Friday, December 26, 2025
Home Blog Page 2737

लिव्ह इन रिलेशनशीपमधून हाफ मर्डर : महिलेसह पाच युवकांवर गुन्हा दाखल

crime

सातारा | लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेल्या युवकाला पाच जणांनी बेदम चोप दिला. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी लिव्ह इन रिलेशनशीपमधील महिलेसह पाच युवकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अदिल कुर्लेकर, संकेत डाळवाले, अरबाज खान, महंमद मुकंदर, सूरज रजपूत (सर्व रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे. योगेश इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जखमी योगेश व संबंधित महिला गेल्या 4 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वाद होण्यास सुरुवात झाली. दि. 21 रोजी वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेने इतर संशयित आरोपींशी संगनमत करून योगेशला मारहाण करण्यास सांगितले. संशयितांनी त्यानुसार योगेश याला बेदम मारहाण केली व जखमी अवस्थेत संबंधित महिलेकडे योगेश याला सोडले. योगेश मारहाणीत जखमी झाल्याने संबंधित महिलेने तिच्या मैत्रिणीच्या घरी जखमी योगेश याला सोडले. दि. 21 रोजी रात्रभर तो विना उपचाराचा तेथेच होता. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत योगेश बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांकडे एमएलसी आल्यानंतर मारहाण असल्याचे समोर आले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने तपासाला सातारा तालुका पोलिसांनी सुरुवात केली. महिलेने संशयित युवकांची नावे सांगितल्याने पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकातील (डीबी) पोलिस हवालदार दादा परिहार, नितीराज थोरात, सतीश पवार यांनी बुधवारी संशयितांची धरपकड केली. तपासामध्ये मात्र या घटनेत महिलेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला सहआरोपी केले आहे.

समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मलिक याना ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला इशारा दिला.

महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे…. जय महाराष्ट्र! असे संजय राऊत यांनी म्हंटल.

दरम्यान, नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. महाविकास आघाडी कडून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणे विरोधात आजपासून राज्यभर आंदोलनही पुकारण्यात आले आहे.

वैजापूर पोलीस महिलांचे रक्षक की भक्षक ? मारहाण प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक

chitra wagh

औरंगाबाद – आमदार रमेश बोरनारे यांनी चुलत भावजयीला भर रस्त्यावर बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी वैजापूर पोलिस हे महिलांचे रक्षक आहेत की भक्षक, अशी टीका केली आहे. यासंदर्भात बुधवारी त्यांनी वैजापुरात उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, बोरनारे प्रकरणात वैजापूर पोलिसांच्या तपासात संदिग्धता आहे. सटाना येथील चुलत भावजयीने भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याने शिवसेनेचे आमदार बोरनारे व इतर आठ ते दहा लोकांनी मिळून एका महिलेला भर रस्त्यावर लाथा बुक्क्यानी मारहाण केल्यानंतरही पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी त्या महिलेला पाच तास ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर ३५४ ब ३२६ विनयभंगाचा गुन्हा दाखल न करता केवळ जामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळेच आमदार बोरणारे यांनी पोलिसांना हाताशी धरून घटनेनंतर फिर्यादी महिलेवर अट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला व ज्यांनी आवाज उठवला त्या लोकांना आता जीवे मारण्याच्या धमक्या आमदार देत असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी परिषदेत केला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, डॉ.राजीव डोंगरे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जगताप, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष कैलास पवार, जिल्हा चिटणीस मोहनराव आहेर, गटनेता दशरथ बनकर, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, सुरेश राऊत, नगरसेविका जयमाला वाघ, कल्पना पवार आदींची उपस्थिती होती.

ईडीने आतापर्यंत ज्या कुणावर कारवाई केली, त्यापैकी एकही जण पुढे आला का? किंवा असा दावा केला का? की आमच्यावर पुराव्याशिवाय कारवाई केली. मग कर नाही तर डर कशाला? अशा शब्दात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मलिक यांच्यावरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतरच त्यांना ५५ लाख भरावे लागले होते, याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.

“दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याच्या सरकार पाठीशी”; देवेंद्र फडणवीसांची टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिकी यांना काल ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोपप्रत्यारोप केले गले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मलिक यांच्या अटकेवरून निशाणा साधला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खे सरकार उभे राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी टीका फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील राजकारणात सध्या अतिशय चुकीचा पायंडा पाडला जात आहे. वास्तविक पाहता मलिक यांना कोणत्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही. तर टेरर फंडिंग संबंधित गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अटक केली आहे. अशा परिस्थितीत एक मंत्री राजीनामा देणार नसतील आणि सरकार म्हणत असेल की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही, तर एक संविधानिक परिस्थिती या ठिकाणी तयार होते. पण मी एवढंच सांगेन की देशात याचा चुकीचा संदेश जाईल. दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहत असल्याचा संदेश यातून जाईल.

दुर्दैवी ! इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून नवी मुंबईत बालकाचा मृत्यू

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे एका 13 वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर खेळत असताना हा अपघात झाला. हि दुर्दैवी घटना नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मध्ये घडली आहे. ईशान गुप्ता असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हि घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर जम्पिंग मशिनवर खेळत असताना सातव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे 13 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत ईशान गुप्ता हा नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील महाराणी सोसायटीत राहत होता.

जम्पिंग मशिनवर एकट्याचा खेळ
घटनेच्या दिवशी रात्री ईशान हा आपल्या इमारतीच्या टेरेसवर खेळण्यासाठी गेला होता. यावेळी टेरेसवर इमारतीतील दोघेजण वॉकिंग करत होते. तर ईशान हा टेरेसवर ठेवलेल्या जम्पिंग मशिनवर एकटाच खेळत होता. यावेळी ईशान याने जम्पिंग मशिनवरुन उडी घेतली मात्र त्याचवेळी त्याचा तोल गेल्याने तो टेरेस वरुन खाली पडला. यानंतर त्याला तातडीने एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

पतीपासून विभक्त राहिलेली मुलगी गरोदर राहिल्याने संतापून आईने उचलले ‘हे’ पाऊल

murder

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या मुलांना संपवल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणी तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी होती. हि तरुणी आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर गर्भवती झाल्याने आईला संताप आला. त्यामुळे तिने आपल्या पोटच्या लेकीच्या हत्येचा कट रचला. आरोपी महिलेच्या नातात्यातील दाम्पत्याने पीडितेला विहिरीत ढकलून तिचा खून केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
चंद्रपूर जिल्ह्यात आपल्या आईने सुपारी देऊन पोटच्या मुलीचा खून केला आहे. 18 फेब्रुवारी रोजी राजुरा तालुक्यातील कविटपेठ या ठिकाणी एका विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेची ओळख पटविण्यासाठी विरुर पोलिसांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये या महिलेचे फोटो पाठवले. त्यावरुन मृत महिला तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी असल्याचे समजले.

मुलीच्या चारित्र्याबाबत आईला शंका
पतीपासून विभक्त राहणारी संबंधित महिला गर्भवती राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत आईच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे आईने गर्भपात करण्याच्या बहाण्याने मुलीला राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडे पाठवले.

तीस हजारांची नातेवाईकांना सुपारी
मुंडीगेट येथील आरोपी महिलेचे नातेवाईक सीन्नू आणि त्याची पत्नी शारदा यांनी तीस हजारांसाठी विहिरीत ढकलून या महिलेचा खून केला. मात्र पोलिसांनी कसून तपास करून या खुनाचा उलघडा केला. महिलेची आई लचमी, नातेवाईक सीन्नू आणि शारदा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

स्वतःचा निधी सोडून आमदार-खासदारांचा जि.प च्या निधीवर डोळा

औरंगाबाद – लोकप्रतिनिधींना स्वतःचा आमदार-खासदार निधी असतानाही जिल्हा परिषदेच्या निधीतून आमदार-खासदारांनी विकासकामांची जंत्रीच सादर केली आहे. जिल्हा परिषदेच्या 50:54 च्या कामांसाठी 28 कोटी निधी मंजूर झाला असून आमदार-खासदारांनी जवळपास तीनशे कामांसाठी शंभर कोटींची मागणी केल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीकडून विकासकामाचा आराखडा तयार करण्यात येतो. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामासाठी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद सदस्यांना निधी वितरित केला जातो. परंतु जिल्हा परिषदेत सदस्यांना शासनाच्या विविध योजना व जिल्हा नियोजनातून मंजूर झालेला निधीवरच अवलंबून राहावे लागते. दरम्यान जिल्हा नियोजनातून जिल्हा परिषदेला 50:54 अंतर्गत मिळालेल्या कामाच्या निधीमध्ये लोकप्रतिनिधींनी 100 कोटींच्या कामाची मागणी केली आहे. परंतु, जिल्हा परिषदेला 2021-22 या वर्षात 50:54 अंतर्गत 28 कोटींचा नियतव्यय मंजूर झाला आहे. आणि आमदार खासदारांची मागणी शंभर कोटींची असल्यामुळे कोणत्या आमदार-खासदारांना किती निधी वितरित करायचा हा मोठा प्रश्‍न बांधकाम समितीला पडला आहे. यातच सोमवारी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्याला मागणीपेक्षा कमी निधी मिळाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु जिल्हा परिषदेकडे निधीच उपलब्ध नसल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निधी देणे अशक्य आहे.

”जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या निधीचा हक्क सर्वांत प्रथम जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात लुडबुड करू नये, सत्तेचा फायदा घेत आमदार-खासदार जिल्हा परिषदेचा निधी बळकावत आहे.” असा पलटवार परिषद पंचायत समिती सदस्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण आणि आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी केला आहे.

रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून तरुण रिक्षा चालकाने उचलले ‘हे’ पाऊल

बदलापूर : हॅलो महाराष्ट्र – बदलापूरमध्ये एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या रिक्षा चालकाने उल्हास नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. गुरुनाथ म्हात्रे असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने आपली रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून थेट नदीत उडी मारली. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नदीतून गुरुनाथ याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र या रिक्षा चालकाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकलेले नाही.

काय आहे प्रकरण?
गुरुनाथ म्हात्रे असे या मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याच भागातील वडवली गावातील रहिवाशी होता. या रिक्षा चालकाने बदलापुरात एरंजाड पुलावरुन उल्हास नदीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

एरंजाड पुलावरुन घेतली नदीत उडी
गुरुनाथ आज सकाळी 11 वाजता बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेला. यानंतर त्याने उल्हास नदीच्या पुलावर रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून त्याने थेट नदीत उडी मारली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यानंतर या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमन दलाने नदीतून बोटीच्या सहाय्याने गुरुनाथ म्हात्रे याचा मृतदेह बाहेर काढला.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट
पोलिसांनी गुरुनाथ याचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मात्र गुरुनाथने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलीस करत आहेत.

तरुणाचा कौतुकास्पद निर्णय! तृतीयपंथीयाशी करणार विवाह

beed

औरंगाबाद – समाजात नेहमीच विशिष्ट प्रकारची, काहीशी नकारात्मक वागणूक मिळणाऱ्या तृतीय पंथीयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. यासाठी आपण काही करू शकतो का, असा विचार करत बीडमधील एक तरुण पुढे आला आहे. बीड शहरातील किन्नर सपना आणि बाळू नावाचा हा तरुण लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मागील अडीच वर्षांपासून या दोघांची मैत्री असून आता या दोघांनी पुढील आयुष्यातही एकमेकांची साथ द्यायची असा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात हे दोघेही विधिवत लग्न करणार असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे.

बाळू धुताडमल हा जागरण गोंधळात हलगी वाजवून आपला उदरनिर्वाह करतो. अशातच त्याची ओळख सपनाशी झाली. या भेटीचे रूपांतर प्रेमात झालं आणि तब्बल अडीच वर्षानंतर त्यांनी आपला संसार फुलवण्याचा निर्णय घेतलाय. रुसव्या फुगव्यातून या दोघांच्या प्रेमाची गोडी अधिक घट्ट झालीय. समाजात आजही या घटकाला स्वीकारण्यासाठी नाकं मुरडली जातात. त्यामुळे लग्न करण्याचा पेच या जोडप्या समोर निर्माण झाला. त्यांनी पत्रकार संघाच्या आयशा शेख यांची भेट घेतली. आणि चर्चेतून मार्ग काढून अखेर विवाह जुळवण्याचा निर्णय बीडच्या पत्रकार संघाने घेतला आहे.

मराठवाड्यातला पहिलाच असा विवाह –
याआधी मनमाड मध्ये किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे हे विवाह बंधनात अडकले होते. या विवाहानंतर मराठवाड्यातील हा पहिला विवाह होणार आहे. या घटकाला देखील समाजात मान सन्मानान देण्यात यावा. अशी भावना व्यक्त केली जातेय. त्यामुळे स्वतःहून जर असे विवाह इच्छुक असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. येत्या मार्च महिन्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून बाळू आणि सपना हे दोघेही लग्न करणार आहे.

मायलेकींनी ‘या’ कारणामुळे जन्मदात्या बापाचाच काढला काटा

ichalkaranji murder

इचलकरंजी : हॅलो महाराष्ट्र – इचलकरंजी या ठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये बायको आणि मुलीच्या अनैतिक संबंधामुळे बापाला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत बापाचे नाव शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे असे आहे. डोक्यात वार करुन शांतिनाथ यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून आरोपी मायलेकींना अटक करण्यात आली आहे. साक्षी केटकाळे आणि सुजाता केटकाळे अशी हत्या करणाऱ्या आरोपी मायलेकींची नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मायलेकीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केला म्हणून हत्या
मृत शांतिनाथ केटकाळे हे पत्नी आणि तीन मुलींसह बर्गे मळा परिसरात राहत होते. केटकाळे कुटुंबीय शेती व्यवसाय करीत होते. शांतिनाथ यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघींचेही बाहेर प्रेमसंबंध सुरु होते. शांतिनाथ यांना बायको आणि मुलीच्या प्रेम संबंधाची माहिती मिळाल्यावर घरात मोठा वाद झाला. शांतिनाथ यांनी मुलगी आणि पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या ऐकायला तयार नव्हत्या. घटनेच्या दिवशीसुद याच कारणावरून मोठा वाद झाला. यावेळी रागाच्या भरात शांतिनाथ यांनी दोघींना मारहाण देखील केली. हा वाद एवढ्या टोकाला गेला कि मुलगी साक्षीने लोखंडी गज आणि बॅटने वडिलांच्या डोक्यात जोरदार वार केला. हा वार इतका भयानक होता कि शांतिनाथचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी मायलेकीला पोलिसांनी ताब्यात घेतले
हि घटना पाहून मृत शांतिनाथ यांच्या दोघी लहान मुलींनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी तात्काळ शांतिनाथ यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र शांतिनाथ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यानंतर शांतिनाथ यांचे भाऊ महावीर केटकाळे यांच्या तक्रारीवरून आरोपी मायलेकींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच शांतिनाथ यांच्या इतर दोन मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.