Monday, December 22, 2025
Home Blog Page 2837

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे आईने नवजात बाळाला 5 हजारात विकले

गुमला : वृत्तसंस्था – झारखंडच्या गुमला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये गुमला शहरातील आंबेडकर नगरमध्ये राहणारी गुडिया देवीने गरीबीमुळे आपल्या पोटच्या बाळाची विक्री केली आहे. तिने नुकताच या बाळाला जन्म दिला होता. हरिजन भागातील एका कुटुंबाने 5 हजार रुपयांत नवजात बाळाला विकले होते.

घरातील गरिबीमुळे गुडियाची दोन मुले आकाश कुमार आणि मुलगी खुशी कुमारी हे दोघेजण पाटनाजवळील बिहटामध्ये वीट भट्टीवर काम करतात. तिसरी मुलदी दीपावली 3 वर्षांची आहे. चौथ्या बाळाला गुडियाने विकले आहे. या घटनेची माहिती जेव्हा प्रशासनाला समजली तेव्हा ते त्यांच्या घरी गेले. आणि त्यांना साडी, धान्य आणि पांघरायला दिले. या कुटुंबाला प्रशासनाकडून एक महिना पुरेल इतकं अन्न-धान्य या कुटुंबाला देण्यात आले तर काही पैसेदेखील देण्यात आले.

तसेच प्रशासनाने गुडियाला तिचे मुलं परत करण्याचे निर्देश दिले आहेत. गुडिया आणि तिचे कुटुंब सिमडेगा येथील रहिवाशी आहेत. तसेच या कुटुंबाला सरकारी योजनांशी जोडून देण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गुडिया देवी हिला क्षयरोग आहे.

नववधूच्या हातच्या स्पेशल चहाने सासरच्या मंडळींची उडवली झोप, रात्री दोघेजण आले आणि….

पिलानी : वृत्तसंस्था – राजस्थानमधील झुंझुनूच्या मंद्रेला शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने पती आणि सासूला नशायुक्त पदार्थ पिण्यास दिला. त्यानंतर तिने दोन मुलांना रात्री घरी बोलावून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाले.

काय आहे नेमके प्रकरण ?
मंद्रेला शहरातील वॉर्ड 3 चे रहिवासी जगदीश शर्मा यांनी त्यांचा मुलगा चेतन शर्मा याचे लग्न 28 नोव्हेंबर 2021 रोजी चिरावा येथील रहिवासी निकिता या मुलीशी झाले होते. या दोघांचे लग्न झाल्यापासून सुनेचे पती आणि घरातील इतर सदस्यांशी पटत नव्हते. तसेच लग्नानंतरही ती पतीपासून काही ना काही निमित्त सांगून अंतर ठेवत असे. घरात तेढ पसरवण्याच्या उद्देशाने सून कुटुंबीयांना एकमेकांविरोधात भडकवायची.

पीडित तरुण हा घरी राहून ऑनलाइन काम करतो. घटनेच्या दिवशी रात्री काम करत असताना चेतनने निकिताकडे चहा मागितला. निकिताने चहामध्ये नशेचा पदार्थ मिसळून प्यायला दिला, त्यामुळे चेतनची प्रकृती खालावली. यानंतर निकिताने शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांना दाखवून पतीला घरी आणले. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिने शेजारी बसलेल्या सासूला गरम पाणी दिले. त्या पाण्यात तिने नशेचे औषध मिसळले. त्यामुळे पती आणि सासू जागीच बेशुद्ध झाले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक ! 150 रुपयांवरुन जिगरी दोस्ताची निर्घृणपणे हत्या

चंदिगढ : वृत्तसंस्था – हरियाणातील फरिदाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मित्राने अवघ्या 150 रुपयांवरुन जिगरी दोस्ताची निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येनंतर पोलिसांनी केवळ 48 तासांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मृत व्यक्तीचे नाव दलिप आहे तर आरोपी तरुणाचे नाव योगेंद्र असे आहे. आरोपी योगेंद्र आणि मृत दलिप एकमेकांचे चांगले मित्र होते. घटनेच्या दिवशी दलीप ढाब्यावरुन जेवण आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर दीडशे रुपयांवरुन योगेंद्र आणि त्याचा वाद झाला. त्यानंतर योगेंद्रने बेदम मारहाण करुन दलीपचा जीव घेतल्याचा आरोप करत दलिपच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?
मृत दलिपच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा 26 वर्षीय मुलगा दलीप हा कामावरुन घरी परतला होता आणि जवळच्या ढाब्यावर जेवण आणण्यासाठी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला तसा तो घरी परातलाच नाही. यानंतर 30 जानेवारीला सकाळी दलीपचा मृतदेह ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या एका पुलाजवळ सापडला. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या माहितीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.

ढाब्यावरील भांडणातून हत्या
या प्रकरणी पोलिसांनी गडखेडा गावातील 23 वर्षीय योगेंद्र याला 1 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. यानंतर आरोपीची चौकशी केली असता योगेंद्र आणि मयत दलीप हे मजुरीचे काम करत होते. घटनेच्या दिवशी दोघेही जेवायला ढाब्यावर गेले होते. योगेंद्रने ढाबा मालकाला पैसे दिले, तर उरलेले 150 रुपये दलीपने ठेवले. यानंतर योगेंद्रने हे पैसे परत मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वाद एवढा विकोपाला गेला कि योगेंद्रने दलीपला बेदम मारहाण करून त्याचा खून केला.

भारत विक्रमी पाचव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकणार ? जाणून घ्या संघाचा आतापर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली । भारतीय संघाने 8व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघ 5व्यांदा अंडर-19 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

अंडर-19 वर्ल्ड कप-2022 मधील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. एका क्षणी दोन विकेट लवकर पडल्यानंतर अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला कर्णधार यश धुळ आणि उपकर्णधार शेख रशीद यांनी द्विशतकी भागीदारी करत सांभाळले. यशने 110 धावा केल्या तर शेख रशीदचे शतक अवघ्या 6 धावांनी हुकले. भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 290 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 41.5 षटकांत 194 धावांवर गारद झाला. भारताने या आयसीसी स्पर्धेच्या 8व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपच्या चालू हंगामात भारताने पहिला गट सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्या सामन्यात भारतीय संघ 232 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 45.4 षटकांत 187 धावांत गुंडाळले. भारताने टूर्नामेंटमध्ये 45 धावांनी विजय नोंदवत विजयी सुरुवात केली.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा दुसरा सामना आयर्लंडविरुद्ध होता. त्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत 50 षटकात 5 गडी गमावून 307 धावा केल्या. हरनूर सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी केली. या सामन्यात आयर्लंडचे फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि त्यांचा संघ 133 धावांत ऑलआऊट झाला. भारताने 174 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

भारताने अंडर-19 वर्ल्ड कपमधील तिसरा गट सामना युगांडा विरुद्ध खेळला. या सामन्यात भारताच्या फलंदाजा आणि गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. या सामन्यात भारताने 5 विकेट गमावून 405 धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर युगांडाच्या संघाला अवघ्या 19.4 षटकांत 79 धावांवर बाद करत 326 धावांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

अंडर-19 वर्ल्ड कपमधील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 विकेट्स राखून पराभव केला. डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी कुमारने अवघ्या 14 धावांत 3 बळी घेतल्याने बांगलादेशी संघ 111 धावांत बाद झाला. यानंतर भारताने हे लक्ष्य 30.5 षटकांत 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

वर्गमित्रानेच केला घात ! अल्पवयीन मैत्रिणीवर केले अत्याचार आणि मग…..

Rape

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 11 वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने बलात्कार केला आहे. हि पीडित मुलगी पाच महिन्याची गरोदर राहिल्यानंतर हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये घडली आहे.

काय आहे प्रकरण ?
संग्रामपूर तालुक्यातील अल्पवयीन विद्यार्थिनी 11वीच्या वर्गात शिकते. तिच्याच वर्गात शिकणाऱ्या कृष्णा बघे नावाच्या मुलाची या पीडित विद्यार्थिनीवर नजर पडली. यानंतर एके दिवशी हि पीडित मुलगी घरी एकटीच असताना तो घरात शिरला. त्याने बॉटलमधून आणलेले पाणी तिला पाजले. यानंतर या मुलीला चक्कर येऊन झोप आली. त्यानंतर काही वेळाने तिला जाग आल्यावर तिचा वर्गमित्र कृष्णा बघे हा नको त्या अवस्थेत तिच्या शेजारी बसलेला होता. यानंतर आरोपी कृष्णा बघे हा 5-6 दिवसानंतर पुन्हा पीडित मुलीच्या घरी आला आणि ‘शारिरीक संबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करेल’ अशी धमकी देत तिच्यासोबत वारंवार शारिरीक संबंध करू लागला.

यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला शेगाव येथील एका खासगी डॉक्टराकडे उपचारासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी ती 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मुलीला अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नराधम कृष्णा बघे विरुद्ध अत्यचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Paytm युझर्सना फ्री मध्ये सिलेंडर मिळवण्याची संधी, त्यासाठी काय करावे जाणून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । पेटीएमने आपल्या युझर्ससाठी एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी एक मोठी ऑफर दिली आहे. पेटीएमकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. एका ऑफर अंतर्गत तुम्हांला 25 रुपयांची सूट मिळू शकते तर दुसरी ऑफर अशी आहे की, तुम्हांला Paytm कॅशबॅक म्हणून 30 रुपये मिळू शकतात. याशिवाय तिसरी ऑफर सध्या सुरू आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही एलपीजी सिलेंडर फ्री मध्ये मिळवू शकता. म्हणजे तुम्हांला एक पैसाही द्यावा लागणार नाही.

या सर्व डील्ससाठी एक सामान्य आणि महत्त्वाची अट अशी आहे की, पेटीएमद्वारे हे तुमचे पहिलेच गॅस सिलेंडर बुकिंग असावे. पेटीएम ग्राहकांना तिन्ही पर्याय उपलब्ध असतील. जर तुम्हांला 25 रुपयांची सूट हवी असेल तर तुम्हांला ती लगेच मिळेल. जर तुम्हांला 30 रुपयांची कॅशबॅक हवी असेल तर तुम्हांला पेटीएम कॅश मिळेल. यासाठी वेगवेगळे प्रोमोकोड देण्यात आले आहेत, जे बुकिंगच्या वेळी लागू करावे लागतील. मात्र फ्रीमध्ये म्हणजे 100% कॅशबॅक मिळविण्यासाठी तुमचे नशीब तुम्हांला अनुकूल असणे आवश्यक आहे.

फ्री मध्ये सिलेंडर मिळविण्यासाठी ‘ही’ प्रक्रिया असेल
फ्री मध्ये एलपीजी सिलेंडर मिळविण्यासाठी, तुम्हाला बुकिंगच्या वेळी FREECYLINDER प्रोमोकोड वापरावा लागेल. सिलेंडर बुक करताना पूर्ण पैसे द्यावे लागतील. यानंतर, पेटीएमच्या प्रत्येक 100व्या गॅस सिलेंडरचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला पूर्ण कॅशबॅक (100% कॅशबॅक) दिली जाईल. यामध्ये जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल, याचा अर्थ तुम्हाला फक्त एकच सिलेंडर बुक करावा लागेल. वरील ऑफर फक्त 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच व्हॅलिड आहे. जर तुम्ही 100 वे भाग्यवान ग्राहक असाल तर तुम्हाला 24 तासांच्या आत कॅशबॅक मिळेल.

पेटीएमवर अशा प्रकारे बुक करा गॅस सिलेंडर
तुम्ही इंडेन, एचपी गॅस आणि भारतगॅस मधून कोणत्याही कंपनीचे सिलेंडर बुक करू शकता. तुम्हाला ‘बुक माय सिलेंडर’ टॅबवर जावे लागेल. येथे तुम्हांला तुमचा मोबाईल नंबर किंवा LPG आयडी किंवा ग्राहक क्रमांक (ग्राहक क्रमांक) टाकावा लागेल. हे एंटर करून, तुम्हांला तुमच्या एजन्सीची माहिती मिळेल. त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी, तुमच्याकडे पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंगचा पर्याय असायला हवा. बुकिंग झाल्यानंतर, हे सिलेंडरएजन्सीद्वारे तुमच्या दिलेल्या पत्त्यावर डिलिव्हरी केले जाईल.

“आयपीएलचे आयोजन यंदा देशातच केले जाणार, मात्र बाद फेरीची ठिकाणे ठरलेली नाहीत” – सौरव गांगुली

नवी दिल्ली । सौरव गांगुलीने IPL 2022 च्या आयोजनाबाबत मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी या टी-20 लीगचा चालू हंगाम देशातच होणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनामुळे देशात बीसीसीआ वर प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती आहे. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्ये या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. यावेळी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ उतरत आहेत. मंडळातर्फे 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव होणार आहे. यापूर्वी 33 खेळाडू वेगवेगळ्या संघात सामील झाले आहेत. या लिलावात 15 देशांतील 590 खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघाला खेळाडू खरेदी करण्यासाठी 90 कोटी रुपये मिळाले आहेत.

स्पोर्टस्टारशी बोलताना सौरव गांगुली म्हणाले, ‘यंदा टी-20 लीग भारतात आयोजित केली जाणार आहे. जोपर्यंत कोरोनाची परिस्थिती फार वाईट असेल. तोपर्यंत महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात सामने आयोजित करण्याचा आमचा विचार आहे.” बाद फेरीच्या सामन्यांची ठिकाणे नंतर ठरवली जातील. अहमदाबादमध्ये बाद फेरीचे सामने खेळवले जाऊ शकतात अशीही माहिती समोर आली आहे.

मे महिन्यात महिला आयपीएल
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की,” यंदाच्या आयपीएल 2022 च्या प्लेऑफदरम्यान महिला आयपीएलचेही आयोजन केले जाईल. आगामी काळात त्याचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या फक्त 3 संघ महिला T20 चॅलेंजमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्यामध्ये 4 सामने खेळवले जातात.

कर्णधारासाठी अवघड काम
सौरव गांगुली म्हणाले,”मला नाही वाटत की बीसीसीआयचे अध्यक्षपद हे टीम इंडियाचा कर्णधार होण्यापेक्षा जास्त आव्हानात्मक आहे. मी काय केले, आता सांगता येणार नाही. पुढे काय होते ते पहा. मी केलेल्या कामाचे मूल्यमापन तुम्ही करू शकता.” कोरोनामुळे सारे जगच त्रस्त झाले होते. मात्र बहुतांश स्पर्धांचे आयोजन करण्यात यश आले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या फरार आरोपीस अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटनेची नोंद झाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने संशयित फरार झाला होता.

वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि रविंद्र तेलतुमडे आणि टिमने उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. यातील पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी डोंगर भागात सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्यावर पोक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे आणि पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि रविंद्र तेलतुमडे, दप्तरी संजय जाधव, किरण निंबाळकर, प्रसाद दुदुस्कर, चालक धुमाळ या पथकाने केलेल्या धाडशी कारवाई केली.

घरातून पळून जाऊन बनली पॉर्न स्टार, आता कुटुंबाचा इतका तिरस्कार करते की 30 वर्षांपासून बोलणेही नाही

काबूल । अफगाणिस्तानची अ‍ॅडल्ट स्टार असलेली यास्मिना अली सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच, तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आणि ती पॉर्न स्टार बनल्यापासून तालिबानला तिला आपल्या रडारवर धरले असल्याचे सांगितले. ती या इंडस्ट्रीत कशी आली आणि ती आपल्या कुटुंबाचा तिरस्कार का करते याबद्दल तिने अनेक खुलासा केले आहेत.

यास्मिना अलीने आपल्या मनाविरुद्ध लावत असलेला विवाह नाकारला आणि आपल्याला पॉर्न इंडस्ट्रीत काम करायचे असल्याचे पालकांना सांगितले. 1990 च्या दशकात तालिबान सत्तेवर आल्यानंतर यास्मीना अली आणि तिच्या कुटुंबाने अफगाणिस्तान सोडले. ते ब्रिटनला गेले जिथे यास्मीनाने शिक्षण घेतले. वयाच्या 19 व्या वर्षी तिचे लग्न व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती मात्र यास्मीनाला ते मान्य नव्हते.

इस्लामचा त्याग केला, नास्तिक बनली
यानंतर यास्मीनाने इस्लामचा त्याग केला आणि ती नास्तिक बनली, त्यानंतर तिने पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला. डेली स्टारशी बोलताना 28 वर्षीय यास्मिनाने सांगितले की, घरातून बाहेर पडल्यापासून ती आपल्या कुटुंबाशी बोललेली नाही. ती म्हणाली, “वयाच्या 19 व्या वर्षी मी पळून गेले कारण त्यांना माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावायचे होते. त्यांनी मला काय हवे आहे हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला नाही.” ती पुढे म्हणाली,”मी त्यांच्यापैकी कोणाशीही (पालकांशी) बोललेले नाही आणि त्यांच्याशी पुन्हा बोलण्याचा माझा विचार देखील नाही.”

‘तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही’
यास्मिना म्हणते,”तो अध्याय आता संपला आहे, कारण कुटुंब म्हणजे पाठिंबा देणे आणि धैर्य वाढवणे. आमच्याकडे समान मूल्ये नाहीत आणि मला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्याबद्दल त्यांना काय वाटते याची मला पर्वा नाही. मला खात्री आहे की ते माझ्याबद्दल वाईट विचारच करतात.”

अफगाणिस्तानात तालिबानने हिंसाचार केला
यास्मिनाने अफगाणिस्तानमध्ये महिला, वृद्ध आणि मुलांसोबत होणार हिंसाचार पाहिला, त्यानंतर ती ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेली. जवळपास 30 वर्षे अफगाणिस्तानसाठी एका स्वप्नासारखी गेली आणि आता तालिबान पुन्हा एकदा सत्तेवर आले, मात्र आता यास्मिना एक निष्पाप बालक नसून एक शक्तिशाली महिला आणि अफगाण कार्यकर्ती आहे. यास्मिना ही अफगाणिस्तानची ‘नंबर वन पॉर्न स्टार’ म्हणून ओळखली जाते.

नितेश राणेंनी केले ‘ते’ ट्विट डिलीट; पाच तास पोलिसांकडून चौकशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी काल गृहमंत्री अमित शाह आणि माजी गृहमंत्री चिदंमबरम यांचा फोटो ट्विट केला होता. त्या फोटाला राणे यांनी “समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है” अशा आशयाचे वाक्य वापरले होते. दरम्यान, याच ट्विटवरून राणेंना त्रास सहन करावा लागल्याने अखेर ते ट्विट नितेश राणे यांनी डिलीट केले आहे.

काल कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी नितेश राणे यांनी अमित शाह आणि चिदंमबरम यांचा फोटो वापरून एक ट्विट केले होते. 2009 ला पी. चिदंमबरम गृहमंत्री असताना अमित शाह यांना अटक झाली होती, तर अमित शाह गृहमंत्री असताना चिदंमबरम यांना अटक झाली होती. त्यामुळे नितेश राणे यांना महाविकास आघाडीला आमचीही वेळ येईल तेव्हा तुम्हालाही अशीच वागणूक मिळेल, असा इशारा या ट्विटमधून दिला होता. दरम्यान या ट्विटमुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली असल्याने त्यांनी अखेर ते ट्विट डिलीट केले आहे.

दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. तसेच त्यांना गोव्यालाही नेण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी पहिल्यांदा नितेश राणे यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यातून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. दरम्यान, नितेश राणे यांची कस्टडी उद्या संपत असल्याने उद्या कोर्टात काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.