Monday, December 22, 2025
Home Blog Page 2804

“चंद्रकांतदादांनी आपण काय बोलतो याचे भान ठेऊन एकदा आत्मचिंतन करावे”; अजित पवारांचा टोला

Ajit Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अजित पवार यांनी आयुष्यभर लोकांचे पैसे आणि जमिनी लाटण्याचं काम केले, असा आरोप केला होता. त्याच्या आरोपावर आता पवारांनीही उत्तर दिले आहे.” आपण एखाद्याबद्दल काय बोलतो याचे भान बाळगले पाहिजे. त्यांनी एकदा आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही’, असा टोला पवार यांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गंगापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवक पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चंद्रकात पाटील यांचा पक्ष केंद्रात सत्तेत आहे. त्यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी काही तरी पुरावे द्यावेत. मी सकाळी लवकर उठून संध्याकाळपर्यंत काम करत असतो. मंत्रालयात सकाळी 8 वाजता हजर असणारा मी एकमेव मंत्री आहे आणि उशिरापर्यंत बसून मी तिथे माझ्यापरीनं काम करत असतो. ते काम योग्य की अयोग्य हे जनता त्याठिकाणी ठरवेल.

मात्र, आपण काय बोलतो याचे भान बाळगणे गरजेचे आहे. हेलिकॉप्टरमधून जाताना कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते, कितीजण जाणार याची माहिती द्यावी लागते. ते मोठी व्यक्ती आहेत. पण उचलली जीभ लावली टाळ्याला असे करून चालत नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी एकदा आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करावे, की आपण काय बोलतो आणि ते वस्तुस्थितीला धरुन आहे का? असा सवाल पवार यांनी यावेळी विचारला.

शिक्षणा बरोबरच व्यक्तीमत्व विकास होणे आवश्यक : रचना पाटील

खटाव | उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे असुन त्यामुळे विद्यार्थांनी व्यक्तीमत्व विकास व संभाषण कौशल्य आत्मसात केले पाहिजे असे मत श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा रचना सारंग पाटील यांनी व्यक्त केले.

वडगाव ज.स्वा (ता.खटाव) येथे श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व जयराम स्वामी विद्यामंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली,त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विकास घार्गे, प्राचार्य संजय पिसाळ, उपाध्यक्ष अंकुश घार्गे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रचना पाटील पुढे म्हणाल्या, शाळा, कॉलेज मध्ये विद्यार्थी भविष्याची स्वप्ने पाहत असतो. मात्र उज्वल भविष्य घडविण्यासाठी उत्तम संभाषण कौशल्य असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वताचे ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी स्वताला झोकून देवुन प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन ते साध्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवले पाहिजे, यश मिळालेच पाहिजे. यासाठी प्रयत्न केला पाहिजे, चिकित्सक व जागरूक बुद्धीचा व प्रभावी संभाषण कौशल्य असलेला विद्यार्थी हा कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होतो. विद्यार्थी घडविणे हाच या कार्यशाळेमागचा विचार आहे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले.

यावेळी अध्यक्ष डाॅ. विकास घार्गे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास व्हा. चेअरमन अंकुश घार्गे, डॉ. गिता घार्गे, अविनाश काशीद, रामचंद्र बरकडे, काशिनाथ दुटाळ, अरुण जाधव, जे. बी. घार्गे, रमेश लहारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सचिन पवार यांनी केले. आभार पर्यवेक्षक बाळासाहेब घाडगे यांनी मानले.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने करदात्यांना पाठवले 1.67 लाख कोटी रुपये; तुम्हांला मिळाले नसल्यास येथे करा तक्रार

Money

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंटने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 7 फेब्रुवारीपर्यंत 1.87 कोटींहून जास्त करदात्यांना 1.67 लाख कोटींहून अधिकची रक्कम रिफंड केली आहे. हा आकडा 1 एप्रिल 2021 ते 7 फेब्रुवारी 2021 दरम्यान केलेल्या रिफंडचा आहे. यापैकी 28,704.38 कोटी रुपयांचे 1.48 कोटी रिफंड मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आहेत. यामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स रिफंड 59,949 कोटी रुपये होता, तर कॉर्पोरेट्सचा टॅक्स रिफंड 1,07,099 कोटी रुपये होता.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ट्विट करून सांगितले की, “CBDT ने 1 एप्रिल 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 दरम्यान 1.87 कोटी करदात्यांना 1,67,048 कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. यापैकी 1.85 कोटी पर्सनल आयकरदात्यांना 59,949 कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. तर 2.28 लाख प्रकरणांमध्ये 1,07,099 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड करण्यात आला आहे.”

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, प्राप्तिकर विभागाने 2.38 कोटी करदात्यांना 2.62 लाख कोटी रुपयांचा टॅक्स रिफंड जारी केला होता. हे 2019-20 या आर्थिक वर्षात जारी केलेल्या 1.83 लाख कोटी रुपयांच्या रिफंडच्या तुलनेत 43.2 टक्के जास्त आहे.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन वेबसाइटवरून रिफंडचे स्टेट्स तपासा-
>> सर्वप्रथम तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.
>> यूझर आयडी आणि पासवर्ड टाका.
>> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ई-फायलिंगचा पर्याय दिसेल.
>> आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न निवडा
>> त्यानंतर View File Return वर क्लिक करा.
>> आता तुमच्या आयटीआरचे डिटेल्स दाखवले जातील.

तुम्ही घरबसल्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे तक्रार करू शकता
कोणताही त्रास न होऊनही रिफंड आला नसेल, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे तक्रार करता येईल. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने यासाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. करदाते इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या ई-फायलिंग पोर्टलद्वारे देखील तक्रारी नोंदवू शकतात.

HARC संस्थेकडून पाथरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात मासिक पाळी समुपदेशन कार्यशाळेचा उपक्रम !

परभणी |  परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे तर्फे बुधवारी (दि.नऊ) पाथरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय  येथे 120 किशोरवयीन मुलीसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारी रोजी आयोजीत या कार्यशाळेत 120 किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्याध्यापिका प्रा पंडित, श्रीमती बोराडे, श्रीमती अरद्वाड , श्रीमती त्रीमले, श्रीमती रंगे , श्रीमती कांबळे  यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉ सौ .आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस तसेच शाश्वत पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. या समुपदेशन सत्रात 120 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले. शेवटी तितक्याच मुलींची 20 प्रश्नांची स्वयंअध्ययन चाचणी घेण्यात आली.

तसेच ‘मेन्स्ट्रुपेडिया’ या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.

कोणतेही शासकीय मदत किंवा मानधन न घेता समुपदेशन करणारी  टीम –

एचएआरसी संस्थेतील टीम सदस्य डॉ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, कु क्षितिजा तापडिया, प्रा अंजली जोशी, प्रा विशाका हेलसकर या मासिक पाळी समुपदेशन उपक्रमात स्वतःच्या व्यस्त नियोजन सांभाळून शासनाकडून किंवा संबंधित संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च न घेता काम करत आहे. एचएआरसी संस्था  सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून लोकसहभागातून मागील 2019 पासून संपूर्ण जिल्ह्यात मासिक पाळी समुपदेशन चे कार्य करत आहे.

पार्श्वभूमी:  एचएआरसी संस्थे तर्फे मागील 2019 पासून आजवर संपूर्ण परभणी, हिंगोली, वाशीम व बीड  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 206 शाळेतील 16935 किशोरवयीन मुलींचे मासिक पाळी विषयी समुपदेशन करून 9565 गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.
मुलींनी परखडपणे व्यक्त केल्या भावना:  अनेक विद्यार्थिनींनी स्टेजवर येऊन मनमोकळेपणे आपल्या मनातील प्रश्न, शंका  ना केवळ व्यक्त केल्या तर मासिक पाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज विषयी परखडपणे भाष्य केले व विज्ञानवादी विचार व्यक्त केले। एचएआरसी टीमने त्यांच्या प्रश्नांचे शास्त्रोक्त उत्तराने समाधान केले.

प्रास्ताविक प्रा पद्मा भालेराव यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, क्षितिजा तापडिया यांनी प्रयत्न केले.

“भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर अगोदर गडकरींपासून सुरु करा,”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून केंद्र सरकारकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या मुद्यांवरून आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी अगोदर गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले होते, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. केला.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, “संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याआधी सुरुवात नितीन गडकरी यांच्या घरापासून केली पाहिजे. कारण त्यांच्या कंपन्या नकली होत्या हे त्यावेळी सिद्ध झाले होते. केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.

मात्र, भाजपात नसतील ते भ्रष्टाचारी असे सुरू आहे. विरोधात असतील, मोदी सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांवरच कारवाई करायचे षडयंत्र भाजपा केंद्रात बसून करत आहे. हे चुकीचं आहे. म्हणून भाजपाने आधी आपली घरं तपासली पाहिजे. कारण नोटबंदीच्या काळात कुणाच्या बँक खात्यात जास्त व्यवहार झाले हेही तपासले पाहिजे. स्वतः भ्रष्टाचारी असताना इतरांच्या घरांवर दगड मारण्याचा प्रकार सुरू आहे. संजय राऊत एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत, असेही पटोले यांनी यावेळी म्हंटले.

शेवटी जनता निवडणुकीतच कोण दादा आहे ते ठरवत असते; दरेकरांचा राऊतांवर पलटवार

RAUT DAREKAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिवसेना मधील दरी आणखी वाढत चालली आहे. मुंबईत शिवसेनाच दादा आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. शेवटी जनता निवडणुकीत कोण दादा आहे ते ठरवत असते असा टोला त्यांनी लगावला.

प्रवीण दरेकर म्हणाले, शेवटी जनता निवडणुकीत कोण दादा आहे ते ठरवत असते. लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल मुंबईतील जनतेने भाजपाला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांच्या दादागिरीला चाप लावला आहे असे प्रवीण दरेकरांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, संजय राऊत किंवा शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही. या महाराष्ट्रात अनेक पक्ष, अनेक नेते आहेत. प्रत्येक नागरिकाचा महाराष्ट्रावर अधिकार आहे, त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे आपल्या कुणाची खासगी मालमत्ता असल्यासारखे बोलण्याचे कारण नाही.

World Pulses Day :डाळींच्या उत्पादनात भारतच अग्रेसर; जगातील 24 टक्के उत्पादन भारतातच

नवी दिल्ली । दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन’ (World Pulses Day) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश (Purpose Of Celebrating World Pulse Day) लोकांना डाळींचे महत्त्व पटवून देणे आणि पोषण तसेच अन्नसुरक्षेसाठी कडधान्ये किती महत्त्वाची आहेत हे सांगणे आहे. कडधान्ये हा भारतीयांच्या आहाराचा भाग आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा कडधान्य उत्पादक देश आहे आणि त्याचा सर्वाधिक वापरही होतो. भारताची वार्षिक डाळींची मागणी सुमारे 250 लाख मेट्रिक टन आहे.

‘आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन’ पहिल्यांदा 2016 मध्ये साजरा करण्यात आला. नंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 10 फेब्रुवारी हा जागतिक कडधान्य दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कडधान्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डाळींचे महत्त्व पटवून देण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

भारत: उत्पादन आणि वापरात पहिला क्रमांक
जगात उत्पादित होणाऱ्या एकूण डाळींपैकी 24 टक्के डाळींचे उत्पादन भारतात होते. अशाप्रकारे भारत हा डाळींचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे. त्याच वेळी, भारतीय देखील जगात सर्वाधिक कडधान्य खातात. भारत जेव्हा जागतिक बाजारपेठेतून डाळ विकत घेतो तेव्हा जगभरात डाळी महाग होतात, अशी एक म्हण बाजारात आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत भारताने डाळींची उत्पादकता 140 लाख टनांवरून 240 लाख टनांपर्यंत वाढवली आहे. 2019-20 मध्ये, भारताने 23.15 मिलियन टन डाळींचे उत्पादन केले, जे जगाच्या 23.62% आहे. 2020-21 या वर्षात जगभरात 2,116.69 कोटी रुपयांची 296,169.83 मेट्रिक टन डाळींची निर्यात करण्यात आली.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 2021-22 साठी मुख्य खरीप पिकांच्या उत्पादनाच्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार, 2021-22 मध्ये एकूण कडधान्य उत्पादन 9.45 मिलियन टन इतके अनुमानित आहे. हे सरासरी खरीप कडधान्य उत्पादन 8.06 मिलियन टनापेक्षा 1.39 मिलियन टन जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कडधान्य क्षेत्रातही 50 हजार हेक्टरने वाढ झाली आहे. भारतात रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात डाळींचे उत्पादन घेतले जाते. भारताच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि इतर कार्यक्रमांमध्ये कडधान्यांचे प्रमुख स्थान आहे. कडधान्यांच्या इतिहासात 2017-18 हे वर्ष आहे जेव्हा सर्वाधिक 254.1 लाख (25.41 मिलियन ) टन डाळींचे उत्पादन झाले.

उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न
भारतात डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना डाळी पिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना चांगल्या वाणांचे बियाणे देणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी या योजनेवर सरकारने सुमारे 300 कोटी रुपये खर्च केले होते. सरकारच्या प्रयत्नांचे परिणामही समोर येत आहेत. सन 2022 मध्ये डाळींच्या उत्पादनाखालील क्षेत्रात सुमारे 50 हजार हेक्टरने वाढ झाली आहे.

डाळी हा प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत आहे
अन्नामध्ये कडधान्ये महत्त्वाची आहेत कारण त्यामध्ये भरपूर पौष्टिक अन्न आणि प्रथिने असतात. भारतीय संस्कृतीसाठी विशेषतः महत्वाचे, कारण आपण मुख्यतः शाकाहारी आहोत आणि आहारात कडधान्यांचा समावेश होतो. शेंगा पिकांमध्ये पाण्याचा वापर कमी असतो. कडधान्ये कोरडवाहू आणि पावसाच्या प्रदेशात घेता येतात. हे जमिनीतील नायट्रोजनचे संरक्षण करून जमिनीची सुपीकता सुधारते, त्यामुळे खतांची गरज कमी होते आणि त्यामुळे ग्रीन हाउसमधील वायूंचे उत्सर्जन कमी होते. पिवळ्या मूग डाळीमध्ये प्रथिने, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. पोटॅशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असलेल्या या मसूरमध्ये फॅट अजिबात नसते.

Share Market : सेन्सेक्स 460 तर निफ्टी 17600 अंकांच्या वर बंद

Stock Market

नवी दिल्ली । विकली एक्सपायरीच्या दिवशी क्रेडिट पॉलिसीच्या निर्णयांमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे. ट्रेडिंगचाच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 460.06 अंकांच्या किंवा 0.79 टक्क्यांच्या वाढीसह 58,926.03 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 142 अंकांनी म्हणजेच 0.81 टक्क्यांच्या वाढीसह 17605.80 वर बंद झाला.

ओएनजीसी, टाटा स्टील, इन्फोसिस, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी बँक हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले तर मारुती सुझुकी, बीपीसीएल, श्री सिमेंट्स, आयओसी आणि अल्ट्राटेक सिमेंट टॉप लुझर्स ठरले.

RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेने व्याजदरात बदल केला नाही
विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी आपले नवीन क्रेडिट पॉलिसी जाहीर केली. RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4 टक्के कायम ठेवला आहे. त्याच वेळी, रिव्हर्स रेपो दर देखील 3.35 टक्के राहील.

LIC IPO: LIC 11 फेब्रुवारी रोजी SEBI कडे DRHP सादर करेल
देशातील सर्वात मोठी लाईफ इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC ने आपला इश्यू आणण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. LIC 11 फेब्रुवारी रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस म्हणजेच DRHP सादर करणार आहे. सरकार किती स्टेक विकणार आहे, हे DRHP दाखल केल्यानंतर कळेल. सरकारने निर्णय घेतला आहे की इश्यूचा काही भाग LIC च्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवला जाईल. यासोबतच त्यांना यात काही सूटही दिली जाणार आहे.

“चंद्रकांत पाटील तुम्ही किती कामं केलं कागदावर सांगा”; बाळासाहेब थोरातांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना माहिती आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्ते फिल्डवर होते, अशी टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पाटील यांना टोला लगावला. “चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावरती बोलण्याआधी तुम्ही कोरोना काळात किती काम केलं हे कागदावर सांगावे, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी कोरोना काळात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो त्याचबरोबर महसूलमंत्री म्हणून जिल्हा यंत्रणा सांभाळत होतो. या काळात सर्व ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत होते. तरीही कोरोना काळात वाढलेल्या कोरोनावरून टीका केली जात आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. ते पडण्याची कुठलीही शक्यता नाही. भाजपचे नेते जरी बोलत असले तरी त्यांनी कार्यकर्ते आणि त्यांच्या आमदारांसाठी बोलावं लागतं त्याशिवाय कार्यकर्ते, आमदार राहणार नाहीत. आज मोठ्या प्रमाणात केंद्रीय तपास संस्था वापरल्या जात आहेत. त्याचा वापर करून एखाद्याच्या कुटुंबियांपर्यंत तपास करुन त्रास देणं हे निश्चित दुर्देवी आहे. लोकशाहीमध्ये मतमतांतरे असू शकतात पण त्याचा असा गैरवापर करू नये अशी अपेक्षा असते. पण भाजप तेच काम आता करत आहे.

गोव्यामध्ये परिवर्तन हे निश्चित – थोरात

गोवा विधानसभा निवडणुकीमुळे गोवा तसेच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात गोव्यात भाजपच्याच सत्ता येणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. या दरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गोवा विधानसभा निवडणुकीतील विजयाबाबत मोठे विधान केले आहे. गोव्यामध्ये भाजप सरकार ज्या पद्धतीने चालले आहे. त्याला लोक कंटाळली आहेत. या ठिकाणी यंदा परिवर्तन निश्चित आहे, असे थोरात यांनी म्हंटले आहे.

अधिवेशनाच्या काळातच मुख्यमंत्री आजारी का पडतात? सुटका होताच राणेंचा घणाघात

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या तब्बेतीवरून विरोधकांनी टीका केली होती. आज न्यायालयीन कोठडीतून सुटका होताच नितेश राणे यांनी विरोधकांना समाचार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा ईडी कारवाईची वेळ येते किंवा सरकार पडण्याची वेळ येते तेव्हाच मुख्यमंत्री आजारी का पडतात असा सवाल त्यांनी केला.

नितेश राणे म्हणाले, मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हा सगळा आरोग्याचा विषय आहे तो न्यायालयीन कोठडी आहे म्हणून करतोय, अस म्हणणारे, जे काही लोक माझं शूगर लेव्हल तपासायचे ते काय खोटे होते का?? 152 ब्लड प्रेशर होत. मी काय मशीनमध्ये बोट घातलं होत का कुणाच्याही तब्येतीवर असा प्रश्न विचारण हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस आहे का? असा सवाल त्यांनी केला.

मी बोललो तर अनेकांना बीपीचा त्रास सुरू होईल अस म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सरकार पडण्याची वेळ येते. ईडीची कारवाई होते, तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा कसा येतो? हा प्रश्न आम्ही विचारावा का? अधिवेशनावेळीच मुख्यमंत्री आजारी का पडतात? मविआच्या नेत्याना ईडीच्या कारवाईवेळीच कोरोना कसा होतो? असा सवाल नितेश राणे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, मी पोलिसांसमोर स्वतः सरेंडर झालो. ज्या दिवशी मी हजर राहिलो त्यावेळी मला सर्वोच्च न्यायलयाचं प्रोटेक्शन होते. तरीही मी हजर राहिलो, मला ज्याप्रमाणे अडवण्यात आलं. माझ्या कार्यकर्त्यांवर चुकीचे आरोप लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामुळे मी विचार केला की कुणालाही तसेच सिधुदूर्गच्या जनतेला यापुढे त्रास नको म्हणून मी सरेंडर झालो. पण म्हणजे मला हे सरकार अटक अजूनही करू शकले नाहीये. मी स्वतः च सरेंडर झालो आहे..