Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2728

साताऱ्यात भरदिवसा तरूणाला मारहाण करून रोकड पळविली

सातारा : सातारा शहरातील मुख्य चाैकाचे ठिकाणावरील पोवई नाका परिसरात भर दिवसा एका तरुणाला मारहाण करुन लुटल्याची घटना आज शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी हल्लेखोरांनी या तरुणाजवळील 2 लाखाहून अधिक रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास संबंधित तरुण बँकेत पैसे भरण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान काही अज्ञात तरुणांनी संबंधित तरुणाला दांडक्याने मारहाण केली. तर त्याच्याजवळील जवळपास दोन लाखाहून अधिक रक्कम लंपास केली.

तरूणाला मारहाण करणाऱ्याच्यात चार ते पाच जणांचा समावेश होता. चोरट्यांच्या तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सातारा शहरात भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक आँचल दलाल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट देऊन तपासाची सूचना केली आहे.

रेल्वेकडून आज 362 गाड्या रद्द, प्रवाशांनी स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी संपूर्ण लिस्ट पहा

Railway

नवी दिल्ली । खराब हवामानासह विविध कारणांमुळे 25 फेब्रुवारीलाही रेल्वेने देशभरात मोठ्या प्रमाणावर गाड्या रद्द केल्या आहेत. शुक्रवारी देशभरातील 362 गाड्या रद्द करण्यात येणार असल्याचे रेल्वेने सांगितले.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, गाड्या रद्द करण्यात आल्याने 6 गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे तर 37 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांनी रेल्वे स्थानक सोडण्यापूर्वी या रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट एकदा तपासून घ्यावी. रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची माहिती मोबाईलवर तिकीट रिझर्वेशन करणाऱ्या प्रवाशांना पाठवत असली तरी तुम्हाला असा कोणताही मेसेज आला नसला तरी, तुम्ही या गाड्यांची माहिती मिळवू शकता.

रद्द केलेल्या गाड्यांची माहिती येथे उपलब्ध असेल
रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes किंवा NTES App द्वारे प्रवाशांना ट्रेनची नवीन स्थिती कळू शकते. मात्र, हे लक्षात घ्यावे की, ही लिस्ट रेल्वेकडून सतत अपडेट केली जाते आणि अशा परिस्थितीत रद्द, डायवर्ट आणि रिशेड्यूल केलेल्या गाड्यांची संख्या देखील वाढू शकते.

अशा ट्रेनची लिस्ट तपासा
सर्व प्रथम http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर क्लिक करा
स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला Exceptional Trains पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
तुम्हाला रद्द झालेल्या ट्रेन, रिशेड्युल केलेल्या आणि डायवर्ट केलेल्या ट्रेन्सची लिस्ट दिसेल.
या लिस्टमध्ये, तुम्हांला हव्या असलेल्या ट्रेनची स्थिती ट्रेन नंबर आणि नाव दोन्हीद्वारे जाणून घेऊ शकता.

मनसेचा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर; ‘या’ शहरात पार पडणार सोहळा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे अर्थातच मनसेचा 16 वा वर्धापनदिन मुंबईत नसून पुण्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.

मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. राज्यभरातील मनसे पदाधिकारी वर्धापनदिनासाठी मोठ्या संख्येने पुण्यात येणार असल्याची माहिती आहे.काही दिवसांत पुणे महापालिकेच्या निवडणुका (PMC Elections 2022) होणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता या वर्धापन दिनानिमित्त मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे.

दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे कंबर कसली असून पक्षप्रमुख राज ठाकरे हे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती.

युक्रेनकडून भारतात तेलासह ‘या’ गोष्टींची होते आयात; युद्धामुळे महागाईचा होईल भडका

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि व्यापारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या अपेक्षित वाढीमुळे महागाई वाढेल, तर सोन्याच्या किंमतीत अपेक्षित वाढ झाल्याने वस्तूंच्या किंमतीतही वाढ होईल. दुसरीकडे, सध्याच्या परिस्थितीत रुपया कमकुवत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे भारताच्या व्यापार संतुलनावर निश्चितपणे परिणाम होईल. सध्याची परिस्थिती पाहता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) या गोष्टी सांगितल्या आहेत.

चालू वर्षात भारताच्या एकूण तेल आयातीत 25.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे तेलाच्या आयातीत सातत्याने वाढ झाली आहे. घाऊक किंमत निर्देशांकात कच्चे तेल आणि संबंधित उत्पादनांचा वाटा 9% आहे. कच्च्या तेलाच्या वाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आणखी महागाई वाढेल, ज्यामुळे एकूणच सर्व वस्तूंच्या किंमती वाढण्याची अपेक्षा आहे. वस्तूंचे उत्पादन आणि वाहतूक खर्च अधिक महाग होईल. कच्च्या तेलाचा वापर प्लास्टिक, फार्मास्युटिकल्स, मशिनरी, पेंट्स आणि इतर अनेक वस्तूंच्या निर्मितीमध्ये केला जातो ज्यामुळे किंमती आणखी वाढतात.

भारत युक्रेनकडून ‘या’ वस्तू खरेदी करतो
कच्च्या तेलाव्यतिरिक्त, भारत युक्रेनमधून औषधी कच्चा माल, सूर्यफूल, सेंद्रिय रसायने, प्लास्टिक, लोह आणि पोलाद इत्यादींची आयात करतो तर भारत फळे, चहा, कॉफी, औषधी उत्पादने, मसाले, तेलबिया, यंत्रसामग्री आणि यंत्रसामग्री इत्यादींची निर्यात करतो. दुसरीकडे, रशिया हा भारतासोबतच्या व्यापारात 25 वा सर्वात मोठा भागीदार आहे, जो रशियाला $2.5 अब्ज निर्यात करतो आणि रशियाकडून $6.9 अब्ज आयात करतो.

युक्रेनमधून येणारी शिपमेंट अडकण्याची भीती होती
भारतातील व्यापारी सामान्यतः युक्रेनियन पुरवठादारांना ऍडव्हान्स पैसे देतात, जे आता अनिश्चित काळासाठी अडकले जाण्याची अपेक्षा आहे. जर युक्रेनमधून येणारी शिपमेंट अडकली तर त्याचा भारतीय व्यापाऱ्यांना नक्कीच फटका बसेल. डॉलरच्या किंमतीत अपेक्षित वाढ झाल्याने इतर देशांसोबतच्या व्यापारावर विपरित परिणाम होईल कारण भारतीय व्यापाऱ्यांना शिपमेंटच्या वेळी प्रचलित किंमत मोजावी लागेल. सोन्याच्या किंमती वाढल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होणार आहे. भारताचा एकूण व्यापार भविष्यात अस्थिर होण्याची अपेक्षा आहे.”

केंद्राकडून ही मागणी
देशातील व्यापारी समुदाय या संकटकाळात सरकारच्या पाठीशी उभा आहे आणि देशात आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी सरकारने उचललेल्या कोणत्याही पावलाला पाठिंबा देईल. CAIT ने केंद्र सरकारला रशिया आणि युक्रेनमधील सध्याच्या युद्धावर लक्ष ठेवून देशातील व्यापार आणि व्यापारासाठी काही सहाय्यक उपाय जाहीर करण्याची विनंती केली आहे.

किरपे विकास सेवा सोसायटीत दादा- बाबा गटाची सत्ता

कराड | तालुक्यातील किरपे येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दादा- बाबा गटाने 9-3 असा विजय मिळविला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या लक्ष्मी नारायण ग्रामविकास पॅनेलने विरोधी लक्ष्मी नारायण परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला.

किरपे सोसायटीत नवनिर्वाचित संचालकांची नांवे व मते पुढीलप्रमाणे

सर्वसाधारण मतदारसंघ ः रामानंद बाबासो देवकर (111), शंकर हरिबा माने (109), नंदकुमार रामचंद्र देवकर (108), कृष्णत बाजी माने (107), मानसिंग खशाबा देवकर (105), संतोष प्रल्हाद देवकर (104), सुहास राजाराम इंगवले (103), अरविंद एकनाथ देसाई (103), महिला राखीव मतदारसंघ ः सुनिता संभाजी देवकर (113), आक्काताई जगन्नाथ देवकर (109), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघः अधिकराव शंकराव कांबळे (108), इतर मागासवर्गीय मतदारसंघ ः अशोक बाळू सुतार (108), विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ ः लक्ष्मण श्रीपती कांबळे (बिनविरोध)

विजयी उमेदवारांचे भास्कर देवकर, विद्याधर देवकर, उपसरपंच विजय देवकर, नारायण दूध डेअरी चेअरमन मारूती देवकर, भानुदास माने, संजय देवकर, संपत देवकर, संदीप माने, अशोक देवकर, तानाजी देवकर, आनंदा देवकर, सर्जेराव देसाई, नाना देसाई यांनी अभिनंदन केले. विरोधी लक्ष्मी नारायण परिवर्तन ग्रामविकास पॅनेलला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले.

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची तब्बेत बिघडली आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, खर तर नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले. मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दाऊद कनेक्शनप्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीदरम्यान सहकार्य करत नसल्याचा माहिती ईडीच्या गोटातून बाहेर आली आहे.

यशवंत जाधव उद्धव ठाकरेंचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर; सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी पडल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या वर पुन्हा एकदा आरोप केला. यशवंत जाधव म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महापालिकेतील मुख्य फंड कलेक्टर असल्याची टीका किरिटी सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, यशवंत जाधव पालिकेच्या कंत्राटदारांकडून रोख पैसे घ्यायचे. पालिकेच्या प्रत्येक कंत्राटातील ४० टक्के पैसे यशवंत जाधव यांना मिळायचे. हेच पैसे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून इतरत्र वळवले जायचे. यशवंत जाधव यांच्या या रोख व्यवहारांचा पुरावा आयकर विभागाच्या हाती लागल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला

यशवंत जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादानं मुंबईकरांना लुटलं, हे शहर बरबाद केलं. त्यांच्यावर कारवाई व्हायला थोडा उशीरच झाला. यशवंत जाधवांचं उदाहरण शिवसेनेसाठी एक आदर्श आहे. म्हणूनच ज्या पद्धतीनं ते मनी लाँड्रिंग करतात. त्याच पद्धतीनं ठाकरे कुटुंबीयही त्याच मार्गावर गेले आहेत. अनिल परबही त्याच मार्गावर गेले आहेत, असं म्हणत सोमय्यांनी टीका केली.

परीक्षा कालावधीत विषय शिक्षकांना ‘त्या’ दिवशी शाळेत ‘नो एंट्री’

Exam

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षा मार्च-एप्रिल महिन्यात होणार आहे. यंदा परीक्षेसाठी शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाने कडक धोरण आखले असून परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या दिवशी विषय शिक्षकांना बंदी घालण्यात आली आहे.

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑॅफलाइन पद्धतीने होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा तेथे परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात आले आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना 14 फेब्रुवारीपासून; तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा आजपासून सुरू होत आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 ते 30 मार्चदरम्यान; तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे. यंदा शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने पूर्वी केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना मुख्य परीक्षा केंद्र; तर नव्याने केंद्र दिलेल्या शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र असे संबोधण्यात आले आहे. मुख्य तसेच उपकेंद्राचे कामकाज पाहणारे केंद्रसंचालक हे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य राहतील. 15 पेक्षा कमी आवेदनपत्र भरलेल्या शाळा या मुख्य केंद्रास जोडण्यात आल्या आहेत.

परिरक्षक कार्यालयातून मुख्य परीक्षा केंद्रास प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी सहायक परिरक्षक राहतील़. मुख्य केंद्राकडून उपकेंद्राकडे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठी संबंधित उपकेंद्राचे शिक्षक (रनर) असणार आहे. दरम्यान, परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ज्या विषयांचा पेपर असेल त्या विषयांच्या शिक्षकांना शाळा, परीक्षा केंद्रांवर प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. पेपरच्या दिवशी संबंधित विषय शिक्षकांना परीक्षेचे काम देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

मंत्र्यांच्या अटकेबाबत छ. उदयनराजे म्हणाले : जीवनात आपण केलेल्या कर्माची फरतफेड

सातारा प्रतिनिनिधी शुभम बोडके

जीवनात जी आपण कर्म करतो त्यांची परत फेड करावी लागत. या सगळ्यांचा संबध राजकारणाशी नाही. जर त्यात तथ्य नसते तर असं झाले नसते. राजकारण्यांनी विचार केला पाहिजे कारण याचा परिणाम सर्वसामान्यांवर होत असतो. राजकारणावरील लोकांचा विश्वास उडत चालला आहे. मी समाजकारण केले, मला राजकारण करत नसल्याचे भाजपचे राज्यसभा खा. छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

नवाब मलिक यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेली अटक झाली आहे. त्यावर ते म्हणाले, त्यांच्या कर्माची फळे आहेत. अशा शब्दात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली. सातार्‍यात गांधी मैदानावर आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विविध प्रश्‍नांवर खा. उदयनराजेंना बोलते केले.

खा. छत्रपती संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उपोषणाला बसणार आहेत. यावर खा. उदयनराजेंना छेडले असता मी त्यावर आता काय बोलणार? आरक्षणाच्या विषयाची आता चव गेली आहे. किती गोष्टी होवून गेल्या आहेत, असे उदयनराजे म्हणाले.

कर्णधार रोहित शर्माचा होणार सन्मान; MCA ने घेतला निर्णय

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा कर्णधार आणि आक्रमक सलामीवीर रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशन ( MCA) कडून सत्कार करण्यात येणार आहे. रोहित शर्मा च्या रूपाने मुंबईचा खेळाडू तिन्ही फॉरमॅट मध्ये देशाचा कर्णधार झाला आहे. त्यामुळेच त्याचा सत्कार करण्यात येणार आहे.

गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने सांगितले, “आज सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितने आत्तापर्यंत एकदिवसीय आणि T20 सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले आहे आणि मार्च मध्ये तो कसोटी क्रिकेट मध्ये देशाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

रोहितशिवाय टीम इंडियामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर यांचाही गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर असलेल्या आंग्रश रघुवंशी यालाही एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.