Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2823

ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी 101 बकऱ्यांचा बळी

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील हापूर येथून नवी दिल्लीस जात असताना एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर हापूरमध्ये गोळीबार करण्यात आला. यानंतर त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी रविवारी हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने 101 बकऱ्यांचा बळी देण्याचा धक्कादायक प्रक्रार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमास मलाकपेटचे आमदार आणि एआयएमआयएम नेते अहमद बलाला यांनीही उपस्थिती लावली होती.

दरम्यान, ३ फेब्रुवारीच्या हल्ल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख ओवेसी यांचे समर्थकांकडून त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जात आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा मंजूर केली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली. दरम्यान, आज हैदराबादच्या बाग-ए-जहानारा येथे एका व्यावसायिकाने १०१ बकऱ्यांचा बळी देण्याचा धक्कादायक प्रक्रार केला आहे.

‘या’ बँकांकडून आपल्या बचत खात्यांवरील व्याजदरात बदल

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट्स च्या दरानंतर आता सरकारी आणि खासगी बँकांनी बचत खात्यावरील व्याजात बदल केला आहे. तुमचेही या बँकांमध्ये बचत खाते असल्यास, दर बदलल्यामुळे तुम्हाला नुकसान झाले की फायदा झाला, हे जाणून घ्या. जर तुम्हाला या बँकांमध्ये बचत खाते उघडायचे असेल तर त्यापूर्वी नवीन व्याजदर तपासा.

खरं तर, सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB), पंजाब आणि सिंध बँक आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने या महिन्यात बचत खात्यांचे व्याजदर बदलले आहेत. यापूर्वी, काही बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट्स वरील व्याजदरातही बदल केले आहेत.

HDFC बँक जास्त व्याज देईल
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात वाढ केली आहे. खातेदाराच्या खात्यातील डेली बॅलन्सवर व्याज मोजले जाईल. मात्र, ते तिमाही आधारावर दिले जाईल. 50 लाखांपेक्षा कमी बॅलन्स असलेल्या बचत खात्यांवर बँक 3% व्याज देईल. 50 लाखांपेक्षा जास्त आणि 1,000 कोटी रुपयांपेक्षा कमी बॅलन्स रकमेवर 3.50 टक्के व्याज भरावे लागेल. 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असलेल्या रकमेवर ग्राहकांना 4.50 टक्के व्याज मिळेल. नवीन दर 2 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

पंजाब नॅशनल बँकेने कपात केली
पंजाब नॅशनल बँकेने घरगुती आणि NRI बचत खात्यांवरील व्याजदरातही 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. यापूर्वी, बँकेने बचत खात्यातील 10 लाख रुपयांच्या बॅलन्सवर 2.80 टक्के व्याजदर देऊ केला होता, जो आता 2.75 टक्के होईल. 10 लाख आणि 500 ​​कोटी रुपयांपेक्षा कमी बॅलन्सवर 2.85 टक्के व्याज मिळेल. 500 कोटी आणि त्यावरील बॅलन्सवर 3.25 टक्के व्याज मिळेल. नवीन दर 3 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

पंजाब आणि सिंध बँकेनेही केले आहेत बदल
बँकेने 1 फेब्रुवारी 2022 पासून बचत खात्यांवरील व्याजदरात बदल केले आहेत. या अंतर्गत 10 कोटी रुपयांपेक्षा कमी बॅलन्सवर 3% व्याज मिळेल. 10 कोटी आणि त्यापेक्षा जास्त बॅलन्सवर दर 3.20 टक्के करण्यात आला आहे. हे दर देशांतर्गत बचत बँक डिपॉझिट्स वर तसेच NRE/NRO डिपॉझिट्स वर लागू आहेत.

Gold ETF : महागाईमुळे वाढली सोन्याची चमक, गुंतवणूकदारांनी केली मोठी गुंतवणूक

Digital Gold

नवी दिल्ली । फिजिकल गोल्ड असो वा डिजिटल गोल्ड म्हणजेच गोल्ड ईटीएफ, ही नेहमीच चांगली गुंतवणूक मानली जाते. विशेष म्हणजे यात कोणताही धोका नाही. वाढत्या महागाईच्या काळात सोन्याची चमक आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे याकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण अजूनही कायम आहे. गुंतवणूकदार सतत सोन्यात गुंतवणूक करत आहेत.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) चे म्हणणे आहे की, उच्च महागाई दर आणि वाढत्या बाजार मूल्यांकनामुळे, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मात्र, 2020 मध्ये ते 6,657 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

यंदाही आकर्षण राहणार आहे
क्वांटम म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ जिमी पटेल म्हणतात की,”जागतिक रिकव्हरी आणि चांगल्या गुंतवणूकदारांच्या भावनांमुळे 2021 मध्ये सोन्याच्या ईटीएफ फ्लो मध्ये महामारीच्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र, उच्च चलनवाढीचा दर आणि यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेमुळे 2022 मध्येही गोल्ड ईटीएफ आकर्षक राहतील.

त्यामुळे 2020 मध्ये गुंतवणूक वाढली
पटेल म्हणाले की,”यूएस सेंट्रल बँकेने आर्थिक धोरण कडक केल्याने डॉलर आणि यूएसमध्ये बॉण्ड यिल्ड वाढेल. हे सोन्याला अडथळा बनू शकते. 2020 मध्ये गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे महामारी. याशिवाय, आर्थिक स्थिती नरमल्याने आणि जागतिक व्याजदरात घट झाल्यामुळे सोन्यातील गुंतवणूकही फायदेशीर ठरली.

शेअर्समध्ये वाढ असूनही चांगली गुंतवणूक
हिमांशू श्रीवास्तव, सहयोगी संचालक व्यवस्थापक (संशोधन), मॉर्निंगस्टार इंडिया म्हणाले की,”गोल्ड ईटीएफ वर्षभर गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. शेअर्समध्ये तेजी असूनही त्याचे आकर्षण कायम राहिले. गेल्या वर्षी केवळ जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमधून पैसे काढले गेले. जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून 61.5 कोटी रुपये काढले. डिसेंबर 2021 पर्यंत गोल्ड फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 30 टक्क्यांनी वाढून रु. 18,405 कोटी झाली आहे, गुंतवणुकीचा ओघ एक वर्षापूर्वी 14,174 कोटी रुपये होता.”

आप, तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवा; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप, आप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षातील नेत्यांकडून टीका टिप्पणी केली जात आहे. त्या दरम्यान आज भाजप गोवा प्रभारी व महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आप आणि तृणमूल्य काँग्रेस पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला. “काँग्रेसचेही डबल इंजिन सरकार होते. त्यांनी काहीच केले नाही. आज तृणमूल काँग्रेस, आप खोटी आश्वासने देत आहेत. आप, तृणमूलसारख्या पक्षनेत्यांना पार्सल करून घरी पाठवा,” असा टोला फडणवीस यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज गोवा येथील माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आधुनिक गोब्याचे शिल्पकार कोण असतील तर ते दिवंगत मनोहर पर्रिकर हे आहेत. त्यांच्यानंतर प्रमोद सावंत यांनी अनेक क्षेत्रांत विकासाला चालना दिली. या राज्याच्या विकासाचा आलेख खूप मोठा आहे. या ठिकाणी सध्या निवडणुकीमुळे अनेक पक्ष आले आहेत. यात तृणमूलही आहे. तृणमूलला भुलून अनेक जण वाहत गेले. गोव्यात तृणमूलचा फॉर्म्युला चालू शकत नाही, हे लक्षात येताच अनेक जण दूर झाले आहेत.”

यावेळी फडणवीसांनी तृणमूलवर टीका करताना ते पुढे म्हणाले, “मगो पक्षाला तृणमूलच्या काळ्याकुट्ट व लोकशाही मान्य नसलेल्या लोकांबरोबर जाणे महागात पडणारे आहे. आज मगोबदद्ल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर तृणमूलचा ध्येय मगोला मान्य असेल तर त्यांना जनता अजिबात मत देणार नाही,” असे फडणवीस याणी यावेळी म्हंटले.

लतादीदींच्या निधनाने राज्यात दुखवटा; सरकारी कार्यालये, शाळा- महाविद्यालय सोमवारी बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. राज्य सरकार कडून लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देखील यापूर्वीच 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मुंबई येथील शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान यावेळी उपस्थित राहतील.

शतकांचा आवाज हरपला; लतादीदींच्या निधनाने ‘बिग बी’ हळहळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. याच दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर शतकांचा आवाज हरपला अशा शब्दांत बॉलीवूड चे महानायक अमिताभ बच्चन यांनी हळहळ व्यक्त केली.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहित लता मंगेशकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे,”शतकांचा आवाज हरपला, आता स्वर्गातही लतादिदींचा आवाज रुंजी घालेल”. दिदींच्या जाण्याने मला अतिव दु:ख होतंय. त्या आज आपल्याला सोडून निघून गेल्या आहेत असे अमिताभ बच्चन यांनी म्हंटल.

गेली 90 वर्ष त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांची सेवा केली. त्या दिदी आज आपल्यात नाहीत. आता त्यांचा अवीट सूर स्वर्गातही रुंजी घालेल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, अशी प्रार्थना आफल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी केलीय.

Start-up : नोकरदारांसाठी मोठी बातमी!! यावर्षी पगारात होऊ शकते 75% वाढ

FD

नवी दिल्ली । जर तुम्ही एखाद्या स्टार्टअपमध्ये काम करत असाल तर येत्या काही वर्षांमध्ये तुमच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. जर तुम्ही टॉप परफॉर्मर असाल तर तुमचा पगार 75% पर्यंत वाढू शकतो. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, स्टार्टअप आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात यावर्षी सरासरी 12-25 टक्क्यांनी वाढ करू शकते, जी कोणत्याही उद्योग आणि क्षेत्रातील सर्वाधिक आहे.

वास्तविक, सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. देशांतर्गत स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षित करत आहेत. म्हणूनच स्टार्टअप्सनाही चांगले आणि कुशल कर्मचारी कायम ठेवायचे आहेत. त्यासाठी ते त्यांना चांगली वाढ देत आहेत.

बोनस, रिटेन्शन बोनस, ESOP सुविधा
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अनेक स्टार्टअप्स त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 15-25 टक्क्यांनी वाढ करणार आहेत. काही स्टार्टअप्स यावर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना 75 टक्क्यांपर्यंत पगारवाढ देऊ शकतात. ज्यांचा पगार कमी आहे, त्यांना दुप्पट पगारही दिला जाऊ शकतो. अतिरिक्त बोनस, रिटेन्शन बोनस, टेन्युअर लिंक्ड स्टॉक ऑप्शन (ESOP) सुविधा देखील दिली जात आहे.

एट्रिशन रेट पगारवाढीचे प्रमुख कारण
Deloitte India चे आनंदरूप घोष म्हणतात की,”टेक स्टार्टअप्स खूप चांगले पगार देत आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी स्टार्टअपमध्ये ज्या प्रकारचा पगार दिला जात होता, तीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. सध्या सरासरी 12-15 पगारवाढीचा अंदाज आहे. त्याच वेळी, एचआर सर्व्हिस फर्म Aon इंडियाचे रुपंक चौधरी म्हणतात की, 2015-16 च्या तुलनेत यावेळी जास्त पगारवाढ उपलब्ध असेल. यामागील मुख्य कारण म्हणजे हाय एट्रिशन रेट. अशा परिस्थितीत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यासाठी आणखी वेतनवाढ देऊ करतील.

स्टार्टअपने विक्रमी $36 अब्ज जमा केले
गेल्या वर्षभरात भारतीय स्टार्टअप्सची कामगिरी उत्तम राहिली आहे. या स्टार्टअप्सनी 2021 मध्ये विक्रमी $36 अब्ज निधी उभारला आहे. पण या स्टार्टअप्सना काम करण्यासाठी कुशल कर्मचाऱ्यांची गरज असते. यामुळे चांगले कर्मचारी कायम ठेवण्यासाठी कंपन्या अशा ऑफर देत आहेत.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ माहिती; अल्फा- बीटा म्हणजे नेमकं काय ?

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड झपाट्याने बदलत आहे. जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अल्फा आणि बीटा बद्दल सांगणार आहोत. हे गणितातले अल्फा-बीटा नाही. तर येथे आपण म्युच्युअल फंडाच्या अल्फा आणि बीटाबद्दल बोलणार आहोत.

जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये एखादा फंड निवडला तर हे लक्षात गया कि त्याचे पाच इंडिकेटर्स असतात. जसे की अल्फा, बीटा, आर स्क्वेअर, स्टॅण्डर्ड डेव्हिएशन आणि पाचवा इज शार्प रेशो. अल्फा आणि बीटाची गणना करून तुम्ही फंडाद्वारे चांगले रिटर्न कसे मिळवू शकाल हे जाणून घ्या.

अल्फा काय आहे ?
अल्फा फंडाची कामगिरी दाखवतो. म्युच्युअल फंडामध्ये, अल्फा फक्त बेंचमार्क इंडिकेटर्स पेक्षा फंडाने किती जास्त किंवा कमी रिटर्न दिला आहे हे दाखवते. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुम्ही एखाद्या फंडात गुंतवणूक केली आहे आणि त्या फंडाचा बेंचमार्क 20% आहे आणि त्या फंडाने 25% रिटर्न दिला आहे, तर याचा अर्थ त्याचा अल्फा म्हणजेच कामगिरी 5% जास्त आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या फंड मॅनेजरने तुमचे फंड उत्तम प्रकारे मॅनेज केले आहेत. कारण रिटर्न बेंचमार्कपेक्षा जास्त आहे.

याउलट, जर बेंचमार्क 20% असेल आणि फंडाने 15% रिटर्न दिला असेल, तर त्याने त्याच्या अपेक्षेपेक्षा 5% कमी रिटर्न दिला आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही गुंतवणूक करायला जाल तेव्हा त्याचा अल्फा जास्त आहे का हे नक्की पहा. अल्फा जितका नकारात्मक असेल तितकी परिस्थिती वाईट होईल आणि ती जितकी जास्त राहील तितकी परिस्थिती चांगली होईल. जर म्युच्युअल फंडाचा सकारात्मक अल्फा 2% असेल, तर याचा अर्थ असा की, त्याने बेंचमार्क निर्देशांकापेक्षा 2% जास्त रिटर्न दिला आहे. दुसरीकडे, जर त्या फंडाचा अल्फा -2% दर्शवत असेल तर फंडाने निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. पॉझिटिव्ह अल्फा म्हणजे त्याच्या फंड मॅनेजरने चांगले काम केले आहे, नंतर पॉझिटिव्ह अल्फा पाहून तुम्ही फंड निवडू शकता आणि तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकता.

बीटा काय आहे ?
बीटा फंडाच्या अस्थिरतेचा संदर्भ देते. म्युच्युअल फंड बाजाराच्या हालचालीसाठी किती संवेदनशील आहे हे बीटा दाखवते. म्हणजेच ते किती उंच किंवा खालपर्यंत जाऊ शकते. जर बीटा निगेटिव्ह असेल तर अस्थिरता कमी असते आणि जर बीटा सकारात्मक असेल तर अस्थिरता जास्त असते. आम्ही म्युच्युअल फंडातील बीटाचा बेंचमार्क मानतो. जर त्याचा बेंचमार्क एकापेक्षा जास्त असेल तर तो अधिक अस्थिर असतो आणि जर तो एकापेक्षा कमी असेल तर तो कमी अस्थिर असतो, जोखीम कमी असते. जेव्हा व्हॅलिडिटी जास्त असते तेव्हा नुकसान होण्याची शक्यता वाढते, मात्र रिटर्न मिळण्याची शक्यता देखील वाढते.

तुम्हाला कोणत्याही AMC मध्ये गुंतवणूक करायची असल्यास, पहिले त्याचे बीटा मूल्य तपासा. बीटा मूल्य कधीही एकापेक्षा जास्त नसावे. म्हणजेच ते वजा किंवा एकापेक्षा कमी असावे. त्यामुळे जर बीटा एकापेक्षा कमी असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. कारण तिथे तुमचा धोका कमी होतो. तुम्हाला जरा कमी रिटर्न नक्कीच मिळतो, मात्र धोका कमी होतो.

“वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात आणि आता…”; केदार शिंदेची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. या प्रकारावरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. “आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल,” अशी टीका शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

केदार शिंदे यांनी ट्विट करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, “वर्षानुवर्षे मांडीला मांडी लावून एकत्र बसलात. आता प्रत्येक गोष्टी मधे एकमेकांवर धावून जाताय? पुन्हा वेळ आल्यावर जनतेची गरज म्हणून एकत्र याल. आम्ही फक्त युत्यासारख्या घटना पाहायच्या!! लोकशाही,”असे शिंदे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हा हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच झाला आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना झटका!! 10 फेब्रुवारीपासून अनेक प्रकारचे शुल्क वाढणार

ICICI Bank

नवी दिल्ली । तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी तुमच्या वॉलेटशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आली आहे. वास्तविक, ICICI बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व्हिस चार्ज वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सांगितले की, 10 फेब्रुवारी 2022 पासून क्रेडिट कार्ड लेट पेमेंट फी, कॅश एडव्हान्स ट्रान्झॅक्शन फी, चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, ICICI बँकेने एमराल्ड क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर क्रेडिट कार्डचा लेट पेमेंट फी बदलली आहे. जर तुमची एकूण थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी असेल, तर बँक तुमच्याकडून काहीही आकारणार नाही. थकबाकी जितकी जास्त असेल तितके शुल्क जास्त असेल. 50,000 किंवा त्याहून जास्तीच्या थकबाकीसाठी, बँक जास्तीत जास्त 1200 रुपये आकारेल. बँकेचे नवीन दर 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.

याशिवाय, 10 फेब्रुवारी 2022 पासून, ICICI बँक क्रेडिट कार्डमधून कॅश ऍडव्हन्स घेतल्यास, ट्रान्सझॅक्शन फीस एडवांस्ड अमाउंटवर 2.50 टक्के असेल, जे किमान 500 रुपये असेल. चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फी एकूण पेमेंट रकमेच्या 2% असेल, जी किमान 500 रुपये असेल.

याशिवाय, ICICI बँकेचे म्हणणे आहे की, चेक रिटर्न फी आणि ऑटो डेबिट रिटर्न फीच्या बाबतीत, 50 रुपये आणि GST देखील ग्राहकाच्या बचत खात्यातून स्वतंत्रपणे कापला जाईल. तुम्हाला रिवाइज्ड फी स्ट्रक्चरबद्दल अधिक माहिती हवी असल्यास  https://www.icicibank.com/managed-assets/docs/personal/F-nd-C-TnC-Dec-21-Revised-Charges.pdf ला भेट द्या आणि तुम्ही जाऊ शकता.