Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2727

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता; तुमचे नाव तर यादीत नाही ना?

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. या योजनेअंतर्गत, सरकार शेतकऱ्यांना एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात.

आतापर्यंत 10 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येऊ शकतो. त्याआधी हा हप्ता मिळेल का ते तपासा? कारण काही शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळणार नाही.

अकराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला.

11 वा हप्ता एप्रिलच्या सुरुवातीला येईल
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. त्यानुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे पैसे जमा करता येणार आहेत.

‘या’ शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळणार नाही
शेतकरी कुटुंबातील कोणत्याही सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले जर टॅक्स भरत असेल तर त्याला योजनेचा लाभ दिला जात नाही.
ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही त्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आले आहे.
जर तुमच्या आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असेल तर तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
जर एखादा शेतीमालक सरकारी नोकरीत असेल तर त्याला पीएम किसानचा लाभ मिळणार नाही.
रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
जर एखाद्या शेतकऱ्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बसणार सर्वाधिक फटका; कसा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म नोमुराने म्हटले आहे की,”या वादाचा आशिया खंडातील भारतावर सर्वाधिक परिणाम होईल.” या युद्धामुळे जगभरात महागाई वाढणार असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूपासून सावरत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे.

नोमुराने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत आशियातील अशा देशांमध्ये आहे, ज्यांना या संकटाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. गुरुवारी युक्रेनवर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. या रिपोर्टचे लेखक अरोदीप नंदी आणि सोनल वर्मा यांनी म्हटले आहे की, “तेल आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.”

‘या’ देशांवर जास्त परिणाम
आशियातील भारत, थायलंड आणि फिलीपिन्सवर याचा सर्वाधिक परिणाम होईल, असे नोमुराने म्हटले आहे. याचा थोडाफार फायदा इंडोनेशियाला होऊ शकतो. या संकटामुळे भारतात महागाई वाढू शकते आणि चालू खात्यातील तूट वाढू शकते. कच्च्या तेलाच्या उच्च किंमतींचा भारताच्या आर्थिक स्थितीवर खोल परिणाम होईल. कारण भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात करतो. एका अंदाजानुसार, तेलाच्या किंमतीत 10% वाढ झाल्यास GDP मध्ये 0.2% ची घसरण होऊ शकते.

चलन दर वाढू शकतो
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मॉनेटरी पॉलिसी अकोमोडेटिव्ह ठेवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र अशीही शक्यता आहे की, जर महागाई वाढली तर RBI ही आपली पॉलिसी आणखी कठोर बनवू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत पुढील आर्थिक वर्षात सरासरी महागाई दर 4.5 टक्के राहण्याची अपेक्षा होती.

त्याच वेळी, QuantEco रिसर्च नुसार, भारताच्या कच्च्या तेलाच्या बास्केटमध्ये प्रति बॅरल $10 च्या वाढीमुळे जीडीपी वाढ 0.10 टक्क्यांनी कमी होऊ शकते. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 9.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्थायी 10 टक्के वाढीमुळे डब्लूपीआई इनफ्लेशनमध्ये 1.2 टक्के आणि CPI इनफ्लेशनमध्ये 0.3 ते 0.4 टक्के वाढ होऊ शकते.

अमरावतीमध्ये खासगी बसचा भीषण अपघात

amrawati

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये खाजगी बस नाल्यात पडल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हि बस अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशकडे जात होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बसमध्ये 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरात हा अपघात घडला आहे. बोलतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या अपघातातून आला.

जखमी प्रवासी रुग्णालयात
दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने भरलेली होती. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे.

मोठ्या प्रमाणात खाजगी बसने वाहतूक
एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

रशिया- युक्रेन युद्ध लांबले तर भारताचे सैनिक अन् शेतकरी दोघांचेही होईल नुकसान

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्ध लांबले किंवा त्यामुळे संकट वाढले तर भारतीय शेतकरी आणि जवान दोघांनाही त्रास सहन करावा लागेल. रशिया आणि युक्रेनशी भारताचे व्यापारी संबंध अतिशय मजबूत आहेत आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे.

वास्तविक, भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणात खतांची आयात करतो. यासोबतच ते रशियाकडून लढाऊ विमाने, मिसाइल डिफेंस सिस्टीमसह अनेक प्रकारची प्रगत शस्त्रे खरेदी करतो. युद्धामुळे त्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावणाऱ्या कृषी क्षेत्रावरील दबाव वाढणार आहे.

रशियाकडून किती खत आयात केले जाते ?
भारतीय खत कंपन्या रशियातून दरवर्षी 4 लाख टन डायमाइन फॉस्फेट (DAP) आयात करतात. सरकारच्या प्रयत्नांनी दोन्ही देश हा व्यापार दरवर्षी 10 लाख टनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय पोटॅशची आयात वाढवण्यासाठी 2021 मध्ये करारही करण्यात आला. भारत दरवर्षी 8 लाख टन नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. 2020 मध्ये, भारताने रशियाकडूनच $61 कोटी किंमतीचे खत आयात केले.

शस्त्रास्त्रांची मोठी खरेदी
भारताकडे रशियन बनावटीच्या शस्त्रास्त्रांची मोठी रांग आहे. अलीकडेच रशियासोबत S-400 मिसाइल डिफेंस सिस्टीम खरेदी करण्यासाठी करार करण्यात आला होता, ज्यापैकी फक्त एक चतुर्थांश मिसाइल आतापर्यंत पुरविण्यात आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2012 ते 2016 या काळात भारताकडून खरेदी करण्यात आलेल्या एकूण शस्त्रास्त्रांमध्ये रशियाचा वाटा 68 टक्के होता. युद्धाचा प्रभाव वाढला तर त्याचा फटका भारताच्या डिफेंस सिस्टीमलाही सहन करावा लागेल हे स्पष्ट आहे.

युक्रेनमधून सूर्यफूल तेल आणि खतांची आयात
भारताने आयात केलेल्या एकूण खतांचा मोठा साठा युक्रेनमध्ये आहे. 2020 च्या सरकारी आकडेवारीनुसार, युक्रेनने भारताला 23.28 कोटी डॉलर्स किंमतीची खते निर्यात केली. त्यात पोटॅशियम, युरियासह अनेक खतांचा समावेश होता. याशिवाय भारताच्या एकूण सूर्यफूल तेलामध्ये युक्रेनचा वाटा 70 टक्के आहे. साहजिकच संकट वाढले तर त्याची किंमत 60 टक्क्यांनी वाढू शकते. भारतात वापरल्या जाणार्‍या एकूण खाद्यतेलापैकी 14% सूर्यफुलाचा वाटा आहे.

भारत-युक्रेन आणि रशियाचा एकूण व्यापार किती आहे
रशिया हा भारतासोबतचा जगातील 25 वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. 2021-22 मध्ये दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत $9.4 अब्ज डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला आहे. भारत मुख्यत्वे इंधन, खनिज तेल, मोती, मौल्यवान खडे, अणुभट्ट्या, यंत्रसामग्री आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रसामग्री आयात करतो, तर फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रिक मशीनरी उपकरणे आणि सेंद्रिय रासायनिक उत्पादने आणि वाहनांची निर्यात करतो.

भारताचा युक्रेनसोबतचा एकूण व्यापार यावर्षी 2.3 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. यामध्ये कृषी उत्पादने, धातू, प्लास्टिक आणि पॉलिमर आयात करण्यात आले, तर औषधे, यंत्रसामग्री, रसायने आणि खाद्यपदार्थांची निर्यात करण्यात आली. भारताच्या एकूण आयातीमध्ये फक्त युरिया आणि सूर्यफूल तेलाचा वाटा $2 अब्ज आहे.

IPL 2022 : मुंबई- चेन्नई वेगवेगळ्या गटात; पहा कोणता संघ कोणत्या गटात

MI VS CSK

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. त्याच पार्श्वभूमीवर आज आयपीएलने स्पर्धेतील संघांचे स्वरूप आणि गटांची माहिती दिली आहे. त्यानुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले मुंबई इंडिअन्स आणि चेन्नई सुपर किंग्स वेगवेगळ्या गटात आहेत

10 संघ एकूण 14- 14 लीग सामने खेळतील. साखळी फेरीत 70 सामने आणि त्यानंतर चार प्लेऑफ सामने होतील. सर्व संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. उर्वरित चार संघांविरुद्ध एक सामना खेळण्याची संधी असेल. यासाठी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. आयपीएल विजेतेपदाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहा कोणता संघ कोणत्या गटात

गट-अ

मुंबई इंडियन्स
कोलकाता नाईट रायडर्स
राजस्थान रॉयल्स
दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्ज
लखनऊ सुपरजायंट्स

गट-ब

चेन्नई सुपर किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
गुजरात टायटन्स

पंजाब किंग्स

युक्रेन मध्ये अडकलेल्या नागरिकांच्या,नातेवाईकानी ,निकटवर्तीयांनी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

parbhani collector office

परभणी : हॅलो महाराष्ट्र – रशिया आणि युक्रेन या दोन देशातील सद्यस्थितीत युद्धाच्या परिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील जे प्रवासी नागरिक, पर्यटक, विद्यार्थी आदी युक्रेनमध्ये वास्तव्यास आहेत. अशा नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी यापूर्वीच भारत सरकारमार्फत आवाहन करण्यात आले आहे.

परंतु परभणी जिल्ह्यातील ज्या नागरिकांना मायदेशी परत येता आले नाही अशा नागरिकांनी किंवा त्यांचे निकटवर्तीय नातेवाईकांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.

जिल्हा नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 02452-226400, टोल फ्री क्रमांक- 1077 तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी भ्रमणध्वनी 7020825668 / 9975013726 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती द्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव महेश वडदकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार होळीपूर्वी देणार 10 हजार रुपयांची भेट; त्यासाठी काय करावे लागेल समजून घ्या

FD

नवी दिल्ली । केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना स्पेशल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम देण्याची घोषणा करू शकते. या योजनेत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स देते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना सुमारे 10 हजार रुपये मिळू शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांना या रकमेवर कोणतेही व्याजही द्यावे लागत नाही. मात्र, दरमहा तुमच्या पगारातून सॅलरीची अ‍ॅडव्हान्स रक्कम कापली जाते. गेल्या वर्षीही सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती.

10 हप्त्यांमध्ये रुपये परत करायचे आहेत
या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचार्‍यांना ही रक्कम 10 हप्त्यांमध्ये परत करण्याची सुविधा मिळू शकेल. म्हणजेच व्याजाशिवाय तुम्ही आरामात पैसे परत करू शकता. हे फक्त 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरता येते.

डिजिटल पद्धतीनेच खर्च करता येतील पैसे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4000-5000 कोटी रुपयांच्या वाटपाची घोषणा केली जाऊ शकते. राज्य सरकारनेही ही योजना अंमलात आणली तर सुमारे 8,000-10,000 कोटी रुपये खर्च होतील. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार अ‍ॅडव्हान्स स्कीमसाठी बँक शुल्क देखील घेईल. कर्मचारी देखील ही आगाऊ रक्कम डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतील.

LTA ला दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली
यापूर्वी, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा Leave Travel Allowance (LTA) दोन वर्षांसाठी वाढवला होता. यासह केंद्रीय कर्मचारी मार्च 2022 पर्यंत ईशान्य, लडाख, अंदमान-निकोबार आणि जम्मू-काश्मीरच्या प्रवासासाठी Leave Travel Allowance (LTA) वापरू शकतील.

डॉ सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात आणखी एक खुलासा, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

suvarna waje

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे हत्या प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. या हत्येप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. यानंतर आता या हत्येप्रकरणी बाळासाहेब म्हस्के याला अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब म्हस्के हा आरोपी संदीप वाजे याचा मावस भाऊ आहे. बाळासाहेब म्हस्के याने पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आहे.

मृतदेह जाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर
डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह आणि गाडी सॅनिटायझरने पेटवून देण्यात आली. आरोपी बाळासाहेब म्हस्के यानेच संदीप वाजे याला ही आयडिया दिली होती.आगीत मृतदेह संपूर्ण जळावा यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्यात आला होता. यासाठी आरोपींनी डॉ सुवर्णा वाजे यांच्याच क्लिनिकमधील सॅनिटायझरचा वापर केला होता.

मोबाइल लोकेशनमुळे अडकला जाळ्यात
डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा पती संदीप वाजे याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आरोपी संदीप वाजे पोलिसांना या तपासात सहकार्य करत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता संदीप वाजे आणि त्याचा मावस भाऊ बाळासाहेब म्हस्के या दोघांचे लोकेशन एकच आढळून आले. तसेच दोघांमध्ये वारंवार फोनवरुन संभाषण होत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी बाळासाहेब म्हस्के याला अटक केली.

बाळासाहेब म्हस्के याच्यावरही पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
बाळासाहेब म्हस्के हा आरोपी संदीप वाजे याचा मावस भाऊ आहे. बाळासाहेब म्हस्के याच्यावरही डॉ. सुवर्णा वाजे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याता आरोप आहे.या प्रकरणात बाळासाहेब म्हस्के याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच तो जामीनावर बाहेर आला होता.

काय आहे नेमके प्रकरण ?
डॉ. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेच्या सिडको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. घटनेच्या दिवशी रायगड नगर परिसरात एका जळालेल्या कारमध्ये मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. डॉ. सुवर्णा वाजे या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांनासुद्धा दिली होती. पोलीस तपासात जळालेल्या गाडीचा चेसी नंबर आणि गाडी नंबर यावरुन ही गाडी डॉ. सुवर्णा वाजे यांची असल्याचं स्पष्ट झालं होते. या प्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली असता डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप यानेच आपल्या पत्नीचा थंड डोक्याने काटा काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. कौटुंबीक कलह आणि त्यातून उडणारे वारंवार खटके यातूनच संदीप वाजे याने आपल्या मित्रांच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केली होती.

Share Market : सेन्सेक्स 1,329 अंकांनी वाढला तर निफ्टी 16,650 च्या वर बंद झाला

Stock Market

नवी दिल्ली । सात दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात बाउन्सबॅक दिसून आला आहे. मार्चच्या मालिकेची सुरुवात चांगली झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या वाढीने बंद झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 1,328.61 अंकांच्या किंवा 2.44 टक्क्यांच्या वाढीसह 55,858.52 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी 410.40 अंकांच्या किंवा 2.53 टक्क्यांच्या उसळीसह 16,658.40 वर बंद झाला.

शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया आणि एचयूएल हे निफ्टीचे टॉप गेनर ठरले. दुसरीकडे कोल इंडिया, टाटा मोटर्स, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स आणि इंडसइंड बँक निफ्टीमध्ये टॉप लुझर ठरले.

एका दिवसापूर्वी मार्केट रेड मार्क मध्ये बंद झाला होता
याआधी गुरुवारी, सेन्सेक्स 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 815.30 अंकांनी किंवा 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला.

NSE Scam : CBI कडून आनंद सुब्रमण्यनला अटक
25 फेब्रुवारी रोजी CBI ने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे माजी उच्च अधिकारी आनंद सुब्रमण्यन यांना अटक केली आहे. एक्स्चेंजच्या नेटवर्क सर्व्हरवर काही हाय फ्रिक्वेन्सी व्यापार्‍यांना कथित अयोग्य ऍक्सेस केल्याच्या तपासात तपास यंत्रणेने ही कारवाई केली आहे.

स्पाइसजेट 10 मार्चपासून बँकॉकसाठी फ्लाईट्स सुरू करणार आहे
स्पाईसजेटने शुक्रवारी सांगितले की,” ते 10 मार्च आणि 17 मार्च रोजी भारत आणि बँकॉक दरम्यान 6 फ्लाईट्स सुरू करणार आहेत.” एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, “एअरलाइन दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांना थायलंडची राजधानी जोडणारी डेली डायरेक्ट फ्लाइट्स सुरू करेल.”