Monday, December 22, 2025
Home Blog Page 2802

पूरग्रस्तांच्या मदतीत गोंधळ, अव्वल कारकुनासह तीन लिपिक निलंबित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महापूर मदत वाटपात गोंधळाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज तहसील कार्यालयातील अव्वल कारकून व तीन लिपिक अशा चाैघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. २०१९ मधील महापुराने बाधित अनेक नागरिक व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारीबाबत ही कारवाई करण्यात आली. मदत वाटप करताना लाभार्थ्याचे नाव, आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक चुकल्याने शेकडो पूरग्रस्तांना बँक खात्यावर शासनाची मदत जमा झाली नाही.

शासनाच्या मदत वाटपाची जबाबदारी तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून राम टिकारे, लिपिक अभिजित गायकवाड, चेतन जाधव, शुभम कांबळे यांच्यावर होती. कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या पूरग्रस्तांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चाैधरी यांनी तक्रारींची पडताळणी करून मदत वाटपातील गोंधळाला जबाबदार ठरवत चाैघांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी एमआयएमकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कर्नाटक राज्यातील उडपीमध्ये मुस्लीम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थीनींना हिजाब घालव्यास विरोध करणार्‍या भाजपा व विश्व हिंदू परिषदेच्या प्रेरीत गावगुंडांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच कर्नाटकात जातीय सलोखा राखण्यात असमर्थ ठरल्याने राज्य सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी एमआयएमच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. कर्नाटकातील काही गावातील शाळा व कॉलेजमध्ये मुस्लीम समाजातील मुलींनी हिजाब घालून आल्यामुळे त्यांना शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश दिला नाही.

जातीयवादी भाजप सरकारने चुकीचा आदेश काढला आहे. त्यामुळे भाजपा विश्वहिंदु परिषदेचे कार्यकर्ते अप्रत्यक्षरीत्या हिजाब घातलेल्या मुलांना शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश करण्यात विरोध करुन जय श्रीराम अशा घोषणा देऊन या विषयाला अतिशय व धार्मिक रंग देण्याचा प्रकार करीत आहेत. शाळा व कॉलेजमध्ये शिकणार्‍या मुलींना हिजाब घालण्यास विरोध करणार्‍या गावगंवर तात्काळ कडक कारवाई करावी.

तसेच कर्नाटक राज्यात काही दिवसांपूर्वी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची दोन वेळा विटंबना झाली. महात्मा बसवेश्वर महाराज यांची विटंबना झाली. हजरत टीपू सुलतान यांचे विषयी वादग्रस्त वक्तव्य प्रख्यात अली व रावेदकडून केले. हिंदू-मुस्लिम दंगल होईना, म्हणून शेवटी हा हिजाबचा विषय काढून कर्नाटकासह देशभर या विषयामुळे जातीय तणाव व अशांतता तथा कर्नाटकातील भाजप सरकारमुळे निर्माण झालेली आहे. या सर्व वादग्रस्त धरून कर्नाटक सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केली.

पहिली ते नववीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर

औरंगाबाद – पहिली ते नववीच्या मार्चअखेर होणाऱ्या परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील असा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला. 15 एप्रिल पर्यंत शिक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत पूर्णवेळ शाळा भरून अध्ययनक्षती भरून काढावी. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंतचा प्रत्यक्ष शिक्षणाचा सूक्ष्म कृती आराखडा शाळांना, डाएट शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली.

सर्वच व्यवस्थापनाच्या शाळेत 30 एप्रिल पर्यंत प्रत्यक्ष शिकवण्याचे नियोजन यापूर्वीच शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून करण्यात आले होते. अध्ययनक्षती भरून काढण्यासाठी शाळा आणि शिक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी दरवर्षी मार्च अखेर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होऊन पुढील 20 दिवस निकालाची प्रक्रिया सुरू असते. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत प्रत्यक्ष शिक्षण व त्यानंतर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्याचा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला.

पूर्णवेळ शाळा भरवा –
सर्व शाळात शंभर टक्के शिक्षकांची उपस्थिती व पूर्णवेळ शाळा भरतात की नाही, याची पडताळणी करून सूचना न मानणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशा सूचना शिक्षणाधिकारी देशमुख यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना झालेल्या बैठकीत दिल्या.

ऑनलाईन कॅसिनो अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

खणभाग परिसरात असणार्‍या बदाम चौक येथील एका गाळ्यात सुरू असणार्‍या ऑनलाईन कॅसिनो जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत चौघांना ताब्यात घेतले. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कॉन्स्टेबल गणेश कांबळे यांनी कारवाई केली. या ठिकाणाहून एक मोबाईल, तीन कॉम्पुटर आणि रोख रक्कम असा एकूण 61 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अड्डा मालकासह चौघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. जुगार मालक युसूफ सलीम शेख, कामगार समीर शब्बीर बेग, सागर वसंत सपाटे आणि शाम शिवाजी कुकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सांगली व मिरज हे कॅसिनो सिटी झाल्याचा आरोप भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी आता कारवाई करण्यास रसुरुवात केली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या बदाम चौकातील एका सेवन स्टार नावाच्या गाळ्यात ऑनलाईन कॅसिनो जुगार अड्डा सुरू होता. याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कॉन्स्टेबल गणेश कांबळे यांनी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी अड्डा मालक युसूफ शेख हा बेकायदेशीर कोणताही परवाना नसताना स्वतःच्या फायद्यासाठी कॅसिनो अड्डा सुरू केल्याचे निष्पन्न झाले.

तसेच कामगार समीर बेग याला पैसे देऊन एका गिर्‍हाइकामागे 1 रुपयास 36 रुपये असे ज्यादा रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून हा अड्डा सुरू केला होता. याठिकाणी कॅसिनो गेम खेळण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणाहून एक मोबाईल, तीन कॉम्प्युटर आणि रोख रक्कम असा एकूण 61 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जागेच्या वादातून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज-पंढरपूर रस्त्यावर राहणार्‍या जयंतीलाल मुलजी ठक्कर यांना जागेच्या वादातून त्यांच्या शेजारी राहणार्‍या राहुल मोरे याने केलेल्या जबर मारहाणीत ठक्कर यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राहुल मोरे याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, जयंतीलाल मोरजी ठक्कर यांचा मुलगा मयूर जयंतीलाल ठक्कर यांचा शेजारीच राहणार्‍या राहुल मोरे यांच्यासोबत घर जागेचा वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास राहुल मोरे व मयूर ठक्कर यांच्यात वादास सुरुवात झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर बाहेर कोणाचे भांडण चालले आहे म्हणून जयंतीलाल ठक्कर आले व त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी संतप्त राहुल मोरे याने जयंतीलााल ठक्कर यांना तू मध्ये पडू नकोस म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जोरात ढकलून दिले. जोरात ढकलल्याने जयंतीलाल दगडावर पडले आणि बेशुद्ध झाले. त्यावेळी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल राहुल मोरे यांच्या विरोधात ठक्कर कुटुंबियांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी राहुल मोरे यास ताब्यात घेतले आहे.

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, आजचा भाव पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.49 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.49 टक्क्यांनी घसरून 48,715 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 1.10 टक्क्यांच्या घसरणीसह 62,568 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,970 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45800 रुपये
पुणे – 45,760 रुपये
नागपूर – 45,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,970 रुपये
पुणे – 49,900 रुपये
नागपूर – 49,900 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4576.00 Rs 4536.00 -0.882 %⌄
8 GRAM Rs 36608 Rs 36288 -0.882 %⌄
10 GRAM Rs 45760 Rs 45360 -0.882 %⌄
100 GRAM Rs 457600 Rs 453600 -0.882 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4990.00 Rs 4951.00 -0.788 %⌄
8 GRAM Rs 39920 Rs 39608 -0.788 %⌄
10 GRAM Rs 49900 Rs 49510 -0.788 %⌄
100 GRAM Rs 499000 Rs 495100 -0.788 %⌄

Share Market : बाजाराच्या गतीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह उघडले

Share Market

नवी दिल्ली । शेअर बाजाराने शुक्रवारी तीन दिवसांचा वेग गमावला आणि दोन्ही एक्सचेंज मोठ्या घसरणीने उघडले. सकाळच्या ट्रेडिंगच्या सुरुवातीला सेन्सेक्स 478 अंकांनी घसरून 58,447 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 143 अंकांनी घसरून 17,462 अंकांवर आला.

जागतिक बाजारपेठेत झालेली घसरण तसेच रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव याचा परिणाम अमेरिका, युरोप आणि आशियानंतर भारतीय बाजारावरही दिसून आला. शेअर बाजारातील प्रचंड घसरणीच्या प्रभावापासून कोणतेही क्षेत्र वाचले नाही. बँकिंग ते आयटी, ऑटो, रिअल इस्टेट, एफएमसीजी, फार्मा यासह जवळपास सर्वच क्षेत्र रेड मार्कवर ट्रेड करत होते. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही मोठी घसरण आहे.

बाजार उघडल्यानंतरही घसरण सुरूच होती
कमकुवत सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण सुरूच होती. गुंतवणूकदारांच्या प्रॉफिट बुकींगमुळे सकाळी 9.31 वाजता सेन्सेक्स 688 अंकांवर तर निफ्टी 202 अंकांनी घसरला. यापूर्वी, तीन व्यापार दिवसांत, बाजाराने गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण नफा दिला होता.

जागतिक बाजारपेठही धोक्याच्या चिन्हावर आहे
जागतिक बाजारातील कामगिरीचा भारतीय शेअर बाजारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. याशिवाय फ्रेंच बाजारही रेड मार्कवर बंद झाले, तर जर्मनी आणि ब्रिटनमध्ये वाढ दिसून आली. आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास, 11 फेब्रुवारीच्या सकाळी सिंगापूरचा निफ्टी 1 टक्क्यांहून अधिकने घसरला होता, तर जपानचा निक्की 0.42 टक्क्यांनी वाढताना दिसत होता. याशिवाय तैवान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि शांघायचे शेअर बाजारही रेड मार्कवर ट्रेड करत होते.

शिवछत्रपतींच्या घराण्यात जन्म ही भाग्याची गोष्ट, पण लोककल्याणाची सर्वथा जाणीवही; वाढदिवशी संभाजीराजेंची भावनिक पोस्ट

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार आणि छत्रपती संभाजी राजे यांचा आज 11 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने संभाजीराजे यांनी आपल्या ट्विट अकाउंट वरून भावुक पोस्ट शेअर केली आहे. शिवछत्रपतींच्या घराण्यात जन्म ही भाग्याची गोष्ट आहे पण त्याचप्रमाणे मला लोककल्याणाची सर्वथा जाणीवही आहे असे संभाजीराजे यांनी म्हंटल आहे.

आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे. असे संभाजीराजे यांनी म्हंटल.

छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे. माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील !

माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील, मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची… असे ट्विट संभाजीराजे यांनी केलं.

“… तोपर्यंत मास्क बंदी उठणार नाही”; अजित पवारांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मास्क वापरण्याच्या सूचना एआज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत. मास्कब्दीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असल्याने मास्क वापरण्याबाबत नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कबंदीबाबत मोठे विधान केले आहे. “जोपर्यंत कोरोना जाणार नाही तोपर्यंत मास्क बंदी उठणार नाही, असे विधान पवार यांनी केले आहे.

आज पर्यावरणमंत्रीआदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, अजूनही नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. अजूनही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा. मास्क काढायचा असेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क घालणं आवश्यक आहे.

मुंबई चांगली दिसावी म्हणून उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ, आदित्य ठाकरे यांना वाटते. मुंबईत आज अनेक विकासकामे होत आहेत. महामंडळाच्या नियुक्तीमध्ये कोणतीही अडचण नाही. आज अनेक पक्ष नावे देत आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. देशात आणि मुंबईत अन्य महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असेही यावेळी पवार यांनी म्हंटले.

सोमवारपासून सुरु होणार बच्चे कंपनीची ‘किलबिलाट’

औरंगाबाद – कोरोना संसर्ग वाढताच बंद केलेल्या शाळा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. पहिल्या टप्प्यात दहावी, बारावी, दुसऱ्या टप्प्यात आठवी, नववी, अकरावी तर तिसऱ्या टप्प्यात पाचवी ते सातवीचे वर्ग सुरळीत सुरू झाल्यानंतर सोमवारपासून महापालिकेसह खासगी शाळांमधील बालवाडी ते चौथीचे वर्ग व खासगी कोचिंग क्लासेसला अटी-शर्तींच्या अधीन राहून भरविण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली. यामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट पुन्‍हा एकदा ऐकण्यास मिळणार आहे.

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांसोबत झालेल्या चर्चेनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका हद्दीतील बालवाडी ते चौथीचे प्रत्यक्ष वर्ग व कोचिंग क्लासेस सोमवारपासून अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला आहे त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहनचालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार शाळेत टप्प्या-टप्प्याने तसेच एक दिवस आड बोलवण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पहिलीपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोरोनामुक्त झाल्यावरच शाळेत उपस्थित राहावे, असे आदेशात म्हटले आहे.