Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2821

भाडळीत जुगार अड्डयावर छापा : 4 लाख 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

भाडळी, ता. फलटण येथे सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी शनिवार, दि 5 रोजी छापा टाकला. या छापेमारीत सुमारे 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी सुनील मोतीराम पवार {वय 40, रा. बुधवार पेठ, फलटण), जमन तारो पंडित (वय 32, रा. येरवडा सादलबाबा दर्गा जवळ पुणे), योगेश यशवंत खरात (वय 34, रा. पंणदरे, ता. बारामती) आतिश सुभाष साळवे (वय 24, रा. पंणदरे, ता. बारामती), सोमनाथ सिताराम घनवट (वय 39, रा. जाधववाडी, ता. फलटण) जांन्टी (रा. पंणदरे, ता. बारामती), माऊली भिवरकर (रा. फलटण), सनी काकडे (रा. फलटण), सर्जेराव दादा माने (रा. भाडळी, ता. फलटण) हे तीनपानी पत्त्याचा जुगार पैजेवर पैसे लावून खेळत होते.

याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यामध्ये एकूण एकूण 4 लाख 37 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. यानंतर संबंधित आरोपींचा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची पोलिसात गणेश अवघडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरगडे करत आहेत.

लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारावे; भाजप नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांचे भव्य स्मारक मुंबईतील शिवाजी पार्क येथे उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

पत्रात नेमकी काय आहे मागणी-

‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतरत्न स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क, दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे शिवाजी पार्कवर त्याच जागी गानकोकिळा लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्याच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे ही संपूर्ण देशाचीच नव्हे तर जगातील कोट्यवधी संगीतप्रेमी अन लता दीदींच्या चाहत्यांची मागणी आहे. तरी तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे’, अशी मागणी लतादीदींचा एक चाहता या नात्याने भाजपा आमदार राम कदन यांनी केली.

प्रतापगड कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर : 13 मार्च रोजी होणार मतदान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

जावली तालुक्यातील प्रतापगड साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि. 13 मार्च रोजी मतदान होणार आहे. तर दि. 14 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रतापगड कारखाना लि. सोनगाव करंदोशी या संस्थेची अधिसूचना जारी केली आहे. या ठिकाणी संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात व्यक्ती व ऊस सभासद गटातून 15 जागा आहेत.

यामध्ये गट नं. 1 कुडाळ, गट नं. 2 खर्शी सायगांव, गट नं. 3 हुमगाव, गट नं. 4 मेढा, गट नं. 5 महाबळेश्वर या 5 गटातून संचालकांच्या प्रत्येकी 3 जागा आहेत. तसेच उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था 1, महिला राखीव 2, अनु. जाती व जमाती राखीव 1, विमुक्त जाती व भटक्या जमाती राखीव १, इतर मागास प्रवर्ग १ अशा २१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमामध्ये दि. 4 ते 10 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र यादी प्रसिद्धी, दु. 3.30 नंतर नामनिर्देशन पत्र छाननी, दि. 11 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र यादी प्रसिद्धी, दि. 14 फेब्रुवारी – नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची तारीख, दि. 14 ते 28 फेब्रुवारी स. 11 ते दु. 3 पर्यंत उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धी व चिन्ह वाटप, दि. 13 मार्च आवश्यक असल्यास मतदान, दि. 14 रोजी मतमोजणी होणार आहे.

गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे RBI ने आजपासून होणारी MPC ची बैठक पुढे ढकलली

RBI

नवी दिल्ली । गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे RBI ने चलनविषयक धोरण समितीची बैठक एका दिवसासाठी पुढे ढकलली आहे. आता ही तीन दिवसीय बैठक 8 फेब्रुवारीपासून म्हणजेच उद्यापासून होणार आहे, जी आधी आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार होती. त्याचे निकाल 10 फेब्रुवारीला येतील, ज्यानंतर तुमच्या होम आणि ऑटो लोनवरील EMI चा बोझा वाढेल की कमी होईल हे तेव्हाच कळेल.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की,सध्याच्या महागाईच्या चिंतेमध्ये RBI अर्थसंकल्पानंतरच्या पुढील आणि पहिल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात मुख्य धोरणामध्ये दर आहे तसेच ठेवू शकते. मध्यवर्ती बँकेची चलनविषयक धोरण समिती ‘उदारमतवादी’ वरून ‘तटस्थ’ अशी धोरणात्मक भूमिका बदलू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. तरलता सामान्यीकरण प्रक्रिया म्हणून रिव्हर्स रेपो रेट बदलला जाऊ शकतो.

रेपो दरात कोणताही बदल अपेक्षित नाही
बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी सांगितले की,”अर्थसंकल्पात दिलेले आश्वासन आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता पाहता रिव्हर्स रेपो दरात वाढ होऊ शकेल. मात्र, यावेळी रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. पुढील वर्षी त्यात 0.50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.”

रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमधील फरक कमी करण्यावर भर
बँक ऑफ अमेरिकाचा अंदाज आहे की,”रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेटमधील फरक RBI पहिले कमी करेल. एप्रिलमध्ये तो रिव्हर्स रेपो 0.40 टक्क्यांनी 3.75 टक्के वाढवला जाऊ शकतो. त्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपोमधील अंतर 0.25 टक्क्यांच्या आधीच्या पातळीवर येईल. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय पहिल्यांदा जूनमध्ये घेतला जाऊ शकतो. डिसेंबरपर्यंत तो 4 टक्क्यांवरून 4.75 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.”

गावाच्या विकासात शासनासोबत लोकसहभाग महत्वाचा :- एकनाथ खडसे

पुणे : गावाचा विकास होतांना भौतिक सामाजिक व अशा मूलभूत अशा सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजना राबवतांना प्रत्यक्ष अमंलबजावणी होतांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटोदा आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते.

ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे कृषि व ग्राम विकासाचे धोरण काल,आज व उद्या या परिसंवादाचे आयोजन लॉ कॉलेज रस्त्यावरील प्रसाद अपार्टमेंटच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ,ग्रामगौरवचे विवेक ठाकरे,कु.धनश्री ठाकरे, अमोल मचाले,पराग पोतदार, विशाल घोडेस्वार,सुनिल शेटे, प्रिया गायकवाड,आर्यन आखाडे, वाय.डी. पाटील,शरद चौधरी आदी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरुवातीला
ग्रामगौरवच्या राज्यस्तरीय कॉर्पोरेट कार्यालायाचे उदघाटन वृषभ व बैलगाडीचे पूजन करून उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

■ आदर्श गावाचा आदर्श घेण्याची गरज-
राज्यात लौकिकपात्र काम केलेल्या ग्रामपंचायतींना शासन आदर्श गाव म्हणून पुरस्कृत करते या आदर्श गावांचे अनुकरण व आदर्श घेण्याची गरज आहे.आपले गाव स्वउत्पन्नातून आत्मनिर्भर कसे होईल, यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे,असे परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक भास्कर पेरे-पाटील यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.सुनील सुतार,गौरव ठाकरे,राजू भडके,शरद चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

तब्बल 13 वर्षानंतर आ. शशिकांत शिंदे यांचा मेढा येथे आज जनता दरबार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

जावली तालुक्यातील जनतेचे विविध प्रश्न व अडीअडचणी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. आमदार शशिकांत शिंदे याच्या उपस्थितीत तब्बल 13 वर्षांनी जावली पंचायत समितीमध्ये आज दुपारी 1 वाजता जनता दरबार भरवण्यात आला आहे, अशी माहिती जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावतीने देण्यात आली.

आ. शशिकांतजी शिंदे हे जावलीचे आमदार होते तेव्हा महिन्यातून एकदा जावली पंचायत समितीमध्ये जनता दरबार भरविला जात होता. त्यातून तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून घेत विकास कामाबाबत चर्चा केली जाईची. मात्र, आ. शिंदे यांचे कोरेगाव तालुक्यात राजकीय पुनर्वसन झाल्यामुळे यात खंड पडला होता.

मात्र, आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी जावलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. विकास कामासाठीही ते पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे तब्बल 13 वर्षांनंतर जावलीत दुपारी 1 वाजता जनता दरबार घेण्यात आला आहे. यावेळी जावली तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विकास कामांरोबर ग्रामस्थांच्या समस्या, शंकांचेही निरसन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे हे आज जावली तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार ,जि .प . माजी शिक्षण सभापती अमित कदम , तसेच जावलीच्या सभापती जयश्रीताई गिरी व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Gold Price : सोने-चांदी महागले, आजचे नवीन दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, 07 फेब्रुवारी 2022 रोजी भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली. या वाढीनंतर सोन्याचा भाव ४८ हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही जोरदार उसळी नोंदवली गेली. चांदीच्या किमती 1.11 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत.

आज सोन्याचा भाव किती आहे जाणून घ्या
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.19 टक्क्यांनी वाढून 48,014 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

आज चांदीची किंमत किती झाली जाणून घ्या
त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरातही जोरदार वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 1.11 टक्क्यांनी वाढून 61,521 रुपये झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,100 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,200 रुपये
पुणे – 45,100 रुपये
नागपूर – 45,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,250 रुपये
पुणे – 49,100 रुपये
नागपूर – 49,250 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4505.00 Rs 4505.00 0 %
8 GRAM Rs 36040 Rs 36040 0 %
10 GRAM Rs 45050 Rs 45050 0 %
100 GRAM Rs 450500 Rs 450500 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4906.00 Rs 4906.00 0 %
8 GRAM Rs 39248 Rs 39248 0 %
10 GRAM Rs 49060 Rs 49060 0 %
100 GRAM Rs 490600 Rs 490600 0 %

नात्याला काळीमा! मुलानेच केला बापाचा खुन

murder

औरंगाबाद – वडीलाच्या त्रासामुळेच आईने जाळून घेतल्याचा राग धरून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात वीट मारून खून केल्याची घटना काल सकाळी दहेगाव बंगला येथे उघडकीस आली. कडुबाळ मुरलीधर सोनवणे (55) असे दुर्दैवी पित्याचे नाव आहे तर अनिल सोनवणे (24) असे आरोपी मुलाचे नाव आहे.

कडूबाळ सोनवणे यांच्या पत्नीने दहा वर्षांपूर्वी जाळून घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे ते सुनील व अनिल या दोन मुलांसोबत दहेगाव बंगला येथे वास्तव्यास आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून अनिल हा वडील कडू बाळ सोनवणे यांच्यात वाद घालत माझे लग्न करून द्या असे म्हणून वाद घालत होता. तसेच तुम्ही चांगले जेवण बनवत नाही म्हणून दररोज वाद घालत जीवे मारण्याची धमकी देत होता. दरम्यान शनिवारी दुपारी सुनील हा हॉटेलमध्ये कामासाठी गेला होता. रात्री अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल बंद झाल्यानंतर हॉटेलमध्येच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गावातील एका नेत्यास वडिलांना तुझ्या भावाने मारहाण केली असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत अशी माहिती दिली. त्यानंतर सुनील हा घरी गेला असता वडील जखमी अवस्थेत दिसले. तोपर्यंत गावकर यांनी ही माहिती वाळूज पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त उज्‍वला वनकर, वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्ष्मण घुमरे फौजदार शेख सलीम गफूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात सुनील सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अनिल सोनवणे याला अटक केली आहे.

सातबारा उतारा बंद होणार; भूमिअभिलेख विभागाचा निर्णय

satbara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातबारा उतारा रद्द करण्याचा निर्णय सरकार कडून घेण्यात आला आहे. पण हा निर्णय फक्त वाढत्या शहरांसाठी आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आता शहरात शेतजमिनीच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्याठिकाणचा सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.

राज्यातील अनेक शहरांमध्ये सिटी सर्व्हे होऊन देखील सातबारा देणे हे सुरुच आहे. त्यामुळे अशा शहरांमध्ये सातबारा देण्याचे बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणच्या नागरिकांना केवळ प्रॉपर्टी कार्ड देणे सुरु राहणार आहे. केवळ वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सारबाऱ्याचा उपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने हा निर्णय घेतला

अनेक शहरांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे शेतजमीन शिल्लक नाही. अनेक शहरातील शेतजमीन जवळपास संपली आहे. त्यामुळे शहरांमधील सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातबाराचे रूपांतर प्रॉपर्टी कार्ड मध्ये झालेलं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो. त्यामुळे फसवणूकी सारखे प्रकार घडतात आणि म्हणूनच सर्व शहरातील सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमिअभिलेख विभागाने घेतला आहे.

सिटीसर्वे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत त्यातून अनेक घोळ होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्याही वाढते या सर्व प्रकारांना रोखण्याचा हेतूनं शेतीचा वापर होत नसलेल्या जमिनीचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमि अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. सिटी सर्वे सुरू झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणे आवश्यक आहे तरी सुद्धा सातबाराचा उतारा आणि प्रॉपर्टी कार्डचे दोन्ही अभिलेख सुरू आहेत. मात्र आता इथून पुढं शहरी भागामध्ये सातबारा उतारा बंद होऊन प्रॉपर्टी कार्ड सुरू केले जाणार आहेत.

Share Market : बाजाराची कमकुवत सुरुवात, निफ्टी 17,500 च्या खाली

Share Market

नवी दिल्ली । बाजाराची सुरुवात खराब झाली आहे. सेन्सेक्स 95.15 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 58,549.67 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी जवळपास 80 अंकांनी घसरून 17,514.35 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील, ओएनजीसी, पॉवर ग्रिड कॉर्प, जेएसडब्ल्यू स्टील आणि टायटन कंपनी हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले आहेत. तर कोटक महिंद्रा बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एल अँड टी हे टॉप लुझर्सआहेत.

जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. आशियाची सुरुवात खराब झाली आहे. SGX NIFTY मध्ये फ्लॅट ट्रेडिंग दिसत आहे. शुक्रवारी अमेरिकेचे बाजार संमिश्र बंद होते. आज DOW FUTURES 40 अंकांनी घसरले आहे.

10 फेब्रुवारी रोजी क्रेडिट पॉलिसी
लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. RBI च्या MPC समितीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता 9 ऐवजी क्रेडिट पॉलिसी 10 फेब्रुवारीला येईल. बँक, बॉन्ड आणि करन्सी मार्केट देखील बंद आहे.

SBI चा तिसऱ्या तिमाहीत निकाल चांगला, नफा 62% वाढला
SBI ने तिसऱ्या तिमाहीत उत्कृष्ट निकाल सादर केले. बँकेच्या नफ्यात 62% आणि व्याजातून मिळणाऱ्या कमाईत 6% वाढ झाली आहे. मालमत्तेच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. 25 तिमाहीत सर्वात कमी स्लिपेज राशन आहे. हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर आहे.

गेल्या आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी होती?
अर्थसंकल्पीय आठवड्यात, बाजार सलग दोन आठवड्यांच्या घसरणीच्या टप्प्यातून सावरताना दिसला. 4 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार 2 टक्क्यांहून अधिकच्या वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाला. मात्र, मिश्रित मॅक्रो डेटा, इंडिया इंक. ची मजबूत कामगिरी, FII ची सतत विक्री, कमकुवत PMI डेटा, बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात केलेली वाढ आणि ECB द्वारे आर्थिक धोरण कडक करण्याची चिन्हे हे काही घटक बाजाराला चालना देत होते.

गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,444.59 अंकांनी म्हणजेच 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 58,644.82 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 50 414.35 अंकांच्या किंवा 2.42 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,516.3 च्या पातळीवर बंद झाला.