Friday, December 26, 2025
Home Blog Page 2743

महाशिवरात्रीला घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात ‘हर हर महादेव’

औरंगाबाद – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात मार्च 2020 पासून गाभाऱ्यात जाऊन भक्तांना दर्शन घेणे बंद आहे. महाशिवरात्रिपासून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मंदिरे बंद होती.
त्यानंतर मंदिरे खुली करण्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकारण तापले. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने घेतला सर्व मंदिरे खुली झाली. मात्र, घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यात दर्शन घेणे सध्या बंद आहे.

श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने भक्तांना दर्शनासाठी गाभारा खुला करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मागेच निवेदन दिले. लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र पाहून पाच ते दहा भाविकांना गाभाऱ्यात सोडावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे ट्रस्टला बंधनकारक करण्यात आले आहे.

कोणीतरी आवरा याला ! दोन्ही हातात मोबाइल घेऊन चालवत होता बाईक; पोलीससुद्धा झाले हैराण

traffic crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वडोदरा या ठिकाणी एक अजब प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये एक व्यक्ती बाईक चालवताना दोन मोबाइल फोन वापरत होता. तसेच या व्यक्तीने बाईक चालवताना हेल्मेटसुद्धा घातले नव्हते. दोन्ही हातात फोन घेऊन ही व्यक्ती बाईक चालवित होती. या बाइकस्वाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याला इ-चलान पाठवण्यात आले. त्याच्या या अनोख्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बाईक चालवताना दोन्ही हात सोडून वापरत होता मोबाइल…
वडोदरा पोलिसांनी ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाइकस्वराविरोधात इ-चलान जारी केले. या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यामध्ये हा बाईकस्वार दोन्ही हात सोडून फोनवर बोलत होता. यानंतर वडोदरा ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई केली. भारतात कार वा दुचाकी चालवताना हेडफोन वापरण्याची परवानगी नाही. आणि भारतीय मोटर वाहन अधिनियमअंतर्गत ड्रायव्हिंग करताना फोनचा उपयोग करणे हा गुन्हा मानला जातो.

हेल्मेटच्या आत इअरफोन लावणं गैरकायदेशीर…
हेल्मेटच्या आत इअरफोन लावणं गैरकायदेशीर आहे. जर तुम्ही हेल्मेटच्या आत स्मार्टफोन ठेवत असाल तर पोलीस तुमच्याकडून दंड आकारू शकतात. त्यामुळे बाईक किंवा कार चालवताना कानात इअरफोन घालणे हा कायद्याने गुन्हा आहे.

रुग्णालयातील नाईट ड्यूटी संपवून खोलीवर येताच नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

lucknow crime

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील झांसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झांसीमध्ये एका नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. ती एका खासगी रुग्णालयातुन नाईट ड्यूटी संपवून मैत्रिणीसोबत घरी परतली होती. यानंतर मैत्रिणीला ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिच्या शेजारी एक सिरिंज आणि एक इंजेक्शन पडले होते. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृत विद्यार्थिनीचे नाव रोशनी असे होते. ती सतनाच्या सार्थक नर्सिंग कॉलेजमधून जीएनएम करीत होती. तिच्यासोबत एक मैत्रिणदेखील राहत होती. दोघी शिक्षणासह दोन वर्षांपासून सरोज रुग्णालयात नोकरी करीत होत्या आणि गुमनाबारास्थित रुग्णालयाच्या क्वार्टरमध्ये एका खोलीत राहत होत्या.

रोशनीची मैत्रीण पूनमने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रुग्णालयात नाइट ड्यूटी होती. त्यामुळे सोमवारी सकाळी 10.30 वाजता दोघे ड्यूटी करून खोलीवर आलो. ड्यूटीहून परतल्यानंतर तिने रोशनीला चहा किंवा दूध पिण्यासाठी विचारले मात्र रोशनीने त्यावेळी नकार दिला. त्यानंतर पूनम दूध पिऊन अंघोळीला निघून गेली. ती पुन्हा आली तर रोशनी बेडवर झोपली होती. यानंतर तिने रोशनीला जेवणाबद्दल विचारलं, मात्र तिने काहीच उत्तर दिलं नाही. पुनमने पुन्हा पाहिलं तर ती बेशुद्ध अवस्थेत होती. त्यानंतर तिने रुग्णालयात डॉक्टरांना कॉल केला.

यानंतर रोशनीला तातडीने मेडिकल कॉलेजच्या आपात्कालीन विभागात भरती करण्यात आले. ती नेमकी बेशुद्ध कशामुळे झाली याचा शोध घेण्यासाठी तिच्या खोलीची तपासणी केली असता बेडवर एक इंजेक्शन आणि सिरिंज मिळाली. यामुळे उपचारादरम्यान रोशनीचा मृत्यू झाला. पूनमने रोशनीच्या घरी कॉल करून या घटनेची माहिती दिली असता रोशनीचा भाऊ आणि अन्य कुटुंबीय तातडीने रुग्णालयात दाखल झाले. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

शिवजंयतीत दुचाकीवर तलवार घेऊन तरुणाने दाखवली हिरोगिरी, पोलिसांनी घडवली अशी अद्दल

Beed Crime

बीड : हॅलो महाराष्ट्र – आज कालचे तरुण हिरोगिरी करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. हीच हिरोगिरी कधी कधी या तरुणांच्या अंगलट येते. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये घडला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी एक तरुण बाईकवर तलवार घेऊन फिरला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी या तरुणावर कारवाई करून त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत भररस्त्यात एका तरुणाने तलवार हातात घेऊन स्टंटबाजी केली होती. यानंतर या स्टंटबाजीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यानंतर बीड पोलिसांनी या फोटोवरून या तरुणाचा शोध घेऊन त्याला तुरुंगाची वारी घडवली आहे. गणेश उर्फ टिनू गोरख शिराळे असे या आरोपी तरुणाचे नाव आहे.

19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त काढलेल्या रॅलीत, गणेश शिराळे याने दुचाकीवर उभे राहून हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करत हिरोगिरी केली होती. त्याच्या या स्टंटबाजीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तो तलवार जवळ बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या आरोपी गणेशचा शोध घेऊन त्याला तुरुंगवारी घडवली आहे. याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या आरोपी तरुणाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

धक्कादायक ! डोंबिवलीत 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, वॉर्डबॉयला अटक

dombiwali crime

डोंबिवली : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डोंबिवली शहरातील एका रुग्णालयात 75 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वॉर्डबॉयने तिचा विनयभंग केला आहे. या वृद्ध महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. कानादास वैष्णव असे या आरोपी वॉर्डबॉयचे नाव आहे. डोंबिवलीतील स्पर्श हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
डोंबिवली पूर्वेतील नामांकित स्पर्श हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले. दिनांक 16 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान या महिलेचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एक्स-रे काढताना विनयभंग
या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्डबॉयने हे लज्जास्पद कृत्य केले आहे. ही वयोवृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूममध्ये गेली असता त्या ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला. एकदा हा प्रकार घडल्याने महिलेला वाटले चुकून हा प्रकार घडला असेल मात्र या नराधम वॉर्डबॉयने दुसऱ्यांदा असाच प्रकार केला. यानंतर पीडित महिलेने हि गोष्ट आपल्या मुलीला सांगितली. उपचारानंतर पीडित महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी वॉर्डबॉय विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी केशव हसगूले हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक ! भाऊ बहिणीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची केली हत्या

Walgaon police station

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोघा भावांनी मित्राच्या मदतीने आपल्याच बहिणीच्या नवऱ्याचा खून केला आहे. 21 वर्षीय तरुणाची हत्या केल्यानंतर तिघेही जण घटनास्थळावरुन पसार झाले. भावा- बहिणींच्या वादात भावोजींनी मध्यस्थी केल्याने मेहुण्यांनी त्यांचा खून केला आहे. अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील दर्यापूर मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कन्हैय्या शंकर पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
अमरावती शहरालगत असलेल्या वलगाव येथील दर्यापूर मार्गावर पाल ठोकून राहणाऱ्या कन्हैय्या शंकर पवार या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या दोन मेहुण्यांनी आपल्या मित्राच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप मृत कन्हैय्याच्या पत्नीने केला आहे.

वादात मध्यस्थी केल्याचा राग
आरोपी मेव्हण्याचा त्याच्या मित्रासोबत वाद सुरु आहे. या भांडणात मध्यस्थी केली म्हणून मेव्हण्यांनी आणि त्यांच्या एका मित्राने भावोजींचीच हत्या केली. हा खून केल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. मृत कन्हैय्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वलगाव पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी बहिणीच्या घरी वाद
दोन दिवसांपूर्वीच तक्रारदार गंगाचे दोन भाऊ म्हणजेच मृत कन्हैयाचे मेव्हणे किसन आणि राजेश हे बहिणीकडे आले होते. यावेळी किसन आणि राजेश यांचा आपसात वाद झाला होता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! होळीनिमित्त सरकार देणार 10 हजार रुपयांचे गिफ्ट

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची होळी खास असणार आहे. रंगांच्या या सणावर सरकार त्यांना एक मोठी भेट देऊ शकते. महामारीच्या या काळात, या भेटीसह, हा सण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप खास बनू शकेल.

वास्तविक, सरकार विशेष फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स योजना देण्याची घोषणा करू शकते. यामध्ये केंद्र सरकार अ‍ॅडव्हान्स योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये देण्याची तरतूद करू शकते. म्हणजेच होळीच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचारी 10,000 रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकतात.

कोणतेही व्याज देणार नाही
यात विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना या रकमेवर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असू शकते म्हणजेच या तारखेपर्यंत फक्त केंद्रीय कर्मचारीच अ‍ॅडव्हान्स रक्कम घेऊ शकतात. गेल्या वर्षीही सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा केली होती.

10 सुलभ हप्त्यांमध्ये पैसे भरण्यास सक्षम असतील
सणांसाठी दिलेली ही अ‍ॅडव्हान्स रक्कम प्री लोडेड असेल. हे पैसे आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात नोंदवले जातील. त्यांना फक्त खर्च करावा लागतो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 हप्त्यांमध्ये हे पैसे परत करण्याची सुविधाही दिली जात आहे. हे फक्त 1,000 रुपयांच्या मासिक हप्त्यांमध्ये भरता येते.

10,000 कोटी रुपये खर्च केले जातील
मिळालेल्या माहितीनुसार, फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स स्कीम अंतर्गत सुमारे 4,000-5,000 कोटी रुपयांच्या वाटपाची घोषणा केली जाऊ शकते. राज्यांनीही ही योजना लागू केल्यास सुमारे 8,000-10,000 कोटी रुपये खर्च होतील. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, सरकार अ‍ॅडव्हान्स योजनेचे बँक शुल्क देखील घेईल. कर्मचारी देखील ही अ‍ॅडव्हान्स रक्कम डिजिटल पद्धतीने खर्च करू शकतील.

अमिताभ बच्चन यांनी क्रिती सेनॉनला भाड्याने दिला आपला डुप्लेक्स, रेंट किती आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री क्रिती सेननला मुंबईतील एक डुप्लेक्स दोन वर्षांसाठी 10 लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिले आहे. Indextap.com ने रजिस्टर्ड रेंट एग्रीमेंटच्या आधारे ही माहिती शेअर केली आहे.

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला रोडवरील अटलांटिस बिल्डिंगच्या 27व्या आणि 28व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. जे भाड्याने घेण्यासाठी क्रिती सेननने 60 लाख रुपयांची सिक्योरिटी डिपॉझिट भरले आहे. अपार्टमेंटसह येणारी एक उत्तम सोय म्हणजे येथे 4 कार पार्क केल्या जाऊ शकतात.

24 महिन्यांसाठी भाड्याने
कागदपत्रांच्या आधारे, लीव एंड लाइसेंस एग्रीमेंट 12 नोव्हेंबर रोजी झाला. या लीझचा कालावधी 16 ऑक्टोबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत म्हणजेच 24 महिने आहे. यावर अभिनेत्याचे अधिकृत प्रतिनिधी राजेश यादव आणि अभिनेत्री सॅनॉनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

क्रिती सॅननने 2014 मध्ये तेलुगु सायकोलॉजिकल थ्रिलर Nenokkadine मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने बरेली की बर्फी, लुका छुपी, मिमी आणि हम दो हमारे दो यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बिग बींनी 31 कोटींना खरेदी केले
अमिताभ बच्चन यांनी डिसेंबर 2020 मध्ये अटलांटिसमध्ये 31 कोटी रुपयांची 5,184 स्क्वेअर फूट मालमत्ता क्रिस्टल ग्रुप या टियर-2 बिल्डरकडून खरेदी केली, मात्र एप्रिल 2021 मध्ये त्याचे रजिस्ट्रेशन झाले. त्यांनी 31 कोटी रुपयांच्या 2 टक्के म्हणजे 62 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती. महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2021 पर्यंत रजिस्ट्रेशनसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये 2 टक्के सूट दिली होती. या व्यवसायाशी संबंधित दलाल आणि रिअल इस्टेट एजंट सांगतात की, येथील मालमत्तेचे मूल्य प्रति चौरस फूट सुमारे 60,000 आहे.

धक्कादायक ! ‘या’ जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Yawatmaal

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हि घटना यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावात जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर या कुटुंबाचे घर जाळण्यात आले. या संपूर्ण घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. यांच्यापैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपुरातील सीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात विनायक भोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. भोरे कुटुंबीय जादूटोणा करत असल्याचा ग्रामस्थांना संशय होता आणि त्या संशयातूनच त्यांनी हे कृत्य केलं आहे. या हल्ल्यात भोरे कुटुंबाचे घर पूर्णत: जळून खाक झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे.

कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक पैसे वसूल कसे करते ? चला जाणून घेऊया

Home Loan

नवी दिल्ली । कोविड-19 ची दुसरी लाट खूप बदलली आहे. आता लोकं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांना काही झाले तर त्यांच्या कुटुंबाचे काय होईल आणि ते कसे जगतील ?. ही चिंता होम लोन घेतलेल्या लोकांना सतावत आहे. कर्जाची रक्कम जास्त असल्याने कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर संकट येऊ शकते. असे कोणाचे झाले तर होम लोनचे काय होईल (कोण थकबाकी भरेल)? बँक मालमत्ता विकून पैसे मिळवतील का? किंवा आणखी काही होईल. आज या लेखात या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेउयात.

व्यापकपणे सांगायचे झाल्यास, या दुर्दैवी परिस्थितीत, बँकेकडे मालमत्ता किंवा घर विकून पैसे वसूल करण्याचा पर्याय आहे, मात्र बँका हा शेवटचा पर्याय म्हणून वापरतात. त्यापूर्वी मालमत्तेचा लिलाव होऊ नये यासाठी बँकांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, जोपर्यंत बँकेला तिचे पूर्ण पैसे परत मिळत नाहीत तोपर्यंत मालमत्तेवर कोणताही कायदेशीर वारस नसतो आणि बँका कायदेशीर वारसाला कर्ज भरण्यासाठी सक्ती देखील करू शकत नाहीत.

जबाबदारी कायदेशीर वारसावर येते
जर एखाद्या व्यक्तीने होम लोन घेतले असेल आणि कर्जाची पूर्ण परतफेड होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला तर कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी त्याच्या कायदेशीर वारसावर येते. याशिवाय जामीनदार असल्यास त्यालाही संधी दिली जाते. होम लोन प्रोटेक्शन पॉलिसी न घेतल्यास हे घडते.

अशा परिस्थितीत कुटुंब कर्ज भरण्यास सक्षम नसेल तर बँकेला कळवावे लागते. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोनचे रि-स्ट्रक्चरींग करण्याचा बँक आटोकाट प्रयत्न करते. या अंतर्गत, EMI कमी करून कर्जाचा कालावधी वाढवण्यासारखे पर्याय आहेत. बँका कुटुंबाला पैसे परत करण्यासाठी पूर्ण वेळ आणि फ्लेक्सिबिलिटी देतात.

याशिवाय, कायदेशीर वारस लोन भरण्यास सक्षम नसल्यास, उत्पन्नाचे पुरेसे साधन असलेल्या दुसर्‍या वारसाला देता येईल, असाही पर्याय आहे. घराच्या नवीन मालकाच्या आर्थिक क्षमतेनुसार बँक लोन एडजस्ट करू शकते.

घराचा लिलाव शेवटचा पर्याय
कोणतीही अनुचित घटना घडल्यास बँका देखील कुटुंबाला मदत करतात. बँकेला पैसे देण्याची कोणतीही पद्धत दिसली नाही तर प्रकरण घराच्या लिलावापर्यंत पोहोचते. याआधी, बँका कायदेशीर वारसांशी वाटाघाटी करण्याचा आणि त्यांना फ्लेक्सी पेमेंट प्लॅन देऊन परतफेडीचे पर्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात.

कर्जदाराकडून 90 दिवसांपर्यंत कोणतेही पेमेंट न झाल्यास, बँक त्याला NPA म्हणजे नॉन-परफॉर्मिंग ए सेट म्हणून घोषित करते. बँका सह-कर्जदारांना लेखी नोटीस पाठवून 30 दिवसांत उत्तर देण्यास सांगतात. या कालावधीत योग्य प्रतिसाद न मिळाल्यास घराचा लिलाव करण्याची प्रक्रिया पुढे नेली जाते.

तुमच्याकडे इन्शुरन्स असल्यास काही हरकत नाही
होम लोन घेताना त्या लोनचा बँकेतूनच इन्शुरन्स उतरवला तर कुटुंबाला फारशी अडचण येत नाही. यामुळेच होम लोन इन्शुरन्स पॉलिसी खूप लोकप्रिय आहे. ही पॉलिसी घेतल्यास कर्जदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबाला किमान इन्शुरन्स फेडण्याची समस्या येत नाही. इन्शुरन्स कंपनी उर्वरित पैसे बँकेला देते आणि घर कायदेशीर वारसाकडे जाते.