashik crime

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक-पेठ महामार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. कमलेश मोरे, संतोष लांडे, हेमंत मोरे अशी या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिन्ही तरुण चाचडगावचे रहिवाशी होते. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

कशा प्रकारे झाला अपघात
पेठ येथून एक आयशर ट्रक नाशिकच्या दिशेने जात होता. तर चाचडगावहून एक पिकअप व्हॅन पेठच्या दिशेने येत होती. यावेळी दोन्ही वाहनांची भीषण टक्कर होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील संतोष हिरामण लांडे, कमलेश सुखदेव मोरे, आणि हेमंत रघुनाथ मोरे या चाचडगाव येथील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर लखन भगवान गांगोडे आणि रवींद्र वामन पोटींदे हे दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

रस्त्यावर रक्ताचा सडा
आयशर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेली धडक इतकी भयंकर होती की, यात पिकअप व्हॅनचा जागेवरच चुराडा झाला. या अपघातामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. या भीषण अपघाताची माहिती मिळताच चाचडगावच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची माहिती समजताच पोलीससुद्धा घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी रस्त्यावरील मृतदेह, अपघातग्रस्त वाहने हटवली. या अपघातामुळे चाचडगाववर मोठी शोककळा पसरली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

रशिया युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबदबा, सेन्सेक्स 778 अंकांनी घसरला

Recession

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन संकटाचा परिणाम आजही बाजारावर झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरणीत बंद झाले. मात्र, ट्रेडिंगच्या शेवटी तो खालच्या स्तरावरून सावरला आणि निफ्टी 16600 च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 778.38 अंकांनी म्हणजेच 1.38 टक्क्यांनी घसरून 55,468.90 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 187.95 अंकांनी किंवा 1.12 टक्क्यांनी घसरून 16,605.95 वर बंद झाला.

आजच्या ट्रेडिंगमध्ये निफ्टी इंट्राडे मध्ये 17500 च्या पातळीवर जाताना दिसला. आजच्या ट्रेडिंगमध्ये ऑटो, बँकिंग, फार्मा, रियल्टी, एफएमसीजी, आयटी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. दुसरीकडे मेटल, पॉवर,एनर्जी, ऑइल अँड गॅसचे शेअर्स वधारले.

घट होण्याची प्रमुख कारणे

1. रशिया-युक्रेन युद्ध
जागतिक बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला. पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियामध्ये आर्थिक संकट उद्भवले आहे, ज्यामुळे परिस्थिती दुसर्‍या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात वाईट संघर्षाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.

SWIFT Financial Networks पासून वेगळे केल्यामुळे रशियाच्या 630 बिलियन डॉलर्सच्या फायनान्शिअल रिझर्व्ह वापरण्‍याच्‍या क्षमतेवर मर्यादा घातली गेली आहे. एकीकडे अनेक कंपन्यांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रशियन सैन्याने युक्रेनमध्ये खोलवर प्रवेश केला आहे. तज्ज्ञांच्या मते, युद्धाभोवतीच्या अनिश्चिततेमुळे नजीकच्या भविष्यात वॉलेटिलिटी इंडेक्स जास्त राहील.

2. क्रूडच्या किंमतींनी पेट घेतला
क्रूड: ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला आहे. यूएस आणि त्याच्या सहयोगी देशांनी मागणीला सपोर्ट देण्यासाठी आपल्या स्ट्रॅटेजिक स्टॉकमधून 6 कोटी डॉलर्स क्रूड रिलीज करण्यास सहमती दर्शवली असूनही ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $110 च्या वर गेले आहे.

क्रूडच्या किंमती वाढल्याने आधीच वाढलेल्या महागाईत आणखी भर पडेल. भारत आपल्या गरजेपैकी 80 टक्के तेल आयात करतो. त्यामुळे चालू आऊट डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिटची परिस्थिती इथे महागाई वाढून बिकट होईल. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या मार्जिनवरही दबाव वाढेल.

आता WhatsApp च्या माध्यमातूनही IPO मध्ये गुंतवणूक करता येणार, ‘या’ कंपनीने सुरू केली सर्व्हिस

WhatsApp

नवी दिल्ली । भारताच्या IPO मार्केटमधील मजबूत तेजी दरम्यान आता इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस कंपनी असलेल्या जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने एक नवीन सर्व्हिस सुरू केली आहे. कंपनीने बुधवारी सांगितले की, गुंतवणूकदारांना WhatsApp द्वारे IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा सुरू केली गेली आहे.

याद्वारे IPO साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी Geojit आपल्या ग्राहकांना WhatsApp वर एंड-टू-एंड सपोर्ट देत आहे. या सर्व्हिस मधील सर्वात स्पेशल फिचर, ज्याला e-IPO असे नाव देण्यात आले आहे. हे गुंतवणूकदारांना IPO अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसमध्ये सहजतेने नेव्हिगेट करण्यास अनुमती देते.

इतर कोणतेही App न उघडता पूर्ण काम केले जाईल
कंपनीने म्हटले आहे की, Geojit चे ग्राहक इतर कोणतेही App न उघडता WhatsApp chat window द्वारे कोणत्याही IPO चे सब्स्क्रिप्शन घेऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Geojit Technologies ने डेव्हलप केलेले हे WhatsApp channel स्टॉक ट्रेडिंग आणि म्युचूअल फंड इंवेस्टमेंटची सुविधा देते.

Geojit चे मुख्य डिजिटल अधिकारी जयदेव एम. वसंतम म्हणाले, “या IPO सर्व्हिसचा शुभारंभ आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम डिजिटल इंवेस्टमेंट सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. आमची WhatsApp-इंटिग्रेटेड IPO सर्व्हिस आमच्या ग्राहकांसाठी IPO अ‍ॅप्लिकेशनची प्रोसेस एका क्लिकवर उपलब्ध करून देते. तसेच, Baset सर्व गुंतवणूकदारांना डिजिटल इंवेस्टमेंट एक्सपेरिअन्स देते. या सर्व्हिससह, IPO अ‍ॅप्लिकेशन WhatsApp chat window न सोडता काही मिनिटांत पूर्ण केली जाऊ शकतात.

व्हॅलिड UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आयडी असलेले आणि कोणतेही स्टॅण्डर्ड UPI-बेस्ड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन वापरणारे सर्व ग्राहक ही सर्व्हिस वापरू शकतील. मार्चमध्ये LIC सह 5 हून जास्त कंपन्या IPO आणणार आहेत. देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LIC या महिन्यात IPO आणणार होती. याशिवाय FarmEasy, Delhivery सह अनेक कंपन्या आपला IPO आणणार आहेत.

Petrol Diesel Price: पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होऊ शकेल वाढ

Petrol-Diesel Price

नवी दिल्ली । पुढील आठवड्यापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकेल. युक्रेन-रशिया युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. ज्याचा परिणाम येत्या आठवडाभरात भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही दिसू शकेल. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, पुढील आठवड्यात पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल 110 डॉलरची पातळी ओलांडली आहे.

जेपी मॉर्गनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, पुढील आठवड्यापासून रिटेल डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे, पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही दैनंदिन इंधनाच्या दरात होणारी वाढ पुन्हा सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार ?
विशेष म्हणजे नोव्हेंबरपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जेपी मॉर्गनच्या मते, ऑइल मार्केटिंग कंपन्याना (OMCs) 5.70 रुपये प्रति लीटर v/s सामान्य मार्जिन रु.2.5/लीटर नुकसान होते आहे. आम्ही गुंतवणूकदारांना सावध करतो की, कच्चे तेल, डिझेल आणि परकीय चलनातील अस्थिरता पाहता ते दिवसेंदिवस बदलू शकते.

कच्च्या तेलाच्या किंमती 111 डॉलर प्रति बॅरल च्या पुढे
बुधवारी दुपारपर्यंत ब्रेंट क्रूडच्या किंमती मागील बंदच्या तुलनेत 6.59% ने प्रति बॅरल $111.56 वर होत्या. ब्रेंट सध्या 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर आहे. मंगळवारी त्याची किंमत प्रति बॅरल 102.16 डॉलर होती. त्यात सातत्याने वाढ होत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) इंधन विक्रेते पेट्रोलवर प्रति लिटर ₹ 5.7 नुकसान करत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरांवर होणार का?
2014 च्या मध्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती US$ 110 प्रति बॅरलच्या वर पोहोचल्या. अशी भीती आहे की, युक्रेनमधील संघर्ष किंवा पाश्चात्य निर्बंधांमुळे दिग्गज ऊर्जा कंपन्यांना रशियाकडून मिळणार ऑइल आणि गॅसचा पुरवठा खंडित होऊ शकतो.

ऑईल मंत्रालयाचे काय म्हणणे आहे ?
ऑईल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड एनालिसिस सेल (PPAC) कडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी, भारताची कच्च्या तेलाची खरेदी प्रति बॅरल $ 102 च्या वर पोहोचली, जी ऑगस्ट 2014 नंतरची सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा 7 फेब्रुवारीला असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.

ब्रोकरेजने सांगितले की, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना सामान्य मार्केटिंग मार्जिनवर परत जाण्यासाठी रिटेल किंमती प्रति लिटर 9 रुपये किंवा 10 टक्क्यांनी वाढवणे आवश्यक आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये आहे. राज्य सरकारने उत्पादन शुल्कात कपात आणि व्हॅट दरात कपात केल्यानंतर ही किंमत आहे.

तिसरे महायुद्ध हे अणवस्त्र, विनाशकारी असेल; रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याचा गंभीर इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला गंभीर इशारा दिला. त्यानंतर आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यानि थेट इशाराच दिला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरं महायुद्ध हे अणवस्त्रांचं असून विनाशकारी असेल, असे महत्वाचे विधान त्यांनी केले आहे.

रशियन सैन्याच्यावतीने युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करण्यात आले आहे. किव्हमधील अनेक इमारतींवर रॉकेट्सने हल्ले केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, युद्धविरामावर अर्थपूर्ण चर्चा सुरू होण्यापूर्वी रशियाने युक्रेनियन शहरांवर बॉम्बफेक करणे थांबवले पाहिजे, कारण या आठवड्यात वाटाघाटींच्या पहिल्या फेरीत फारशी प्रगती झाली नाही.

 

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील गेल्या सात दिवसांपासूनयुद्ध सुरु आहे. रशियाने त्यांच्या न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध अणवस्त्र युद्धाच्या दिशेने जाणार का याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अशात आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्जी लावरो यांनी तिसरे महायुद्ध हे अणवस्त्रांचे असून विनाशकारी असेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करता येतील, त्याविषयीचे तपशील जाणून घ्या

Share Market

नवी दिल्ली । जेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यास पात्र ठरता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमच्यासमोर अनेक गुंतागुंत असते. इन्कम टॅक्स म्हणून कमाईचा भाग भरणे सुरुवातीला जड वाटते. मात्र देशाच्या विकासासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून टॅक्स भरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकं नेहमी जास्तीतजास्त टॅक्स सेव्हिंग ऑप्शनच्या शोधात असतात. टॅक्स म्हणून भरावे लागणारे पैसे वाचवू शकणारे पर्याय गमावणे कोणालाही आवडत नाही. वेगवेगळी लोकं हे करण्याचे वेगवेगळे मार्ग पसंत करतात.

नागरिकांमध्ये जास्त टॅक्स वाचवण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कलम 80C अंतर्गत काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या अंतर्गत, तुम्ही विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये पैसे गुंतवून टॅक्स सूट मिळवू शकता.

तुम्ही खालील इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये गुंतवणूक करून पैसे वाचवू शकता-

● Pension plans

● PPF accounts

● Equity mutual funds

● 5-year tax-saving deposits

● Life insurance policies or term plans

पगार भत्ता
तुमचे कर दायित्व कमी करण्यासाठी बहुतेक कंपन्या तुमच्या पगारात विविध तरतुदी करतात. या संदर्भात तुम्ही तुमच्या कंपनीच्या HR शी बोलू शकता. तुम्ही तुमच्या पगाराचा भाग म्हणून वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता आणि टेलिफोन खर्च यासारखे भत्ते घेऊ शकता, कारण ते करपात्र नाहीत.

घरभाडे भत्ता (HRA)
कर्मचार्‍यांना त्यांच्या उत्पन्नात सामान्यतः घरभाडे भत्ता (HRA) मिळतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि नियोक्त्याकडून भाडे भत्ता मिळत असेल, तर तुम्ही, एक कर्मचारी म्हणून, आयकर कायद्यानुसार HRA वर सूट मिळण्याचा क्लेम करू शकता.

धर्मादाय योगदान
तसेच, कलम 80G अंतर्गत धर्मादाय योगदान तुमच्या उत्पन्नाच्या 10% पर्यंत वजा केले जाते. मात्र, तुम्ही पावतीशिवाय देणगी देण्याऐवजी संस्थेकडून पावती आणि त्यांच्या आयकर सूट प्रमाणपत्राची प्रत मिळाल्याची खात्री करा.