Monday, December 22, 2025
Home Blog Page 2805

e-RUPI प्रीपेड डिजिटल व्हाउचरची मर्यादा वाढली; जाणून घ्या काय आहेत फायदे

Share Market

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ई-रुपी प्रीपेड डिजिटल व्हाउचरची मर्यादा वाढवली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतर सांगितले की,” ई-रुपी प्रीपेड डिजिटल व्हाउचरसाठी 10,000 रुपयांची सध्याची मर्यादा प्रति व्हाउचर 1 लाख रुपये करण्यात आली आहे. आता ते एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाऊ शकते.”

सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये डिजिटल व्हाउचर ई-रुपी (e-RUPI) लाँच केले होते. ही कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट पद्धत आहे. याचा वापर करून, सरकार आपल्या कल्याणकारी योजनेंतर्गत थेट लाभार्थ्यांना पैसे ट्रान्सफर करू शकते. त्यात कोणी ब्रोकर किंवा मध्यस्थ नाही. NPCI ने ई-रुपी व्हाउचरसाठी 11 बँकांशी करार केला आहे. यामध्ये SBI, SDFC Bank, Axis Bank, बँक ऑफ बडोदा (BoB), Canara Bank आणि ICICI Bank यांचा समावेश आहे.

ई-रुपी व्हाउचर म्हणजे काय?
डिजिटल व्हाउचर ई-रुपे प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने डेव्हलप केले आहे. यात डिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्व्हिसेस, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांचेही सहकार्य आहे. डिजिटल व्हाउचर ई-रुपे हा एक क्यूआर कोड किंवा SMS आधारित ई-व्हाउचर आहे, जो थेट लाभार्थीच्या मोबाईलवर पाठवला जातो.

अशा प्रकारे काम करते
मोबाइलमध्ये क्यूआर कोड किंवा SMS ची स्ट्रिंग सापडली की, पैसे पोहोचतात. हे व्हाउचर रिडीम करण्यासाठी युझरला कोणतेही कार्ड, डिजिटल पेमेंट अ‍ॅप किंवा इंटरनेट बँकिंगची आवश्यकता नाही. जी लोकं डिजिटल पेमेंटच्या आधुनिक पद्धती वापरण्यास कचरतात त्यांच्यासाठी हे अतिशय सोयीचे आहे.

हे प्रीपेड व्हाउचरसारखे आहे, जे कोणत्याही मर्चंट पॉईंट्स वर किंवा ते स्वीकारणाऱ्या केंद्रावर वापरले जाऊ शकते. समजा, सरकारने एखाद्याला हॉस्पिटलमध्ये मोफत उपचाराची सुविधा दिली तर त्यामुळे सरकार त्या व्यक्तीच्या मोबाईलवर QR कोड पाठवेल. या QR कोडद्वारे व्यक्ती त्या रुग्णालयात पैसे भरण्यास सक्षम असेल.

‘या’ घोषणाही झाल्या
याशिवाय, TReDs सेटलमेंटसाठी उत्तम पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी, राज्यपालांनी NACH आदेशाची मर्यादा सध्याच्या 1 कोटींवरून 3 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. सेंट्रल बँकेने हेल्थकेअरसाठी ऑन-टॅप लिक्विडिटी विंडो 30 जूनपर्यंत वाढवली आहे आणि वॉलेंटरी रिटेंशन रूट कॅप लिमिट 1 लाख कोटी रुपयांवरून 2.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.

कर्नाटकातील हिजाब वादावर हेमा मालिनीचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या की…

hema malini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कर्नाटक सध्या हिजाब प्रकरणावरून चालू असलेले वाद हे दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. त्यातच आता भाजप खासदार असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत शाळेत हिजाब घालण्याला विरोध केला आहे. शिवाय त्यांनी म्हटले कि शाळेत गणवेशच घालायला हवा. यामुळे कदाचित हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या शाळा या शिक्षणासाठी असून तेथे धार्मिक बाबी घेऊ नये, असे त्यांनी सांगितले. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, प्रत्येक शाळेत गणवेश असतो ज्याचा आदर केला पाहिजे. शाळेच्या बाहेर तुम्हाला हवे ते घालता येते.शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही
.
प्रत्येक शाळेचा एक गणवेश हा निश्चित ठरलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने त्या गणवेशाचा सन्मान करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. याबाबत तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा. अशा आशयाची प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण-
जानेवारी महिन्यामध्ये कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला होता. येथील एका ज्युनिअर कॉलेजमधील ६ विद्यार्थिनींना त्यांनी हिजाब परिधान केल्यामुळे शिक्षण घेण्याकरिता वर्गात प्रवेश नाकारण्यात आला होता. तर ड्रेसमध्ये समानता यावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले होते. यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा वाद वाढत गेला. हिजाबच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी भगवी शाल आणि भगवे फेटे परिधान करून शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचताना दिसू लागले आहेत. तर हिजाब परीधान केलेल्या युवतीला कॉलेजमध्ये पाहताच या तरुणांनी अतिशय आक्रमकरीत्या जय श्री राम अश्या घोषणा दिल्या. शिवाय त्या तरुणीने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत या जमावाला प्रत्युत्तर दिले.

“उत्तर प्रदेशात भाजपची नव्हे, असंतोषाची लाट”; विजय वडेट्टीवार यांचा टोला

vijay vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सविस्तर मुलाखत दिली. यावेळी उत्तर प्रदेशसह पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा मोदी यांनी केला. त्यांच्या दाव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे. “उत्तर प्रदेशात लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. लाट असती तर उत्तर प्रदेशामध्ये असंतोष दिसला नसता. ही लाट असंतोषाची लाट आहे. बेरोजगारीची लाट आहे असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातीळ महत्वाचा प्रश्न असलेला ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाकडे अहवाल दिला आहे. निर्णय लवकर अपेक्षित आहे. आमच्याकडून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे. आम्ही बनविलेल्या कायद्यानुसार निवडणूक घेतल्या जाऊ शकतात, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले होते मोदी ?

काल दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले के, निवडणुकीत सर्व राज्यात पाहतो आहे की भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेला आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारनं फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात, असे मोदी यांनी म्हंटले

खरीप हंगामात भासणार नाही खताची कमतरता; शेतकऱ्यांसाठी सरकारने उचलले मोठे पाऊल

नवी दिल्ली । रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी खूप हेलपाटे मारावे लागत असून देशातील अनेक राज्यांमध्ये आजही युरियासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच आहे. यातून धडा घेत केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी युरिया आणि DAP खतांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. खरीप हंगामात खताचा तुटवडा नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे, त्यामुळे सरकार वापरापेक्षा जास्त साठा करेल.

खरीप पिकांसाठी खतांच्या उपलब्धतेत कोणतीही कमतरता भासू नये म्हणून सरकार जागतिक बाजारपेठेतून कच्चा माल आणि खते या दोन्ही गोष्टी आधीच एकत्रित करत आहे. त्याचबरोबर देशात खतांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी युरिया आणि डाय-अमोनियम फॉस्फेटचा पुरेसा साठा ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात खरीप पिकांची पेरणी मे महिन्यात कापसापासून सुरू होते. पेरणीच्या वेळी जास्त DAP लागते.

DAP च्या सुरुवातीच्या साठ्यात मोठी वाढ
खरीप हंगाम 2022 मध्ये DAP चा प्रारंभिक साठा 25 लाख टन असण्याचा अंदाज आहे, जो खरीप हंगाम 2021 मध्ये 14.5 लाख टन होता. तसेच गेल्या खरीप हंगामापेक्षा 10 लाख टन जास्त युरियाही उपलब्ध होणार आहे. त्याचा प्रारंभिक साठा 60 लाख टन असण्याची अपेक्षा आहे. एवढेच नाही तर DAP सह युरिया आणि इतर खतांच्या अखंडित पुरवठ्यासाठी भारत अनेक देशांशी बोलणी करत आहे. दीर्घकालीन पुरवठा करार करण्याचा सरकारचा मानस आहे, जेणेकरून भविष्यात देशात खताचा तुटवडा भासू नये. भारत 45 टक्के DAP आणि काही युरिया चीनकडून आयात करतो.

देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर
खत उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मंगळवारीच खत मंत्र्यांनी सांगितले की,”मंत्रालयाने दीर्घकालीन करारांतर्गत विविध देशांकडून कच्चा माल आणि तयार खतांचा नियमित आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एक रोडमॅप तयार केला आहे. DAP पुरवठ्याला चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांवर, खत मंत्रालयाने कंपन्यांना सध्या सुरू असलेल्या DAP च्या उत्पादनाव्यतिरिक्त, NPK फ्लोचा वापर करून ना नफा-ना-तोटा तत्त्वावर अतिरिक्त DAP तयार करण्याचे आदेश दिले आहेत.”

त्याचवेळी, Paradip Phosphates Ltd. ला ZACL गोवा प्लांटला जाणाऱ्या दोन गाड्यांचा वापर करून वार्षिक 8 लाख टन अतिरिक्त DAP आणि NPK फर्टिलाइजर कॉम्प्लेक्स तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेशातील मध्य भारत ऍग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेडला 1.20 लाख टन स्थापित क्षमतेने DAP आणि NPK खतांचे उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड आणि FACT कोची अनुक्रमे 5 आणि 5.5 लाख टन वार्षिक क्षमता असलेले नवीन DAP किंवा NPK प्लांट्स स्थापन करतील.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी NCB वरील आरोपांचा तपास पूर्ण; समीर वानखेडेसह 3 अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावले

Cruise Drugs Case

नवी दिल्ली । बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा दक्षता तपास (Vigilance) जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीतील आयर्न खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद, व्हीव्ही सिंग आणि समीर वानखेडे या तिघांच्या चौकशीची शेवटची फेरी होणार आहे.

आशिष रंजन यांना 11 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या दिल्लीत दक्षता तपासाला सामोरे जावे लागणार आहे. हि त्यांची तिसरी चौकशी आहे. तर दुसरीकडे, व्हीव्ही सिंग यांना 12 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा दक्षता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षता पथक 13 फेब्रुवारीला समीर वानखेडेची तिसऱ्यांदा चौकशी करणार आहे. या प्रकरणी दक्षता पथकाकडून आतापर्यंत केवळ किरण गोसावी यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्याच्या गावात पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.

या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाचे प्रमुख आणि डीडीजी एनआर ज्ञानेश्वर सिंह करत आहेत, जे तीन वेळा मुंबईत जाऊन अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचबरोबर घटनेशी संबंधित घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचाही या प्रकरणात बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.

साताऱ्यात वाय. सी काॅलेज परिसरात युवकांचा राडा : निर्भया पथक गायब

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील वाय. सी. कॉलेज परिसरामध्ये युवकांच्यात जोरदार हाणामारी झालेली आहे. या युवकांच्या हाणामारीत दगडफेक झाल्याने लेडीज शॉपीचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. निर्भया पथकाचा काॅलेज परिसरात वचक कमी झाल्याने वारंवार हाणामारीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

वाय. सी. काॅलेज किरकोळ कारणावरून युवकांच्यात जोरदार हाणामारी झाली. काॅलेज परिसरात अचानक गोंधळ उडाळ्याने मुली पळाल्या. तसेच एक युवकाने लेडीज शाॅपी परिसरात असलेला दगड उचलून फेकला असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. काॅलेज सुरू झाल्यापासून वारंवार हाणामारीचे प्रकार सुरू झालेले आहेत. परंतु यावर पोलिसांचा वचक असलेला दिसून येत नाही.

काॅलेज परिसरात होणाऱ्या या राड्यावर नियंत्रणासाठी निर्भया पथकाची नेमणूक पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. मात्र, सध्या हे पथक सक्षमरित्या आपले काम करताना आढळून येत नाही. तेव्हा या पथकाचीच आता उजळणी पोलिस अधीक्षकांनी घेणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा; केंद्रीय जीएसटी विभागाची औरंगाबादेत धाड 

औरंगाबाद – प्रत्यक्षात भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता हजारपेक्षा अधिक बनावट बिले तयार करून जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी)द्वारे सरकारला सुमारे 200 कोटींचा गंडा घालणाऱ्या दिल्लीतील व्यापारी समीर मलिक याला केंद्रीय जीएसटी विभागाने अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे आता या घोटाळ्यात सहभागी झालेल्या वाळूज, हनुमाननगर येथील एका भंगार दुकानावर सायंकाळी धाड टाकण्यात आली. यामुळे जिल्ह्यातील भंगार विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील समीर मलिक याने शहरात नारेगाव येथे सनसाईज इंटरप्राईजेस नावाने फर्म सुरु केली होती. त्यासाठी त्याने बोगस नोंदणी केली होती. त्याने 60 कोटींचे बोगस बिल फाडले होते. 10 कोटींची आयटीसी शहरातील 15 ते 16 भंगार विक्रेत्यांना फॉरवर्ड केली होती. या व्यवहाराचा संशय येथील केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना आल्यानंतर त्यांनी समीर मलिक याला औरंगाबादेत बोलावले व विमानतळावर शुक्रवारी 4 तार

आम्ही किंगमेकर नाही, किंग बनणार; बाळा नांदगावकर यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्यावतीने आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आम्ही किंगमेकर नाही किंग बनणार आहोत, असे विधान नांदगावकर यांनी केले आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे कार्यकर्त्याची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळेस आम्ही महापालिकांच्या निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही किंगमेकर नाही तर किंग म्हणून बनणार आहोत, असे विधान नांदगावकर यांनी केले.

आज मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या या विधानानंतर मुंबईत महापालिका निवडनुक मनसे लढवणार असलच्या चर्चांना उधाण आले आहे. नाशिक पुण्याला बैठका सुरु आहेत. तयारीला लोक लागले असल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

‘द ग्रेट खली’ चा भाजपमध्ये प्रवेश; मोदींचे तोंडभरून केलं कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंटमधून प्रसिद्ध झालेला रेसलर द ग्रेट खली उर्फ ​​दिलीप सिंह राणा याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले .

भाजपच्या राष्ट्रीय धोरणामुळे प्रभावित होऊन मी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे असे खली म्हणाला. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी देशासाठी केलेले काम त्यांना योग्य पंतप्रधान बनवते. म्हणूनच मला वाटले की राष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या राजवटीचा एक भाग का बनू नये. भाजपच्या राष्ट्रीय धोरणाने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे त्यांनी म्हंटल

दरम्यान, पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये द ग्रेट खलीचा प्रवेश भाजपसाठी फायदेशीर ठरू शकतो. गेल्या वर्षी खलीने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर अखिलेश, त्यांचे काय झाले, हे उघड झाले नाही, पण ते सपाकडे जातील, अशी अटकळ होती.मात्र आज त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला

नशेच्या गोळ्या विक्री करण्याऱ्या एजन्सीला पोलीसांचा दणका

drugs

औरंगाबाद – पोलिस दलाचा वार्षिक अहवाल मांडताना मागील महिन्यांत खुद्द पोलिस आयुक्तांनीच नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. मात्र, त्यानंतरही नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांचे पेवच फुटले आहे. नुकतेच उस्मानपुरा पोलिसांनी एका आरोपीला नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणात अटक केली असून तो ज्या मेडिकल एजन्सीमध्ये काम करतो त्या एजन्सीचा थेट परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव अन्न व औषधी प्रशासन विभागाला दिला आहे.

याप्रकरणी निरीक्षक बागवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी रोजी प्रतापनगर मैदानाजवळ तौफिक रफिक फारोखी (41, रा. ब्रिजवाडी, नारेगाव) या आरोपीला पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी अटक केली आहे. आरोपी तौफिक हा ‘अनिल एजन्सी फार्मास्युटिकलचा डिस्ट्रीब्युटर असून त्याच्याकडे शेड्यूल एच-1 औषधींचा साठा सापडला होता. शेड्यूल एच-1 हे प्रिस्क्रिप्शन ड्रग प्रकारात मोडतात, ते मानवी शरीरास हानिकारक आहेत. विशेष म्हणजे शेड्यूल एच-1, प्रिस्क्रिप्शन संदर्भात पूर्ण जाणीव असूनही अनिल एजन्सीने कोणतीही काळजी न घेता औषधींचा पुरवठा केला आहे.

त्यामुळे अनिल एजन्सीचे परवानाधारक अंकुर गजेंद्र साहुजी, अनिल एजन्सी (गुलजार टॉकीज जवळ, गुलमंडी) यांचा परवाना रद्द करावा याबाबतचा प्रस्ताव निरीक्षक बागवडे यांनी सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांना दिला आहे. पुढील तपास आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त उस्मानपुरा विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.