Monday, December 22, 2025
Home Blog Page 2803

शहरात मार्च अखेरपर्यंत येणार दोन डबलडेकर बस

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरासाठी दोन इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस मार्चअखेरपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी गुरुवारी दिली.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्मार्ट सिटी प्रशासनाला इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस खरेदी करण्याची सूचना केली होती. स्मार्ट सिटी ने बसेस खरेदी ची तयारी केली असली तरी दीड वर्षांची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात आले. पांडेय यांनी पर्यटन मंत्र्यांना डबल डेकर बसेस मिळण्यात येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून दिली. स्मार्ट सिटीने दोन कंपन्यांशी चर्चा केली असून त्यांनी कमीत कमी दोन डबलडेकर बसेस उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. या बस प्राधान्याने पर्यटकांसाठी वापरण्यात येतील.

महामेट्रोच्या पथकाने शहराचा डाटा घेतला –
शेंद्रा एमायडिसी ते वाळुज पर्यंत एकच उड्डाणपूल आणि मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी बुधवारी महा मेट्रोचे एक पथक शहरात आले. या पथकाने काल स्मार्ट सिटीच्या नवीन कार्यालयात विविध शासकीय कार्यालयांकडून शहराचा डाटा जमा केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खळबळजनक! विहिरीत आढळला मृतावस्थेत बिबट्या

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा परिसरातील एका विहिरीत बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळील विहिरीत बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे. चौधरी कॉलनी परिसरातील महादेव मंदिराजवळ एक विहिर आहे. या परिसराच्या बाजूला शेती असून विरळ वस्ती आहे. हा परिसरात भाविकांचे येणेजाणे असते.

आज दुपारी काही भाविक महादेव मंदिरात दर्शनासाठी आले होते. भाविकांनी उत्सुकते पोटी जवळच्या विहिरीत पाहिले असता मृतावस्थेतील बिबट्या तरंगताना आढळून आला. त्यांनी लागलीच सर्पमित्र संघानंद शिंदे यांना संपर्क करून माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार हा बिबट्या दीड ते दोन वर्ष वयाचा असेल. तसेच एक दिवसांपूर्वी हा बिबट्या विहिरीत पडला असावा.

राष्ट्रवादीने ‘क्रॉंग्रेस’ला पाडले खिंडार

mcp

औरंगाबाद – जिल्ह्यातील गंगापूरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विद्यमान पाच नगरसेवकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षावर नाराज असलेले जाधव हे पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या पक्षांतराने शहरात प्राबल्य असलेल्या काँग्रेस पक्षाला पालिका निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडले आहे. दरम्यान, मागील महिन्यातच मालेगाव मधील काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, आमदार सतीश चव्हाण, खादि ग्रामउद्योग मंडळाचे संतोष माने, तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ, वाल्मिक सिरसाट, फैसल चाऊस यांची उपस्थिती होती. मागील पालिका निवडणुकीचा व अपवाद वगळता जाधव यांची वीस वर्ष्यापासून गंगापूर पालिकेवर पकड आहे. डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकित सेना भाजपाची युती होती तर काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढले होते सेनेचे सर्वाधिक 8 काँग्रेसचे 7 तर 2 नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष झाला होता याच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जाधव यांच्या पत्नी काँग्रेस उमेदवार सुवर्णा जाधव जवळून पराभूत झाल्या होत्या.

विपरीत परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले असतांना देखील पक्षाच्या वतीने गंगापूरकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याने व पालिका निवडणुकीत पाहिजे तसे सहकार्य न मिळाल्याने जाधव यांनी अनेकदा पक्ष श्रेष्टीकडे व शहरात झालेल्या कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती तरी देखील पक्षाने त्यांची दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी अखेर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तालुक्याच्या तुलनेत शहरात कॉंग्रेस मजबूत होती मात्र आता जाधव यांच्या सोबत विद्यमान पाच नगरसेवकांनी ‘घड्याळ’ बांधल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पक्षाला अनेक वार्डात उमेदवार शोधावे लागणार आहे; तर जाधव यांच्या प्रवेशाने पालिकेत सध्या एक देखील नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीची ताकद किती वाढणार हे येणाऱ्या पालिका निवडणुकीत दिसून येईल. यावेळी ज्ञानेश्वर साबने, सुरेश नेमाडे, योगेश पाटील, अशोक खाजेकर, मोहसीन चाऊस या पाच नगरसेवकांसह बाजार समितीचे सहा संचालक तसेच अमोल जगताप, सोपानराव देशमुख, तुकाराम सटाले,राकेश कळसकर, राजेंद्र दंडे नवनाथ कानडे, सचिन भवार,हनिफ बागवान, गुलाम शहा, दिनेश गायकवाड, उमेश बाराहते आदींनी प्रवेश केला.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा तिढा सुटणार

railway shivajinagar

औरंगाबाद – गारखेडा परिसरातील शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक 55 येथील प्रस्तावित पण प्रलंबित भुयारी मार्गाचे काम रेल्वे करणार आहे. त्याचे नकाशे येत्या पंधरा दिवसांत अंतिम होणार आहेत. रेल्वेकडे निधीची तरतूद आहे. कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही दमरेचे विभागीय मुख्य अभियंता के. श्रीनिवास यांनी दिली.

दुसरीकडे भुयारी मार्गाच्या जोड रस्त्यासाठी आवश्यक अठराशे मीटर जागेचे भूसंपादन आणि त्यासाठी भूधारकांना मोजावा लागणारा सहा कोटींचा मावेजा पीडब्ल्यूडी देणार, असे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांनी सांगितले. त्यामुळे भुयारी मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेस लवकरच सुरुवात होईल. एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गाचा ‘संग्राम’ आता लवकरच संपणार असल्याचे संकेत औरंगाबाद येथील पीडब्ल्यूडीच्या मुख्य भवनात, महापालिका, महारेल, पीडब्ल्यूडीतील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिले. ॲड. रूपेश जैस्वाल यांनी शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेद्वारे 2 नोव्हेंबर 2018 मध्ये शिवाजीनगर रेल्वेगेट क्रमांक 55 येथील वाहतूक कोंडीवर उपाययोजना व्हावी यासाठी मुद्दा उपस्थित केला होता. त्यात राज्य शासन, रेल्वे, पीडब्ल्यूडी आणि महापालिकेला प्रतिवादी केले होते.

न्यायालयाने संबंधितांची कानउघाडणी केल्यानंतर शासनाने मनपा, पीडब्ल्यूडी (जागतिक बँक प्रकल्प) आणि रेल्वे अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले होते. त्यात एकमताने अधिकाऱ्यांनी भुयारी मार्ग योग्य असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर भुयारी मार्गासाठी रेल्वेने 38 कोटी 60 लाखांचे अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार केला. त्यात रेल्वे आणि राज्य शासनाने भागीदारी तत्त्वावर भुयारी मार्गाचा प्रश्न सोडवावा असे न्यायालयाचे आदेश देखील मान्य केले. रेल्वेने हिश्‍शातील 16 कोटी 30 लाखांची तरतूद केली. शासनाने देखील 22.05 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी, महापालिका, सार्वजनिक बांधकाम (जागतिक बॅंक प्रकल्प शाखा) उपविभागीय अधिकाऱ्याकडूनदेखील एनओसी मिळाली होती.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा तिढा कायम सुटणार असे वाटत असताना पीडब्ल्यूडीने भूसंपादनापोटी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाच्या सहा कोटींच्या रकमेतील 30 टक्के म्हणजे 1 कोटी 81 लाख रुपयांचा हिस्सा महापालिकेला मागितला. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे म्हणत महापालिकेने शासनाला पत्र पाठवून भुयारी मार्गाचा खर्च आपणच उचलण्याची विनंती केली. यात काम रखडले होते.

बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर : पाटणकर गटाचा धुव्वा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील खुर्द येथील बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या 20 वर्षाच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 12 पैकी 11 जागा जिंकून  सत्तांतर घडविले.

पाटण तालु्क्यातील बेलवडे खुर्द विकास सेवा सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्तांतर करून आपला झेंडा फडकवला. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत सत्ताधारी पाटणकर गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार विजया बबन पवार, अलका बंडू पाटील, गोविंद गणपती कांबळे, यशवंत केशव कवर, अधिक यशवंत पवार, आनंदा विष्णू पवार, बंडू नथुराम पवार, शामराव रामचंद्र सोनार, राजाराम श्रीपती पवार, राजेंद्र निवृत्ती पवार, हणमंत खाशाबा पवार हे विजयी झाले आहेत. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

सर्व विजयी उमेदवारांचे मंत्री शंभूराज देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई यांनी अभिनंदन केले. दरम्यान सत्ताधारी पाटणकर गटाच्या बेलजाईदेवी ग्रामविकास पॅनेलचे बबन पांडूरंग पवार हे केवळ एक उमेदवार या निवडणूकीत विजयी झाले.

वीस वर्षानंतर पाटणकर गटाला भगदाड..!

बेलवडे विकास सेवा सोसायटीवर गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाची तब्बल 20 वर्षे सत्ता होती. मात्र यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आणि मनसे या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने 12 पैकी 11 जागावर दणदणीत विजय मिळवून विरोधी पाटणकर गटाच्या 20 वर्षाच्या सत्तेला भगदाड पाडून सत्तांतर केले.

माझी वसुंधरा : मलकापूर नगरपरिषदेकडून शनिवारी सायकल महारॅलीचे आयोजन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सन 2020- 21 या सालामध्ये माझी वसुंधरा 1.0 हे अभियान हाती घेतले होते. या अभियानामध्ये राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी सहभाग नोंदविला होता. मलकापूर नगरपरिषदेने सुध्दा माझी वसुंधरा 1.0 या अभियानामध्ये सहभागी झाली होती.

मलकापूर नगरपरिषदेने माझी वसुंधरा 1.0 अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल मलकापूर नगरपरिषदेस राज्यामध्ये तृतीय क्रमांकांचे मानांकन देऊन गौरविण्यात आलेले आहे. माझी वसुंधरा 1.0 नंतर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा 2.0 हे अभियान हाती घेतले असून, या अभियानामध्ये सुध्दा मलकापूर नगरपरिषदेने सहभाग नोंदविला असून, मलकापूर शहरातील नागरिकांची पर्यावरण जनजागृती व्हावी. याकरिता शनिवार, दि. 12/02/2022 रोजी सकाळी ठिक 6.30 वाजता ढेबेवाडी फाटा, मलकापूर (पोलिस मदत केंद्रानजीक) या ठिकाणाहून पर्यावरण जनजागृती सायकल महारॅलीचे आयोजन करणेत आलेले आहे. सदर रॅलीचा उद्घाटन समारंभ कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.

तरी मलकापूर शहरातील सर्व नागरिकांनी सायकल महारॅलीस उपस्थित राहणेचे आवाहन मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष तथा सभापती, पाणी पुरवठा, स्वच्छता व जलः निस्सारण समिती श्री. मनोहर भास्करराव शिंदे, श्री. राजेंद्र प्रल्हाद यादव बांधकाम समिती सभापती, सौ. पुजा गणेश चव्हाण सभापती नियोजन व शिक्षण समिती, सौ. गितांजली शहाजी पाटील सभापती महिला व बालकल्याण समिती तसेच मुख्याधिकारी श्री. राहुल मर्ढेकर यांनी केले.

सायकल रॅलीचा मार्ग असणार पुढीलप्रमाणे

ढेबेवाडी फाटा -इमर्सन कंपनी- ढेबेवाडी फाटा- कोल्हापूर नाका- मोहिते हॉस्पिटल- पीडी पाटील उद्यान मार्गे बैल बाजार रोड- लक्ष्मी नगर असा राहील, असे संयोजकांनी सांगितले आहे.

ICICI बँकेचा ग्राहकांना झटका !! आता लेट पेमेंटसाठी भरावे लागणार 1200 ते 500 रुपये चार्ज

ICICI Bank

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. कारण त्याचा थेट संबंध तुमच्या खिशाशी आहे. वास्तविक, ICICI बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व्हिस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की,”10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्ड लेट फीस, कॅश ऍडव्हान्स ट्रान्सझॅक्शन चार्ज, चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”

बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ICICI बँकेने एमराल्ड क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर क्रेडिट कार्डची लेट पेमेंट फीस बदलली आहे. जर तुमची एकूण थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी असेल, तर बँक तुमच्याकडून काहीही आकारणार नाही. थकबाकी जितकी जास्त असेल तितके शुल्क जास्त असेल. 50,000 किंवा त्याहून अधिकच्या थकबाकीसाठी, बँक जास्तीत जास्त 1200 रुपये आकारेल. बँकेचे नवीन दर 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.

ICICI बँक क्रेडिट कार्डवरील चार्ज अपग्रेड केले
>> पेमेंटची रक्कम 100 रुपयांपेक्षा कमी असल्यास लेट फीस आकारली जाणार नाही
>> 100 रुपये ते 500 रुपयांच्या दरम्यानच्या पेमेंट रकमेसाठी 100 रुपये आकारले जातील
>> 500 पर्यंतच्या पेमेंट रकमेसाठी 501 रुपये ते 5000 रुपये
>> 10,000 पर्यंतच्या पेमेंट रकमेसाठी 750
>> 25000 रुपयांपर्यंतच्या पेमेंट रकमेसाठी 900 रुपये
>> 50,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंट रकमेसाठी 1000 रुपये
>> 50,000 रुपयांपर्यंतच्या पेमेंट रकमेसाठी 1200 रुपये

याशिवाय ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून 20 हजार रुपयांपर्यंतची कॅश काढण्यासाठी 500 रुपये आकारले जातील. यापेक्षा जास्त पैसे काढल्यास 2.5 टक्के लेट फीस आकारली जाईल. चेक रिटर्न आणि ऑटो डेबिट रिटर्नच्या बाबतीत, किमान 500 रुपये दंड आकारला जाईल.

प्रत्येक बँकेसाठी लेट पेमेंट फीस वेगळी आहे. उदाहरणार्थ, HDFC बँक आणि SBI सारख्या प्रमुख बँका 50,000 रुपयांपेक्षा जास्त थकबाकीवर 1,300-1,300 रुपये लेट फीस आकारतात. त्याच वेळी, एक्सिस बँक यासाठी 1,000 रुपये आकारते.

ITR मध्ये चूक झाल्यास तो किती वेळा अपडेट करता येईल? चला जाणून घ्या

ITR

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स भरणारे त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) एका मूल्यांकन वर्षात फक्त एकदाच अपडेट करू शकतील. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) चे अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी बुधवारी सांगितले की,”या तरतुदीचा उद्देश अशा लोकांना संधी देणे आहे ज्यांच्याकडून ITR मध्ये कोणती माहिती माहिती देण्याची राहून गेली आहे किंवा कोणतीही चुकीची माहिती भरली आहे किंवा जे काही कारणांमुळे ते भरू शकलेले नाहीत.”

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कार्यक्रमात बोलताना, महापात्रा म्हणाले की,” 2022-23 च्या अर्थसंकल्पात अशा करदात्यांना ITR दाखल करण्याच्या दोन वर्षांच्या आत तो अपडेट करण्याची परवानगी दिली गेली ज्यांनी काही चुका केल्या आहेत किंवा चुकीचा तपशील टाकला आहे किंवा माहिती देण्याची राहून गेली आहे. असे करदाते आता कर भरून आपला ITR अपडेट करू शकतील.”

करदात्यांच्या मनात विश्वास निर्माण होईल
सध्या असा नियम आहे की, जर करदात्याने ITR भरला नाही तर तो स्वत:च्या इच्छेने रिटर्न भरू शकत नाही. नोटीस मिळाल्यावर किंवा आयकर विभागाची परवानगी मिळाल्यानंतर विभागाच्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ITR भरण्यास सूट दिली जाते. रिटर्न भरण्याचा एक लांब आणि गुंतागुंतीचा नियम आहे. नवीन नियम यापासून मुक्तता देतो आणि करदात्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो.

अतिरिक्त कर भरावा लागेल
महापात्रा म्हणाले की,”अपडेट केलेला ITR 12 महिन्यांच्या आत दाखल केल्यास थकीत कर आणि व्याजावर 25 टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. जर करदात्याने 12 महिन्यांनंतर त्याचे अपडेटेड रिटर्न फाइल केले, तर पेमेंटची रक्कम 50 टक्क्यांपर्यंत वाढेल. मात्र, ते संबंधित मूल्यांकन वर्षाच्या 24 महिन्यांच्या आत दाखल करणे आवश्यक आहे.”

त्यांना सुविधेचा लाभ मिळणार नाही
CBDT चेअरमन म्हणाले की,”ही सुविधा सर्व करदात्यांना मिळणार नाही. जर करदात्याला कोणत्याही मूल्यांकन वर्षासाठी नोटीस देऊन खटला चालवण्याची कारवाई सुरू केली गेली असेल, तर त्याला ITR अपडेट करण्याचा लाभ मिळणार नाही. तसेच, जर करदात्याने अपडेटेड ITR दाखल केले मात्र अतिरिक्त कर भरला नाही, तर त्याचा ITR इनव्हॅलिड होईल.”

पुणे- मिरज रेल्वे दुहेरीकरण भूसंपादनासाठी सातबारानुसार जमिनीची मोजणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- मिरज रेल्वे दुहेरीकरण भूसंपादनासाठी आज कोपर्डे हवेली येथील शेतकऱ्यांची यादववाडी हद्दीतील एकूण 10 गट नंबरची जमिनीची सयुंक्त मोजणी सातबारानुसार करण्यात आली. रेल्वेच्या हद्दीचे कोणतीही कागदपत्रे पुरावे नसल्याने शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेखाकडील गटांच्या रेकॉर्डनुसार मोजणी करण्यात आली. कोपर्डे हवेली येथील अजून जवळपास 90 शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा भूसंपादन प्रस्ताव रेल्वे विभागाने तयार करून त्याची सयुंक्त मोजणी करावी आणि शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कोपर्डे हवेलीचे ग्रामस्थ व शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

रेल्वे दुहेरीकरणासाठी कराड तालुक्यातील रेल्वे शेजारील जमीनी प्रकल्प बाधित होत आहेत. दुहेरीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचा भूसंपादन प्रस्ताव तयार करण्यासाठी रेल्वेने खाजगी सर्व्हे कंपनीला ठेका दिला होता. सदर ठेकेदार कंपनीने शेतकऱ्यांच्या रेल्वेलगत जमिनीचा सरसकट सर्व्हे न करता काही रेल्वे शेजारील गट वगळले होते. या विरोधात शेतकरी संघटनेने आवाज उठवला होता. कोपर्डे हवेली, पार्ले, ब्रिटिश शिरवड़े, विरवड़े, टेंभू, सयापुर, हजारमाची येथील प्रस्तावातून वगळलेल्या गटांचा रेल्वे भूसंपादनात समावेश करावा, अशा मागणीचे निवेदन वेळोवेळी संघटनेने दिलेले होते.

कोपर्डे हवेली येथील सर्व रेल्वे रूळाशेजारील सर्व गटांची सयुंक्त मोजणी होवून भूसंपादन प्रस्ताव तयार झाल्याशिवाय आम्ही आमची जमीन देणार नसल्याचे निवेदन रयत क्रांति संघटनेच्यावतीने सचिन नलवडे, कोपर्डेचे जेष्ठ नेते सुदाम चव्हाण, भरत चव्हाण, मोहन चव्हाण, बाळसाहेब चव्हाण, तानाजी चव्हाण, अशोक चव्हाण यांनी दिले होते.