Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2730

नवाब मलिकांना भर चौकात फाशी द्या; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीकडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपावरून ईडी कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीका करताना भाजप आमदार महेश लांडगे यांची जीभ घसरली आहे. नवाब मलिक यांना चौकात फाशी द्या असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात भाजप कडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार महेश लांडगे यांनी मलिक यांचा एकेरी उल्लेख करत महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. देशद्रोही मलिकला अटक नाही, तर भरचौकात फाशी दिली पाहिजे, असे लांडगे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीतील कोणत्या ना, कोणत्या मंत्र्यांवर दररोज भ्रष्ट्राचाराचे आरोप होत आहेत. नवाब मलिक यांच्यावर जो आरोप आहे. हा या हिंदुस्थानमधील नागरिक सहन करणार नाहीत. मलिकचा राजीनामा घेतला, तरी देशवासीय त्याला माफ करणार नाहीत, एवढा गंभीर आणि संतापजनक आरोप त्याच्यावर आहे. मुंबई बॉम्बस्फोट घडवणाऱ्या देशद्रोही दाऊदसाठी तो काम करीत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे, त्यामुळे त्याला भरचौकात फाशी दिली पाहिजे, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली.

Petrol Diesel Prices: देशातील अनेक शहरांमध्ये वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती; तुमच्या शहरातील नवीन दर पहा

नवी दिल्ली । ब्रेंट क्रूड तेलाच्या किंमती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सात वर्षांच्या उच्चांकावर आहेत. ब्रेंट क्रूडचे भाव सध्या प्रति बॅरल 20 डॉलरवर आहेत. हा दर ऑक्टोबर 2014 नंतरचा उच्चांक आहे. असे असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. IOCL ने शनिवार 29 जानेवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

आजपर्यंतच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. काही राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दरात वाढ केली जात नसल्याचे मानले जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतशनिवारी पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. सरकारने 4 नोव्हेंबर 2021 रोजी किमती बदलल्या होत्या. त्यानंतर सरकारने दर कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल डिझेलची किंमत
>> दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीन किंमती जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

बोरनारे मारहाण प्रकरण: सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे पोलीस महानिरीक्षकांचे आदेश

औरंगाबाद – कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे कोणीही असले तरी त्यास पाठीशी घातले जाणार नाही. आमदार रमेश बोरनारे यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना योग्य ती कारवाई करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा रागातून शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दहा जणांनी चुलत भावजयी जयश्री दिलीप बोरनारे यांच्यासह त्यांच्या पतीला 18 फेब्रुवारी रोजी बेदम मारहाण केली होती. पोलिसांनी या प्रकरणात आमदार बोरनारे यांच्यासह इतरांवर किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच तक्रार देणाऱ्या जयश्री बोरनारे यांच्या विरोधात आमदार बोरणारे यांच्या खाजगी सचिवाने जातीवाचक उल्लेख केल्याचा आरोप करत ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची तक्रार दाखल केली. त्यात पोलिसांनी चौकशी न करताच गुन्हा दाखल केल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सध्या जिल्ह्यात हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. वैजापूर पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. एकूणच कायदा व सुव्यवस्थेचा विषय लक्षात घेऊन के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी पोलिस अधीक्षक निमित गोयल यांना चौकशीचे आदेश दिले. तसेच सात दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती महानिरीक्षक प्रसन्ना यांनी दिली.

या प्रकरणात महानिरीक्षक यांना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड व भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन पुढे ते विरुद्धचा ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा व आमदार बोरणारे यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

NSE Scam : CBI कडून काल रात्री चेन्नई येथून आनंद सुब्रमण्यमला अटक

चेन्नई । NSE घोटाळ्याप्रकरणी CBI ने आनंद सुब्रमण्यमला अटक केली आहे. काल रात्री चेन्नई येथून ही अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आनंद सुब्रमण्यम यांच्या चौकशीनंतर CBI ने गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मधील सह-स्थान घोटाळ्यातील आरोपी आनंद सुब्रमण्यम हे NSE माजी MD-CEO चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागारही होते. तत्पूर्वी, CBI ने त्याच्याकडून प्रदीर्घ चौकशी करून त्याला सीओओ पदावर कसे नियुक्त केले गेले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आनंदला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजबाबतही तपास यंत्रणेने त्याच्याकडे चौकशी केली होती.

तत्पूर्वी, CBI ने NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम आणि माजी सीईओ रवी नारायण यांच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले होते, ज्यांना चित्रा व्यतिरिक्त ‘योगी’ च्या सूचनेनुसार नियुक्त करण्यात आले होते.

सुब्रमण्यम यांना 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे
सेबीने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की, चित्रा काही रहस्यमय योगींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत असे आणि त्यांच्या सांगण्यावरून सुब्रमण्यम यांना सल्लागार आणि समूह संचालन अधिकारी बनवले होते. हे गंभीर ऑपरेशनल लॅप्स म्हणून लक्षात घेऊन, बाजार नियामक सेबीने चित्रा यांना 3 कोटी रुपये आणि सुब्रमण्यम यांना 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चित्रा स्वतःला निर्दोष म्हणते
CBI च्या सूत्रांचे म्हणणे आहे की, NSE च्या माजी एमडी चित्रा रामकृष्ण यांनी चौकशीदरम्यान निर्दोष असल्याची बाजू मांडली आहे. तिला अनेक गोष्टींची माहिती नसून या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा दावा तिने केला. मात्र, चौकशीदरम्यान त्याने अनेकदा आपले म्हणणे बदलून तपासाची दिशा बदलण्याचाही प्रयत्न केला. आता आनंदला अटक करण्यात आल्याने चित्रा यांच्यावरही मुसंडी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Stock Market : बाजारात जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स पुन्हा 55 हजारांच्या पुढे तर निफ्टीही तेजीत

Stock Market Timing

नवी दिल्ली । एक दिवस आधी झालेल्या इतिहासातील पाचव्या मोठ्या घसरणीतून सावरत शेअर बाजाराने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. बाजार उघडताच सेन्सेक्सने 55 हजारांची पातळी ओलांडली.

सुरुवातीच्या सत्रातच सेन्सेक्स 792 अंकांनी वाढून 55,322 वर उघडला आणि निफ्टीही 268 अंकांच्या मजबूत उसळीसह 16,515.65 वर उघडला. गुंतवणूकदारांनी आज जोरदारपणे शेअर्स खरेदी केले आणि सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स 1,152 अंकांच्या वाढीसह 55,678 वर ट्रेड करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीही 357 अंकांनी वाढून 16,604 वर पोहोचला.

सर्व क्षेत्रांत वाढ दिसून येते
गुंतवणूकदारांच्या सततच्या खरेदीमुळे एक्सचेंजमधील सर्वच क्षेत्रांत आज तेजी पाहायला मिळत आहे. विशेषत: पीएसयू बँक, मेटल, रिअल इस्टेटच्या निर्देशांकाने 4 टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपनेही जोरदार पुनरागमन केले असून ते 3 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. NSE वर PSU बँकेच्या शेअर्सनी 5 टक्क्यांपर्यंत उसळी मारली. एसबीआय, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी जोरदार सुरुवात केली आहे.

आशियाई बाजारातही मजबूती दिसून आली
25 फेब्रुवारीच्या सकाळी आशियाई बाजारांनी जोरदार परतावा देऊन ट्रेडिंग सुरू केले. सिंगापूरचे दोन एक्सचेंज 2.09 आणि 1.14 टक्क्यांनी वधारले, तर जपानचे निक्केई 1.54 टक्क्यांच्या उसळीसह ट्रेडिंग करत होते. याशिवाय, तैवानच्या एक्सचेंजमध्ये 0.70 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.13 टक्के मजबूत वाढ आहे.

मुंबईचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्सच्या धाडी; शिवसेनेला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप कडून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप सातत्याने महाविकास आघाडी कडून होत असतानाच आता अजून एका शिवसेनेच्या नेत्याच्या घरी इनकम टॅक्स च्या धाडी पडल्या आहेत. मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्स चे अधिकारी पोहोचले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे

यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळेच आयकर विभागाने ही धाड टाकली असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत. विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मंत्रालयाशेजारी महाविकासआघाडीचे जे धरणे आंदोलन झाले होते त्यामध्ये यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव सहभागी झाल्या होत्या. त्याच्याच दुसऱ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी धाड पडल्याने राजकीय वर्तुळाच्या खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकार कायदा : कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण, कर्मचारी आक्रमक

कराड | माहिती अधिकारात मागवलेली माहिती अशीच का दिली, असे म्हणून एकाने कराड नगरपालिका अधिकाऱ्यासोबत वाद घालत त्यानंतर नगरपालिकेच्या परिसरात त्यास मारहाण केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरा धैर्यशील विलास कराळे (वय-42, शनिवार पेठ मुळीक चाैक, कराड) व जालिंदर प्रताप वाघमारे (वय- 43, हनुमान मंदिर शेजारी बनवडी, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद कराड नगरपालिकेचे रचना सहाय्यक रोहन बाळासाहेब ढोणे (ज्ञानदेव काॅलनी, सैदापूर) यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी, नगरपालिकेत माहिती अधिकार कायद्यानुसार धैर्यशील कराळे, जालिंदर वाघमारे यांनी नगरपालिकेकडे माहिती मागवली होती. त्यानुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने संबंधिताला माहिती दिली होती. परंतु दिलेली माहिती अशीच का दिली, असे म्हणून संबंधित माहिती मागणाऱ्या व्यक्तीने गुरुवारी सायंकाळी नगरपालिकेत येऊन माहिती दिलेल्या कर्मचाऱ्याबरोबर वादावादी केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार करत नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी कराड शहर पोलीस ठाणे गाठले.

पोलिस ठाण्यासमोर मुख्याधिकारी रमाकांत डाके, यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. त्यानंतर संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नगरपालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला.

मोठी बातमी!! ‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएल 2022

IPL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेली इंडिअन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 26 मार्चपासून सुरू होत आहे तर अंतिम सामना 29 मे रोजी खेळवण्यात येईल. आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आयपीएलचे आयोजन हे महाराष्ट्रात होणार आहे. मुंबईत 55 आणि पुण्यात 15 सामने होतील. लीगचे सर्व सामने चार स्टेडियममध्ये खेळवले जातील. वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने, ब्रेबॉर्न स्टेडियमवर 15 सामने आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 15 सामने होणार आहेत.

दरम्यान, यंदाचे आयपीएल सामने हे रिकाम्या स्टेडियममध्ये होणार नाहीत. म्हणजेच सामन्यादरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. साखळी फेरीदरम्यान त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार घेतला जाईल. स्टेडियममध्ये किमान २५ किंवा ५० टक्के प्रेक्षक उपस्थित असतील

पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना लावला फोन; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मधील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला आहे. रशियानं युद्ध थांबवावं आणि नाटोसोबत संवाद साधावा. नाटो आणि रशियानं चर्चेतून मार्ग काढावा, असं आवाहन मोदींनी केलं.

रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात, असा विश्वास मोदींनी पुन्हा एकदा व्यक्त केला. तसेच राजनयिक वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

यावेळी रशियन अध्यक्षांनी मोदींना युक्रेनमधील लष्करी कारवाईची माहिती दिली. पुतीन यांच्याशी संवाद साधताना मोदींनी युक्रेनमधील भारतीयांबद्दल, विशेषत: विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली. अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदींनी पुतीन यांनी सांगितलं.

लग्नाच्या आमिषाने दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपींना अटक

Rape

औरंगाबाद – लग्नाचे आमिष दाखवून 14 आणि 15 वर्षाच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दिली.

मुकुंदवाडी ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट 2021 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत संजय नगर येथील अमोल सुभाष पवार याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. अमोलचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. पीडिता त्याच्या मुलांना खेळविण्यात येत होती. तेव्हा अमोल तिला पहिल्या पत्नीला सोडून देऊन तुझ्या सोबत लग्न करणार असल्याचे सांगून अत्याचार करीत होता. ही बाब पीडितेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बलात्कारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी अमोलला अटक केली असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण वाघ करत आहेत.

दुसरी घटना मुकुंदनगर येथे घडली. या प्रकरणातील मुलगी 15 वर्षाची असून मुकुंदनगरातील आजीकडे आल्यानंतर तिची आरोपी लक्ष्मण उर्फ अक्षय गोविंद दराडे (21) यांच्या सोबत ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून नोव्हेंबर 2020 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत अत्याचार केले. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन मिरधे करत आहेत.