Saturday, December 20, 2025
Home Blog Page 2825

किरीट सोमय्यांनी नौटंकी करू नये; अनिल परब यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी शिवसैनिकांकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना परब यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. “सोमय्या जाता-जाता स्वतः पडले असतील. त्यांनी नौटंकी करू नये,” असे मंत्री परब यांनी म्हंटले आहे.

अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर काल हल्ला झाला. सोमय्यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकले पाहिजे. त्यांनी सगळ्यांचे भ्रष्टाचार काढले पाहिजेत. सोमय्यांनी राजकीय नौटंकी करू नये. त्यांना फिजिकल मारहाण झाली नाही. ते जात असताना स्वतः पडले, असे परब यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी त्यांच्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावरून आता भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर टीका केली जात आहे. दरम्यान, आज नाशिक येथे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनीही प्रत्युत्तर दिले.

बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची युवक काँग्रेसची विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे मागणी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

भारती विद्यापीठाचे संस्थापक, राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांच्या कुटूंबियाबद्दल बंडातात्या कराडकर यांनी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने विश्रामबाग पोलिसांकडे करण्यात आली. नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, बंडातात्या कराडकर या संत समाजातील तथाकथित नेत्याने सातार्‍यातील कार्यक्रमात वाईन बंदीच्या आंदोलना दरम्यान अर्वाच्य भाषेत बदमानी केली आहे. यावेळी पतंगराव कदम कुटूंबियाबाबतही त्यांनी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

गेली कित्येक वर्षे कदम कुटूंबिय शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी अनेक गोरगरिबांना आधार दिला आहे. अशा कुटूंबियांची बदनामी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कदापिही खपवून घेणार नाही. बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार, शिवाजी मोहिते, अमर निंबाळकर, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत15 एकर ऊस जळून झाला खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कडेगाव येथील बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरातील उसाचे फड शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना भर दुपारी 1 वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विजवण्याचे अतोनात प्रयत्न केल्याने पुढील 25 एकरातील ऊस आगीपासून वाचवण्यात आला.

अल्पभूधारक शेतकरी नितीन शिंदे, प्रकाश शिंदे ,भीमराव जाधव, तानाजी भोसले, मोहन जाधव यांचा सुमारे 15 एकरातील उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. दरम्यान यावेळी आग विझवण्यासाठी येथील शेतकरी वसंत सुर्वे, सागर नलवडे, रोहित चन्ने, शंकर नायकवडी, अभिजित पाटील, मनोज सुर्यवंशी, जीवन शेटे, सादिक पिरजादे, राजू बागवान, सचिन शिंदे, लाला शिंदे, अल्ताफ शेख, कौशल धर्मे \, इंद्रजित थोरात, आकाश धर्मे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे पुढील घटना टाळली.

दरम्यान, या घटनेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आगीत जळून खाक झाला. ग्रामीण भागांत सर्रास महावितरणच्या वाकडे पोल, लोंबत्या तारा, उघडे डीपी हे चित्र पहायला मिळत असून महावितरण अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक ठिकाणी पिक जळण्याच्या घटना घडतात. याची दखल न घेणा-या महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लतादीदींच्या अंत्य दर्शनासाठी उद्धव ठाकरे ‘प्रभुकुंज’वर जाणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि आज सकाळी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यांनी ट्विट करीत आदरांजली वाहिली आहे. दरम्यान थोड्याचवेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लता मंगेशकर या राहत असलेल्या ‘प्रभुकुंज’ येथे अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत.

लता मंगेशकर यांची आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी प्राणज्योत मालवली. गेल्या 28 दिवसांपासून त्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, काल त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दुपारी 12.15 वाजता त्यांचे पार्थिव ब्रीच कँडितून परेड रोड येथील त्यांच्या प्रभू कुंज येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. तसेच ते दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. यावेळी लतादीदींच्या प्रभुकुंज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंत्यदर्शनासाठी जाणारा आहेत.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी मुंबईत निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्या वरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

किरीट सोमय्या महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि केंद्राकडून त्यांना….; राऊतांची ‘रोखठोक’ टीका

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेत सोमय्या जखमी होऊन त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप- प्रत्यारोप होत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या महाराष्ट्राच्या सरकारला धमक्या देतात. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची बदनामी करतात. महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि हे महान कार्य करत असल्याबद्दल भाजपाच्या केंद्र सरकारने त्यांना केंद्र सरकारची खास ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू अशा पद्धतीने भाजपचे केंद्र सरकार पोसत आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली

किरीट सोमय्या सरळसरळ ब्लॅकमेलिंग करतात, असे त्यांचे वर्तन आहे. हे सोमय्या ईडी कार्यालयात जातात व उद्या कुणाला बोलवायचे व दम द्यायचा तो अजेंडा ठरवतात व पुन्हा ते तसे जाहीर करतात, उद्या ईडी कुणाच्या घरी पोहोचणार हे ते आधी जाहीर करतात. त्यानुसार ईडीच्या कारवाया होतात. हे घडत असल्याने मोदी व शहांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.51 लाख कोटी रुपयांची वाढ

Recession

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 मधील आठ कंपन्यांची मार्केट कॅप एकत्रितपणे 1,51,456.45 कोटी रुपयांनी वाढली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सर्वात जास्त वाढला. गेल्या आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,444.59 अंकांनी किंवा 2.52 टक्क्यांनी वाढला होता.

टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीच्या मार्केट कॅपमध्येच घसरण झाली आहे. रिपोर्टिंग वीकमध्ये TCS ची मार्केट कॅप 46,016.2 कोटी रुपयांनी वाढून 14,11,058.63 कोटी रुपये झाली आहे. HDFC बँकेची मार्केट कॅप 33,861.41 कोटींनी वाढून 8,44,922.53 कोटी रुपये झाली.

बँकांचे शेअर्स वधारले
इन्फोसिसची मार्केट कॅप 23,425.29 कोटी रुपयांनी वाढून 7,32,177.06 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्सची मार्केट कॅप 17,226.59 कोटींच्या नफ्यासह 4,31,926.08 कोटी आणि ICICI बँकेची मार्केट कॅप16,601.55 कोटींनी वाढून 5,59,009.41 कोटी झाली.

भारती एअरटेलची मार्केट कॅप वाढली
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची मार्केट कॅप 6,113.36 कोटी रुपयांनी वाढून 4,73,182.90 कोटी रुपये झाली. त्याचप्रमाणे हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केट कॅप 5,850.48 कोटी रुपयांनी वाढून 5,42,262.17 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलने या आठवड्यात 2,361.57 कोटी रुपयांची भर घातली आणि तिची मार्केट कॅप 3,95,535.80 कोटी रुपयांवर पोहोचली.

रिलायन्स इंडस्ट्रीज खाली
याच्या विरुद्ध, HDFC ची मार्केट कॅप 2,870.45 कोटी रुपयांनी घसरून 4,53,231.97 कोटी रुपयांवर आले. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 2,396.57 कोटी रुपयांनी घसरून 15,77,382.90 कोटी रुपये झाली.

टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

सातारच्या MIDCची वाट लागण्याचे कारण दिव्य खासदार : आ. शिवेंद्रसिंहराजे

Satara Udayn Shivendra Raje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा एमआयडीसी वाढत नाही, याला एकमेव कारण हे उदयनराजे आहेत. कारण तिथे आलेल्या माणसांना धमक्या द्यायच्या, वसूल्या करायच्या, सोना एलाजाईन्स प्रकरण आपण केलं. साताराची एमआयडीसी न वाढण्याचे कारण हे फक्त उदयनराजे आणि त्यांचे त्यांचे बगलबच्चे आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला दमदाटी करायची, हप्ते मागायचे, युनियन काढायची, आमची माणसे घ्या, अन्यथा बघतो अशा प्रकारांमुळे सातारा एमआयडीसी वाढत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगण्याचा काही प्रयत्न करू नये. सगळ्या एमआयडीसीची वाट लागली, कारखानदार न येणे याचं मूळ कारण हे आपले दिव्य खासदार उदयनराजे हे असल्याचा आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

सातारा येथील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीमध्ये खासदार उदयनराजे यांनी उडी घेतल्याने हा वाद आता विकोपाला गेलेला पाहायला मिळत आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, खासदार किती आले तरी आम्ही गुन्हे दाखल करणार. तुमची बाजू हायकोर्टात मांडा, तिथे हायकोर्ट काय म्हणते ते बघू या. आम्ही काही पाकिस्तानमधून आलो आहे का. सर्वजण व्यवसाय करतात, आम्हाला गुंतवणूक करायची होती. आम्ही जागेत केली, आम्ही जी जागा घेतली होती ती कारखान्यासाठीच वापरतो आहे. तिथे आम्ही हॉटेल किंवा घर बांधत नाही तिथे इंडस्ट्री सुरू व्हावी, यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. आमचे प्रयत्न सातारच्या दृष्टीने चांगलेच आहेत.

महाराष्ट्र स्कूटरची आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा पडून आहे, याचा काहीच फायदा साताऱ्याला नाही. अनेक वर्ष महाराष्ट्र स्कूटर सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यात यश आले नाही. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली होती. त्यांची जागा अशीच पडून होती बँकेच्या लिलावातून आम्ही घेतली असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

 

‘या’ आहेत परवडणाऱ्या क्रिप्टोकरन्सी, ज्या गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय असू शकतील

Online fraud

नवी दिल्ली | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आकर्षण अजूनही आहे. सरकारने 30 टक्के टॅक्स लावण्याची घोषणा केल्यानंतरही लोकं त्यात गुंतवणूक करण्याची संधी सोडत नाहीत. येथे आज आम्‍ही तुम्‍हाला सध्‍याच्‍या अशा टॉप 5 क्रिप्टोबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्यामध्ये भविष्यात चांगले रिटर्न देण्याची क्षमता आहे. मात्र लक्षात ठेवा की, क्रिप्टो ही अत्यंत जोखमीची गुंतवणूक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक गुंतवणूक करा.

लकी ब्लॉक
लकी ब्लॉक ही एक नवीन क्रिप्टोकरन्सी आहे. हे मल्टी-बिलियन डॉलर लॉटरी क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणत आहे. क्रिप्टो 2022 मध्ये खरेदी करण्यासाठी हे सर्वोत्तम आणि नवीन बेट्स आहेत. हे टोकन फक्त एका आठवड्यासाठी PancakeSwap वर ट्रेड करत आहे, मात्र त्याचे मूल्य 1,000 टक्क्यांहून जास्त वाढले आहे. या क्रिप्टोमध्ये वाढण्याची मोठी क्षमता आहे कारण त्याने बाजारातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेससह डायरेक्ट लिस्टिंगसाठी अर्ज केला आहे.

Dogecoin
Dogecoin चे नाव तुम्हाला चांगलेच माहीत असेल. ते सध्या प्रति टोकन $0.20 च्या खाली ट्रेडिंग करत आहे. 2022 मध्ये खरेदी करण्यासाठी ही सर्वात स्वस्त क्रिप्टोकरन्सी आहे. हे एक अतिशय प्रसिद्ध मीम कॉईन आहे, जे जानेवारी 2021 मध्ये $0.005 च्या किमतीवरून जुलैमध्ये $0.74 च्या उच्चांकावर गेले. मात्र त्यानंतर त्याचे मूल्य 80 टक्क्यांनी घसरले आहे.

BNB
Binance Exchange ने ते 2017 मध्ये लाँच केले. मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत BNB ने स्वतःला टॉप 5 डिजिटल असेट्समध्ये स्थान दिले आहे. BNB हे Binance स्मार्ट चेनवरील ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठी वापरले जाणारे प्रायमरी करन्सी आहे. हे आता हजारो प्रोजेक्ट्सद्वारे वापरले जाणारे एक मोठे नेटवर्क आहे. या क्रिप्टोकरन्सीने लॉन्च झाल्यापासून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. 1 वर्षात 710% आणि 5 वर्षात 8,000% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

द ग्राफ
द ग्राफ हा क्रिप्टोकरन्सीचा एक प्रमोटिंग आणि ब्लॉकचेन टेक्नोलॉजी प्रोजेक्ट आहे जो ‘इंडेक्सिंग’ नावाच्या एका खास गोष्टीत माहिर आहे. याचा अर्थ असा की द ग्राफ ब्लॉकचेन नेटवर्कला त्याचा अतिरिक्त डेटाचे इंडेक्स करण्यास अनुमती देतो जेणेकरून सिस्टीम जास्त काम करू नये. लकी ब्लॉक आणि Dogecoin प्रमाणे, द ग्राफ ही खरेदी करण्यासाठी स्वस्त क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे $0.40 प्रति टोकन आहे.

शिबा इनू
तुम्ही कोणत्याही ट्रेंडिंग टोकनमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर शिबा इनू पेक्षा चांगले दुसरे नाही. 2022 मध्ये खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम क्रिप्टोकरन्सी आहे. शिबा इनूचे मूल्य अवघ्या एका वर्षात लाखो टक्क्यांनी वाढले आहे. त्याचे बाजार भांडवल 11 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. शिबा आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 75 टक्क्यांहून अधिकने घसरला आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीत खरेदी केल्यास चांगले असल्याचे सिद्ध होऊ शकते.

भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने सोमय्यांवर हल्ला; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले होते. यावेळी शिवसैनिकांकडून सोमय्या यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. “सोमय्या यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित कट आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारने छळवाद मांडला आहे. भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने हल्ला केला,” अशी टीका दरेकर यांनी केली.

प्रवीण दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल किरीट सोमय्या यांच्यावर हल्ल्याचा कट पूर्वनियोजित होता. अनिल परब म्हणतात हे होणारच होते. 100 ते 150 शिवसैनिकांनी हा कट पार पडला. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. झेड सिक्युरिटीच्या कवचात असलेल्या नेत्यावर जीवघेणा हल्ला लज्जास्पद आहे.

यावेळी दरेकर यांनी राज्य सरकारला इशाराही दिला. ते पुढे म्हणाले की, भाजपने उद्या जर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले तर त्या आंदोलनाला सर्वस्वी सरकार जवाबदार असेल. देशात लोकशाही आहे. सोमय्या ज्या पद्धतीने पुराव्यासहित प्रकरण बाहेर काढत आहेत, याचा अर्थ सोमय्या यांनी केलेले आरोप खरे आहेत. भविष्यात आपण उघडे पडणार या भीतीने हल्ला केला. हल्ला करणारे शिवसैनिक आहेत, असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख, दररोज जमा करावे लागतील फक्त 73 रुपये

LIC

नवी दिल्ली । देशात गुंतवणुकीचे अनेक नवीन पर्याय येत असूनही, आजही LIC लोकांची पहिली पसंती आहे. LIC ची जोखीम मुक्त आणि एकरकमी रक्कम लोकांना आकर्षित करते. आज आपण येथे अशा पॉलिसीबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त 73 रुपये जमा करून पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपये मिळवू शकता. यासोबतच, हे तुम्हाला आजीवन मृत्यूचे कव्हर देखील देते.

 या पॉलिसीची वैशिष्ट्ये –
पॉलिसी घेण्यासाठी किमान वय: 18 वर्षे
– पॉलिसीमध्ये प्रवेश करण्याचे कमाल वय: 50 वर्षे
– कमाल मॅच्युरिटी वय: 75 वर्षे
– किमान पॉलिसी टर्म: 15 वर्षे
– कमाल पॉलिसी टर्म: 35 वर्षे
– प्रीमियम पेमेंट मोड: वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक

कोणतीही व्यक्ती LIC नवीन जीवन आनंद पॉलिसी खरेदी करू शकते. या पॉलिसी अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम 1 लाख रुपये आहे. विमा रकमेची जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही.

पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते
पूर्ण दोन वर्षांसाठी प्रीमियम भरला गेला असेल तर पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते. पॉलिसी सरेंडर केल्यावर, पॉलिसीधारकाला गॅरेंटेड सरेंडर व्हॅल्यू आणि स्पेशल सरेंडर व्हॅल्यूच्या समान सरेंडर व्हॅल्यू मिळेल.

कर्ज
पॉलिसी अंतर्गत कर्जही घेता येते. प्रीमियम भरण्याच्या कालावधीत कर्ज घेतल्यास, कमाल क्रेडिट सरेंडर मूल्याच्या 90% पर्यंत असेल.

डेथ बेनिफिट
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला मूळ विमा रकमेच्या 125% किंवा वार्षिक प्रीमियमच्या सात पट रक्कम मिळेल. पॉलिसीची मुदत संपल्यानंतर पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, म्हणजे मुदतपूर्तीच्या निर्धारित तारखेपासून, त्याच्या नॉमिनीला मूळ विमा रक्कम मिळेल.

मॅच्युरिटी बेनिफिट
पॉलिसीधारकास मुदतीच्या शेवटी निहित साधे रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस, जर असेल तर, मूळ विमा रक्कम मिळेल. तुम्ही 21 वर्षांच्या पॉलिसीच्या अटींसाठी 24 वर्षे वयाच्या 5 लाख रुपयांच्या विम्याची नवीन जीवन आनंद पॉलिसी खरेदी केल्यास, तुमचा वार्षिक प्रीमियम रु. 26,815 किंवा अंदाजे रु. 73.50 प्रतिदिन असेल. तुम्ही 21 वर्षांची पॉलिसी घेतल्यास, तुमची गुंतवणूक सुमारे 5.63 लाख रुपये असेल, परंतु मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला बोनससह 10.33 लाख रुपये मिळतील.