Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2778

मुलीच्या आईने धमकावल्याने पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

औरंगाबाद – एका पंधरा वर्षीय मुलाने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री फर्दापूर येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद परवेज सय्यद राजिक (रा. ठाणा, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

रविवारी रात्री फर्दापूर येथील एका हॉटेलमध्ये सय्यद परवेज याने गळफास घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला रुग्णालयात हलविण्यात आले. शाळेत तू माझ्या मुलीच्या बेंचवर का बसला, असे म्हणून सदर महिलेने गुरुवारी सय्यद परवेजला शिवीगाळ केली व तुझे नाव शाळेतून काढायला लावेल, अशी धमकी दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाइकांनी केला.

आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने सोमवारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर मयत परवेजचे वडील सय्यद राजिक सय्यद आरीफ यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

योग्य ETF कसा निवडायचा? गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Digital Gold

नवी दिल्ली । तुम्हांला जर दीर्घकालीन गुंतवणुकीत चांगला रिटर्न हवा असेल तर ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. ईटीएफ स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट केले जातात आणि त्यामध्ये शेअर्सप्रमाणेच खरेदी आणि विक्री केली जाते. यासाठी म्युच्युअल फंडाप्रमाणे ऍक्टिव्ह पोर्टफोलिओ मॅनेजमेंटची आवश्यकता नाही, म्हणून ही एक निष्क्रिय इक्विटी गुंतवणूक मानली जाते.

बाजारात अनेक प्रकारचे ईटीएफ आहेत
भारतीय बाजारपेठेत साधारणपणे पाच प्रकारचे ईटीएफ उपलब्ध आहेत, गोल्ड ईटीएफ, इंडेक्स ईटीएफ, बाँड ईटीएफ, सिल्व्हर ईटीएफ आणि इंटरनॅशनल ईटीएफ.

गुंतवणूकीची पद्धत
ETF ची खरेदी-विक्री शेअर बाजारात केली जाते. ETF खरेदी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ब्रोकरमार्फत डीमॅट खाते उघडावे लागेल. ETF ची किंमत रिअल टाइममध्ये वर किंवा खाली जाऊ शकते. हे म्युच्युअल फंडाच्या युनिट प्राईसच्या उलट आहे, जे केवळ एका ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेटल केले जाते.

गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ पॅरामीटर्सवर ETF तपासा
>> ETF निवडताना किंवा गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी लिक्विडीटी, लो एक्सपेंस रेशियो, लो इंपॅक्ट कॉस्ट, लो ट्रॅकिंग एरर आणि अंडरलाइंग सिक्युरिटीजसाठी L4U पॉलिसीवर अवलंबून राहावे.
>> ETF च्या लिक्विडीटीमुळे गुंतवणूकदारांना स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी किंवा विक्री करणे सोपे होईल.
>> साधारणपणे, ETF चे एक्सपेंस रेशियो ऍक्टिव्ह फंडांपेक्षा कमी असते मात्र गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या ETF च्या एक्सपेंस रेशियोची आपापसात तुलना केली पाहिजे.
>> कोणताही ETF निवडताना लो ट्रॅकिंग एरर हा महत्त्वाचा घटक आहे. हे निर्देशांकाच्या तुलनेत रिटर्न मधील फरक कमी करण्यास मदत करते. साधारणपणे, 02 टक्के ट्रॅकिंग एरर अंडरलाइंग सिक्युरिटीजसाठी आदर्श मानली जाते.
>> ETF निवडताना सर्वात महत्त्वाचे पॅरामीटर हे अंडरलाइंग सिक्युरिटीज आहे कारण रिटर्न त्याच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

नॉन-इक्विटी ETF जसे की सोने आणि इंटरनॅशनल ETF मध्ये 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीची गुंतवणूक अल्प मुदतीची गुंतवणूक मानली जाते, तर 3 वर्षांहून अधिक काळ केलेली गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. नॉन-इक्विटी ETF च्या STCG वर नाममात्र दराने कर आकारला जातो. नॉन-इक्विटी ETF च्या LTCG वर इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% कर आकारला जातो.

LIC च्या सर्वात मोठ्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ जोखीम लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठे नुकसान

LIC

नवी दिल्ली । अखेर LIC IPO ची प्रतीक्षा संपली आहे. LIC ने SEBI कडे DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे. याचा अर्थ LIC चा IPO लवकरच येऊ शकतो. डॉक्युमेंट्स नुसार, सरकार IPO द्वारे LIC मधील सुमारे 5 टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत आहे.

सरकार 6.32 अब्ज शेअर्स पैकी सुमारे 31.6 कोटी इक्विटी शेअर्स विकणार आहे. त्याची फेसव्हॅल्यू 10 रुपये आहे. या OFS IPO द्वारे उभारलेले सर्व पैसे सरकारच्या तिजोरीत जातील LIC कडे नाही, कारण कंपनीकडून कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. असा विश्वास आहे की, हा IPO 60,000 ते 90,000 कोटी रुपयांचा असेल. LIC IPO मुळे सरकारला 78 हजार कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे सुधारित लक्ष्य साध्य करण्यात मदत होईल.

कामावर परिणाम
महामारीमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांचा LIC च्या कामकाजावरही परिणाम झाला आहे. गुंतवणुकीत घट झाली आहे. LIC चा शेअर बाजारातील हिस्सा डिसेंबरच्या तिमाहीत विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. बाजारमूल्य केवळ 3.67 टक्क्यांवर आले आहे.

क्लेम सेटलमेंट वाढले
कोरोनाच्या काळात LIC च्या क्लेम सेटलमेंटमध्ये वाढ झाली आहे. देठ क्लेमची रक्कम 2018-19 मध्ये 17,128.8 कोटी, 2019-20 मध्ये 17,527.9 कोटी, आर्थिक वर्ष 20-21 मध्ये 23,926.8 कोटी आणि चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 मध्ये 21,734.1 कोटी होती. हे एकूण इन्शुरन्स क्लेमच्या 6.79 टक्के, 6.86 टक्के, 8.29 टक्के आणि 14.47 टक्के आहे.

ब्रँडला धक्का
कोरोनामुळे इन्शुरन्सच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. या संकटाच्या काळात LIC कर्मचारी आणि एजंटांनी ब्रँड नेमचा गैरवापर केला. यामुळे LIC ब्रँडला मोठा धक्का बसला आहे.

रिस्क मॅनेजमेंट टूल काम करत नाही
LIC परंपरेने काम करत आहे. तिचे रिस्क मॅनेजमेंट टूल आता प्रभावी नाहीत. बदलत्या काळात रिस्क व्हॅल्युएशन आणि रिस्क मॅनेजमेंटची पद्धत बदलली आहे. LIC ने या संदर्भात कोणताही मोठा बदल स्वीकारलेला नाही.

RBI ची स्थिती
भारतीय आयुर्विमा महामंडळ ही IDBI बँक आणि LIC हाउसिंग फायनान्सची मूळ कंपनी आहे. RBI ने म्हटले आहे की, या दोघांपैकी एकाला पुढील महिन्याच्या आत त्यांचा हाउसिंग फायनान्स बिझनेस बंद करावा लागेल. या अटीवर LIC चा IPO मंजूर करण्यात आला आहे.

व्यवसायावर परिणाम होईल
भारताची मॅक्रो अर्थव्यवस्था कमकुवत होत आहे, तर LIC चा व्यवसाय भारतीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्था मंदावल्यास इन्शुरन्स कंपनीच्या व्यवसायावरही परिणाम होईल.

महागाई आणि व्याजदराचा परिणाम
युरोप, अमेरिका आणि इतर आशियाई बाजारांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर होतो. जागतिक चलनवाढ उच्च पातळीवर आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवणार आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम IPO वरही होणार आहे.

नियमातील बदलाचा परिणाम
नियमांमध्ये काही बदल झाल्यास त्याचा परिणाम व्यवसायावर होईल, असे सेबीच्या ठेव प्रस्तावात म्हटले आहे. येत्या काळात भारतात किंवा जगात कोणत्याही प्रकारचे आर्थिक नियमन आले तर त्याचा परिणाम दिसून येईल. कॉर्पोरेट टॅक्स आघाडीवरील कोणत्याही कारवाईचा परिणाम होईल.

कारण देखील
LIC मधील 5 टक्के हिस्सा विकण्याची तयारी सुरू आहे. 95 टक्के हिस्सा अजूनही भारताच्या राष्ट्रपतींकडे असेल, ज्याची देखरेख वित्त मंत्रालयाकडून केली जाते. अशा स्थितीत सरकारशी संबंधित सर्व घटकांचा त्यावर परिणाम होतो.

मुरबाडमध्ये भरदिवसा पार्किंगच्या वादातून डॉक्टरवर कोयत्याने हल्ला

murbad crime

मुरबाड : हॅलो महाराष्ट्र – ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पार्किंगवरुन झालेल्या वादानंतर एका डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या आरोपीने डॉक्टरवर चक्का कोयत्याने हल्ला केला आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात हा भयंकर प्रकार घडला आहे. मुरबाडमधील यांनी आपल्या क्लिनिकबाहेर आपली बाईक पार्क केली होती. या ठिकाणी बाईक पार्क केल्याच्या वादातून डॉ. धीरज श्रीवास्तव यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ज्यावेळी डॉक्टर आपली दुचाकी घेऊन निघत होते त्यावेळी आरोपीने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

डॉक्टरांच्या हात-डोक्याला दुखापत
हा वाद पुढे वाढत गेला यानंतर आरोपीने डॉक्टर धीरज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीने सुरुवातीला डॉक्टर धीरज यांना काठीने मारहाण केली. या आरोपीला एवढा राग आला होता कि त्याने जवळच असलेला कोयता घेऊन डॉक्टर धीरज यांच्यावर हल्ला चढवला. डॉक्टर धीरज यांनी आरोपीचा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला मात्र या हल्ल्यात डॉक्टर धीरज यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.

घटना सीसीटीव्हीत कैद
मुरबाड तालुक्यातील अंजली गॅस एजन्सीच्या परिसरात हि घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपी भाऊ मुरबाडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरदिवसा करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

“फडणवीसांच्या काळात महा आयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांवरही गंभीर आरोप केले. यावेळी राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव घेत तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा हा तब्बल 25 हजार कोटी रुपयांचा होता. फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यंना कुठं लपवलंय ते त्यांनी गावे, असा आरोप राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी राऊत म्हणाले की, आज मी फडणवीस याच्या काळा झालेला महाआयटीतल्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं, त्यांचे मनी ट्रान्झॅक्शन्स, विना टेंडर कोणाकोणाला कंत्राटे दिली? कोणाला किती रुपये दिले? याची माहिती येत्या दोन दिवसात ईडीकडे दिली जाईल, असे सांगितले.

भाजपचे काही प्रमुख वारंवार मला भेटून तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थिती आम्हाला हे सरकार घालवायचे आहे. आमची सगळी तयारी झाली आहे. काही आमदार आमच्या हाताला लागले आहेत. तुम्ही बाहेर पडा. आम्हाला मदत करा. आम्ही राष्ट्रपती राजवट आणू. तुम्ही जर मदत केली नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असे राऊत यांनी यावेळी म्हंटले.

सोमय्या पिता- पुत्रांना अटक करा; संजय राऊतांनी बाहेर काढला ‘हा’ घोटाळा

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या याना अटक करा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच राकेश . पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान आणि किरीट सोमय्या यांचे आर्थिक संबंध असून राकेश बावधन याने भाजपाला २० कोटी रुपये दिले असा आरोपहि त्यांनी केला आहे.

निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली असा आरोप संजय राऊत यांनी केला

किरीट सोमय्यांचा मुलगा राकेश वाधवानच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल..या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला 20 कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा असून महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असताना त्यांच्या मुलीच्या लग्नात ९ कोटींचे कार्पेट वापरण्यात आले असेही त्यांनी सांगितले ईडी ला ते दिसलं नाही का असा सवाल त्यांनी केला

“…हा तर फुसका बार निघाला”; पत्रकार परिषदेवरून प्रवीण दरेकर यांचा टोला

RAUT DAREKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजपवर निशाणा साधत अनेक आरोप केले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. राऊतांनी आज भाजपचे साडेतीन नेते यांची नावे जाहीर करू असे सांगितले. मात्र, त्यांनी एकही नेत्याचे नाव घेतले नाही. मला वाटते आजची प्रकार परिषद म्हणजे फुसका बार म्हणावा लागेल, असा टोला दरेकर यांनी लगावला.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. दरेकर म्हणाले की, पत्रकार परिषद घेत छातूरमातूर गोष्टी करून काय होणार नाही. राऊतांना एवढंच सांगणे आहे कि त्यांनी बोलण्यापेक्षा थेट पुरावे द्यावेत. किरीट सोमय्यांना जेलमध्ये टाकावे.

वास्तविक पाहता आज पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते. एकतर सरकार तुमचं ऐकत नाही. राऊत हे सध्या तोंडावर आपटले आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.

“… तर मी राजकारण सोडेन”; पत्रकार परिषदेत संजय राऊतांचे सोमय्यांना आव्हान

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजपवर निशाणा साधला. आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयाच्या पुढे घेण्याचे नियोजन होते. छत्रपती शिवाजी महाराज याच्या राज्यात बाळासाहेब ठाकरे याच्या राज्यात असे कधी घडले नाही. भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केला. ठाकरे कुटुंबीयांनी अलिबागमध्ये १९ बंगले बांधून ठेवले, असे मुलुंडच्या किरीट सोमय्या या दलालाने म्हंटले. त्या दलाला मी आव्हान करतो कि आपण त्या १९ बंगल्यामध्ये पिकनिक काढू. जर ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, असे आव्हान राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात खोटेपणाचा कळस चालला आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांच्या नवे रोज १९ बंगले टीव्हीवर दाखवले जात आहेत. मीही उद्धव ठाकरे यांना विचारले कि कुठे आहेत ते बंगले मलाही दाखवा. किरीट सोमय्या कोर्टात मराठी भाषेच्या विरुद्ध गेले. आणि या भडव्याने मुंबईत मराठी कट्टा चालवला आहे.

आज महाराष्ट्रातही नेत्यांना अडकवण्यासाठी केंद्रीय तपासाचा वापर केला जात आहे. मराठी माणसाविषयी भाजपला द्वेष आहे. आमच्यावर आरोप करण्यात आले कि तुम्ही जमिनीत खरेदी केली. पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे घेतली हे दाखवावं बाराव्या माणसाकडून अशी वास्तविक पाटणकर आणि देवस्थानाचा काही संबंध नाही. आम्ही देवस्थानाकडून जमीनी खरेदी केल्या नाहीत, असा खुलासा राऊत यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणजे “मुलुंडचा दलाल”; संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत घणाघात

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | किरीट सोमय्या म्हणजे मुलुंडचा दलाल आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. मुंबईतील शिवसेना भवनात आज शिवसेनेकडून आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किरीट सोमय्या हा भाजपचा हा दलाल उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगले हडपलल्याचा आरोप करत आहे. मी त्या दलालाला सांगतो की आपण चार बसेस करून पिकनीकला जाऊ, जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडेन. त्याने हिंमत असेल तर ते बंगले दाखवावे, अन्यथा त्या दलालाला आम्ही जोड्याने मारू असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

किरीट सोमय्या याला मराठी माणूस आणि भाषा याबद्दल द्वेष आहे. किरीट सोमय्यांनी काही वर्षापूर्वी मराठी भाषा सक्तीची नसावी असं अपील केलं होतं. हाच तो, भडवा, दलाल, कोर्टात जातो आधी याचं थोबाड बंद करा असे म्हणत त्यांनी सोमय्यांवर घणाघात केला. तुम्ही कितीही हल्ले करा आम्ही शांत बसणार नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून कितीही त्रास दिला तरी आम्ही झुकणार नाही असेही त्यांनी म्हंटल

पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच राऊतांनी केले ‘हे’ पहिले महत्वाचे विधान; म्हणाले की…

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी भाजपचे ‘साडे तीन’ नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केला. दरम्यान त्यांच्याकडून दुपारी पत्रकार परिषद घेऊन नावे जाहीर करणार असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला महत्वाचे आणि मोठे विधान केले. “जय महाराष्ट्र, आजची पत्रकार परिषद हेच सांगण्यासाठी घेतली आहे कि आम्ही कुना गांडूची औलाद नाही. आज खोटे आरोप करून बदनामी केली जात आहे. त्यातून केंद्रीय तपासाचा वापर केला जात आहे. भाजपतील प्रमुख नेते रोज तारखा का देत आहेत? असे महत्वाचे विधान राऊत यांनी केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी ते शिवसेना भवन येथे दाखल झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती लावली होती. त्यांनी शिवसैनिकांना हात उंचावून प्रतिसाद दिला. राऊत यांनी ठीक चार वाजता पत्रकार परिषदेस सुरुवात केली. यावेळी राऊत म्हणाले की, शिवसेना भावनाने अनेक लढे बघितले आहेत. आदरणीय बालासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मन्त्र दिला. ते नेहमी सांगायचे तू जर काही पाप केले नसेल तर कुणाच्या बापाला घाबरू नका. महाराष्ट्रावर तसेच महाराष्ट्रातील मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरु आहे. त्याविरुद्ध कुणी तरी आक्रमण करणे गरजेचे होते. ते करण्यासाठी मला पाठींबा देण्यात आला आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेस राऊत यांच्यासह खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार धैर्यशील माने, अनिल देसाई, मंत्री उदय सामंत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आनंदराव अडसूळ, आदेश बांदेकर आदींची उपस्थिती होती.