Friday, December 26, 2025
Home Blog Page 2746

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे?? चला जाणून घेऊया

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । या अर्थसंकल्पातही केंद्र सरकारने करदात्यांना टॅक्स वाचवण्यासाठी कोणतीही विशेष सवलत दिलेली नाही. प्रत्येक करदात्याला शक्य तितका टॅक्स वाचवायचा आहे, मात्र ते करणे सोपे नाही. तुम्हालाही जास्त टॅक्स वाचवायचा असेल तर आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे आहे. आज आपण अशाच काही योजनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

या सर्व योजनांना सरकारची मान्यता आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला पैसे मिळतील की नाही याची काळजी करण्याची गरज नाही.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वोत्कृष्ट सरकारी योजना PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) मानली जाते. तुम्ही PPF मध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स सूट मिळते. सरकार PPF मधील गुंतवणुकीची हमी देते, म्हणजेच पैसे बुडणार नाहीत. सध्या सरकार PPF वर 7.10 टक्के वार्षिक व्याज देत आहे.

नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांच्या टॅक्स व्यतिरिक्त, 50,000 रुपयांचा लाभ घेता येतो. NPS मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही एकूण 2 लाख रुपयांची इन्कम टॅक्स सवलत मिळवू शकता. तुम्ही महिन्याला 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. 18 ते 65 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतो.

लाईफ इन्शुरन्स
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIPs) मधील गुंतवणुकीवर टॅक्स सेव्हिंग सूट उपलब्ध आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या ULIP मध्ये प्रीमियमवर कोणतीही टॅक्स सूट मिळणार नाही. सध्याच्या आयकर कायद्यानुसार, जीवन विमा पॉलिसींच्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या उत्पन्न कलम 10(10D) अंतर्गत टॅक्सफ्री आहे. ULIPs मधील इन्शुरन्स आणि गुंतवणूक यांचे संयोजन 5 वर्षांच्या लॉक-इन पिरियडसह येते.

टॅक्स सेव्हिंग FD
टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही इन्कम टॅक्स वाचवू शकता. टॅक्स सेव्हिंग FD मधील गुंतवणूक 5 वर्षांसाठी लॉक केली आहे. टॅक्स सेव्हिंग FD व्याज दर वेळोवेळी बदलतात. टॅक्स सेव्हिंग FD गुंतवणूक हा सुरक्षित आणि गॅरेंटेड रिटर्नचा पर्याय आहे. तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या FD वर 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळवू शकता.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक प्रकारचा इक्विटी फंड आहे आणि हा एकमेव म्युच्युअल फंड आहे जो आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स सूट देतो. ELSS मध्‍ये वार्षिक रु. 1 लाखापर्यंतचा रिटर्न/नफा करपात्र नाही. ELSS मध्ये सर्वात कमी लॉक-इन पिरियड3 वर्षांचा आहे जो सर्व टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक पर्यायांमध्ये चांगला आहे.

छ. उदयनराजे भावूक : संभाजी महाराजांच्या बदनामीचे षडयंत्र करणाऱ्यांना जाहीर आव्हान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

संभाजी महाराज यांच्यासारख्या हुशार, विद्वान अभ्यासू व्यक्तिमत्त्व नाही. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. परंतु काही विकृत लोकांनी त्यांना बदनाम केले. संभाजी महाराजांच्या बदनामीचे षडयंत्र करणाऱ्यांनाचा मी जाहीर निषेध करतोच पण त्यांना माझं जाहीर आव्हान आहे, छ. खा. उदयनराजे भोसले यांनी दिले.

सातारा येथे खासदार उदयनराजें भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने उदयनराजे मित्र समुहाने साता-यात वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केले आहे. यावेळी बोलताना ते भावूक झाले. कोव्हिड नियमांमधुन थोडी सुट मिळाल्यामुळं यंदा उदयनराजेंचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. काल झालेल्या एका कार्यक्रमात उदयनराजेंनी संभाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर झालेल्या बदनामीचा आणि षडयंत्राचा निषेध केला.

छ. उदयनराजे भोसले म्हणाले, संभाजीराजेंची बदनामी ज्यांनी केली, त्यांनी माझ्या समोर व्यासपीठावर येवून चर्चा करावी. त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी कुठेही व्यासपीठावर यावे.

एका वर्षात क्रूड ऑइल 62 टक्‍क्‍यांनी महागले; अर्थव्यवस्थेवर होतो मोठा परिणाम

Crude Oil

नवी दिल्ली । 2022 च्या सुरुवातीपासूनच चलनवाढ आणि शेअर बाजाराची हालचाल बिघडली आहे. क्रुडच्या वाढत्या दरामुळे भारताचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. गेल्या वर्षभरात कच्चे तेल 62 टक्क्यांनी महागले आहे.

केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया सांगतात की,”या वर्षीच क्रूडमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे आणि ती 7-8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव आणि ऑर्गनायझेशन ऑफ द ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) च्या उदासीनतेमुळे कच्चे तेल आणखी महाग होण्याची अपेक्षा आहे.” तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”सध्या महागड्या कच्च्या मालापासून कोणताही दिलासा नाही आणि आगामी काळात ते $100 च्या पुढे जाऊ शकते.”

भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम
महागड्या कच्च्या तेलाचा भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. क्रूडमध्ये 10 डॉलरची वाढ झाल्यास विकास दर 0.35 टक्क्यांनी मंदावला जाईल. इतकेच नव्हे तर आयात बिलावरही त्याचा परिणाम होतो आणि ते डॉलरमध्ये भरल्यास रुपया कमकुवत होतो. दुसरीकडे, महाग इंधनामुळे मालवाहतुकीची किंमत वाढते आणि किरकोळ बाजारात महागाई वाढते.

शेअर बाजारावरही तेलाची सावली
महागड्या कच्च्या तेलाचाही या वर्षी शेअर बाजारातील चढ-उतारात मोठा वाटा आहे. क्रूडमध्ये वाढ किंवा घसरण झाल्यास त्याचा थेट परिणाम 40 ते 50 शेअर्सवर होतो. यामुळे बॅटरी बनवणाऱ्या कंपन्या, तेल कंपन्या, विमान कंपन्या, टायर, सिमेंट, लॉजिस्टिक, स्टील आणि कंझ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअर्सवर दबाव येतो.

उत्पादन वाढवण्यास OPEC ची अनिच्छा
रशियासह तेल उत्पादक देशांच्या संघटनेने (OPEC+) रविवारी बैठकीनंतर अतिरिक्त क्रूड उत्पादन करण्यास नकार दिला. मात्र, 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत OPEC ने तेलाचे उत्पादन दररोज 4 लाख बॅरलने वाढविण्याबाबत सांगितले होते. मात्र, अरब देशांच्या मंत्र्यांनी आता महामारीचा धोका कमी होत आहे आणि अर्थव्यवस्था खुली होऊ लागली आहेत, असे सांगून टाळाटाळ केली.

जिल्हा लवकरच होणार निर्बंधमुक्त – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Unlock

औरंगाबाद – कोरोना रूग्णांची कमी होत जाणारी संख्या आणि लसीकरणाचा वाढलेला टक्का यामुळे कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निर्बंध हटवण्यासंदर्भातील शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला शासनाकडून मंजुरी मिळताच जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली होती. यामुळे अनेक निर्बंध लागू आहेत. कोरोना बाधितांची कमी होत जाणारी संख्या, लसीकरणाचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता सोमवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत कोविडच्या अनुषंगाने जिल्ह्यात लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले कि, कोरोनाशी संबंधित विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दोन आकडी झाली आहे. जिल्ह्यात बहुतांश लसीकरण झाल्याने आता कोविडविषयक उर्वरीत निर्बंधही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉटेल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पूर्ण क्षमतेने आणि नियमित वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्ण कमी झाल्याने व संसर्ग वाढीची शक्यता कमी असल्याने सर्व कोविड केअर सेंटरही सोमवार पासून बंद करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या चाचण्या दर दिवशी दीड हजारांवर आल्या आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कोरोना चाचणी केंद्र एका शिफ्टमध्ये तर घाटीतील केंद्र 24 तास सुरू ठेवण्यात येईल. इतरत्र सुरू केलेल चाचणी केंद्र बंद करण्यात आले आहेत. फक्त दोन मोबाईल व्हॅन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. कोविड केअर सेंटर बंद केले तरी सर्व आरोग्य केंद्रात कोरोनावर उपचार आणि कोरोना चाचणी केली जाणार आहे. लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यासाठी शहरात खासगी 70 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्या वॉर्डामध्ये आरोग्य केंद्राची सोय नाही त्या ठिकाणी खासगी डॉक्टरांकडून लसीकरण होईल. लस प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक डॉक्टराकडे एक या प्रमाणे 70 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Bank Holidays : सुट्ट्यांमुळे ‘या’ शहरांमध्ये सरकारी बँका बंद राहणार

Bank Holiday

नवी दिल्ली । वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये 12 दिवस बँकांना सुट्ट्या असतील. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बँका संपूर्ण भारतात बंद आहेत, तर काही राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँकेच्या शाखा बंद राहतील.

या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी लागू होणार नाहीत. त्याच वेळी, RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

23-24 फेब्रुवारीऐवजी मार्चमध्ये संप होणार आहे
देशभरातील केंद्रीय कामगार संघटनांनी यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी सरकारच्या धोरणांविरोधात देशव्यापी संप पुकारला होता. त्याच दिवशी बँक कर्मचारीही संपावर जाणार होते. मात्र आता हा संप 23 आणि 24 फेब्रुवारीऐवजी मार्चमध्ये होणार असल्याची माहिती CITU ने दिली आहे. यासोबतच बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) नेही संपाची तारीख मार्चपर्यंत वाढवली आहे.

सुट्ट्यांची लिस्ट पहा
15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली/लुई नागाई नी यांच्या वाढदिवसानिमित्त इंफाळ, कानपूर आणि लखनऊ येथील बँक शाखा बंद राहतील.
16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती त्याच दिवशी येते. चंदीगडमध्ये बँका बंद राहतील.
18 फेब्रुवारी : डोलजत्रेमुळे कोलकाता येथील बँक शाखा बंद राहतील.
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
20 फेब्रुवारी: रविवार
26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार
27 फेब्रुवारी : रविवार

Cryptocurrency Prices : क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी घसरण; Shiba,Solana10 टक्क्यांहून अधिकने घसरले

Cryptocurrency

नवी दिल्ली । सोमवार, 22 फेब्रुवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. सकाळी 9:50 वाजता, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप काल सकाळी 11 च्या सुमारास असलेल्या $1.79 ट्रिलियन वरून 6.91% ने $1.65 ट्रिलियन पर्यंत घसरले. Bitcoin, Ethereum सह सर्व प्रमुख करन्सीमध्ये घसरण झाली. टॉप कॉइन्समध्ये सर्वाधिक घसरण झालेल्या करन्सीमध्ये Solana – SOL, Shiba Inu आणि Avalanche यांचा समावेश आहे.

आज सर्वात मोठी करन्सी Bitcoin 5.94% ने $36,710.81 वर ट्रेडिंग करत आहे, तर Ethereum $2,530.19 वर ट्रेडिंग करत आहे, गेल्या 24 तासात 7.02% खाली. बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये Bitcoin चे मार्केट वर्चस्व 42.1% होते, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.3% होते.

कोणत्या करन्सी किती टक्क्यांनी घसरली?
>> Avalanche – प्राइस: $68.16, घसरण : 15.44%
>> XRP – प्राइस: $0.6828, घसरण : 13.64%
>> Cardano (Cardano – ADA) -प्राइस: $0.8333, घसरण : 13.33%
>> Solana – SOL – प्राइस: $82.23, घसरण : 12.73%
>> Shiba Inu – प्राइस: $0.00002347, घसरण : 12.74%
>> Dogecoin (DOGE) – प्राइस: $0.1265, घसरण : 9.19%
>> BNB – प्राइस: $354.83, घसरण : 8.85%
>> Terra – LUNA – प्राइस: $49.17, घसरण : 3.15%

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
या काळात सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सी बद्दल बोलायचे झाल्यास, OBRok Token (OBROK), BoleToken (BOLE) आणि MetaPay मध्ये जबरदस्त वाढ झाली. OBRok Token (OBROK) नावाच्या टोकनने गेल्या 24 तासांत सर्वात मोठी उडी घेतली. हे टोकन 646.11% वाढले आहे. BoleToken (BOLE) 585.95% तर MetaPay 576.83% वाढले आहे.

Gold Price : सोन्याच्या दरात जोरदार वाढ; आजचे नवीन भाव तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सध्या सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते लवकर खरेदी करा. 2022 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा भाव 0.76 टक्क्यांनी मजबूत होत आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.76 टक्क्यांच्या मजबूत वाढीसह 50,460 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 1.10 टक्क्यांच्या उसळीसह 64,289 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,350 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,460 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,460 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,250 रुपये
पुणे – 46,150 रुपये
नागपूर – 46,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,460 रुपये
पुणे – 50,350 रुपये
नागपूर – 50,460 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4605.00 Rs 4614.00 0.195 %⌃
8 GRAM Rs 36840 Rs 36912 0.195 %⌃
10 GRAM Rs 46050 Rs 46140 0.195 %⌃
100 GRAM Rs 460500 Rs 461400 0.195 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5015.00 Rs 5024.00 0.179 %⌃
8 GRAM Rs 40120 Rs 40192 0.179 %⌃
10 GRAM Rs 50150 Rs 50240 0.179 %⌃
100 GRAM Rs 501500 Rs 502400 0.179 %⌃

Stock Market : सेन्सेक्स 1,200 अंकांनी घसरला तर निफ्टी 17 हजारांच्या खाली आला

Recession

नवी दिल्ली । जसा अंदाज वर्तवला जात होता तसा भारतीय शेअर बाजार मंगळवारी मोठ्या घसरणीने उघडला. जागतिक बाजाराच्या दबावाखाली सेन्सेक्स आणि निफ्टीने सुरुवातीच्या सत्रातच उडी घेतली. सेन्सेक्सने 1,200 अंकांची घसरण दाखवली तेव्हा निफ्टी 17 हजारांच्या खाली घसरला.

आजचा दिवस शेअर बाजारासाठी अशुभ ठरला आणि युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या वाढत्या भीतीने गुंतवणूकदारांनी मोठा नफा बुक केला. BSE सेन्सेक्स उघडताच तो 1,200 अंकांपेक्षा अधिकने घसरला आणि 57 हजारांच्या खाली ट्रेड सुरू झाला. निफ्टीही 360 अंकांनी घसरून 16,847 वर उघडला. सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 952 अंकांच्या घसरणीवर तर निफ्टी 276 अंकांच्या घसरणीवर ट्रेड करत होता.

सर्व सेक्टर्स कोलमडले
शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीतून कोणतेही सेक्टर सुटू शकलेले नाही. विशेषतः बँकिंग शेअर्समध्ये कमकुवतपणा दिसून आला. मिड कॅप स्मॉल कॅपलाही जबरदस्त मारहाण झाली. परिस्थिती अशी होती की, सेन्सेक्सचे सर्व 30 शेअर्स रेड मार्कमध्ये ट्रेड करत होते. डॉ रेड्डीज लॅब्स, एल अँड टी, एशियन पेंट्स, टीसीएस आणि यूपीएल निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहत आहेत.

आशियाई बाजार घसरणीने उघडले
मंगळवारी सकाळी आशियातील बहुतांश बाजार घसरणीवर उघडले. सिंगापूरचे एक्सचेंज 1.31 टक्के आणि जपानचे 3 टक्के घसरले. याशिवाय तैवानमध्ये 0.83 टक्के आणि दक्षिण कोरियामध्ये 1.34 टक्के नुकसान झाले आहे. हाँगकाँगचा हेंग सेंगही सुमारे 3 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होता. भारतीय गुंतवणूकदारांना आशियाई बाजारांचाही परिणाम होऊ शकतो, जे मोठ्या विक्रीच्या दिशेने वाटचाल करू शकतात.

जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या नसात मुस्लिमांचे रक्त; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्या नसात मुस्लिमांचे रक्त आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उत्तर प्रदेश येथील भाजप आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. एका जाहीर सभेला संबोधित करत असताना त्यांनी असे विधान केलं आहे

राघवेंद्र प्रताप सिंह म्हणाले, जो हिंदू दुसरीकडे कुठेतरी जात असेल तर त्याच्या नसात ‘मियां’चे रक्त वाहत आहे . तो जयचंदचा देशद्रोही आणि हरामखोर मुलगा आहे. एवढा छळ करून हिंदू दुसऱ्या बाजूला गेला तर त्याने तोंड दाखवू नये. तुमच्यापैकी जयचंद किती आहेत? मला त्यांची नावे द्या आणि ते हिंदू आहेत की मियां आहेत हे पाहण्यासाठी मी त्यांच्या रक्ताची चाचणी घेईन. मी त्याची डीएनए चाचणी करून घेईन

दरम्यान, सिंह यांनी त्यांच्या वक्तव्याची इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कबुली दिली. पुढे स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, “मी त्या गोष्टी बोलल्या आहेत, मी नाकारत नाही. पण मी त्या सर्व गोष्टी दुसर्‍या संदर्भात बोललो होतो आणि भूतकाळाशी तुलना करत होतो. कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता. डोमरियागंजमध्ये सुमारे १.७३ लाख मुस्लिम मतदार आहेत, अशा ठिकाणी अशी धमकी देऊन कोणी निवडणूक जिंकू शकते का?,” असंही ते म्हणाले.

उद्या साताऱ्यात “चला हवा येऊ द्या” कार्यक्रम

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले मित्र समूहच्या वतीने उद्या बुधवार दि. 23 रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर “चला हवा येऊ द्या” हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हास्यविनोद यांनी भरलेला कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाकरिता उभारण्यात येणारे व्यासपीठ व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.

या कार्यक्रमासाठी 80 बाय 60 चे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. आधुनिक पद्धतीचे स्टेज बॅकग्राऊंड सर्वोत्तम ध्वनीयंत्रणा व लेझर लाईट सिस्टीम अशा अद्ययावत तंत्रज्ञानाणे हा कार्यक्रम समृद्ध आहे. कलाकारांसाठी एकूण 20 मेकअप रूम आणि आपत्कालीन कारणासाठी टॉयलेट व्यवस्था जिल्हा परिषदेच्या मैदानावर केली आहे. याशिवाय मैदानावर ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी पाच व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध असणार आहेत. सदरचा कार्यक्रम संपूर्ण सातारकर रसिकांसाठी विनामूल्य असून याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. नागरिकांना हा कार्यक्रम मोफत असावा अशा स्पष्ट सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहेत.

या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाचे सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमात अजय-अतुल संगीत दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन केलेल्या झुंड या हिंदी चित्रपटातील कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्टेजच्या उभारणीच्या प्रसंगी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, बाळासाहेब गोसावी, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, राहुल पाटोळे, शेतकरी संघटनेचे राजू पाटील, सुनील बर्गे, प्रशांत निंबाळकर, संदीप शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.