Friday, December 26, 2025
Home Blog Page 2744

Russia-Ukraine Crisis : भारतावर होणार ‘हा’ मोठा परिणाम; तेल कंपन्याही अडचणीत येणार

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या स्थितीमुळे जगभरातील शेअर बाजार संकटात आहेत. वास्तविक, हे दोन्ही देश तेलाचे मोठे उत्पादक आहेत आणि जर त्यांच्यात युद्ध झाले तर जगभरात तेलाच्या किंमतीत मोठी उसळी येईल. तसेच जर तेलाचे दर वाढले तर सर्व काही महाग होईल.

शेअर बाजाराशी निगडित लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे की, ज्या भारतीय कंपन्यांचे रशियामध्ये युती किंवा व्यवसाय आहे किंवा त्या आधीच रशियन कंपन्यांसोबत काम करत आहेत, त्यांच्या शेअर्सचे मूल्यांकन कमी होऊ शकते. त्यांचा नफा कमी होईल आणि त्यांचे शेअर्स पडू शकतात. उदाहरणार्थ, भारत रशियाला फार्मा, मशीनरीज़, चहा-कॉफी, तंबाखू, मसाले आणि सुका मेवा पुरवतो.

फार्माच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम
मनीकंट्रोलच्या एका बातमीनुसार, भारतीय कंपनी डॉ. रेड्डीज लॅबच्या एकूण विक्रीपैकी सुमारे 8-10 टक्के विक्री एकट्या रशियामध्ये आहे. रशियामध्ये विकल्या जाणार्‍या 200 सर्वाधिक विकल्या जाणार्‍या फार्मा प्रॉडक्ट्समध्ये Nise, Omez, Nasivin, Cetrine आणि Ibuclin यांचा समावेश होतो.

याशिवाय ग्लेनमार्क या भारतीय स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड असलेल्या कंपनीच्या विक्रीपैकी सुमारे 10 टक्के विक्री रशियामधून येते. याशिवाय कॅडिला आणि सन-फार्माचे प्रॉडक्ट्स रशियामध्ये 10-13% पर्यंत विकले जातात.

ऑइल-गॅस आणि डिफेंस सेक्टरवरही परिणाम होणार आहे
रशिया आणि युक्रेनने लवकरच शांततेच्या दिशेने पावले उचलली नाहीत, तर भारतातील ऑइल-गॅस आणि डिफेंस सेक्टरशी संबंधित कंपन्यांच्या व्यवसायावरही परिणाम होईल. ONGC Videsh ची Sakhalin-I प्रकल्पात मोठी गुंतवणूक आहे. त्याचप्रमाणे ONGC चा Rosneft शी करार आहे.

डिफेंस सेक्टरबद्दल बोलायचे झाले तर HAL चे रशियन कंपन्यांसोबत 2 जॉईंट वेंचर आहेत. हा जॉईंट वेंचर एरोस्पेस आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये आहे. त्याच वेळी, BDL ने Tunguska, Kavadrat,OSA-AKA आणि Pechora air सारख्या एयर डिफेंस मिसाइस सिस्टीम भारतात तयार करण्यासाठी JVs च्या शक्यता तपासण्यासाठी Almaz Antey सोबत करार केला आहे. यासोबतच शिल्का सेल्फ-प्रोपेल्ड एयर डिफेंस सिस्टीम देशात बनवण्यासाठी JVs ची शक्यता तपासली जात आहे.

“दिशा सालियन प्रकरणात 7 मार्चनंतर सर्व काही पुरावे समोर येणार”; चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आज भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सूचक असे विधान केले आहे. “दिशा सालियन प्रकरणात 7 मार्चला सर्व पुरावे समोर येतील, असे पाटील यांनी म्हंटले आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल ७ मार्चला कळेल. या प्रकरणातील सर्व पुरावे समोर येतील. या प्रकरणात काही राजकारण नाही

दरम्यान, 7 मार्चनंतर या प्रकरणाचा दूध का दूध और पाणी का पाणी हो जायेगा. घाबरू नका, 7 मार्चला सर्व पुरावे समोर येतील. उसणं अवसान आणणं आणि शिवराळ भाषेचा वापर यामुळेच सुरू आहे. दिवा विझण्याआधी फडफडतो. आपल्याला वाटतं दिवा खूप प्रज्वलित झाला. ती विझण्यापूर्वीची फडफड असल्याचेही पाटील यांनी यावेळी म्हंटले.

सुप्रिया सुळे यांच्यासहित महाराष्ट्रातील 4 खासदारांना संसदरत्न पुरस्कार

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याना पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत. सुप्रिया सुळेंनी सलग ७ व्या वर्षी मानाचा पुरस्कार पटकावला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई-मॅगझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

महत्वाचे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील चार खासदारांचा यात समावेश आहे.  शिवसेनेचे श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, भाजपच्या हीना गावित. कामगिरीतल्या सातत्याबद्दल सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणे यांना “संसद विशिष्ट रत्न’ पुरस्कार असणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू यावर्षीही लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.

IPO च्या तयारीत गुंतलेली LIC आपला IDBI बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार नाही, अध्यक्षांनी दिली माहिती

LIC IPO Date

नवी दिल्ली । IPO ची तयारी करत असलेल्या LIC ने म्हटले आहे की,” ते IDBI बँकेतील संपूर्ण स्टेक विकणार नाहीत. कंपनी आपले इन्शुरन्स प्रॉडक्ट्स विकण्यासाठी बँकेच्या शाखा वापरू शकते.” LIC चे अध्यक्ष एमआर कुमार म्हणतात की,” आम्हांला IDBI बँकेत काही भाग घ्यायचा आहे. याद्वारे इन्शुरन्स प्रॉडक्ट्स विकण्यास मदत होईल.

IDBI बँकेत भारत सरकार आणि LIC चा 90 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. बँकेकडे 39 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.92 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. डिसेंबर अखेरीस, बँकेच्या देशभरात 1,800 पेक्षा जास्त शाखा होत्या. बँकेची बहुतांश कर्जे NPA झाल्यावर इन्शुरन्स कंपनीने ही बँक ताब्यात घेतली होती.

2019 मध्ये बँकेत गुंतवणूक केली होती
23 ऑक्टोबर 2019 रोजी LIC ने IDBI बँकेला जामीन देण्यासाठी पॉलिसीधारकांचे पैसे वापरून 4,743 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. बँकेने 1435.1 कोटी रुपये उभे केले. मार्च 2021 मध्ये RBI ने लादलेल्या निर्बंधातून बँक बाहेर आली. सरकार आणि LIC दोघेही गेल्या काही वर्षांपासून IDBI मधील त्यांचे स्टेक विकण्याची तयारी करत आहेत.

LIC कडे पुरेसे भांडवल आहे
कुमार म्हणाले की,”LIC कडे पुरेसे भांडवल आहे आणि संभाव्य गुंतवणूकदारांनी IPO नंतर कंपनीच्या भविष्याची चिंता करू नये.” कंपनीवरील सरकारच्या नियंत्रणाबाबत उपस्थित केलेल्या चिंतेवर अध्यक्ष म्हणाले की,”सर्व निर्णय बोर्ड घेतात. इन्शुरन्स कंपनीत सरकारचा 95 टक्के हिस्सा आहे.”

काही भाग ठेवा
LIC चे अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले की,”आम्हाला IDBI बँकेत काही भाग घ्यायचा आहे. बँकेत हिस्सा घेण्याची आमची कल्पना धोरणात्मक होती आणि ते कारण अजूनही कायम आहे. ते म्हणाले की,” LIC चे अध्यक्ष या नात्याने भविष्यातही हे नाते कायम राहावे अशी माझी इच्छा आहे.”

नफ्यावर अध्यक्ष काय म्हणाले ते जाणून घ्या
कुमार म्हणाले की, ” इन्शुरन्स कंपन्यांच्या नफ्याची तुलना कोणत्याही उत्पादन कंपनीच्या नफ्याशी होऊ शकत नाही. कारण दोन्ही व्यवसायांचे स्वरूप पूर्णपणे भिन्न आहे. अतिरिक्त उत्पादनाच्या बाबतीत, गेल्या दोन वर्षांत 50,000 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न झाले आहे. या अतिरिक्त रकमेपैकी 95 टक्के रक्कम पॉलिसीधारकांकडे जात होती. ते म्हणाले की,”जेव्हा तुम्ही पाच टक्के पाहता तेव्हा ते आकाराने लहान दिसते, मात्र प्रत्यक्षात तसे नाही. आता सरप्लस वितरणाची पद्धत बदलणार आहे.”

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

Sangeeta Tupsagar

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक कौटुंबिक हिंसाचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण केली आहे. या मारहाणीप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही घटना घडली आहे.

या प्रकरणी संगीता तुपसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे याच्या विरुद्धही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
संगीता तुपसागर या पीडित महिलेच्या मानलेली सासू आहेत. त्यांच्या सांगण्यावरून आरोपी पती भुजंग भुतावळे याने आपल्या पत्नीला मारहाण केली आहे. यानंतर पीडित महिलेने पोलिसांत आरोपी संगीता तुपसागर आणि पती भुजंग भुतावळे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली. आरोपी संगीता तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मास्क मुक्त महाराष्ट्र कधी होणार?? उद्धव ठाकरे म्हणतात…

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून त्याच पार्श्वभूमीवर निर्बंधांत शिथिलता आणली गेली आहे. परंतु मास्कमुक्त महाराष्ट्र कधी होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. मात्र कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उसर(ता.अलिबाग) येथील प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे

आता आपल्याला जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. साथ शिखरावर असतांना लसीकरण करणे कितपत योग्य हे डॉक्टर सांगतील पण आता लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही कोरोना लागण होते पण त्याची घातकता कमी होते, जीव वाचवण्याचे सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

“भाजप नेत्यांचे अभिनेत्रींशी संबंध, त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; नवाब मलिकांचा इशारा

Nawab Malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार तसेच शिवसेना पक्षावर वारंवार अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचा कोणत्या अभिनेत्रींशी संबंध आहे हे सांगायला लावू नका, आमच्याकडे यादी आहे. ती यादी समोर आल्यानंतर भाजप नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही”, असे म्हणून मलिकांनी इशारा दिला आहे.

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात आणि देशात सध्या भाजपकडून घाणेरडं राजकारण सुरू आहे. वारंवार अनेक राजकारण केले जात आहे. उध्या जर काही वाईट घडलं तर त्याची जबाबदारी भाजपची राहिल.

एखादी महिला मृत्युमुखी पडल्यानंतर तिच्या नावावर अनेक आरोप करत आहेत. भाजपच्या लोकांकडून अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी बोलून घाणेरडे राजकारण केले जात आहे. आम्हालाही भाजप नेत्याचे कोणाशी काय संबंध आहेत हे आम्हालाही चांगलेच माहीत आहे, असेही मलिक यांनी म्हंटले.

Stock Market : दिवसभरातील प्रचंड अस्थिरतेत बाजार रेड मार्कवर बंद, निफ्टी 17,000 च्या वर आला

Stock Market

नवी दिल्ली । मंगळवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. मोठ्या अंतराने बाजारपेठा खुल्या होत्या. निफ्टी 200 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 17 हजारांच्या खाली गेला होता. मात्र, दुपारनंतर बाजारात खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी झाली. रिकव्हरीनंतर निफ्टीने पुन्हा 17 हजारांची पातळी ओलांडली.

आज सेन्सेक्स 382.91 अंकांच्या घसरणीसह 57300.68 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 114.45 अंकांच्या घसरणीसह 17092.20 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी बँक 313.95 अंकांच्या घसरणीसह 37,371.65 वर बंद झाला. रियल्टी, मेटल, आयटी या कंपन्यांवर सर्वाधिक दबाव होता. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही विक्री दिसून आली.

दुपारी, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून एक महत्त्वपूर्ण विधान आले, ज्यात म्हटले आहे की पूर्व युक्रेनमध्ये रशियन तळ बांधण्यावर चर्चा झाली नाही. दुसरीकडे, डाऊ फ्युचर्स दुपारनंतर तळापासून 250 अंकांनी सुधारला. युरोपीय बाजारांत तळापासून 2% रिकव्हरी झाली. त्यामुळे भारतीय बाजारात खालच्या पातळीवरून रिकव्हरी झाली. निफ्टी खालच्या पातळीवरून 250 अंकांनी सुधारला. सेन्सेक्स खालच्या स्तरावरून 950 अंकांनी वर आला.

“म्हणूनच माझ्या कुटूंबाविरोधात अटक करण्याचे मुख्यमंत्र्यानी आदेश दिले,”; सोमय्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यावरील आरोपाकजे सत्र अजूनही सुरूच आहे. दरम्यान आज सोमय्या यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी मागील काही दिवसांमध्ये माझ्या कुटुंबाविरोधात वेगवेगळे आरोप केल्यानंतर त्यांना कोणतेही कागदपत्रं सादर करता आली नाहीत. म्हणूनच आता मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबियांना अटक करण्याचे आदेश दिले असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, माझ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार आरोप केले जात आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या आरोपात एखादा तरी कागद त्यांनी दाखवला आहे का? माझ्यावरील आरोपांतील कागत जेव्हा त्यांना मिळाला नाही.

त्यानंतर जेव्हा मी उद्धव ठाकरे यांचे थोतांड उघडकीस आणले त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आम्ही सगळे महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी जेलमध्ये जायला तयार आहोत,” असे सोमय्या यांनी म्हंटले .

नितीशकुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ?? प्रशांत किशोर विरोधकांना एकत्र आणणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदासाठी जुलै-ऑगस्टमध्ये निवडणूक होणार आहे.यावेळी विरोधकांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर हे यासाठी फिल्डिंग लावत असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पुढाकार घेत आहेत

वास्तविक, याच महिन्यात प्रशांत किशोर आणि केसीआर यांच्यात बैठक झाली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांचीही भेट घेतली. तेव्हापासून नितीशकुमार हे विरोधकांच्या वतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

यासाठी नितीश कुमार यांचे मन वळविण्याचे काम स्वतः प्रशांत किशोर करत असल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर बिगरभाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारीही प्रशांत किशोर यांच्यावर आहे. दरम्यान, चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर राव नितीश कुमार यांच्या बाजूने टीएमसी, सपा, आरजेडी, जेडीयू या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मते नितीश कुमार हे खूप तगडे उमेदवार असू शकतात. असे झाल्यास काँग्रेसलाही त्यांना पाठिंबा देणे भाग पडू शकते.