Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2700

एकहाती सत्ता : कोळे विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा 13-0 ने विजय

कराड | कोळे विविध विकास सेवा सोसायटी निवडणूकीत 13-0 ने श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. सोसायटीचे सर्व विजयी उमेदवार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, अँड. उदयसिंह विलासराव पाटील – उंडाळकर यांचे नेतृत्व मानणारे आहेत. दरम्यान श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलने  एकहाती सत्ता मिळवली आहे.

कोळे विविध विकास सेवा सोसायटी निवडणुकीसाठी दोन पॅनेलमध्ये लढत झाली. श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेल विरुद्ध घाडगेनाथ पॅनेल अशी लढत झाली. डॉ. अतुलबाबा भोसले व माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी घाडगेनाथ पॅनेल तयार केले होते. या विरोधात स्वर्गीय विलासकाका पाटील, अॅड. उदयसिंह पाटील यांचे कट्टर समर्थकांनी श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेल तयार करून निवडणुकीला सामोरे गेले होते. श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार सुमारे 100 ते 150 मताधिक्याने निवडून आलेले आहेत.

सर्वसाधारण मतदार संघातून ः संपत बाबाजी कदम, श्रीरंग विष्णू कराळे – पाटील, महादेव भीमराव पाटील, मोहन मारुती चव्हाण, राजकुमार भाऊ पाटील, शामराव अंतु पाटील, संतोष दादासाहेब पाटील, मंदार उत्तम शिंगण,

महिला राखीव मतदार संघातून ः यशोदाबाई कृष्णा पाटील, कलाबाई रामचंद्र शिंगण,

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून ः मन्सूर नूरमहंम्मद मुजावर,

विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गमधून ः नथुराम मारुती शिनगारे,

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून ः पंढरीनाथ गंगाराम कांबळे हे विजयी झालेले आहेत.

कोळे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जावेद फकीर, माजी सरपंच श्रीकांत कुंभार, सोसायटीचे माजी संचालक श्रीरंग पाटील, महादेव देसाई, उपसरपंच समाधान शिनगारे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन कराळे, सुधीर कांबळे, दीपक कराळे, अजिंक्य पाटील, राजेश देसाई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, अॅड.उदयसिंह पाटील (उंडाळकर) यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

मराठवाड्यातील 18 विद्यार्थी युक्रेनमधून परतले

औरंगाबाद – रशियाने युक्रेन वर हल्ला केल्यामुळे मराठवाड्यातून विविध कामांसाठी तिकडे गेलेले 109 जण अडकुन पडले होते. त्यापैकी 18 जण मायदेशी परतले असून अद्याप 91 जण युक्रेन आणि बाजूचा राष्ट्रात अडकले आहे. प्रत्येक जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. त्या लोकांना मायदेशी अन यासाठी शासनाकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

युक्रेनमध्ये शिक्षण आणि इतर कामांसाठी गेलेले तब्बल 109 जण अडकून पडले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 16, जालना येथील 7, परभणी 6, हिंगोली 2, नांदेड 34, बीड 4, लातूर 28 तर उस्मानाबाद जिल्ह्यातील 12 जणांचा समावेश आहे. या 109 पैकी काही जणांनी युक्रेनची सीमा पार करून दुसऱ्या देशात आश्रय घेऊन तेथून ते मायदेशी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 18 जण स्वगृही परतले आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 3, जालना येथील 4, परभणी 6, नांदेड 6, बीड 1, लातूर 2, उस्मानाबाद जिल्ह्यातील 1 जणांचा समावेश आहे. अद्याप 91 जण अडकून पडले असून, या 91 जणांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या कायम संपर्कात आहेत.

औरंगाबादचे चार विद्यार्थी दिल्लीत –
औरंगाबादेतील भूमिका शार्दुल, श्रुतिका चव्हाण आणि प्रतीक ठाकरे हे तीन विद्यार्थी तसेच बीड जिल्ह्यातील अनिलकुमार तेजराम हाही दिल्लीला पोहोचला आहे. महाराष्ट्र सदनात त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लवकरच ते औरंगाबादला दाखल होणार आहे. तर परभणी जिल्ह्यातील सहा विद्यार्थी युक्रेनमधून परतले असून त्यांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

नवाब मलिकांच्या विरोधात आणखी एक ईडीकडे नवी तक्रार

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रुयांवर आदींची कारवाई चालली आहे. असहित राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आज भाजपकडून अधिवेशनात केली जाणार असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आता आणखी एका जागेवरुन मलिकांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल झाली आहे. मलिकांच्या अटकेनंतर एका जेष्ठ नागरिकाने केली ईडीकडे तक्रार केली असून त्या ज्येष्ठ नागरिकाने तक्रारीत नवाब मलिकांवरती अनेक आरोप केले आहेत.

नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच नवाब मलिकांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काळ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही अधिवेशनात मालिकांचा राजीनामा घ्यायला सरकारला भाग पाडू असेही ते म्हणाले.

दरम्यान नवाब मलिक यांच्यावरती जागेच्या खरेदीचा आरोप केल्याने त्यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यांच्या विरोधात एका वयोवृध्द व्यक्तीने तक्रार केली असून त्यांमध्ये त्यांनी एका जागेवर मलिकांनी जबरदस्तीने कब्जा केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. ईडीने त्यांची तक्रार नोंद केली असून त्यासंदर्भातले सगळे पेपर त्यांनी जमा केली आहेत.

ईडी’सारख्या संस्था भाजपची धुणीभांडी करणाऱ्या घरगडय़ांप्रमाणे काम करतात

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर तोफ डागली आहे. ईडी’सारख्या संस्था या भाजपची धुणीभांडी करणाऱया घरगडय़ांप्रमाणे सध्या काम करीत आहेत. राजकीय विरोधकांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांना थंड करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा राबविल्या जात आहेत असा आरोप शिवसेनेनं केला. तसेच विधिमंडळात विरोधक गोंधळ घालणार असतील तर याला आदळआपट म्हणावी लागेल असा टोलाही लगावला

‘ईडी’सारख्या संस्था या भाजपची धुणीभांडी करणाऱया घरगडय़ांप्रमाणे सध्या काम करीत आहेत. राजकीय विरोधकांच्या गळ्याभोवती फास आवळून त्यांना थंड करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा राबविल्या जात आहेत, हे आता उघड झाले आहे. दाऊद इब्राहिम हा देशाचा दुश्मन आहे व त्यास तात्काळ हिंदुस्थानात आणून फासावर लटकवायची जबाबदारी केंद्रातल्या मोदी सरकारची आहे. मोदींचे सरकार दाऊदला अद्याप ताब्यात का घेऊ शकले नाही? असा सवाल शिवसेनेनं केला.

दाऊद कराचीमध्ये ज्या भागात राहतो, त्यावर एखादा सर्जिकल स्ट्राईक करून देशाच्या दुश्मनाला कायमचे खतम करायला काहीच हरकत नाही. म्हणजे ‘ना रहेगी बास ना बजेगी बांसुरी,’ पण ऊठसूट “दाऊद दाऊद” म्हणून जमिनीवर काठय़ा आपटायच्या व देशाला “धोका धोका” असल्याचे बोंबलायचे. हे प्रकार कधी तरी थांबायलाच हवेत. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड पंपनीने केलेली 23 हजार कोटींची बँक लूट दाऊदने घडविलेल्या बॉम्बस्फोटांइतकीच भयंकर आहे. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हासुद्धा दहशतवादच आहे असे सामनातून म्हंटल.

महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी रामदास यांच्या संबंधांवर वादग्रस्त तितकेच बिनबुडाचे वक्तव्य केल्याने समस्त शिवभक्तांत संतापाचे वातावरण आहे. राज्यात अनेक ठिकाणी लोक रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत आहेत. याप्रश्नी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी भाजप घेणार आहे काय ? छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे दिशाभूल करणारे वक्तव्य केले त्याचा साधा निषेधही देवेंद्र फडणवीस यांनी करू नये? खरे तर असे अनेक विषय वादळी आहेत अस म्हणत शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे.

 

मनपा निवडणूकीचा मार्ग होणार मोकळा? सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

औरंगाबाद – राज्यातील मुदत संपणाऱ्या महापालिकांमध्ये निवडणूक घेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया थांबवली आहे. निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार आज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीत निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल का? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या सभागृहाची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली. त्यापूर्वी निवडणूक घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी 2020 मध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली. या प्रक्रियेत प्रचंड अनागोंदी झाली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. अनेकदा यावर सुनावणी झाली. मात्र, निर्णय झाला नाही.

दरम्यान राज्यात निवडणुकीच्या कायद्यात बदल झाला. त्यामुळे याचिका निकाली काढावी अशी विनंती आयोगाने न्यायालयात केली. याचिकाकर्त्यांनी ही त्यावर आक्षेप नोंदवला नाही. आज सरन्यायाधीश यांच्यासमोर 16 व्या क्रमांकावर औरंगाबाद महापालिकेची याचिका सुनावणीस येणार आहे.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Suicide

औरंगाबाद – अवघ्या 14 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेस माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी औरंगपूर- हर्सूल येथे घडली आहे. सासरच्या मंडळींना अटक करण्याच्या मागणीसाठी विवाहितेच्या माहेरच्यांनी बुधवारी वाळूज ठाण्या समोरच पाच तास ठिय्या दिला. याप्रकरणी विवाहितेचा पती अक्षय शिंदे यास अटक करण्यात आली असून, सासू-सासरे अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली.

औरंगाबाद जिल्ह्यातील वाहेगाव (ता.गंगापूर) येथील रामचंद्र मनाळ यांची एकुलती एक मुलगी प्रांजली हिचा विवाह अवघ्या 14 महिन्यांपुर्वी औरंगपूर (हर्सुली) येथील अक्षय तात्याराव शिंदे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर आरोपी अक्षय तात्याराव शिंदे (पती), सासरा तात्याराव खंडेराव शिंदे (सासरा) व कमलबाई तात्याराव शिंदे (सासू) यांनी प्रांजली हिस माहेरहून सात लाख रुपये आणण्याची मागणी केली. मात्र ती पूर्ण होत नसल्याने आरोपींनी प्रांजलीचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला.

त्यामुळे प्रांजलीने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी तिचा मृतदेह काढून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर काल प्रांजलीच्या माहेरच्या मंडळींनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला. या आरोपींमध्ये छावणी पोलीस ठाण्याच्या पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. अखेर पाच तासानंतर वाळूज पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीत सशस्त्र दरोडा; कुटुंबावर हल्ला करून लाखोंचे दागिने पळवले

bhivandi crime

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भिवंडी शहराला लागून असलेल्या खोणी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. या दरोडेखोरांनी घरातील एका खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवून तिच्या अंगावरील दागिने घेऊन पलायन केले आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी गावात अ‍ॅड अजय पाटील यांच्या घरात हा दरोडा पडला आहे.

घटनेच्या दिवशी अजय पाटील यांचे कुटुंबीय झोपले असताना मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला. अजय विष्णू पाटील हे आपल्या पत्नी मुला सह एका खोलीत तर त्यांची आई नंदा आणि सहा वर्षांची मुलगी हे दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला. मात्र त्या ठिकाणी काहीच न मिळाल्याने या दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजल्यावरील घराकडे वळवला.

यानंतर त्यांनी अजय पाटील यांची आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले आणि त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली. यानंतर गळ्यातील गंठन आणि हातातील बांगड्या हिसकावून घेत असताना नंदा यांनी मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी विनंती केली. यादरम्यान नंदा यांची सून अचानक जागी झाली. घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून तिने जोरजोरात आरडाओरड केल्याने दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. यावेळी काही लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी आपल्यासोबत रस्सीने बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर पीडित कुटुंबाने स्थानिक निजामपुरा पोलिसांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आरोपींनी महिलेसोबत केले ‘हे’ दुष्कृत्य

rape

नालासोपारा : हॅलो महाराष्ट्र – नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेवर दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने बलात्कार केला आहे. आरोपी मौलाना रज्जब शेख आणि शहाबुद्दीन या दोघांनी पीडित महिलेला काळी जादू उतरवतो असे सांगून जादूटोणा करण्याच्या बहाण्याने तिच्या शरीरावरील कपडे काढून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत वसई तालुक्यातील नालासोपारा येथील चाळीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार झाला असल्याचे सांगितले. यादरम्यान आरोपींनी पीडित महिलेला तिच्यावर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिला त्रास होत आहे असे सांगितले. यानंतर पीडित महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शविली.

तिला जादूटोणा करून बरे करण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला सांगितले की, आपण काही जादूटोणा करत आहोत. नंतर त्यांनी तिला कपडे काढण्यास सांगून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेने पालघर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी विरोधात बलात्कार आणि धमकावल्याबद्दल भारतीय दंड संहिताच्या कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र दोघे आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने हलवून त्या दोन आरोपींना अखेर बेड्या घातल्या. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

वर्धा नदीत आंघोळ करायला गेले असताना मुलासह आईचा बुडून मृत्यू

vardha crime

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – महाशिवरात्रीच्या दिवशी वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेल्या आईचा आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर-लोणवलीच्या वर्धा नदी घाटावर ही धक्कादायक घटना घडली आहे. आंघोळीला गेलेला मुलगा खोल पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच मुलाला वाचविण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली मात्र या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पदमा अरकोंडा, व रक्षित अरकोंडा अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. हे दोघेही तेलंगणातील लोणवाही या ठिकाणचे रहिवाशी होते. या घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मायलेकरांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मुलाला वाचविण्यासाठी धावली आई
महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त भाविक शिवमंदिरांना ठिकठिकाणी भेट देत असतात. ही शिवमंदिरं पहाडावर तसेच काही नदीकिनारी आहेत. यादरम्यान वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेला मुलगा खोल पाण्यात गेला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आपल्या मुलाला बुडताना पाहून आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता तिचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बऱ्याच प्रयत्नानंतर मायलेकाचा मृतदेह काढला
तेलंगणा राज्यात येणाऱ्या लोणवाही येथील पदमा अरकोंडा, रक्षित अरकोंडा हे दोघे माय-लेक महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला गेले होते. त्या ठिकाणी वर्धा नदी पात्रात आंघोळीला गेले. यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर-लोणवाही घाटावर मुलगा आंघोळ करीत असताना खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आपल्या मुलाला बुडताना पाहून आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता तिचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर मायलेकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

भाजपाला धक्का : पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश, तारीख ठरली

मुंबई | माजी राज्यमंत्री, जेष्ठ नेते मा. शिवाजीराव नाईक यांचा बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील प्रवेश त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने निश्चित झाला. पश्चिम महाराष्ट्रात शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा भाजपला मोठा धक्का मानावे लागणार आहे.

शिवाजीराव नाईक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी खासदार पवार म्हणाले, आपण सगळे पूर्वीं एकाच विचाराने काम केले आहे. आता पुन्हा एकत्र येऊन अधिक जोमाने काम करूया. आज शिवजीरावांनी वाढदिवसा दिवशीच राष्ट्रवादी पक्षात येण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी झालेल्या चर्चेनुसार मा. खासदार पवारसाहेब व इतर मान्यवरच्या उपस्थित २ एप्रिल २०२२ शिराळ्यात भव्य शेतकरी मेळावा घेऊन प्रवेश होईल.

यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी जिल्हा परिषद रणधीर नाईक, सत्यजीत नाईक, अभिजीत नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.