Friday, December 26, 2025
Home Blog Page 2731

रशियात 650 विद्यार्थी सुखरूप तर युक्रेनमध्ये दोघे अडकले

औरंगाबाद – रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणास गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजी वाटू लागली आहे. रशियामध्ये बिस्केक व इतर प्रांतात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले सुमारे 650 विद्यार्थी सुखरूप आहेत. पण युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या दोन विद्यार्थी अडकले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडे काल सायंकाळपर्यंत दोन विद्यार्थ्यांच्या पालकांचे अर्ज आले होते. युक्रेनमधील दोन विद्यार्थी बुधवारी विमानतळावर भारताकडे येण्यासाठी आले होते. परंतु विमानात जागा नसल्यामुळे त्यांना येता आले नाही. त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तेथे थांबावे लागले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून समजली. भारतीय दूतावासाच्या ते संपर्कात असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच प्रशासन पालकांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी किंवा इतर कारणांनी जिल्ह्यातील कोणी असेल तर त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यासाठी प्रशासनाने केंद्र सरकार स्थानिक फोन नंबरही जाहीर केले आहेत.

24 तासात तिघांनी संपवलं आयुष्य, यामध्ये 19 वर्षीय तरुणाचा समावेश

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तीन जणांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. या तिन्ही आत्महत्या प्रकरणामध्ये एका 19 वर्षीय तरुणाचासुद्धा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत माजलगाव शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प या ठिकाणी राहणारे सुरेश रामकिसन बडे या शिक्षकाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मृत सुरेश बडे हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. याच नैराश्यातून त्यांनी आज पहाटे 3 वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

तर दुसरी घटना बीड जिल्ह्यातील राजेवाडी या ठिकाणी घडली आहे. यामध्ये कृष्णा बालासाहेब कोके या तरुणाने अज्ञात कारणावरून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत कृष्णा बालासाहेब कोके हा अवघ्या 19 वर्षांचा तरुण होता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अजून स्पष्ट झाले नाही. कृष्णाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिंद्रुड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

तर तिसरी घटना राजेगाव या ठिकाणी घडली आहे. मृत रामचंद्र धुराजी गरड यांनी व्यवहारातील आर्थिक जाचाला कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत आत्महत्येच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण माजलगाव तालुका हादरला आहे.

परळीत वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या

परळी : हॅलो महाराष्ट्र – परळीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हि घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. सटवा ग्यानबा मुंडे आणि शुभ्रा ग्यानबा मुंडे अशी हत्या करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत.

परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत मृत सटवा मुंडे यांचे शेत आहे. याच शेतामध्ये दोघा बहिण-भावाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. परळी ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. हि हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली हे अजून समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

या प्रकारे झाला खुलासा
मृत सटवा मुंडे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. तर शुभ्रा मुंडे यांचे पतीबरोबर जमत नसल्याने त्या कायम आपल्या भावाकडेच राहत होत्या. हे दोघेही बहिण-भाऊ शेती व्यवसाय सांभाळत होते. दिवसभर दोघेही शेतात काम करायचे. दुपारी जेवणासाठी आणि रात्री झोपण्यासाठी केवळ घरी यायचे. घटनेच्या दिवशीहि नेहमीप्रमाणे दोघे शेतात काम करण्यासाठी घरुन निघून गेले. मात्र दुपारी जेवणाची वेळ झाली तरी दोघे घरी जेवायला आले नाहीत. त्यामुळे जेवायला का आले नाही बघायला सटवा यांचा मुलगा शेतामध्ये गेला. यावेळी सटवा आणि त्यांची बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. यानंतर परळी ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या दोघां बहीण भावांची हत्या झाल्याने संपूर्ण गाव हादरले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी

कराड | तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली. संजीव बाबुराव चव्हाण (वय -54) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

विशेष सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड तालुक्यातील एका गावातील पिडीत अल्पवयीन मुलगी 29 जुलै 2020 रोजी दुकानात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ती दुकानात जात असताना आरोपी संजीव चव्हाण याने तिच्यावर पाळत ठेवली. तसेच ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिला आपल्या दुचाकीवर घेतले. त्यानंतर तो तिला घेऊन शिवारात गेला. त्याठिकाणी तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत मुलीच्या आईने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांनी 2 आॅगस्ट 2020 रोजी आरोपीला अटक करुन या गुन्ह्याचा तपास केला. पोलिसांनी पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच गुन्ह्यात वापरलेले वाहन व पिडीत मुलगी आणि आरोपीचे कपडेही जप्त केले होते. तसेच पिडीत मुलीचा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदविण्यात आला होता.

तपास पुर्ण झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलीचा जबाब, तपासी अधिकारी, घटनास्थळ पंचांसह अन्य काही साक्षी या खटल्यात महत्वपुर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरुन जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी आरोपीला वीस वर्ष सक्तमजुरी व बावीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

कल्याणमध्ये 55 किलो गांजा जप्त, तीन तस्कर गजाआड

kalyan crime

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – अंमली पदार्थाची खरेदी विक्री करणे हा एक कायदेशीर गुन्हा आहे. भुवनेश्वरकडून मुंबईकडे येणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकुलीत बोगीतून 5 लाख 53 हजार रुपये किमतीचा तब्बल 55 किलो गांजा कल्याण आरपीएफने जप्त केला आहे. या तस्करी प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सम्राट बाबुराव पात्रा, संजू अहमद गाजी आणि अजगर अली बहाद्दूर खान अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे गांजा जप्त
कल्याण आरपीएफच्या जवानांच्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधान व सतर्कतेमुळे एक्स्प्रेसमधून तब्बल 55 किलो गांजा घेऊन जाणाऱ्या तीन जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण आरपीएफचे निरीक्षक भूपेंद्र सिंहच्या मार्गदर्शनाखाली सी जी रुपदे यांचे पथक बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनन्स सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या बोगीत इगतपुरी ते कल्याण दरम्यान पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान तीन प्रवासी आपसात भांडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडे आरपीएफच्या पथकाने विचारणा केली त्यातील एकाने सीट खाली असलेली बॅग आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला.

यानंतर या तिघांच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव पाहता त्यांच्यावर आरपीएफ जवानांना संशय आला. यानंतर आरपीएफ जवानांनी तिघांना सामानासह ताब्यात घेत त्यांची झडती घेतली. त्यांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसाच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे सुमारे 5 लाख 53 हजार 950 रुपये किमतीचा गांजा आढळला. यानंतर पोलिसांनी या तिघांना अटक करून त्यांच्याकडील गांजा जप्त केला. कल्याण रेल्वे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कावड यात्रेला गाडीचा धक्का लागल्याने यात्रेकरुंची चालकाला बेदम मारहाण

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये रस्त्याने निघालेल्या कावड यात्रेला गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून मोठा वाद झाला. यानंतर कावड यात्रा वाहणाऱ्या यात्रेकरुंनी कार चालकाला काठीने बेदम मारहाण केली आहे. या यात्रेकरूंनी एवढ्यावरच न थांबता गाडीचीही तोडफोड केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील लखनऊमधील आलम नगर फ्लायओव्हर जवळ घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
कावड यात्रेला धक्का लागल्याच्या वादातून यात्रेकरुंनी कारची तोडफोड केली आहे. या तोडफोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये यात्रेकरू गाडीच्या ड्रायव्हरलाही काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. पत्रकार प्रज्ञा मिश्रा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. काल मध्यरात्री हि घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील लखनऊमधील आलम नगर फ्लायओव्हर जवळ हि घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काही जणांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तर अनेक वाहन चालकांमध्ये या घटनेमुळे घबराट निर्माण झाली आहे. तर काही ट्विटर यूझर्सनी या प्रकाराचे समर्थनसुद्धा केले आहे.

मेट्रोच्या डीपीआरवर 7.5 कोटींची उधळपट्टी कशाला ? जलील यांचा सवाल

imtiaz jalil

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करुन मेट्रोलाईन डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामाला तत्काळ स्थगिती देऊन नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या आशयाचे पत्र त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना पाठवले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद शहरात विविध प्रकल्प राबविले जात असून जे प्रकल्प वास्तविकतेत शक्य आहेत आणि सर्वसामान्य नागरीकांच्या हिताचे आहेत, त्यावरच निधी खर्च करणे योग्य असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

खासदारांनी पत्रातून काय मागण्या केल्या?
– खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, औरंगाबाद शहरात मेट्रोलाईनचा डिपीआर महारेल संस्थेमार्फत तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी बजेटममधून महारेल संस्थेस रुपये 7.5 कोटी अदा करण्यात येणार असल्याचे समजते. सेंट्रल अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा मी सदस्य असून सबब कमिटी संपूर्ण भारतातील विविध शहरात राबविण्यात येणारे विकासात्मक कामे व प्रकल्पांचे निरीक्षण करते. महारेल संस्था ही फक्त भरमसाठ फीस वसूल करुन जे शक्य होणार नाही असे डीपीआर बनवते, असे कमिटीच्या निदर्शनास आलेले आहे.

– मेट्रोलाईन प्रकल्प हा पूर्णपणे खाजगी तत्वावर चालतो. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. मेट्रोलाईन प्रकल्प सुरु करण्यास हजारो कोटींची आवश्यकता असणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात महानगरपालिका निधी देऊच शकत नाही. मग मेट्रोलाईन प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा वाटा कसा व कुठून आणणार ? तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून उर्वरित निधी मिळविण्यासाठी औरंगाबाद मनपाच्या वाट्याची रक्कम आतापर्यंत भरण्यात आली नाही. त्याकरिता मनपातर्फे अनेक प्रयत्न सुरु आहे.

– स्मार्टसिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रोलाईनचा डिपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहेत. औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रोलाईन शक्यच नाही. सबब निधी शहरातील उद्याने व सद्यस्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे. शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषत: जालना रोडवर उड्डाणपूल हवे आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले आहे.

गट क : भूमि अभिलेख विभागातील रिक्त पदासाठी प्रक्रिया

सातारा | भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारक व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https:///andrecordsrecruitment2021.in  व  https://mahabhumi.gov.in  या संकेतस्थळावर 9 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली होती. 31 डिसेंबर 2021 अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण 76 हजार 379 अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झाला आहे. डाटाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.

विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर सुचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

छाननी अर्ज 9 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येईल. छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या सदर अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे, असे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख एन. के. सुधांशु यांनी कळविले आहे.

संतापजनक ! भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका भोंदूबाबाने भावाच्या मदतीने एका महिलेसह तिच्या तीन मुलींवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे. या आरोपी भोंदूबाबाने आणि त्याच्या भावाने मुलीला जादूटोणा झाल्याचा सांगत सलग दोन वर्षांहून अधिक काळ पीडित महिलेसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केला आहे. हि घटना नाशिकमधील येवला या ठिकाणी घडली आहे. या आरोपींवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकूचा धाक दाखवत बलात्कार
या प्रकरणी मुलीचं लग्न जमत नसल्याने तालुक्यातील एका गावातील बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला असल्याचे सांगितले. त्यावर उपाय करण्यासाठी भोंदूबाबाने आईसह तिन्ही मुलींना पिण्यासाठी पाणी दिले. यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार केला. हे आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडिओ शूट केला.

ब्लॅकमेल करुन पीडित मुलीच्या आईवर बलात्कार
यानंतर आरोपी भोंदूबाबाने व्हिडीओच्या सहाय्याने या मुलीच्या आईला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मग या भोंदूबाबाने पीडित मुलीच्या आईसह इतर दोन मुलींवरदेखील बलात्कार केला.

बलात्कार करुन पैसेही उकळले
या आरोपी भोंदूबाबाचे नाव सुफी अजीज अब्दुल बाबा आणि आरोपी भावाचे नाव जब्बार शेख असे आहे. या दोघांनी तब्बल दोन वर्षे 4 महिने वेळोवेळी आई आणि तिच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत पैशाची मागणी देखील केली. येवला शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मतिमंद अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपींची संख्या वाढली

पाटण | पाटण येथील मतीमंद अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली होती. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता महिलेच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्यात आलेली आहे. तर एका 60 वर्षीय वृध्दासह दोघांना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या 11 झालेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील एका महीलेने दि. 27/01/2022 रोजी ते 18/2/2022 या दरम्यान तिच्या परीचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमीष दाखवुन तिला बाहेर घेवून गेली. मुलीला पाटण व आजुबाजुचे परीसरातील लोकांशी ओळख करून देवुन त्यांचेशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. सदर पाटण व आजुबाजुचे परीसरातील 10 लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेळ्या ठिकाणी नेवुन वारंवार बलात्कार केला आहे.

याबाबत यातील पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीचे आईने दिले तक्रारीवरून पाटण पोलीस सदर गुन्हयातील सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आली होती. आता यामध्ये आणखी दोघांना अटक करण्यात आलेली असून आरोपींच्यात 60 वर्षीय वृध्दाचाही समावेश आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.