Monday, December 22, 2025
Home Blog Page 2849

Budget 2022 : अर्थसंकल्पामध्ये LIC च्या IPO संदर्भात मोठी घोषणा, कधी येणार पब्लिक ऑफर जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मेगा IPO (LIC IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. LIC चा IPO लवकरच आणणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यांच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पीय भाषणात, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की,सरकार लवकरच LIC चा IPO जारी करणार आहे.

याशिवाय, अर्थमंत्र्यांनी सांगितले की एअर इंडियाची निर्गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि त्याचवेळी नीलाचल इस्पातसाठी देखील स्ट्रेटेजिक पार्टनरची निवड करण्यात आली आहे.

सरकार 31 मार्चपर्यंत LIC ला शेअर बाजारात लिस्ट करू शकते
अलीकडेच डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे म्हणाले होते की,” LIC च्या निर्गुंतवणुकीची रक्कम या वर्षीच्या बजटमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे कारण आमची 31 मार्चपूर्वी लिस्टिंग करण्याचे आमचे टार्गेट आहे.

LIC चेअरमनचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला
अलीकडेच, सरकारने LIC चे अध्यक्ष एमआर कुमार यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवला आहे. मुदतवाढीनंतर, कुमार मार्च 2023 पर्यंत LIC चे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील. यासोबतच LIC चे व्यवस्थापकीय संचालक राज कुमार यांचा कार्यकाळही एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे.

FY22 साठी निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यात मोठी कपात
विशेष म्हणजे, सरकारने निर्गुंतवणुकीतून उत्पन्नाचा अंदाज चालू आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपयांवरून 78,000 कोटी रुपयांवर आणला आहे. यासोबतच पुढील आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प ; अशोक चव्हाणांचा केंद्र सरकावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “यंदाच्या अर्थसंकल्पात भाजपच्या जुन्या घोषणांना मूठमाती देण्यात आली आहे. देशाची दिशाभूल करण्यासाठी पुढील 25 वर्षांच्या विकासाचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली आहे.

मंत्री अशोक चव्हाण यांनी आज माध्यमाशी संवाद साधत केंद्रीयमंत्री सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, आज मांडलेल्या अर्थसंकल्पास भाजपच्या काही नेत्यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणून म्हंटले आहे. महाभारतातील श्लोक आणि ‘अमृतकाल’, ‘गतीशक्ती’सारखे मोठमोठे शब्द वापरून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचे वजन वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी, बेरोजगार, नोकरदार, गरिबांसाठी त्यात काहीच नसल्याने तो एक पोकळ अर्थसंकल्प ठरलेला आहे.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या, 100 स्मार्ट सिटी, महागाईवर नियंत्रण अशा अनेक घोषणा भाजपने केंद्र सरकारने केल्या होत्या. मात्र, अशा अनेक जुन्या महत्वाकांक्षी घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याची दिसते. हे अपयश झाकण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २५ वर्षांच्या विकासाचे नवे स्वप्नरंजन करण्यात आले आहे. ही देशाची दिशाभूल व फसवणूक आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरदिवसा चोरी, चोरट्यांकडून 16 लाख लंपास

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दिवसाढवळ्या चोरी करण्यात आली आहे. या चोरटयांनी बँकेत सर्व कर्मचारी उपस्थित असताना 16 ते 17 लाखांची रक्कम लंपास केली. या चोरटयांनी केलेल्या चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि घटना 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजायच्या सुमारास घडली आहे.

कशाप्रकारे घडली घटना ?
या बँकेचा कॅशिअर कामानिमित्त मॅनेजरच्या केबिनमध्ये गेल्यावर चोरट्यांनी हि संधी साधून चोरट्यांनी केबिनमध्ये शिरत थेट टेबलवरून ही रक्कम लांबवली. 500 आणि 200 च्या नोटांचे बंडल पिशवीत टाकून चोरटे त्या ठिकाणाहून पसार झाले. बँकेत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये 2 संशयित आरोपींसोबत एक तरुणीसुद्धा असल्याचे दिसत आहे.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1488396437679644674

या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांसोबत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या चोरटयांनी बँकेत चोरी करायच्या अगोदर बँकेची रेकी करत चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांसोबत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या बँकमधून 16 ते 17 लाख लंपास झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Budget 2022 : 7.5 लाख ते 15 लाखांपर्यंत कमाई करूनही टॅक्स कसा वाचवता येईल हे जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांना कोणतीही थेट सूट दिली नसेल, मात्र आधीच जारी केलेल्या इन्कम टॅक्स सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये मोठी बचत करू शकता.

वास्तविक, इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत, तुम्हाला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, होम लोनचे व्याज आणि मुद्दल, इन्व्हेस्टमेंट, FD किंवा असे डझनभर पर्याय खरेदी करून कर सवलतीचा लाभ मिळतो. याच्या मदतीने, 7.5 लाख रुपयांपर्यंत कमावणारी व्यक्ती आपली कर दायित्व शून्यावर आणू शकते तर महिन्याला 10 लाख आणि 15 लाख रुपये कमाई करणाराही मोठ्या प्रमाणात टॅक्स वाचवू शकतो. तुमच्या उत्पन्नावर टॅक्स कसा वाचवायचा ते जाणून घ्या.

7.5 लाख वार्षिक उत्पन्न असेल तर टॅक्स शून्य असेल (20% टॅक्स स्लॅब)
80C अंतर्गत 1.5 लाख सूट.
80D मध्ये मेडिक्लेमवर 25 हजारांची सूट.
होम लोनच्या व्याजावर 24B मध्ये 2 लाखांची सूट.
NPS वर 50 हजार रुपयांची सूट
स्टँडर्ड डिडक्शनमध्येही 50 हजारांची सूट.
(अशा प्रकारे निव्वळ करपात्र उत्पन्न रु. 2.75 हजार असेल, जे 5 लाखांपेक्षा कमी आहे आणि 87A अंतर्गत कर दायित्व शून्य असेल)

10 लाख वार्षिक उत्पन्नावर किती कर भरावा लागेल ? (20 टक्के टॅक्स स्लॅब)
80C अंतर्गत 1.5 लाख सूट.
80D मध्ये मेडिक्लेमवर 25 हजारांची सूट.
गृहकर्जाच्या व्याजावर 24B मध्ये 2 लाखांची सूट.
NPS वर 50 हजार रुपयांची सूट
स्टँडर्ड डिडक्शनमध्येही 50 हजारांची सूट.
(येथे तुमचे निव्वळ करपात्र उत्पन्न रु. 5.25 लाख आहे, ज्यावर 20 टक्के टॅक्स लागेल. रु. 17,500 च्या कर दायित्वावर 4 टक्के सेस लागू होईल. म्हणजे रु. 700 आणि एकूण कर रु. 18,200 असेल)

15 लाखांच्या उत्पन्नावर (30% टॅक्स स्लॅब) याप्रमाणे टॅक्स वाचवा
स्टँडर्ड डिडक्शनमध्येही 50 हजारांची सूट.
80C अंतर्गत 1.5 लाख सूट.
80D मध्ये मेडिक्लेमवर 25 हजारांची सूट.
होम लोनच्या व्याजावर 24B मध्ये 2 लाखांची सूट.
NPS वर 50 हजार रुपयांची सूट
(येथे तुमचे एकूण करपात्र उत्पन्न रु. 10.25 लाख असेल. यावर 1.20 लाखांवर 30 टक्के दराने टॅक्स लागेल, ज्यावर 4 टक्के म्हणजे रु. 4,800 सेस भरावा लागेल. एकूण कर दायित्व रु.1,24,800 असेल.)

नवीन इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सूट नाही
सरकारने इन्कम टॅक्स च्या नवीन स्लॅबमधील सर्व 70 प्रकारच्या सवलती रद्द केल्या आहेत. मात्र, यामध्ये कराचा दर कमी करण्यात आला आहे. असे असूनही कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांना याचा कोणताही लाभ मिळणार नाही. यामुळेच गेल्या आर्थिक वर्षात केवळ 5 टक्के करदात्यांनी नवा स्लॅब स्वीकारला होता.

शहरातील सिद्धार्थ उद्यानाला जप्तीची नोटीस

औरंगाबाद – मार्च महिना येतोय तसे सर्वच यंत्रणांचा वसुलीचे वेध लागले आहेत. औरंगाबादेतही महसूल विभागाने थकीत वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच मालिकेत औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानाकडेही मोठा कर थकल्याचे समोर आले आहे. वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही महापालिका सिद्धार्थ उद्यानाचा दीड कोटी रुपयांचा थकीत करमणूक कर भरत नसल्याने अखेर अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने मनपाला उद्यान जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अकृषक करासह इतरही करांनी मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्हा महसूल वसुलीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर आहे. केवळ याच कारणामुळे यंदा विभागीय नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत मागणीनुसार वाढ दिली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महसूलसह थकीत कर वसुलीवरही भर दिला आहे. महसूल विभागातर्फे महापालिकेला 1 कोटी 35 लाखांचा अकृषक कर भरावा, अशी नोटीसही बजावण्यात आली आहे.

जीएसटी सुरु होण्यापूर्वी महसूल विभागामार्फत करमणूक कर वसूल केला जात होता. आता ही वसुली बंद असली तरी काही विभागांकडे अगोदरचा कर थकलेला आहे. त्याची वसुली महसूल विभाग करीत आहे. सिद्धार्थ उद्यानाकडेही दीड कोटींचा कमरणूक कर थकलेला आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही मनपा या कराचा भरणा करीत नसल्याने अखेर अप्पर तहसील कार्यालयाच्या वतीने मनपाला सिद्धार्थ उद्यान जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून मनपाने कर भरणा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती महसूल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही; अजित पवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली

अजित पवार म्हणाले, केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्यायाची परंपरा कायम राहिली. आपण सार्वधिक जीएसटी आणि टॅक्स आपण भरतो त्याचप्रमाणे आपल्याला निधी मिळावा अशी आमची अपेक्षा होती मात्र केंद्राकडून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे असे अजित पवार यांनी म्हंटल. अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते शोधूनही सापडत नाही त्यामुळे महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प”, असं ट्विट करत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. या महिन्यात देशात उत्तर प्रदेश, पंजाबसह एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारनं अर्थसंकल्प सादर केला असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

आजचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा; अर्थसंकल्पावरून राजू शेट्टी यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचा खुशाल समर्थन करावे. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांला खड्ड्यात घालणारा आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पा बाबत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी, महिला, बँकिंग, सहकार, कॉपोरेट क्षेत्र, डिजिटल सेवा यासह अनेक क्षेत्राबाबत सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. याचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदीसाठी २ लाख ४७ हजार कोटीची तरतूद केली होती. पण सरकारने सगळा शेतीमाल खरेदी केला नाही. मात्र पैसे सगळे खर्च झाले.

यावर्षी त्यामध्ये १० हजार कोटीची कपात केली आहे. अर्थसंकल्पात २ लाख ३७ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. म्हणजे गेल्यावर्षी पेक्षा १० हजार कोटींनी जी तरतूद कमी आहे तिथे स्वागत करण्यासारखे आहेच काय? शिवाय गेल्या वर्षी एकूण बजेटच्या ४.३६ टक्के तरतूद शेतीसाठी होती. यावर्षी ती ३.७६ इतकी करण्यात आली आहे. म्हणजे पाऊण टक्क्यांनी शेतीचे बजेट कापण्यात आले आहे, असे यावेळी राजू शेट्टी यांनी म्हंटले.

कंटेनर पलटी होऊन थेट रिक्षाला धडकला अन्….; मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन। मुंबई पुणे महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनर पलटी होऊन थेट रिक्षाला धडक दिली आहे. आज (1 फेब्रुवारी 2022) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र साठे मिसळजवळ पुण्यावरून मुंबईकडे अतिवेगाने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. आणि 15 ते 20 फूट दूर फरफटत गेला. या अपघातात कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली ज्यामुळे रिक्षाचा चेंदामेंदा झाला.

या अपघातात रिक्षामध्ये असलेल्या तीन महिला आणि रिक्षा चालक जखमी झाले आहेत. जखमींवर लोणावळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कंटेनर चालक सुखरूप बचावला आहे.

Budget 2022 : “कर वाढवावा असे पंतप्रधान मोदींना वाटत नव्हते” – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

कर का वाढवला नाही ?
“आम्ही कर वाढवला नाही. अतिरिक्त कर देऊन एक पैसाही मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तूट कितीही असली तरी महामारीच्या काळात जनतेवर कराचा बोजा लादू नका, असा गेल्या वेळी पंतप्रधानांचा आदेश होता. यावेळीही तशाच सूचना देण्यात आल्या होत्या.”अर्थमंत्र्यांनी सांगितले.

कर न वाढवण्याचा मोठा दिलासा – अर्थमंत्री
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”कर न वाढवणे हा सर्वात मोठा दिलासा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर वाढवण्याच्या बाजूने नव्हते. गेल्या वर्षी आणि या वर्षीही कर वाढवून एक पैसाही कमावण्याचा प्रयत्न केला गेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणे महामारीच्या वेळी जनतेवर बोझा पडू नये, असा पंतप्रधानांचा आदेश होता. यंदाही तसेच होते. यंदाही आम्ही करात कोणतीही वाढ केलेली नाही.”

देशात प्रथमच पर्वतमाला योजना सुरू – पंतप्रधान मोदी
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात प्रथमच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह ईशान्येकडील राज्यांसाठी पर्वतमाला योजना सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये आधुनिक वाहतूक व्यवस्था, कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि सीमावर्ती गावे मजबूत होतील.

उद्या सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाबाबत बोलू – पंतप्रधान मोदी
बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात मी अर्थसंकल्पाबाबत माझे म्हणणे मांडणार असून त्यात अर्थसंकल्पाशी संबंधित इतर गोष्टींवर माझे म्हणणे मांडणार असल्याचे पीएम मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पाचे प्रत्येक क्षेत्राने स्वागत केले असून, प्रत्येक गावात इंटरनेट पोहोचवण्यास या अर्थसंकल्पाची मदत होईल, असेही ते म्हणाले.

राजकीय पाठबळाशिवाय विद्यार्थ्यांचे आंदोलन शक्य नाही; संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑफलाईन परीक्षेच्या निषेधार्थ 31 जानेवारी रोजी धारावी येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकही केली आहे. याबाबात शिवसेना खासदार संजय राऊत यां प्रतिक्रिया दिली आहे. विध्यार्थांनी जे आंदोलन केले ते राजकीय पाठबळ असल्याशिवाय शक्य नाही. यामागे नक्कीच राजकीय हात आहे, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल जे विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले त्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आंदोलन शक्य नाही. काही राजकीय लोक समाजमाध्यमांच्या साहाय्याने मुलांना बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयावरून 31 जानेवारी रोजी हजारो विद्यार्थ्यांनी चांगलाच आक्रमक पावित्रा घेतला होता. त्यांनी धारावीमध्ये रस्त्यावर उतरत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराला घेरावही घातला. प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार हिंदुस्तानी भाऊ याच्या आवाहनानंतरच विद्यार्थ्यांनी धारावीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊवर कायदेशीर कारवाई करीत त्याला अटकही केली.