Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2824

2023 मध्ये भारताला मिळणार सरकारी गॅरेंटी असलेला ‘डिजिटल रुपया’, अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला आपले अधिकृत डिजिटल चलन 2023 पर्यंत मिळू शकते. हे सध्या खाजगी कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक वॉलेटसारखेच असेल, तसेच त्यासोबत ‘सरकारी गॅरेंटी’ देखील जोडलेली असेल. एका उच्च सरकारी सूत्राने ही माहिती दिली.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना गेल्या आठवड्यात सांगितले की,”लवकरच केंद्रीय बँक समर्थित ‘डिजिटल रुपया’ सादर केला जाईल.”

‘हे’ सरकारी गॅरेंटी असलेले डिजिटल वॉलेट असेल
एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की,”रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या डिजिटल करन्सीमध्ये भारतीय चलनाप्रमाणेच विशेष अंक असतील. ते ‘फ्लॅट’ करन्सीपेक्षा वेगळे असणार नाही. हे त्याचे डिजिटल स्वरूप असेल. एक प्रकारे, असे म्हणता येईल की, हे सरकारी गॅरेंटी असलेले डिजिटल वॉलेट असेल. डिजिटल करन्सीच्या स्वरूपात जारी केलेल्या युनिट्सचा समावेश चलनात असलेल्या करन्सीमध्ये केला जाईल.

सूत्राने सांगितले की, केंद्रीय बँकेने पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस डिजिटल रुपया तयार होईल असे संकेत दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने विकसित केलेली डिजिटल रुपी ब्लॉकचेन सर्व प्रकारच्या ट्रान्सझॅक्शन ट्रॅक करण्यास सक्षम असेल. खासगी कंपन्यांच्या मोबाइल वॉलेटमध्ये सध्या अशी सिस्टीम नाही.

फोनमध्ये डिजिटल करन्सी राहील
याबाबत स्पष्टीकरण देताना सूत्राने सांगितले की, सध्या लोकं खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक वॉलेटचा वापर करून खासगी कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करतात. हा पैसा त्यांच्याकडेच राहतो आणि या कंपन्या ग्राहकांच्या वतीने व्यापाऱ्यांना म्हणजेच दुकानदारांना कोणत्याही व्यवहारावर पेमेंट करतात.

तर डिजिटल करन्सीच्या बाबतीत, लोकांच्या फोनमध्ये डिजिटल करन्सी असेल आणि ती सेंट्रल बँकेकडे असेल. ते सेंट्रल बँकेकडून कोणत्याही दुकानदाराकडे ट्रान्सफर केले जाईल. यावर शासनाची संपूर्ण गॅरेंटी असेल. जेव्हा एखाद्या कंपनीच्या ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात तेव्हा त्या कंपनीची ‘क्रेडिट’ जोखीम देखील या पैशाशी संलग्न असल्याचे सूत्राने सांगितले. याशिवाय या कंपन्या शुल्कही आकारतात. “हे वॉलेट घेऊन जाण्याऐवजी, मी माझ्या फोनमध्ये पैसे ठेवू इच्छितो,” असे सूत्राने सांगितले.

अबब ! तब्बल 54 अब्ज 53 कोटींचा कृती आराखडा

औरंगाबाद – मागेल त्याला काम देणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 2022-23 मध्ये जिल्ह्यातील विविध सरकारी विभागांनी तब्बल 2 लाख 93 हजार 540 विकास कामे सुचविली आहेत. या कामांसाठी 54 अब्ज 53 कोटी 11 लाख 47 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. अब्जावधींचा कृती आराखड्याला मंजुरी घेणाऱ्या जि.प.ने जिल्ह्यात मग्रारोहयोचे गतवर्षी केवळ 61 कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

वन विभागाने 13 हजार 641 कामे प्रस्तावित केली. सामाजिक वनीकरण विभागाने 7 हजार 19 कामे, बांधकाम विभागाने 35 हजार 923 कामे, कृषी विभागाने 51 हजार 223 कामे, रेशीम विभागाने 5 हजार 898 कामे, सिंचन विभागाने 12 हजार 823 कामे, जिल्ह्यातील 868 ग्रामपंचायतींनी 1 लाख 57 हजार 666 कामे तर पशुसंवर्धन विभागाने 9 हजार 347 कामे प्रस्तावित केली आहेत.

या कामांसाठी अकुशल मजुरांवर 34 अब्ज 16 कोटी 70 लाख 60 हजार रुपये, तर अकुशल कामावर 20 अब्ज 36 कोटी 40 लाख 87 हजार रुपये अशी एकूण 54 अब्ज 53 कोटींची कामे प्रस्तावित आहेत.

माझ्यावरील हल्ला उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार, मोदींकडे तक्रार करणार- सोमय्या

thackeray somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेत सोमय्या जखमी होऊन त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला असा आरोप त्यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणाले, काल जे पुणे महापालिकेत माफीयासेनेनी गुंडगिरी केली होती. ते त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून केली होती. पुणे पोलिसांकडे तक्रार देणार आहे ती त्यांना पोलिसांपर्यंत घेऊ द्यायची नाही म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे.

या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मी येत्या गुरुवारी दिल्लीत जाणार आहे आणि राष्ट्रीय डिझास्टरचे प्रमुख आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार आहे असेही सोमय्या यांनी म्हंटल. दरम्यान, सोमय्यांच्या या आरोपांना शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहावे लागेल.

NH4 हायवेवर टायर फुटल्याने टेम्पो पलटी, वाहतूकीचा खोळंबा

कराड | पुणे- बंगळूर महामार्गावर उंब्रजशेजारी असलेल्या कोर्टी येथे एका आयशर टेम्पोचा अपघात झाला. रविवारी दि. 6 रोजी टेम्पोचा पाठीमागील बाजूचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. यावेळी गाडी चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाल्याने चालक जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- सातारा दरम्यान असलेल्या कोर्टी येथे हा हायवेवर टेम्पो क्रमांक (MH- 12- CH-2816) पलटी झाला. तारेचे गठ्ठे भरून जात असताना अचानक आयशर गाडीचा पाठीमागील टायर फुटल्याने गाडी चालकाचा ताबा सुटला. जखमी चालकास उंब्रज हाॅस्पिटल येथे दाखल केले.

टेम्पो पलटी झाल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला होता. अखेर कराड व उंब्रज पोलिसांनी क्रेन बोलावून टेम्पो बाजूला काढून रस्ता सुरळीत केला. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जी. आर. बी हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड तसेच महामार्ग पोलिस ऊंब्रज पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी मदत केली.

देशातील ‘या’ कंपनीत मिळणार दर आठवड्याला पगार

SIP

नवी दिल्ली । महामारीच्या काळात एकीकडे कंपन्या कर्मचाऱ्यांना उशीरा पगार देत आहेत तर दुसरीकडे एक कंपनी अशी आहे जी दर आठवड्याला कर्मचाऱ्यांना पगार देणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांचा आर्थिक भार तर कमी होईलच शिवाय त्यांना जास्त चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. विशेष म्हणजे त्यांना पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही.

वास्तविक, अनेक देशांमध्ये कंपन्या दर आठवड्याला आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देतात. आता देशातही अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे. IndiaMART ने भारतात आपला उपक्रम सुरू केला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘या’ देशांमध्ये ते प्रचलित आहे
IndiaMART ही देशातील विकली सॅलरी देणारी पहिली कंपनी ठरली आहे. बदलता काळ आणि वाढता आर्थिक भार पाहता त्याची गरज भासत असल्याचे ते सांगतात. महामारीमध्ये त्याचे महत्त्व वाढले आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि अमेरिका यांसारख्या अनेक देशांमध्ये ही प्रथा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची बदललेली परिस्थिती, कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

खूप वर्षांपूर्वी तयारी सुरू झाली
IndiaMART चे सीओओ दिनेश गुलाटी म्हणाले की,”कंपनीतील प्रत्येकजण या निर्णयाचे स्वागत करेल. अनेक वर्षांपूर्वी कंपनीने या दिशेने काम सुरू केले होते. येथे दर आठवड्याला अनेकांना प्रोत्साहन दिले जाते. IndiaMART ही महामारीच्या उद्रेकानंतर वर्क फ्रॉम होम पूर्ण करणारी पहिली कंपनी होती.”

आर्थिक गरजा पूर्ण करणे सोपे
कंपनीचे म्हणणे आहे की,”कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार मिळत असल्याने त्यांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करणे सोपे होईल. त्यांना पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही.” गुलाटी सांगतात की,”देशात पहिल्यांदाच कोणतीही कंपनी अशी सिस्टीम सुरू करणार आहे. झपाट्याने बदलणाऱ्या कार्यसंस्कृतीत, प्रत्येकाला झटपट फायदे हवे आहेत.”

पोलीस दखल घेत नसल्याने कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद – शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीची दखल पोलिस प्रशासन घेत नसल्याने फुलंब्री येथील कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी या कार्यालयाच्या झाडावर गळफास घेण्यासाठी दोरही टाकला होता. दरम्यान पोलिसांनी कुटुंबाची समजूत काढून तक्रार देण्यासाठी फुलंब्री पोलिस ठाण्यात पोलिसांच्या वाहनाने पाठवण्यात आले.

याबाबातच्या निवेदनात फुलंब्री येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामागे राहणाऱ्या शोभा राजू बिरसने यांनी म्हटले आहे की, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री मुलांनी दारात फटाके वाजवले व गाणे गात असताना शेजारी राहणाऱ्या लोकांनी विरोध करून आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर लोकांचा समूह त्या ठिकाणी जमा झाला असता, मी घाबरून पोलीस ठाणे फुलंब्री यांना फोन करून संपर्क साधला व माहिती दिली. मात्र पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. तसेच जमलेल्या काही लोकांनी मला व माझ्या पतीला मारहाण करून दोघांचे कपडे फाडले असा आरोप शोभा बिरसने यांनी निवेदनात केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे कुटूंब आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी व सिटी चौक पोलिस ठाणे यांना देण्यात आली. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या कुटूंबाची भेट घेऊन समजूत काढली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन तक्रार नोंदण्यासाठी अर्जदार शोभा राजू बिरसने व त्यांच्या कुटूंबियांना पोलिस वाहनात बसवून फुलंब्री पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आले.

जगामधल्या सर्वोच्च स्थान भूषवलेल्या महान गायिकेला आज जगाने गमावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशांच्या आणि जगाच्या गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर यांचे आजारामुळे निधन झालेले आहे. त्यांनी त्यांचे आयुष्य संगीताला समर्पित केलं होतं. देश आणि देवावर निष्ठा त्याचबरोबर माणुसकी, सकारात्मक दृष्टिकोन, प्रचंड परिश्रम, कामावर असणारी निष्ठा आणि सहृदय व्यक्तित्व असा अभूतपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये झाला होता अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिली.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच शिवसेना यांच्याशी त्यांचे स्नेहाचे, प्रेमाचे आणि घरगुती स्नेहाचे संबंध होते.असेही त्या म्हणाल्या. महाराष्ट्राच्या गौरव दिनाच्या निमित्ताने त्यांनी लक्षावधी लोकांच्या बरोबर गानयज्ञामघ्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये समारंभात त्या सहभागी झाल्या होत्या.

मा.लताताईंनी शेवटपर्यंत त्यांचं काम संगीताच्या संदर्भात चालू ठेवलेलं होतं. अनेक सामाजिक विषयांवरती त्यांचं लक्ष होतं, बांधीलकी होती. दीनानाथ मंगेशकर इस्पितळ उभारण्यात सर्वच मंगेशकर कुटुंबियांचा कायम सिंहाचा वाटा राहिला त्याच्यामार्फत सेवा केली जाते आहे. असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. विधानपरिषदेची उपसभापती, शिवसेनेचे उपनेते यानात्याने जगामधला सर्वोच्च स्थान भूषवलेल्या एक महान गायिका त्याचबरोबर महाराष्ट्र कन्या, भारतकन्या अशा लतादीदी मंगेशकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते.

सासवडला दोन वर्षाच्या मुलाचा दफन मृतदेह बाहेर काढला कारण…

सातारा | सासवड- झणझणे (ता. फलटण) येथील माळी बेंद नावाच्या शिवारात ट्रॅक्टरवरून पडून दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याची लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली होती. परंतु, शवविच्छेदन न करताच दफन करण्यात आले होते. त्यामुळे दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. फलटण नायब तहसीलदारांच्या समक्ष मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करून पुन्हा दफन करण्यात आला.

मिळालेली माहिती अशी, माळी बंद नावाच्या शिवारात दि. 28 जानेवारी रोजी दुपारी ट्रॅक्टरवरून पडून रुद्र गणेश भुजबळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा मृत्यू झाला याबद्दल कोणाचीही तक्रार नसल्याने रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देवेंद्र पाडवी तपास करत होते.

बिबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप खताळ यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील अनपट, ग्रामपंचायत सदस्य अमोल रासकर, महेश अनपट, किरण जाधव, गणेश पवार, गणेश भुजबळ, हवालदार अविनाश नलवडे, नाना होले, पोलीस पाटील प्रसाद कुमठेकर, आदी माळी वेंद व सासवडचे ग्रामस्थ उपस्थित होते.

LIC ग्राहकांसाठी गुड न्यूज; सवलतीसह लॅप्स झालेली पॉलिसी आता पुन्हा सुरू करता येणार

LIC

नवी दिल्ली । तुम्ही देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC चे पॉलिसीधारक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमची LIC पॉलिसी लॅप्स झाली असेल तर तुम्हाला आता ती पुन्हा सुरू करण्याची उत्तम संधी आहे. वास्तविक, LIC ने लॅप्स झालेल्या पर्सनल इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 7 फेब्रुवारी ते 25 मार्च 2022 पर्यंत चालणार आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपनी असलेल्या LIC ने शनिवारी एका निवेदनात सांगितले की, प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ज्या पॉलिसी लॅप्स झाल्या आहेत, ज्यांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला नाही, अशा पॉलिसी या मोहिमेत पुन्हा सुरु केल्या जाऊ शकतात. ही मोहीम 7 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 25 मार्च 2022 पर्यंत चालेल.

रिवाइव्ह शुल्क माफी
इन्शुरन्स कंपनी म्हणाली, “कोविड-19 महामारीने इन्शुरन्स कव्हरच्या गरजेवर भर दिला आहे आणि ही मोहीम LIC च्या पॉलिसीधारकांना आपली पॉलिसी रिवाइव्ह करण्याची चांगली संधी आहे. लॅप्स पॉलिसी रिवाइव्ह केल्याबद्दल शुल्कातही सूट दिली जात आहे. मात्र, ही सूट टर्म प्लॅन आणि हाय रिस्क इन्शुरन्स प्लॅनवर उपलब्ध होणार नाही.”

याशिवाय पॉलिसी पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी आवश्यक असलेल्या मेडिकल रिपोर्टमध्ये कोणताही दिलासा दिला जाणार नाही. मात्र हेल्थ आणि सूक्ष्म इन्शुरन्स योजनांमध्ये, लेट प्रीमियम भरण्याचे शुल्कही माफ केले जाईल. या मोहिमेअंतर्गत, ज्या पॉलिसीने 5 वर्षांपासून प्रीमियम भरला नाही अशा पॉलिसीला देखील रिवाइव्ह केले जाऊ शकते.

कोणाच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण?

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील आठवड्यात क्रांती चौक येथे बसविण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वी म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या अगोदर करावे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी शनिवारी सकाळी पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर 9 फेब्रुवारी नंतर अनावरण कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात येणार हे अद्याप निश्चित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल असे बोलले जात आहे. परंतु शिवरायांच्या वंशजांकडूनच पुतळ्याचे अनावरण करावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

अनावरणाचा वाद आणखी चिघळू नये, म्हणून महापालिकाने तातडीने कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू केला आहे. या ठिकाणी शिवसृष्टीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे.