Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2819

Cryptocurrency Price : क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी, सर्व टॉप 12 करन्सीमध्ये झाली जोरदार वाढ

नवी दिल्ली । आज, 7 फेब्रुवारी 2022, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तेजी आली आहे. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 2.75% ने $1.96 ट्रिलियन पर्यंत वाढली आहे. ही वाढ दुपारी 2:43 वाजताची आहे. सोमवारी बातमी लिहिली तेव्हा मार्केट कॅपच्या संदर्भात टॉप 12 करन्सीपैकी एकही रेड मार्कवर ट्रेड करत नव्हता. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये अशी हिरवाई बऱ्याच दिवसांनी दिसली.

सोमवारी, सर्वात मोठी करन्सी असलेले Bitcoin $42,587.11 वर ट्रेड करत होते. त्यात 2.31% ची वाढ झाली आहे. इथेरियम $3,072.31 वर 1.93% वाढीसह ट्रेड करत आहे. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.3 टक्के आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.8 टक्के आहे.

गेल्या 24 तासांत सर्वात मोठ्या वाढणाऱ्या प्रमुख करन्सी बद्दल बोलायचे झाल्यास, Shiba Inu 22.69%, XRP 14.05%,Cardano 4.36%, Avalanche 5.74% आणि Dogecoin 6.14% वाढले.

Shiba Inu एका आठवड्यात 34.86% वाढला
Shiba Inu ने या अत्यंत स्वस्त करन्सीने आठवड्याभरात जबरदस्त झेप घेतली आहे. एका आठवड्यात ही करन्सी सुमारे 35% वाढली आहे. म्हणजेच एका आठवड्यापूर्वी जर एखाद्याने Shiba Inu मध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत त्याचे पैसे 1 लाख 35 हजार रुपये झाले असतील. त्यांना 35 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असता.

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
Dogecolony, First Eleven, आणि PAPPAY ही गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी आहेत. Dogecolony (DOGECO) ने 464.90% ची वाढ नोंदवली आहे, तर First Eleven (F11) ने 445.36% ची वाढ नोंदवली आहे. PAPPAY टोकन 325.30% च्या उडीसह ट्रेड करत आहे.

मद्यधुंद पोलिसांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण ; वडाचे म्हसवे येथील प्रकार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

एका शेतकरी कुटुंबियांना मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केला असल्याचा प्रकार जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील रविवारी घडला आहे. या प्रकरणी संबंधित संबंधित पोलिसांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मारहाण झालेल्या शेतकरी योगेश बाबूराव सामंत यांनी दिली आहे.

या घडलेल्या प्रकाराबाबत योगेश सामंत यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी मी स्ट्रॉबेरीची विक्री करत असताना मेढा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी विकास शिंदे आणि ड्रायव्हर कांबळे हे दोघेजण आले. त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानकपणे मला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलीला आणि पत्नी शीतल योगेश सावंत यांनाही ढकलून दिले. याबाबत मी जाब विचारायला गेलो असता त्यांनी मला पोलीस गाडीत टाकून कुडाळ पोलीस ठाण्याबाहेर सोडून निघून गेले.

पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत मारहाण करण्यात आली असल्याने याबाबत कुडाळ पोलिस ठाणे आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संबंधित दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात निवेदनाद्वारे तक्रार करणार असल्याचे योगेश सामंत यांनी सांगितले.

जगातील तिसरी सर्वात मोठी विमा कंपनी LIC रिटर्नच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर

LIC

नवी दिल्ली । LIC आपला IPO शेअर बाजारात आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मार्चपर्यंत हा IPO येण्याची शक्यता आहे. दरम्यान, क्रिसिलने कंपनीच्या रिटर्नच्या संदर्भातील रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्स नुसार, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ही केवळ होम-मार्केट शेअरमध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी नाही तर रिटर्न ऑन एसेट्स मध्येही नंबर-1 कंपनी आहे.

2020 पर्यंत, ग्रॉस रिटेल प्रीमियममध्ये LIC चा वाटा 64.1% होता. तर कंपनी रिटर्न ऑन एसेट्स (RoE) मध्ये 82% रिटर्न देत आहे. यासह, लाइफ इन्शुरन्स प्रीमियमच्या बाबतीत LIC ही जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

मार्केट शेअर मध्ये घसरण
मात्र, गेल्या काही वर्षांत LIC चा बाजारातील हिस्सा कमी होत आहे. 2000 पूर्वी कंपनीचा बाजारातील हिस्सा 100% इतका होता. 2016 पर्यंत ते 71.8% आणि 2020 पर्यंत 64.1% पर्यंत खाली आले आहे. तसे, या कालावधीत SBI Life चा मार्केट शेअर वाढला आहे.

SBI Life चा बाजारातील हिस्सा वाढला
SBI Life ही देशातील दुसरी सर्वात मोठी विमा कंपनी आहे. क्रिसिलच्या रिपोर्ट नुसार, 2016 मध्ये SBI Life ची हिस्सेदारी केवळ 5% होती, जी 2020 मध्ये 8% पर्यंत वाढली आहे. CRISIL ने नोव्हेंबर 2021 मध्ये हा रिपोर्ट तयार केला होता मात्र तो सार्वजनिक करता आला नाही.

LIC चा ग्रॉस रिटेल प्रीमियम (GWP) 64.1% म्हणजेच $56.405 अब्ज आहे. रिपोर्ट नुसार, जगातील कोणत्याही विमा कंपनीचा इतका बाजारातील हिस्सा नाही.

जगातील टॉप 10 विमा कंपन्या
भारतीय कंपनी LIC चा देखील जगातील टॉप 10 विमा कंपन्यांमध्ये समावेश आहे. या लिस्ट मधील 5 विमा कंपन्या चीनमधील असून, पिंग हा जगातील सर्वात मौल्यवान इन्शुरन्स ब्रँड आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील दोन आणि फ्रान्स, जर्मनी आणि भारतातील प्रत्येकी एका कंपनीचा सहभाग आहे. LIC, जो भारतातील सर्वात मोठा शेअर विक्रेता होणार आहे, हा देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा ब्रँड आहे ज्याचे मूल्य $8.656 अब्ज (सुमारे 64,722 कोटी रुपये) आहे. यासोबतच हा जगातील तिसरा मजबूत विमा ब्रँड आहे, असे एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे बडे नेते का नव्हते? नाना पटोलेंनी दिले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातील दिग्गज नेतेमंडळी आणि अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थिती लावली होती. मात्र लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी काँग्रेसचे मोठे नेतेमंडळी उपस्थित नव्हती. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याना विचारलं असता त्यांनी यामागचे कारण सांगितले.

नाना पटोले म्हणाले, आमचे बरेच नेते कोरोनाबाधित होते. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाला हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासूसुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमची टीम लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती, असं पटोले म्हणाले.

दरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित होते. अत्यंत श्रायुनयनांनी लता मंगेशकर याना अखेरचा निरोप देण्यात आला.

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी !! 28 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम अन्यथा पेन्शन थांबेल

PMSBY

नवी दिल्ली । जर तुम्हीही पेन्शन घेत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नियमांनुसार, यावर्षी सर्व पेन्शनधारकांना 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावे लागेल. तसे न केल्यास त्यांची पेन्शन थांबेल. लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुमची पेन्शन पुढे चालू राहते.

केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची सामान्य मुदत दरवर्षी 30 नोव्हेंबर असते. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांसाठी ही मुदत वाढवून 28 फेब्रुवारी 2022 करण्यात आली आहे.

आपण कोणत्या मार्गाने लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता ते जाणून घ्या.

पोर्टलवर सबमिट करू शकता
तुम्ही तुमचे लाइफ सर्टिफिकेट https://jeevanpramaan.gov.in/ या लाइफ सर्टिफिकेट पोर्टलवर सबमिट करू शकता. यासाठी तुम्हाला पहिले पोर्टलवरून लाइफ सर्टिफिकेट अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. याशिवाय, UDAI द्वारे प्रमाणित केलेले फिंगरप्रिंट डिव्हाइस असावे. यानंतर, तुम्ही स्मार्टफोनद्वारे आणि अ‍ॅपमध्ये नमूद केलेल्या पद्धतींचा वापर करून घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकता.

घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट जमा करा
पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने सांगितले की, पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग अलायन्सचा वापर करून किंवा पोस्ट ऑफिसच्या डोअरस्टेप सर्व्हिस वापरून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात.

‘या’ बँका देत आहेत सर्व्हिस
भारतीय बँका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया ‘या’ बँका सर्व्हिस देत आहेत.

तुम्ही वेबसाइट http://doorstepbanks.com किंवा http://www.dsb.imfast.co.in/doorstep/login किंवा ‘डोअरस्टेप बँकिंग’ मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर किंवा टोल फ्री क्रमांकावर (18001213721 किंवा 18001037188) कॉल करून बँकेची डोअरस्टेप सर्व्हिस बुक करू शकता.

इंडिया पोस्टने सुरू केली सर्व्हिस
इंडिया पोस्टने ट्विट करून ही माहिती दिली आहे की, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जवळील पोस्ट ऑफिसमधून कॉमन सर्व्हिस सेंटर (CAC) मधून जीवन प्रमाण सेवा सहजपणे घेऊ शकतात. विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारत सरकार पेन्शनर योजनेसाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मिळविण्याची समस्या सोडवू इच्छित आहे. जेणेकरून, लाइफ सर्टिफिकेट सहजपणे मिळू शकेल.

कुठे अर्ज करता येईल ?
अर्जासाठी, 7738299899 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवून जवळच्या जीवन सन्मान केंद्रावर अपडेट्स घेता येतील. SMS मध्ये JPL <PIN Code> लिहावे लागेल. यावर तुम्हाला तुमच्या परिसरातील केंद्रांची लिस्ट मिळेल.

जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काँग्रेस पक्षाकडून देशभर सदस्य नोंदणी अभियान डिजिटल माध्यमातून राबविले जाणार आहे. कराड येथे या अभियानाचा प्रारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी केंद्र महत्वाचे विधान केले. “आता जातीयवादी पक्षांकडून देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील जनतेला एकसंघ ठेवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविणार आहे, असे चव्हाण यांनी म्हंटले

कराड येथील कार्यक्रमावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, स्वातंत्र्य प्राप्तीवेळी ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा उभारण्यासाठी देशातील सर्व जनता काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्र आली होती. तोच एकसंघ विचार काँग्रेसने आजपर्यंत जपला म्हणूनच आज आपला देश विविधतापूर्ण आहे.

इंग्रजांनी आपला देश लुटून नेल्यानंतर तो समृद्ध करण्यासाठी माजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी धोरणात्मक निर्णय घेत प्रयत्न केले. त्यानंतरच्या काँग्रेसच्या सर्व नेतृत्वांनी आपल्या देशास समृद्ध करीत देशातील जनतेला एकसंघ ठेवले. परंतु आता जातीयवादी पक्षांचा देशामध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा देशातील जनतेला एकसंघ ठेवण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान राबविणार आहे. त्याची व्याप्ती बूथ लेवलपासून केली जात आहे.

आपल्या बूथमधील जनतेला काँग्रेसचा विचार पटवून देत सदस्य नोंदणी केल्याचा परिणाम कायम राहणार आहे. फक्त मोठे आकडे दाखविण्यासाठी हि नोंदणी नसून एक समृद्ध विचार वाढविण्यासाठी हि सदस्य नोंदणी आहे. तरी, काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपल्या मतदारसंघात हे अभियान यशस्वी करूया, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

यावेळी कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अल्पना यादव, माजी जि. प. सदस्या विद्याताई थोरवडे, राजेंद्र शेलार, संदीप चव्हाण आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

T20 World Cup: 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या काही मिनिटांतच संपली

नवी दिल्ली । या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठीची तिकीट विक्री सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान संघ कोणत्याही मंचावर भिडतात तेव्हा चाहत्यांचा आनंद आणि उत्साह शिगेला पोहोचतो आणि त्याचे पडसाद या सामन्याच्या तिकीट खरेदीतही दिसून येते. T20 विश्वचषक-2022 मधील भारत-पाकिस्तान सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्याची तिकिटे अवघ्या काही मिनिटांतच विकली गेली.

ही आयसीसी स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यासाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटता यावा या उद्देशाने तिकीट खरेदी करता येणार आहे. ही तिकिटे t20worldcup.com वर उपलब्ध आहेत. यामध्ये फायनलसह 45 सामन्यांची तिकिटे खरेदी करता येणार आहेत. “पहिल्या फेरीसाठी आणि सुपर 12 टप्प्यासाठी मुलांचे तिकीट $5 आहे तर प्रौढांचे तिकीट $20 आहे,” असे ICC ने एका निवेदनात म्हटले आहे.

गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून ऑस्ट्रेलिया या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे. वेस्ट इंडिजकडे 2 विजेतेपदे आहेत जो या जागतिक T20 स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. आत्तापर्यंत जवळपास प्रत्येक सामन्याची तिकिटे उपलब्ध होती मात्र 13 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम आणि भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघ्या काही मिनिटांतच विकली गेली.

ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदाच पुरुषांचा T20 विश्वचषक खेळवला जात आहे, ज्याचे सामने एडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे होतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार एरॉन फिंच म्हणाला, ‘आयसीसी T20 विश्वचषक शानदार असेल. तसेच आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर विजेतेपद राखण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

तो म्हणाला, ‘घरच्या प्रेक्षकांचे महत्त्व 2015 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक आणि गेल्या वर्षीच्या महिला टी-20 विश्वचषकात दिसून आले. जेव्हा संपूर्ण देश आम्हाला प्रोत्साहन देत असेल, तेव्हा आम्ही हा आणखी एक अविस्मरणीय विश्वचषक बनवू.आयसीसीच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या कुटुंबाला आपल्या 2 मुलांसह सामना पाहायचा असेल, तर त्यासाठी तिकिटाची किंमत $50 ठेवण्यात आली आहे.

महाविद्यालयात शेंगा तोडताना शॉक लागून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – शेवगाच्या शेंगा तोडताना विजेचा धक्का बसल्याने एका ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली. विजय पांडुरंग नाथभजन असे 39 वर्षीय मृताचे नाव आहे.

या प्रकरणी मृताचा भाऊ विकास यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विजय हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कंत्राटी कामगार म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होते. सकाळी विजय यांना त्यांच्या सुपरव्हाइजरचा कॉल आला होता. शेंगा तोडण्यासाठी लवकर या म्हणून त्यांचा तगादा सुरु असल्याने विजय सकाळी साडेनऊ च्या दरम्यान घरातून गेले.मात्र तेथे शेंगा तोंडत असताना अचानक त्याना विजेचा धक्का लागला आणि ते जमिनीवर बेशुद्ध पडले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी अभियांत्रिकी महाविद्यालयाला सुट्टी असते. विजय यांची देखील रविवारी सुट्टी होती मात्र तरी देखील महाविद्यालयात परिसरातील शेवंगाच्या शेंगा तोडण्यासाठी वारंवार विजय यांना बोलविण्यात आले होते. विजय यांना तीन अपत्ये असून त्यांच्या घरात विजय हे एकटेच घराचा गाडा चालवत असे.त्यांच्या मृत्यूने घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर उपासमातिची वेळ आली असून मृताच्या वारसांना नोकरीत सामावून घाव्ये अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

Share Market : सेन्सेक्स 1000 हून जास्त अंकांनी घसरला तर निफ्टी 17,200 च्या खाली, बाजार का घसरत आहे जाणून घ्या

Recession

नवी दिल्ली । आज आठवड्याचा पहिला दिवस भारतीय शेअर बाजारांसाठी निराशाजनक असणार आहे. सेन्सेक्स 1200 हून जास्त अंकांनी घसरताना दिसत आहे. त्याच वेळी, निफ्टी 300 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 17,200 च्या खाली ट्रेड करत आहे. बँक निफ्टी 700 हून जास्त अंकांनी घसरला आहे.

निफ्टीच्या 50 पैकी 44 शेअर्स मध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्सवर घसरणीचे वर्चस्व आहे. निफ्टी अर्थसंकल्पीय दिवसाच्या नीचांकाच्या खाली घसरला आहे. पॉवर वगळता बीएसईच्या सर्व सेक्टरल इंडेक्समध्ये घसरण होत आहे. दरम्यान, मिडकॅप इंडेक्स आठवड्याच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहे.

‘या’ 4 कारणांमुळे बाजारातील सेंटीमेंट बिघडल्या

$100 च्या जवळ क्रूड
जागतिक पातळीवर कच्च्या तेलातील तेजी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या क्रमाने, आज ब्रेंट आशियाई बाजारात प्रति बॅरल $ 94 च्या पातळीवर पोहोचला आहे. गेल्या एका महिन्यात त्याची किंमत 14 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे आणि येत्या आठवड्यात ती $100 वर जाऊ शकते. क्रूडमधील ताकद भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नकारात्मक आहे, कारण त्याचा ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होतो आणि भारतीय रिझर्व्ह बँकेवर मॉनिटरी पॉलिसी कडक करण्यासाठी दबाव वाढतो.

यूएस दर पाच वेळा वाढवण्याची योजना आखत आहे
यूएस पेरोल डेटा हे दर्शविते की, गेल्या महिन्यात नोकऱ्यांमध्ये 4,67,000 ने वाढ झाली, ज्यामुळे केंद्रीय बँकेला दर वाढविण्यात मदत होऊ शकते. हा आकडा देखील महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात ओमिक्रॉन व्हेरिएंट खूप प्रभावित झाला होता. तसेच नोकऱ्यांचा हा आकडा अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूपच चांगला होता. अशा स्थितीत, मार्चच्या मॉनिटरी पॉलिसी मीटिंगमध्ये 50 बेसिस पॉईंट्सच्या वाढीच्या शक्यतेसह, यूएस फेडने यावर्षी पाच वेळा व्याजदर वाढविण्यावर व्यापारी बाजी मारत आहेत.

FII ची सतत विक्री
जागतिक क्रूडच्या किंमतीतील तेजीप्रमाणेच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून विक्रीचा दबाव आहे. 2022 मध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी (foreign portfolio investors) देशांतर्गत बाजारात 37,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अमेरिकेतील दर वाढीची अपेक्षा आणि इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराचे उच्च मूल्यांकन यामुळेही FII ला विक्री करण्यास भाग पाडले जात आहे.

टेक कंपन्यांमध्ये विक्री
गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारात तेजीचे मुख्य कारण इनफोर्मेशन टेक्नोलॉजी सेक्टरमधील कंपन्यांचे होते. आता 2022 मध्ये, या सेक्टरने आपली चमक गमावली आहे आणि निफ्टी आयटी इंडेक्स अलीकडील उच्चांकाच्या तुलनेत 10 टक्क्यांहून जास्तीच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री तसेच जागतिक टेक्नोलॉजी शेअर्स मधील विक्रीचा या सेक्टरला दुहेरी फटका बसला आहे.

नोकरीच्या आमिषाने 18 जणांची फसवणूक : सातारा पोलिसांकडून दोघांना अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

दहीवडी तहसिल कार्यालय तसेच कोल्हापुर येथे शासकीय नोकरी लावतो, असे सांगून सातारा, सांगली, पुणे जिल्हयातील एकुण 18 लोकांकडून 15 लाखाची रक्कम घेवुन फसवणुक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबट पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रमेश पोपट ढावरे (रा. नरुटवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारुती जयवंत साळुखे, (रा.नरोटवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे मुळ रा. बनपुरी, ता. आटपाडी, जि. सांगली) व प्रविण राजाराम येवले (रा येवले, रा. वडी, ता. खटाव, जि. सातारा) यांनी दहीवडी तहसिल कार्यालय किंवा कोल्हापुर येथे शासकीय नोकरी लावतो असे सांगितले. तसेच वेळोवेळी २० हजार रुपये घेतले. याबाबत नंतर विचारांनी केली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश ढावरे यांनी दोन आरोपींविरोधात सातारा शहर पोलिसात तक्रार दिली.

त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला. पोलिसांनी आरोपीच्याकडे अधिक चौकशी केली. चौकशी अंती सातारा, सांगली, पुणे जिल्हयातील एकुण 18 लोकांकडून सरकारी नोकरी लावतो असे सांगुन त्याची 15 लाखाची फसवणुक केली आहे, अशी माहिती आरोपींनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले,पोलीस नाईक पंकज मोहिते, पोवीस कॉन्स्टेबल निलेश निकम यांनी केली आहे.