Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2820

शाहरुख खानला ट्रोल करणं म्हणजे नालायकपणा; संजय राऊत संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने दुवा पढली. त्यावरून काही लोकांनी शाहरुख खानवर टीका केली. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी टीका करणार्यांना खडेबोल सुनावले आहेत. शाहरुख खानला ट्रॉल करणे म्हणजे नालायकपणा आहे असे ते म्हणाले

संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला

नेमकं काय घडलं

लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी शाहरुख खान गेला होता. त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या मंचावर शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. मात्र हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा काहींनी केला. अर्थात या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी शाहरुखवर टीका केली.

शहरात बॅनर बाजी ! एमआयएम कडून घरकुल योजनेचा ‘फेककुल’ असा उल्लेख

औरंगाबाद – राज्य सरकारने घेतलेल्या स्टोरमध्ये वाईन विक्रीला विरोध केल्याने जिल्ह्यात शिवसेना आणि एमआयएम मध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच रविवारी संध्याकाळी एमआयएम च्या वतीने शहरभर पंतप्रधान घरकुल आवाज योजनेची खिल्ली उडवणारे बॅनर लावण्यात आले आहे.या मुळे आता एमआयएम आणि भारतीय जनता पक्षा मध्ये येत्या काळात राजकीय युद्ध पाहायला मिळू शकते.

खा इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान घरकुल आवाज योजनेची जिल्ह्यातील स्थिती बाबत पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला होता. 80 हजार पेक्षा अधिक अर्ज आले असताना फक्त 355 लोकांनाच हा लाभ देण्यात आल्या बाबत नाराजी व्यक्त करीत लोकसभेत देखील हा मुद्दा उपस्थित केला होता.या बाबत आता एमआयएम आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून औरंगाबाद शहरातील भडकल गेट,जिन्सी, सिटीचौक अशा विविध चौकात एमआयएम च्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेची खिल्ली उडवणारे बॅनर लावले आहे.

या बॅनर वर सपणो का घर सापनोमेही मिलेगा असे मजकूर लिहिलेले आहे तर घरकुल योजनेचा फेककुल योजना असा उल्लेख करण्यात आला आहे.एमआयएम च्या या बॅनरबाजी ने येत्या काळात भाजप आणि एमआयएम मध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकते.

LIC IPO: जर आपल्याकडे LIC ची पॉलिसी असेल स्वस्तात मिळतील शेअर्स

LIC

नवी दिल्ली । लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC-Life Insurance Corporation) चा IPO आणण्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. IPO साठी LIC च्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.

LIC ने माजी वित्तीय सेवा सचिव अंजुली छिब दुग्गल, सेबीचे माजी सदस्य जी. महालिंगम आणि एसबीआय लाइफचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजीव नौटियाल, चार्टर्ड अकाउंटंट विजय कुमार, राजकमल आणि व्हीएस पार्थसारथी यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. आता LIC च्या संचालक मंडळातील स्वतंत्र संचालकांची संख्या नऊ झाली आहे.

पॉलिसीधारकांसाठी राखीव
दरम्यान, LIC च्या IPO मधील 10 टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची बातमी आहे. तुमच्याकडे LIC ची कोणतीही पॉलिसी असल्यास IPO मिळण्याची शक्यता जास्त आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग सचिव, (Dipam) तुहिन कांत पांडे यांनी सांगितले होते की, सेबीच्या मंजुरीनंतर LIC चा IPO मार्चमध्ये येऊ शकतो. ते म्हणाले की LIC च्या इश्यूच्या 10 टक्क्यांपर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. LIC चे देशात लाखो पॉलिसीधारक आहेत आणि या IPO मध्ये त्यांना स्वस्तात शेअर्स मिळण्याची मोठी संधी आहे.

LIC चे मूळ मूल्य तयार केले गेले आहे आणि ते 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अंकाचा आकार DRHP मध्ये नमूद केला जाईल.

Dipam चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी सांगितले की, या IPO मध्ये रिटेल विंडो अंतर्गत काही राखीव देखील ठेवण्यात आली आहेत. आमच्याकडे पॉलिसीधारकांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. आम्ही LIC कायद्यांतर्गत अशी तरतूद केली आहे की पॉलिसीधारकांना काही सवलतीत 10 टक्क्यांपर्यंत शेअर्स ऑफर केले जाऊ शकतील. या IPO मध्ये LIC कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल.

रिटेल गुंतवणूकदार आणि कर्मचार्‍यांसाठी देखील काही सूट अपेक्षित आहे. LIC च्या प्रस्तावित IPO मध्ये सर्वसामान्यांच्या सहभागाला सरकार प्रोत्साहन देऊ इच्छित असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना सवलत दिली जाऊ शकते.

पॉलिसीधारकांना पत्र
LIC ने आपल्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये सहभागी होण्यासाठी पत्र लिहून जागरूक केले आहे. कंपनीने त्यांना IPO मध्ये सहभागी होण्यासाठी आपला पॅन क्रमांक अपडेट करण्यास सांगितले आहे. LIC पॉलिसीधारकांना जाहिरातीद्वारे पॅन अपडेट करण्यासाठी देखील सूचित करत आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकावर तलवारीने खुनी हल्ला

औरंगाबाद – शहरातील भारतनगर परिसरात कुख्यात गुंड दुर्लभ कश्यप नावाचा चौक उभा करणाऱ्या कश्यप गॅंगने रेणुकानगरमध्ये धुमाकूळ घालत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकाच्या डोक्यात फायटर आणि तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण देखील केली. हा युवक खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये अत्यवस्थ असून त्याच्या डोक्याला तब्बल 70 टक्के पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना पुंडलिक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शिवाजीनगर भागातील साइ नगर येथे शुभम विनायक मनगटे (24) हा युवक स्पर्धापरीक्षांची तयारी करतो. शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कश्यप गॅंगचे राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, अतिष मोरे, शेख बादशाह शेख बाबा, निलेश धस, पिन्या खडके यांच्यासह इतर दोन अनोळखी मुलांनी शुभम याचा किराणा दुकान आणि घरासमोर येत बाहेरून लाथा बुक्या मारून दुकान उघडण्याची मागणी केली. तेव्हा घरात शुभमची आई- वडील आणि लहान भाऊ होता. त्यांनी दरवाजा उघडला नाही. शुभम एका लग्न होऊन घरी आल्यानंतर त्याचे समजले. आरोपी यश पाखरेला मावसभाऊ राजु पठाडे यांच्या मार्फत समजावून सांगावे यासाठी शुभम मित्रासोबत पठाडेच्या रेणुका नगर येथील घरी गेला. वरील सर्व हल्लेखोर तेथे आले. त्यांनी शुभमला शिवीगाळ केली. पाखरे याने शुभमच्या डोक्‍यात फायटरने वार केले.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दुर्लभ कश्यप हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या नावाने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत नगर येथे एक चौक बनवण्याची माहिती पुढे आली आहे. कश्यप हा कपाळावर लाल टिक्का, गळ्यात गमछा आणि अंगात काळा शर्ट घालून गुन्हेगारी कृत्य करीत होता. त्याचीच नक्कल यश पाखरे, शुभम मोरे यांच्या यांनी केली आहे.

सोमय्यांवरील हल्ल्याची घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती – उदयराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेनंतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमय्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “किरीट सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे, अशी टीका भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी टीका करताना पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांचेवर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय आहे.”

“सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. “ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अश्या हल्याच्या घटना घडल्यास अशा घटनेचे कोणीही समर्थन करु शकणार नाही,”असे भोसले यांनी यावेळी म्हंटले आहे.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/posts/2278339358971894

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्ल्याच्या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीत जाणार आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

दुचाकीवरून निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरटयांकडून लंपास

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या विश्रामबाग परिसरातील वाडीकर मंगल कार्यालय ते बिरनाळे कॉलेज पर्यंत दुचाकीवरून निघालेल्या महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी हिसडा मारून लंपास केले. सदरची घटना हि शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिरनाळे कॉलेज समोर घडली. या प्रकरणी वीणा रमाकांत सारडा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वीणा सारडा या सांगलीतील बापट मळा परिसरात आपल्या कुटुंबियांसह राहतात. शनिवार दि. 05 रोजी सायंकाळी त्या वाडीकर मंगलकार्यालय परिसरात कामानिमित्त गेल्या होत्या. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून परत येत होत्या. त्यावेळी एका दुचाकीवरून दोघा अज्ञातांनी त्यांचा पाठलाग केला. सारडा या बिरनाळे कॉलेज समोर आल्या असता त्यातील एका व्यक्तीने सारडा यांचे मंगळसूत्र हिसडा मारून चोरले. त्यानंतर दोघांनी तेथून भरधाव वेगाने दुचाकीवरून पळ काढला. घडलेल्या या प्रकारानंतर सारडा या गोंधळल्या होत्या. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.

विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही फुटेज द्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसात चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वीणा सारडा यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात शिवप्रतिष्ठानची जनजागृती रॅली

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राज्य सरकारने किराणामाल दुकानांमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शविला. या निर्णयाच्या विरोधात संभाजीराव भिडे यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हि संघटना देखील रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीचा निर्णय रद्द करावा, तसेच दारू विक्रीवर बंदी घालावी या मागणीसाठी सांगली शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.

या फेरीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह महिला, शेकडो धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातामध्ये निषेधाचे फलक घेऊन, निषेधाच्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून हि फेरी काढण्यात आली. मारुती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरवात झाली.

मारुती चौक, हरभट रोड, महापालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, जुनी पोलीस लाईन मार्गे शिवाजी मंडई येथे या फेरीची सांगता झाली. राज्य शासनाने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घ्यावा, तसेच दारूच्या आहारी जाऊन तरुण पिढी बरबाद होत असल्याने राज्यात पूर्णपणे दारू विक्रीवर बंदी घालण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आला.

लतादीदी देशाचा अनमोल ठेवा, त्यांच्या स्मारकावरून राजकारण करू नका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्कवर उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता लता दीदींच्या आठवणीना उजाळा देणारे स्मारक केंद्र आणि राज्य सरकार नक्कीच उभारेल मात्र त्यावरून कोणी राजकारण करू नये असे म्हंटल आहे.

संजय राऊत म्हणाले, लतादीदी या देशाचा अनमोल ठेवा होत्या. त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करु नका असे राऊत यावेळी म्हणाले. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या, जगाच्या आहेत. जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशा प्रकारचे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे स्मारक महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार करेल असे राऊत यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, लता दिदी या काही राजकारणी नव्हत्या. ते असं व्यक्तीमत्व होतं की त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की त्यांच्या स्मारकाबद्दल देशालाही विचार कारावा लागेल असे म्हणत लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा राष्ट्रीय स्तरावर विचार केला जावा असे संकेत दिलेत

पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई करत अट्टल दुचाकी चोरट्यास केले जेरबंद

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा, शिराळा व कराड हद्दीत दुचाकीची चोरी करणारा चोरटा दिपक पांडुरंग पाटील याला इस्लामपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाख रूपये किंमतीच्या 5 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीमध्ये चोरटयाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

पथकाला इस्लामपूर प्रशासकीय इमारतीजवळ एक इसम चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी घेवून येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या ठिकाणी पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता दिपक पांडूंरग पाटील असे नाव सांगितले. त्याच्याकडे असणार्‍या दुचाकीची अधिक चौकशी केली असता बांबवडे ता.शिराळा येथून दुचाकी चोरून केल्याचे त्याने कबूल केले.

पोलिसी खाक्या दाखवताच दिपक पाटील याने कराड व शिराळा हद्दीतून 5 दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली. पोलिस पथकाने चोरटयाकडून दीड लाख रूपये किंमतीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या. इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीशांनी 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.