Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2822

रस्त्यावर केक कापला म्हणुन 16 जणांना अटक; 9 वाहने जप्त

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा येथील सुमित्राराजे उद्यानाचे समोर सदरबझार येथे दि. 05 रोजी तब्बल युवकांनी रस्त्यावर मोटार सायकलवरती केक कापून वाढदिवस साजरा केला. याप्रकरणी पोलिसांकडून रविवारी 16 जनांना अटक करण्यात आली असून 9 वाहने जप्त केली आहेत.

याप्रकरणी ऋतिक जितेंद्र शिंदे (रा. बागडवाडा, गोडोली),अक्षय सुनिल जाधव (रा. करंजे सातारा), सागर चंद्रकांत साळुखे (कृष्णानगर खेड, सातारा) प्रितम अनिल चव्हाण (रा. गणेश कॉलनी जुना आरटीओ चौक, सातारा), दिनेश राजेंद्र निकम (रा. विकास नगर खेड, सातारा) सुरज शंकर साळुखे (रा. तडवळे, ता. कोरेगांव), संकेत प्रल्हाद शिंदे (रा. रणशिंगवाडी, ता. खटाव, जि.सातारा) पुरुषोत्तम नारायण भोसले
(रा. विकास नगर खेड, सातारा), अक्षय संजय जातक (रा. वणे, ता.जि.सातारा), प्रविण अशोक खडपद (रा. सदरबझार, सातारा), गौरव पांडुरंग मोरे (रा. कारी ता.जि.सातारा) व इतर 5 ते 6 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रविवार पेठ, गोडोली, सदरबझार, एमआयडीसी, क्षेत्रमाहुली अशी बीट येतात. या सर्व हद्दीमध्ये शांतता रहावी नागरीकांना त्रास होऊ नये, नागरीकांचे स्वास्थ बिघडु नये यासाठी सातारा शहर पोलासांमार्फत पोलीस पेट्रोलींग केले जाते. शनिवार, दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर पेट्रोलींग करीत होते.

यावेळी सिम्बॉयसिस हॉस्पिटल जवळ सुमित्राराजे उद्यानाचे समोर सदरबझार सातारा येथे काही युवक रस्त्यावर मोटार सायकल लावुन त्यावरती केक कापत होते. हे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजय बोराडे, सहा पोलीस अधिक्षक दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस नाईक खाडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

अन् सुप्रियाताईंनी पवारांच्या पायात बूट घातला; मोदीही बघतच राहिले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज आले होते. उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहत सर्वांचे लक्ष्य वेधले.

झालं असं की पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. यावेळी ते बूट घालण्यासाठी खाली वाकणार होते. वडिलांना खाली वाकून बूट घालण्यास त्रास होतोय… कष्ट घ्यावे लागत आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रिया सुळे यांनी हेरलं आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले.

आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार मनी न बाळगता, सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवार यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार ?

औरंगाबाद – जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या प्रारूप प्रभाग रचना तपासणीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर करण्यात आले असून जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम 12 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी सादर करणार आहे. यात जिल्हा परिषदेसाठी 70; तर पंचायत समित्यांसाठी एकूण 140 गण निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रशासकीय स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही नांदी समजले जात आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अ. गो. जाधव यांनी याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे. वर्ष 2022 चा महाराष्ट्र अधिनियम सुधारित तरतुदीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर तयार करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणूक उपजिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदारांनी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार केला आहे. तो तपासणीकरिता राज्य निवडणूक कार्यालयाने मागविला आहे. त्यानुसार प्रभाग रचनेची हार्ड व सॉफ्ट कॉपी, नकाशे सोबत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या 62 जिल्हा परिषदेचे गट आहेत. आता ही संख्या आठने वाढणार आहे. त्यामुळे गटांची संख्या एकूण 70 होणार आहे. पंचायत समित्यांचे 124 गण असून आता त्यात 16 गणांची वाढ होणार असून आता एकूण गणांची संख्या 140 होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मार्च महिन्यात मुदत संपत असल्याने काही दिवस जिल्हा परिषदेचे काम प्रशासकांच्या हाती जाणार अशी चर्चा आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र पाठविले असून प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम पाठविण्याच्या सूचना केल्या आहे. जिल्ह्याचा प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम 12 फेब्रुवारीला निवासी उपजिल्हाधिकारी सादर करणार आहे.

या तालुक्यात वाढले गट –
जिल्ह्याचा नवीन प्रारूप प्रभाग रचनेनुसार औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यांत प्रत्येकी २ तर फुलंब्री, पैठण, कन्नड व गंगापूर तालुक्यांत प्रत्येकी १ असे आठ जिल्हा परिषदेचे गट वाढले आहेत.

तालुकानिहाय गट – गणांची संख्या
औरंगाबाद – 10 – 20
पैठण – 9 – 18
खुलताबाद – 3 – 6
वैजापूर – 7 – 14
गंगापूर – 9- 18
सोयगाव – 3 – 6
सिल्लोड – 8 – 16
कन्नड – 8 – 16
फुलंब्री – 4- 8

ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले; आता RTO टेस्टची वाट पहावी लागणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाहन चालकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ड्रायव्हिंग लायसन्स च्या नियमात सरकार कडून काही बदल करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात वाहन परवाना मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. हे नियम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केले आहेत, हे नियम लागू देखील झाले आहेत. यामुळे ते ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये पडून असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी नोंदणी करून शकता. अर्जदाराला ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल. अन् तिथेच  टेस्ट द्यावी लागेल. त्यानुसार टेस्टमध्ये पास झालेल्यांना संबंधित ट्रेनिंग सेंटरकडून सर्टिफिकेट देण्यात येईल. या सर्टिफिकेटच्या आधारावर अर्जदाराला परवाना देण्यात येईल.

मंत्रालयाने ड्रायव्हिंग सेंटर स्कूलसाठी काही नियम आणि अटीही घालून दिल्या आहेत. त्यानुसार अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी निंग सेंटर्सकडे किमान एक एकर जागा आहे, मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी निंग सेंटर्ससाठी दोन एकर जागा आवश्यक आहे. ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.

अतीत येथे प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील अतीत येथील समर्थगाव मधील प्लास्टिक रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस भीषण आग लागण्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

अतीत समर्थगाव येथे अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल प्रा.ली. ही कंपनी आहे. या कंपनी भंगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. या ठिकाणी रविवारी अचानक आग लागली. आजचे लोट आई धूर बाहेर येत असल्याचे परिसरातील लोकांनी पाहिले असता त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशामक दलास दिली. त्या तर अग्निशामक दलाची गाडी त्या ठिकाणी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. अखेर दोन तासानंतर आग अटोक्यात आली.

कंपनीला अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात उकसान झाले आहे. बोरगाव पोलिसांसह सातारा नगरपालिका, कराड नगरपालिका, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्निशामक दलाच्या पथकाने आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले.

रक्षकच बनला भक्षक ! लग्नाचे आमिष दाखवून पोलिसानेच केला अत्याचार

Rape

औरंगाबाद – विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून 15 फेब्रुवारी 2021 ते 29 जानेवारी 2022 दरम्यान अत्याचार करणाऱ्या छावणी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाच्या विरोधात छावणी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संदीप लक्ष्‍मण पवार असे आरोपी शिपायाचे नाव आहे.

छावणी ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, पीडिता ही नवऱ्यासोबत वाद असल्यामुळे विभक्त राहते. तिला दोन मुले आहेत. 2021 मध्ये ती एका मॉलमध्ये कामाला असताना त्या ठिकाणी शिपाई संदीप कामानिमित्त गेला होता. त्या वेळी दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून पवारने तिला दोन मुलांसह स्वीकारून लग्नाचे आमिष दाखवले. तसेच 15 फेब्रुवारी 2019 ते 29 जानेवारी दोन हजार बावीस दरम्यान जबरदस्तीने संपर्क प्रस्थापित केले. लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. या काळात तिच्याकडून आठ ते दहा लाख रुपये उकळले. ती 28 ऑगस्ट 2019 रोजी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे सोनोग्राफी केल्यानंतर स्पष्ट झाले. तेव्हा तिने पवारला लग्नाबाबत आग्रहाची मागणी केली, तेव्हा पवारने गर्भपात कर नाहीतर तुझ्या मुलांना मारून टाकेल अशी धमकी दिली.

तसेच जबरदस्तीने एका खाजगी रुग्णालयात गर्भपात केला. पवार वारंवार धमकी देऊन, माझ्यावर गुन्हा दाखल असून तू माझे काहीही वाकडे करू शकणार नाही, असे नेहमी बोलत असल्याचे ही फिर्यादीत म्हटले आहे.

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन

lata mangeshkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतरत्न प्राप्त स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. हि बातमी अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण जगभरात शोकमय वातावरण निर्माण झाले. यानंतर जगभरातून लता मंगेशकर यांच्या चाहत्यांनी अक्षरशः टाहो फोडला. गेल्या २९ दिवसांपासून लता दीदींची न्यूमोनियासोबत झुंज सुरु होती. हि झुंज आज अपयशी झाली आणि लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर अगदी काहीच क्षणापुर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे लता दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले आणि दीदी अनंतात विलीन झाल्या. लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या चाहत्यांनी शिवाजी पार्कवर मोठी गर्दी केली होती. साश्रू नयनांनी प्रत्येकाने लता दीदींना निरोप दिला. याठिकाणी अनेक दिग्गज कलाकार आणि नेते मंडळी उपस्थित होते.

रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता दिंडीचे ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास लता दीदींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दीदींचे पार्थिव प्रभुकुंज येथून शिवाजी पार्क येथे सर्व सामान्यांना अंत्य दर्शन घेता यावे यासाठी नेण्यात आले. याठिकाणी दीदींच्या अनेक चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तर दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी तेथे दिग्गज नेतेमंडळी यांच्यासह कलासृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. मंगेशकर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दीदींच्या नसण्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. तर लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांच्या चेहऱ्यावरदेखील दुःखद भाव स्पष्ट दिसत होते.

लता दीदी यांची विशेष बाब म्हणजे, वयाच्या तेराव्या वर्षी वडील दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. अशावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेताना त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचार कधीच केला नाही. लता दीदींचे वय फारसे नव्हते पण खांद्यांमध्ये कुटुंबाची जबाबदारी पेलता येईल इतके बळ सामावलेले होते. लता दीदींनी आपल्या चारही भावंडांचा व्यवस्थित सांभाळ केला. कुटुंबासाठी त्यांनी लग्नदेखील केले नाही. त्यांनी नेहमीच आपल्या कुटुंबाची पाठराखण केली. इतकेच नव्हे तर लता दीदींचे स्वर जितके मधुर तितकीच मधुर त्यांची वाणी होती. लता दीदींचे प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध होई. त्यामुळे आज लता दीदींचे हयात नसणे हि बाब सर्वांच्याच जिव्हारी लागली आहे.

FPI ने फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारातून आतापर्यंत काढले 6,834 कोटी रुपये

नवी दिल्ली । परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारांमध्ये निव्वळ विक्रेते राहिले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये FPI ने भारतीय बाजारातून 6,834 कोटी रुपये काढले. डिपॉझिटरी डेटानुसार, FPI ने इक्विटीमधून 3,627 कोटी रुपये, डेट सेगमेंट मधून 3,173 कोटी रुपये आणि हायब्रिड इंस्ट्रूमेंट्स मधून 34 कोटी रुपये काढले आहेत.

याआधी, FPI हे सलग चार महिने निव्वळ विक्रेते राहिले आहेत.मॉर्निंगस्टार इंडिया असोसिएट डायरेक्टर हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, “यूएस फेडरल रिझर्व्हने अत्यंत सौम्य चलनविषयक धोरणाची भूमिका संपवण्याचे संकेत दिले आहेत. तेव्हापासून FPI ची विक्री झपाट्याने वाढली आहे.”

याशिवाय, व्याजदरात वाढ होण्याच्या अपेक्षेने जागतिक स्तरावर बॉण्ड यिल्डही वाढले आहे, असे ते म्हणाले. परिणामी, गुंतवणूकदार धोकादायक मालमत्तेचे प्रदर्शन कमी करत आहेत आणि सोन्यासारख्या सुरक्षित आश्रयस्थानाकडे वळत आहेत. श्रीवास्तव म्हणाले की,”देशांतर्गत आघाडीवर, विकासाभिमुख अर्थसंकल्पामुळे, बाहेर पडण्यावर काही प्रमाणात अंकुश आला आहे, मात्र परकीय निधीच्या प्रवाहावर अर्थसंकल्पाचा काय परिणाम होईल याचा अंदाज येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल.”

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही.के.विजयकुमार म्हणाले, “FPI ने बँक आणि आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री केली आहे. त्याच वेळी, त्याने मेटल स्टॉकमध्ये खरेदी केली आहे.” कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) श्रीकांत चौहान म्हणाले, “उच्च चलनवाढीमुळे आणि येत्या काही महिन्यांत यूएस मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे शेअर बाजार अस्थिर राहतील.”

चिप नसल्यामुळे ‘या’ कार कंपनीला थांबवावे लागेल उत्पादन, जाणून घ्या काय होणार परिणाम

नवी दिल्ली । सेमीकंडक्टर चिप नसल्यामुळे फोर्ड मोटर्सने आपले उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी पुढील आठवड्यापासून अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथील आपल्या 8 प्लांटमधील उत्पादन थांबवणार आहे किंवा कमी करणार आहे. याच्या एक दिवस आधीच डेट्रॉईट ऑटोमेकरने चेतावणी दिली होती कि, चिपच्या कमतरतेमुळे चालू तिमाहीत वाहनांचे प्रमाण कमी होईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मिशिगन, शिकागो आणि मेक्सिको येथे असलेल्या प्लांटमध्ये काही काळ उत्पादन थांबवले जाईल. कॅन्सस सिटीमधील आपल्या F-150 पिकअप ट्रकचे उत्पादन वाया जाईल, तर एक शिफ्ट त्यांच्या ट्रान्झिट व्हॅनच्या उत्पादनासाठी जाईल. डेट्रॉइट ऑटोमेकर कॅनडातील आपल्या ओकविले प्लांटमध्ये ओव्हरटाईम काढून टाकेल आणि डिअरबॉर्न, केंटकी तसेच लुईसविले येथील कारखान्यांमध्ये एकच शिफ्ट किंवा कमी शेड्यूल चालवतील.

अलीकडेच, फोर्डकडून अपेक्षेपेक्षा कमी कमाईची घोषणा झाल्यानंतर शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. याचे आणखी एक कारण म्हणजे फोर्डचे स्पर्धक असलेल्या जनरल मोटर्सच्या तुलनेत 2022 मध्ये वाहनांच्या उत्पादनातील संथ रिकव्हरीचा परिणाम. मात्र, कंपनीने म्हटले आहे की, दुसऱ्या सहामाहीत वाहनांच्या संख्येत लक्षणीय सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या आकडेवारीनुसार, कार निर्मात्यांनी डिसेंबर 2021 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत 219,421 प्रवासी वाहने विकली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 13 टक्क्यांनी कमी आहे. ही मागणीची समस्या नसून पुरवठ्याची समस्या आहे. विविध कार निर्मात्याच्या वेबसाइटवरील माहितीवरून असे दिसून येते की डिसेंबर 2021 पर्यंत एकूण 7 लाखाहून जास्त ऑर्डर प्रलंबित आहेत.

Stock Market : ‘या’ आठवड्यात बाजारात अस्थिरतेचा अंदाज; काळजीपूर्वक गुंतवणूक करा

नवी दिल्ली । RBI च्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक पाहता, या आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण होऊ शकते. याचा परिणाम कंपन्यांच्या तिमाही निकालांवरही होऊ शकेल. त्यामुळे जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर सावधगिरी बाळगा. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, आठवडाभरातील बाजारांची दिशा रिझव्‍‌र्ह बँकेचा आर्थिक आढावा आणि काही मोठ्या कंपन्यांच्या तिमाही निकालांवरून ठरवली जाईल.

देशांतर्गत बाजारातील गुंतवणूकदार रुपयाची अस्थिरता, ब्रेंट क्रूडच्या किंमती आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या वृत्तीवरही लक्ष ठेवतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणतात की,”महत्त्वाच्या घडामोडींदरम्यान, बाजारातील सहभागी या आठवड्यात MPC च्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मिटिंगकडे लक्ष देतील. या बैठकीचा निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे. याशिवाय औद्योगिक उत्पादन (IIP) डेटा देखील 11 फेब्रुवारी रोजी मॅक्रो इकॉनॉमिक आघाडीवर येणार आहे.

‘या’ कंपन्यांचे निकाल येत आहेत
ते म्हणाले की,”भारती एअरटेल, जिंदाल स्टील, एसीसी, हिरो मोटोकॉर्प, टाटा पॉवर, हिंदाल्को आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासह अनेक मोठ्या कंपन्यांच्या तिमाहीचे निकालही या आठवड्यात येणार आहेत. TVS मोटर कंपनी, युनियन बँक ऑफ इंडिया, IRCTC, NMDC आणि SAIL देखील आपल्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. शिवाय, देशांतर्गत बाजारात दिसणारी प्रचंड अस्थिरता जागतिक ट्रेंडशी सुसंगत आहे. हे नजीकच्या भविष्यातही सुरू राहू शकते.

MPC च्या बैठकीवर लक्ष ठेवून आहे
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे रिसर्च प्रमुख संतोष मीना म्हणाले की,”या आठवड्यात देशांतर्गत निर्देशक बाजाराला दिशा देतील. RBI च्या 9 फेब्रुवारीला होणाऱ्या MPC च्या बैठकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागतिक निर्देशक देखील अस्पष्ट आहेत. भू-राजकीय परिस्थिती महत्त्वाची आहे तर कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार सध्या विक्रीच्या मूडमध्ये आहेत. त्यांची भूमिकाही बाजाराला दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”

बाजारात अपेक्षेप्रमाणे वाढ
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च प्रमुख विनोद नायर म्हणतात की,”रिझर्व्ह बँकेची या आठवड्यात होणारी धोरणात्मक बैठक ही देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची घटना आहे. या बैठकीच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांत बाजारातील तेजी अपेक्षेनुसार होती असे विश्लेषकांनी सांगितले. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 1,444.59 अंकांनी म्हणजेच 2.52 टक्क्यांनी वधारला होता.