Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2772

पुतळा अनावरण सोहळ्याची वेळ बदला; अन्यथा रात्री वाद्य वाजविण्याची परवानगी द्या

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुक्त पद्धतीने होऊच शकत नाही. यामुळे क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्याची मध्यरात्रीची वेळ बदला, अन्यथा रात्री दहा वाजल्यानंतर शिवप्रेमींना वाद्य वाजवण्याची परवानगी द्या, अशी मागणी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित देशमुख आणि माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उद्या मध्यरात्री करण्यात येणार असल्याचे महापालिकेने मंगळवारी जाहीर केले. रात्री दहानंतर वाद्य वाजवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. शिवजयंतीची जय्यत तयारी करणारे शिवप्रेमी क्रांती चौकातील शिवस्मारकाच्या अनावरण समारंभाची हे आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. शिवस्मारकाचे अनावरण मोठ्या जल्लोषात व्हावे अशी लाखो शिवप्रेमींची इच्छा आहे. असे असताना मध्यरात्री मुख्य पद्धतीने अनावरण सोहळ्याचे आयोजन कशासाठी करण्यात आले आहे? असा सवाल विनोद पाटील यांनी केला.

विनोद पाटील म्हणाले की, राज्यात विविध निवडणुका झाल्या तेव्हा त्या गर्दीत कोरुना पसरला नाही. आता शिवप्रेमींनी वर निर्बंध लादून गुन्हा नोंदवण्याचा इशारा देणे अन्यायकारक आहे. मराठा क्रांती मोर्चाचा वाहन रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. शिवसेनेनेही ‘एक राजा एक जयंती’ या तत्वानुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंतीत सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करतो. यावेळी राजू शिंदे, मनोज पाटील, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, मनोज गायके, सुमित खांबेकर उपस्थित होते.

…अन्यथा शहरास निर्जळी; औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा संकटात

Water supply
Water supply

औरंगाबाद – तांत्रिक अडचणींमुळे शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना तब्बल सात-आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. त्यात आता पाटबंधारे विभागाच्या नोटिशीमुळे शहराचा पाणी पुरवठा संकटात सापडला आहे. पाणी बिलाचे 26 कोटी 32 लाख रुपये 18 फेब्रुवारीपर्यंत भरावेत, अन्यथा सोमवारपासून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

महापालिका पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी घेण्यासाठी पाटबंधारे विभागाला पैसे मोजते. पण पाण्याचे बिल थकल्यामुळे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभाग मार्च एन्डला महापालिकेला नोटीस बजावून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा देते. काही रक्कम भरताच विषय लांबणीवर पडतो. यंदा पुन्हा एकदा महापालिकेकडील पाणी बिलाची थकबाकी २६ कोटी ३२ लाख रुपयांवर पोचली आहे. त्यामुळे जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला नोटीस पाठवून 18 फेब्रुवारीपर्यंत थकबाकीचा भरणा करण्याची सूचना केली आहे. अन्यथा सोमवारपासून पाणी उपसा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान बिलाची फाईल प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे असून, दंड, व्याज या रकमा वळत्या करून पाण्याचे बिल भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी असेल कारवाई –
21 फेब्रुवारीला पाणी उपसा दोन तासांसाठी बंद केला जाईल. त्यानंतर 22 फेब्रुवारीला चार तासांकरिता, 23 फेब्रुवारीला सहा तासांकरिता २४ फेब्रुवारीला आठ तासांकरिता तर 25 फेब्रुवारीला पाणी उपसा पूर्णपणे बंद केला जाईल असे पाटबंधारे खात्याने महापालिकेला पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे.

10 वी च्या मुलीने जुन्या कोयना पुलावरून उडी घेतली; तरूणांनी धाडसाने ‘असे’ वाचविले प्राण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील एका 10 वी च्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जुन्या कोयना पुलावरून उडी घेतल्याची घटना घडली. पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या मुलीला दोन मुलांनी धाडसाने वाचविले आहे. या मुलांच्या धाडसाचे कौतुक नागरिकांच्यातून केले जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज बुधवारी दि.16 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कराड शहरातील ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून एका अल्पवयीन मुलीने कोयना नदीपात्रात उडी घेतली. मुलीने उडी घेतल्याची घटना पुलावर असलेल्या काही नागरिकांनी पाहिली. त्यानंतर नदीत उडी घेतलेल्या मुलीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रात्रीचे 9 वाजले असल्यामुळे अंधारात पाण्यात नक्की मुलगी कुठे आहे हे कोणालाच दिसत नव्हते.

अशावेळी लोकांना काय करायचे हे समजत नसताना, तेथे दोन तरुण मुले आली. त्यांना सदरील घटना समजली. त्यांनी धाडस करून पुलावरून खाली नदीच्या काठावर जावून मुलीचा शोध लागतो, का हे पाहिले. त्यानंतर काही वेळाने पाण्यात मुलगी दिसली. तेव्हा दोन्ही मुलांनी अंधारात नदीत उडी घेतली व मुलीला नदीपात्रातून बाहेर काढले.

अंधाऱ्या रात्रीत धाडस करत दोन मुलांनी सदर मुलीचा शोध घेऊन तिला नदीपात्रातून बाहेर काढले. कराड शहरातील एकजण (नांव समजू शकले नाही) व पाटण तालुक्यातील गारवडे येथील अनिकेत शिंदे या मुलांच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले. अनिकेत हा कराड शहरात कामाला असून घरी जात असताना ही घटना घडली असल्याचे त्याने सांगितले. अल्पवयीन मुलगी शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे. सध्या, या मुलीवर कराड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

औरंगाबादेत खळबळ! कारमध्ये मृतावस्थेत आढळले नग्न कपल

औरंगाबाद – बंद कारमध्ये अचानक स्फोट झाल्याने त्यातील नग्न प्रेमी युगुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी शहर लगतच्या गांधेली शिवारात उघडकीस आली. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसून कारमधील एसीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शहरालगतच्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे काम सुरु आहे. याच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची तपासणी केली असता त्यात आक्षेपार्ह स्थितीत प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. दोघांची वय चाळीस वर्षांपर्यंत असून अद्याप त्यांची ओळख पटली नाही. कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

माहिती मिळताच चिखलठाणा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर दोन्ही मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आली आहेत. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

नवीन पाणीपुरवठा योजनेला मिळाला ‘बुस्टर’

water supply

औरंगाबाद – औरंगाबादकरांची तहान भागवण्यासाठी 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम थांबू नये यासाठी राज्य शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली आहे. यामुळे ही योजना 2023-24 पर्यंत रखडणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की, समांतर जलवाहिनीस आलेला निधी पडून होता. या निधीतून पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निधी दिला जात आहे. आतापर्यंत 76 कोटी रुपये देण्यात आले आहेत. शासनाने या योजनेसाठी आर्थिक तरतूद केली. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आर्थिक पेच निर्माण होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ही पाणी पुरवठा योजना केंद्र सरकारच्या अमृत-2 मधून पूर्ण करावी असा प्रयत्न देखील सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करेल. अमृत-2 मधून ही योजना मंजूर झाली, तर राज्य आणि केंद्र सरकारच्या निधीतून या योजनेचे काम होऊ शकेल. पाणीपुरवठा योजनेसाठी भविष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.

ओमायक्रॉनच्या 148 नवीन रुग्णांचा शोध

Corona

औरंगाबाद – कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळत असताना, औरंगाबादेत काल तब्बल 148 ओमायक्रोन रुग्णांचे निदान झाले.

एका दिवसात निधन झालेली आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. मात्र, अहवाल उशिरा येत असल्याने बहुतांश रुग्ण बरे झालेले आहेत. परंतु, तरीही प्रत्येक रुग्णांशी संपर्क साधून प्रकृतीबाबत विचारणा आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहे.

आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 60 च्या घरात होती. काल एकाच दिवशी ओमायक्रॉनच्या 148 यांचे निधन झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची काहीशी चिंता वाढली. परंतु, गेल्या काही दिवसातील स्थिती पाहता हे रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत.

फी न भरल्याने 10 वीच्या विद्यर्थिनीला परीक्षेतून काढले बाहेर

औरंगाबाद – फी न भरल्याने 10 वीच्या विद्यर्थिनीला परीक्षेतून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसेने घेराव घातल्यानंतर विद्यार्थिनीला वापस परीक्षेत बसवण्यात आले.

27 हजार रुपये पैकी 7 हजार रुपये बाकी असल्याने 10 वी त शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळा प्रशासनाने परीक्षेतून बाहेर काढल्याचा प्रकार शहरातील सिंधी कॉलोनी भागात असलेल्या ऑईस्टर इंग्लिश हायस्कुल शाळेत समोर आला आहे.

ही माहिती मिळताच मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला धारेवर धरत घेराव घातला होता. शाळा प्रशासनाने चूक मान्य करीत विद्यार्थिनीला परीक्षेत बसू देण्याचे मान्य करीत माफीनामा लिहून दिला.

“नारायण राणे सत्तापिपासू नेता”; राणेंच्या टीकेवर विनायक राऊतांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर आज पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार विनायक राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत पलटवार केला. “संजय राऊतांच्या आरोपामुळे भाजपचे अनेक नेते घायाळ झाले आहेत. वास्तविक संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नेते हि उपाधी कधीच दिली नाही. कारण ठाकरे यांना चांगले माहिती होते कि राणे हे सत्तापिपासू आहेत, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली.

विनायक राऊत यांनी आज तर्कार प्रिधड घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राऊतांच्या बाणांमुळे भाजप घायाळ झाली आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. बाळासाहेबांनी ज्यांना नेते केले त्यातच संजय राऊत नेते झाले. बाळासाहेबांनी नेते ही उपाधी राणेंना दिली नसल्याने याच्यातून नारायण राणेंची लायकी दिसते. संजय राऊत निधड्या छातीचे शिवसैनिक आहेत.

कालच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी उघड बोलण्याचे धाडस केले. राणेंच्या मागे ईडी लागल्यावर चोर रस्त्याने दिल्लीत जाऊन त्यांनी शरणागती पत्करली. ईडीपासून बचाव करण्यासाठी शिवसेनेशी आणि काँग्रेसशी बेईमानी केली, अशी टीकाही राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केली.

Paytm वर विना गॅरंटी मिळेल 5 लाखांचे लोन, त्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या

Paytm

नवी दिल्ली । जर तुम्ही छोटे व्यापारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. Paytm ने लहान व्यापाऱ्यांना 5,00,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी एक छान ऑफर आणली आहे. तसेच हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरेंटी देण्याची गरज नाही. शिवाय, ते फेडण्यासाठी, Paytm ने डेली EMI चा पर्याय देखील दिला आहे. Paytm ने या संदर्भात शेड्यूल्ड कमर्शियल बँका आणि NBFC सोबत भागीदारी केली आहे.

जर तुम्हांलाही हे कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी पेटीएम फॉर बिझनेस अ‍ॅपमधील ‘Merchant Lending Program’ मध्ये जावे लागेल. Paytm चे अल्गोरिदम तुमच्या किंवा व्यापाऱ्याच्या डेली ट्रान्सझॅक्शनच्या आधारे Credit-worthiness तपासेल.

पूर्णपणे डिजिटल लोन अर्ज प्रक्रियेसह, कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नाही. लोनचे री-पेमेंट प्रामुख्याने Paytm सह व्यापाऱ्याच्या डेली सेटलमेंटद्वारे केले जाते. जर तुम्ही एकाच वेळी वेळेपूर्वी लोन भरायचे ठरवले तर यासाठी कोणतेही प्री-पेमेंट शुल्क लागणार नाही.

लोन मिळवण्यासाठी ‘या’ 5 स्टेप फॉलो करा
1. Paytm for Business अ‍ॅपच्या होम स्क्रीनवरील “बिझनेस लोन” आयकॉनवर टॅप करा आणि तुमच्यासाठी उपलब्ध असलेली ऑफर तपासा. यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता.

2. एकदा रक्कम निवडल्यानंतर, तुम्ही लोन अमाउंट, डिस्बर्स अमाउंट, Total Payable, Daily Installment, Tenure इत्यादी डिटेल्स पाहू शकता.

3. आता तुम्हाला तुमच्या डिटेल्सची पुष्टी करावी लागेल.त्यासाठी चेक बॉक्सवर क्लिक करा आणि पुढे जाण्यासाठी “Get Started” वर टॅप करा. तुमचा कर्जाचा अर्ज लवकर पूर्ण करण्यासाठी CKYC कडून तुमचे KYC डिटेल्स मिळवण्यासाठी संमती देऊ शकता.

4. पुढील स्क्रीनवर, तुम्ही तुमचा पॅन कार्ड डेटा, जन्मतारीख आणि ई-मेल अ‍ॅड्रेस यासारख्या डिटेल्सचे व्हेरीफिकेशन करू शकता. जर हे फील्ड भरले नाहीत तर ते भरा आणि पुष्टी करा. एकदा हे पूर्ण झाल्यावर तुम्ही ऑफरच्या पुष्टीकरणासह पुढे जाऊ शकता. पॅन डिटेल्स व्हेरिफाय केल्यानंतर, तुमचा क्रेडिट स्कोअर व्हेरिफाय केला जाईल आणि KYC चे व्हेरीफिकेशन केले जाईल.

5. तुमचा कर्ज अर्ज सबमिट केल्यानंतर, कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमचे बँक डिटेल्स इत्यादी काळजीपूर्वक भरा.

कंपनीने आपल्या Q3 FY22 च्या रिपोर्टमध्ये नोंदवले होते की, प्लॅटफॉर्मवर वितरित केलेल्या मर्चंट लोनची संख्या वर्ष-दर-वर्ष 38% वाढली आहे, तर मर्चंट लोनचे मूल्य वर्ष-दर-वर्ष 128% वाढले आहे. नवीन कर्जदारांना 25% पेक्षा जास्त कर्ज वितरित केले गेले.